ShetkariYojana Anudan

ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा? | MahaDBT Tractor Yojana Apply Online

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आमच्या आज च्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्या साठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा? या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

MahaDBT Tractor Yojana Apply Online

मित्रांनो, आपला भारत हा एक कृषि प्रधान देश असून सध्या शेती मध्ये यांत्रिकीकरण वाढले आहे. परंतु काही वर्षांपूर्वी बघितले तर आधी बैलांच्या सहाय्याने शेतीची पूर्ण मशागत केली जायची. एवढंच नाही तर अजूनही काही ग्रामीण भागात शेतकरी बैलांच्या सहाय्यानेच शेतीची मशागत करताना दिसतात. अगदी शेतात पेरणी करण्यापासून ते आलेल्या पिकाची वाहतूक करण्या पर्यंत सर्व कामे बैलाच्या सहाय्याने केली जातात. मात्र आता शेती करायची म्हटलं कि ट्रॅक्टर आधी घेतात. कारण ट्रॅक्टर मुळे पूर्ण दिवसाचे चालणारे काम हे अगदी काही तासातच होते, शिवाय आजकाल शेतीच्या कामासाठी मजूर मिळणे देखील खूप कठीण झाले आहे. यामुळे शेतीसाठी वेळेची बचत करायची असेल तर ट्रॅक्टर तर हवाच.



परंतु ट्रॅक्टर घ्यायचा म्हटलं तर त्यासाठी खर्च ही जास्त येतो. परंतु आता शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही. कारण आता शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेता यावा, यासाठी सरकारने एक महत्वाची योजना आणली आहे, ती म्हणजे”ट्रॅक्टर अनुदान योजना”.

मित्रांनो, या योजने द्वारे पात्र शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी आर्थिक सहाय्य म्हणजे च अनुदान दिले जाते. त्यामुळे अल्प भूधारक आणि मध्यम शेतकऱ्यांनाही ट्रॅक्टर सारखी महागडी शेती उपकरणे परवडण्या सारखी होतात. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी सरकारच्या अधिकृत पोर्टल वर जाऊन ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक असते. मात्र त्या आधी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया समजून घेणे शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे, कारण चुकीची माहिती दिली तर अर्ज फेटाळला जाऊ शकतो.

नंबरशेतीसाठी महत्वाची माहिती
1तुमच्या जमिनीवर कधीच कब्जा होणार नाही, हे वाचा
2प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन फ्री मध्ये कसं काढायचं?
3(7/12) सातबारा उताऱ्यात मोठा बदल
4डिजिटल 7/12 उतारा डाउनलोड कसा करायचा?
5किसान सुविधा पोर्टल माहिती: खतांचे बाजार भाव, पीक विमा

या प्रक्रिये मध्ये अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे, पोर्टल वर लॉगिन कसे करावे, अश्या सर्व प्रकारच्या गोष्टीं बद्दल तसेच ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा?, याची टप्प्या टप्प्याने आणि सोप्या भाषेत आज आपण माहिती घेणार आहोत, जेणेकरून कोणताही शेतकरी सहजतेने या योजनेचा लाभ घेऊ शकेल. त्यामुळे सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा….

किती अनुदान दिले जाते?

मित्रांनो, ट्रॅक्टर अनुदान योजनेत लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान मिळतं आणि ते जास्तीत जास्त 1,25,000 रुपये इतके अनुदान दिले जाते. यात ही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.



ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा

MahaDBT Tractor Yojana Apply Online Step 1

स्टेप 1:- मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला mahadbtmahait.gov.in ता वेबसाईट वर जायचे आहे. त्या नंतर लॉगिन करण्यासाठी ‘वैयक्तिक शेतकरी’ हा पर्याय निवडून नंतर खाली तुमचा फार्मर आयडी टाकायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला जर फार्मर आयडी माहीत नसेल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही तुमचा फार्मर आयडी जाणून घेऊ शकता. तर फार्मर आयडी टाकल्यानंतर ‘ओटीपी पाठवा’ या बटन वर क्लिक करायचं आहे.

तुम्ही शेतकरी ओळखप नसेल तर हा लेख वाचा => शेतकरी ओळखपत्राची नोंदणी मोबाईल वरून

स्टेप 2:- आता तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवला जाईल, तो दिलेल्या जागी टाकून ‘ओटीपी तपासा’ या बटन वर क्लिक करायचे आहे. नंतर प्रोसेसिंग होईल व तुम्हाला तुमची प्रोफाइल कम्प्लिट आहे की नाही ते सांगितलं जाईल. जर प्रोफाइल पूर्ण नसेल तर ते आधी करून घ्यायचं आहे.

