Aadhaar CardNew Post

मास्क आधार कार्ड: म्हणजे काय ?, डाउनलोड कसे करायचे, फायदे, कुठे वापरावे व का वापरावे ?

नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन लेखात तुमचे पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला मास्क आधार कार्ड (Masked Aadhaar Card) विषयी माहिती सांगणार आहोत. या लेखात आपण मास्क आधार म्हणजे काय, त्याचे फायदे काय आहेत, ते कसे डाउनलोड करावे, व कुठे वापरायचे, अश्या सर्व प्रकारच्या गोष्टीं बद्दल जाणून घेणार आहोत. थोडक्यात काय तर मास्क आधार विषयी सर्व सविस्तर माहिती तुम्हाला एकाच ठिकाणी म्हणजे आमच्या या लेखात मिळणार आहे. त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

Masked Aadhaar Card information in Marathi

मित्रांनो, कोणत्याही सरकारी कामासाठी किंवा सरकारी योजनांचा लाभ घेता यावा यासाठी आधार कार्ड खूप गरजेचे असते. तसेच तुम्हाला जर ओळखीचा पुरावा मागितला ते अश्या वेळेस आधार कार्ड दाखवावे लागते. याशिवाय बँक खाते उघडण्यासाठी तसेच काही खाजगी कामांसाठी सुद्धा आधार कार्ड खूप महत्त्वाचे असते. या सर्व गोष्टींमुळे आधार कार्ड हे एक महत्वाचे व अनिवार्य कागदपत्र बनले आहे. पण अनेक वेळा आधार कार्डचा दुरूपयोग केल्याच्या घटना आपण ऐकत असतो. आणि आता तर आधार कार्डचा उपयोग करून तुमची फसवणूक होऊ शकते हे सरकार ने सुद्धा मान्य केले आहे. असे फसवणुकीचे किंवा आधार कार्डचा गैरवापर करण्याचे प्रकार थांबवण्यासाठी सरकारने आधार कार्ड डाउनलोड बद्दल एक अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी मास्क आधार कार्ड डाउनलोड करावे व आधार कार्डची झेरॉक्स (फोटोकॉपी) देण्याऐवजी लोकांनी मास्क आधार देण्याची सूचना सरकार कडून करण्यात आली आहे. या बद्दल सर्व माहिती आता आपण जाणून घेऊ या…



मास्क आधार कार्ड म्हणजे काय ?

What Is A Masked Aadhaar Card ?

मित्रांनो, मास्क आधार कार्ड म्हणजे हे कार्ड तुमच्या आधीच्या आधार कार्ड सारखेच असते फक्त यात तुमचा जो 12 अंकी आधार नंबर असतो. त्यात थोडा बदल करण्यात आला आहे. यात तुमचे पूर्ण 12 अंक दिसत नाहीत. फक्त शेवटचे 4 अंक दिसतात व बाकीच्या अंकाच्या ठिकाणी चुकीच्या (XXXX) फुल्या मारलेल्या आहेत. यामुळे तुमच्या आधार कार्डचा गैरवापर थांबवता येईल. तसेच नागरिकांनी कोणत्याही कामाच्या ठिकाणी आधार कार्डची फोटो कॉपी देण्याऐवजी मास्क आधार कार्ड द्यावे असे सरकारने सुचवले आहे. कारण असे न केल्यास तुमच्या आधार कार्ड नंबर वरून कोणीही तुमचा डेटा चोरू शकतो, यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान ही होऊ शकते. म्हणून सर्व नागरिकांना मास्क आधार वापरण्याचा सल्ला सरकारने दिला आहे.

मास्क आधार कार्ड का व कुठे वापरावे

मित्रांनो, मास्क आधार कार्ड वापरल्याने सुरवातीचे आठ अंक लपवले जातात आणि फक्त शेवटचे चार अंक दाखवले जातात. यामुळे तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक केलेली तुमची सर्व वैयक्तिक माहिती संरक्षित राहते. म्हणून मास्क आधार आवर्जून वापरावे. तसेच कोणत्याही खाजगी कामासाठी किंवा सरकारी कामासाठी, किंवा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी, जॉबच्या ठिकाणी, तुम्ही हे मास्क आधार वापरू शकता. तसेच हॉटेल्स, पर्यटन स्थळी किंवा सिनेमा हॉलमध्ये किंवा एखाद्या खाजगी संस्थेला तुमचे आधार कार्डची झेरॉक्स घेण्याची किंवा ठेवून घेण्याची परवानगी नाही. असे केल्यास त्या लोकांनी आधार कार्ड कायदा 2016 चे उल्लंघन केल्याचे समजले जाईल. एखादी संस्था UIDAI लायसन्स धारक आहे की नाही ते माहीत करून घेऊन मगच तुमचे आधार कार्ड द्यावे. या शिवाय कोणत्याही सार्वजनिक सायबर कॅफे मधून, किंवा माहीत नसलेल्या सार्वजनिक WIFI सेवा वापरून इ-आधार कार्ड डाउनलोड करणे टाळावे. जरी कधी वापरलेत तर त्या कम्प्युटरच्या डाउनलोड मधून तुमचे आधार कार्ड डिलीट करून टाका.

