7/12 UttaraMaharashtra Land Records & Satbara 7/12

प्लॉटचा किंवा शेत जमिनीचा नकाशा (Land Map) ऑनलाईन कसा पहायचा? | Maharashtra Bhu Nakasha Download


नमस्कार मित्रांनो, आज आपण प्लॉटचा किंवा शेत जमिनीचा नकाशा (Land Map) ऑनलाईन कसा पहायचा व त्याला pdf रुपात डाउनलोड कसा करायचा, या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

Maharashtra Bhu Nakasha Download Kasa Karaycha

मित्रांनो, आजकाल जवळजवळ सगळ्याच गोष्टी इंटरनेट मुळे ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करण्याची तरतूद झाली आहे, आणि तसं पाहिलं तर हीच काळाची गरज बनत चालली आहे. कोणतेही काम असो किंवा एखादे शासकीय स्तरावरील कामे असो, सर्व प्रकारचे काम आता ऑनलाइनच होतात. आणि आता तर काय शासनाच्या ऑफिशियल पोर्टल वरून प्रॉपर्टी व्यवहाराशी संबंधित कामे सुद्धा आपण घरबसल्या करू शकतो.



मित्रांनो, आजकाल बऱ्याच जणांकडे एखादा प्लॉट किंवा घर किंवा एखादी जमीन असते. पूर्वी काय व्हायचं की, जर एखाद्या वेळी तुम्हाला तुमच्या जमिनीचा किंवा प्लॉट चा नकाशा पहायचा असेल तर मग तहसील कार्यालय ची चक्कर मारावी लागायची. आणि तरीही वेळेवर जमिनीचा नकाशा (land map) मिळत नव्हता. पण मित्रांनो, आता आपण जवळजवळ सगळ्याच गोष्टी इंटरनेट मुळे ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करू शकतो. कोणतेही काम असो किंवा एखादे शासकीय स्तरावरील कामे असो, सर्व प्रकारचे काम आता ऑनलाइनच होतात. आणि आता तर काय शासनाच्या ऑफिशियल पोर्टल वरून प्रॉपर्टी व्यवहाराशी संबंधित कामे सुद्धा आपण घरबसल्या करू शकतो.

जर तुम्हाला 7/12 फ्री मध्ये पाहायचा असेल तर हा लेख वाचा: सातबारा (7/12) ऑनलाईन डाउनलोड करा (Free मध्ये)

त्यातल्या त्यात आपल्या जमिनीचा नकाशा हा आता आपल्याला ऑनलाईन बघता येणार आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की याचा उपयोग काय होईल. तर मित्रांनो, तुम्हाला जर कधी शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा तुमच्या जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायच्या असतील तर तुमच्या कडे तुमच्या जमिनीचा नकाशा असणं आवश्यक असतं. आता हाच जमिनीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने कसा बघायचा ते आपण पुढे जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा बघायचा

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला भूमिअभिलेख च्या ऑफिशियल वेबसाईट bhumiabhilekh.maharashtra.gov.in यावर जायचे आहे.

स्टेप 2: आता वेबसाईट ओपन झाल्यावर पोर्टल च्या डाव्या बाजूला तुम्हाला सेवा असा ऑप्शन बघायला मिळेल. त्यात तुम्हाला ई- नकाशा/ भु- नकाशा असा ऑप्शन बघायला मिळेल. त्यावर क्लिक करायचे आहे.



Shet Jaminicha Nakasha Kasa Baghaycha Step 2

स्टेप 3: या नंतर नेक्स्ट पेज मध्ये भु नकाशाचे पोर्टल उघडेल. त्यात तुम्हाला स्टेट टाकायचे आहे. त्या नंतर कॅटेगरी या ऑप्शन मध्ये rural किंवा urban हा ऑप्शन निवडायचा आहे. म्हणजे तुम्ही शहरी (urban) भागात राहता की ग्रामीण (rural) भागात राहता ते टाकायचे आहे. त्यानंतर तुमचे डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा टाकायचा आहे, व नंतर तालुका सिलेक्ट करून टाकायचा आहे. व त्या नंतर तुमच्या गावाचे नाव निवडायचे आहे.

Shet Jaminicha Nakasha Kasa Baghaycha Step 3

मित्रांनो, पुढे आता तुम्हाला Village Map म्हणजे गावाचा नकाशा दाखविला जाईल. पण इथे तुम्ही एखाद्या ठराविक प्लॉट चा नकाशा सुद्धा बघू शकता. त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या Search by plot no. किंवा Select by plot no. या ऑप्शन मध्ये तुमचा प्लॉट चा नंबर किंवा सर्वे नंबर टाकायचा आहे. व प्लॉट नंबर टाकल्या नंतर ज्या व्यक्तीचा तो प्लॉट आहे त्याची सर्व माहिती बघायला मिळेल. ज्यात त्या व्यक्तीचे नाव, त्याच्या नावावर किती क्षेत्र आहे, खातेदार किती आहे, सामाईक क्षेत्र किती आहे या सगळ्या बद्दलची माहिती व नकाशा दाखवला जातो.

Shet Jaminicha Nakasha Kasa Baghaycha Step 3 Sub-Step 2

स्टेप 4: मित्रांनो, आता या नकाशाची पीडीएफ (pdf) काढायचा असेल तर डाव्या बाजूला खाली Map Report या ऑप्शन वर क्लिक करायच आहे.

Shet Jaminicha Nakasha Kasa Baghaycha Step 4

स्टेप 5: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुम्ही टाकलेल्या प्लॉट नंबर चा संपूर्ण नकाशा तुम्हाला स्केल रुपात दाखवला जाईल. ही स्केल तुम्ही चेंज ही करू शकता. तसेच या प्लॉट वरील सर्व खातेधारकांची माहिती, कोणाच्या नावावर किती क्षेत्र आहे, त्याचे खाते नंबर वगैरे सर्व माहिती तुम्ही इथे पाहू शकता. व नंतर तुम्ही ही pdf डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड ऍरो वर क्लिक करून तुमच्या प्लॉटचा नकाशा डाउनलोड करू शकता.

Shet Jaminicha Nakasha Kasa Baghaycha Step 5
नंबरशेतीसाठी महत्वाची माहिती
1प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन फ्री मध्ये कसं काढायचं?
2(7/12) सातबारा उताऱ्यात मोठा बदल
3डिजिटल 7/12 उतारा डाउनलोड कसा करायचा?
4किसान सुविधा पोर्टल माहिती: खतांचे बाजार भाव, पीक विमा

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण प्लॉटचा किंवा शेत जमिनीचा नकाशा (Land map) ऑनलाईन कसा पहायचा, व तो pdf मध्ये डाउनलोड कसा करायचा, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!