मास्क आधार कार्ड डाउनलोड करणे

How to Download Masked Aadhaar Card

आता मास्क आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे ते जाणून घेऊ या



स्टेप 1: मित्रांनो, मास्क आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटर च्या गुगल क्रोम मध्ये जायचं आहे व सर्च बटन मधून UIDAI सर्च करायचे आहे व नंतर तुमच्या समोर UIDAI.gov.in ची लिंक दिसेल त्या लिंक वर क्लीक करायचे आहे.

किंवा इथे क्लिक करा => UIDAI.gov.in

How to Download Masked Aadhar Card Step 1

स्टेप 2: लिंक ओपन केल्यावर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल त्यावर Get Aadhaar या ऑप्शनच्या खाली Download Aadhaar असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करायचे आहे.

How to Download Masked Aadhar Card Step 2

स्टेप 3: क्लीक केल्यानंतर तुमच्या समोर एक दुसरे पेज ओपन होईल ज्यावर Welcome to myAadhaar असे लिहिले असेल. त्याच्या खाली असलेल्या Login बटन वर क्लिक करायचे आहे.

How to Download Masked Aadhar Card Step 3

स्टेप 4: या पेज वर तुम्हाला दिलेल्या बॉक्स मध्ये तुमचा 12 अंकी आधार नंबर टाकायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला इथे तोच आधार नंबर टाकायचा आहे ज्याला तुम्ही मास्क आधार मध्ये डाउनलोड करायचे आहे. आता या नंतर तुम्हाला दिलेला कॅपचा टाकायचा आहे व खाली Send OTP वर क्लीक करायचे आहे.

आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल तो Enter OTP बॉक्स मध्ये टाकायचा आहे, आणि Login बटन वर क्लीक करायचे आहे.

How to Download Masked Aadhar Card Step 4

स्टेप 5: आता नवीन पेज वर तुम्हाला Download Aadhaar ऑपशन वर क्लीक करायचे आहे.

How to Download Masked Aadhar Card Step 5

स्टेप 6: मित्रांनो, या पेज वर तुम्ही तुमचे ओरिग्नल आधार कार्डला PDF मध्ये डाउनलोड करू शकता, त्याचबरोबर याच पेज वर तुम्ही तुमचे मास्क आधार पण डाउनलोड करू शकता, हे मास्क आधार डाउनलोड करण्यासाठी Do you want a masked Aadhaar या ऑपशन वर टिक करून खाली असलेल्या Download बटन वर क्लिक करायचे आहे.

How to Download Masked Aadhar Card Step 6

स्टेप 7: आता तुमचे मास्क आधार डाउनलोड व्हायला सुरुवात होईल, आणि पूर्ण झाल्यावर तुम्हाला Congratulation !!! असा मेसेज येईल

How to Download Masked Aadhar Card Step 7

आता तुमच्या मोबाइल मधल्या मास्क आधारची PDF उघडताना तुम्हाला पासवर्ड विचारला जाईल. UIDAI ने आधार कार्डच्या सुरक्षेसाठी तुमच्या मास्क आधारकार्ड PDF ला आठ अक्षरी-अंकी पासवर्ड सेट केलेला आहे. तो काय आहे ते बघू

उदाहरण – तुमचे नाव Sachin आहे आणि जन्म वर्ष 1973 आहे तर तुमचा पासवर्ड इंग्लिश कॅपिटल लेटरमध्ये तुमच्या नावाचे पहिले चार अक्षरे (SACH) आणि जन्म वर्ष (1973) दोन्ही मिळून आठ अक्षरी पासवर्ड SACH1973 असा तयार होईल.

पासवर्ड टाकल्या नंतर तुमचे मास्क आधार कार्ड तुम्हाला दिसेल. या मास्क आधार कार्डची पुढची आणि मागची अशी दोन्ही बाजू दिसतील. तुम्हाला जर याची प्रिंट हवी असेल तर प्रिंट काढू शकता किंवा PDF च्या स्वरूपात सेव्ह करून ठेवू शकता.

मास्क आधार कार्ड चे फायदे

Benefits of Masked Aadhaar Card

मित्रांनो, मास्क आधार कार्डचा सर्वात मोठा फायदा असा आहे की तुमचे मास्क आधार कार्ड जरी हरवले तरी ही तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही कारण मास्क आधार कार्डचा कोणीही गैरवापर करू शकणार नाही. तसेच तुमचे मास्क आधार कार्ड हरवल्या नंतर तुम्ही ते परत eaadhaar.uidai.gov.in या लिंक वरून कधीही डाउनलोड करून घेऊ शकता.

तसेच ट्रेन मध्ये, एअरपोर्ट वर किंवा हॉटेल मध्ये ओळखीचा पुरावा म्हणून तुम्ही मास्क आधार वापरू शकता.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे तुम्ही तुमचे मास्क आधार कार्ड सर्व ठिकाणी वापरू शकता. पण काही सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी जसे की प्रधानमंत्री उज्वला योजना, LPG सबसिडी वगैरेसाठी तुम्ही या मास्क आधार चा वापर नाही करू शकत.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण मास्क आधार बद्दल सर्व माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करतो की तुम्हाला आमचा आजचा हा लेख नक्की आवडला असेल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पुर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!