MahaDBT Tractor Yojana Apply Online Step 2

स्टेप 3:- मित्रांनो, प्रोफाइल कम्प्लिट झाल्यावर तुम्हाला नेक्स्ट पेज वर डाव्या बाजूला दिलेल्या ‘घटकासाठी अर्ज करा’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

MahaDBT Tractor Yojana Apply Online Step 3

स्टेप 4:- त्या नंतर कृषी यांत्रिकीकरण मधील ‘बाबी निवडा’ या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.

MahaDBT Tractor Yojana Apply Online Step 4

स्टेप 5:- आता नेक्स्ट पेज वर मुख्य घटक मध्ये तुम्हाला ‘कृषी यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य’ हा पर्याय निवडायचा आहे. नंतर तपशील मध्ये ‘ट्रॅक्टर’ या पर्याय निवडायचा आहे. तर व्हील ड्राइव्ह प्रकार या मध्ये ‘2 डब्ल्यू डी’ किंवा ‘4 डब्ल्यू डी’ या पैकी तुम्हाला जो प्रकार हवा आहे तो प्रकार निवडायचा आहे.

MahaDBT Tractor Yojana Apply Online Step 5

त्या नंतर एच पी श्रेणी मध्ये 31 ते 40 पी टी ओ एचपी, 41 ते 70 पी टी ओ एचपी, 8 ते 30 पी टी ओ एचपी यापैकी तुम्हाला हवी ती एचपी श्रेणी निवडायची आहे. नंतर खाली दिलेल्या बॉक्स मध्ये टिक करून ‘जतन करा’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

स्टेप 6:- त्या नंतर तुमचा अर्ज समाविष्ट केला जाईल. व खाली सुद्धा तुम्ही केलेला अर्ज ऍड झालेला दिसेल.

MahaDBT Tractor Yojana Apply Online Step 6

स्टेप 7:- आता परत मागे येऊन ‘घटकासाठी अर्ज करा’ या ऑप्शन वर क्लिक करून निळ्या रंगात दिलेल्या ‘अर्ज सादर करा’ या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

त्या नंतर ओपन झालेल्या विंडो मध्ये Ok करून पुढच्या पेज वर ‘पाहा’ या बटन वर क्लिक करायचं आहे.

MahaDBT Tractor Yojana Apply Online Step 7

स्टेप 8:- त्या नंतर तुमचा अर्ज दाखवला जाईल. तसेच या अर्जासाठी लागणाऱ्या अटी व शर्ती मान्य करून ‘अर्ज सादर करा’ बटन वर क्लिक करायचं आहे. या नंतर लगेचच Success मध्ये ‘देय यशस्वी’ असा मेसेज येईल. म्हणजेच तुमचा अर्ज केला गेला आहे.

MahaDBT Tractor Yojana Apply Online Step 8

स्टेप 9:- त्या नंतर ‘लागू केलेले घटक’ मध्ये जाऊन तुम्ही केलेला अर्ज बघू शकता. तसेच इथून ‘अर्ज स्थिती’ मध्ये तुमच्या अर्जाची स्थिती तुम्ही पाहू शकता व ‘पावती पहा’ वर क्लिक करून तुम्ही याची पावती सुद्धा काढून घेऊ शकता.

MahaDBT Tractor Yojana Apply Online Step 9

अशा पद्धतीने तुम्ही ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद.

FAQ

ट्रॅक्टर अनुदान योजना म्हणजे काय?

मित्रांनो, ही केंद्र किंवा राज्य शासनाची योजना आहे, ज्यामध्ये पात्र शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी आर्थिक अनुदान दिले जाते, जेणेकरून शेतीसाठी यांत्रिकीकरण शक्य होईल.

ट्रॅक्टर अनुदान योजना योजना कोणासाठी आहे?

मित्रांनो, ही योजना प्रामुख्याने लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी आहे. वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, सहकारी संस्था हे देखील अर्ज करू शकतात.

ट्रॅक्टर वर किती टक्के अनुदान मिळते?

मित्रांनो, अनुदानाची टक्केवारी राज्य व लाभार्थ्याच्या प्रवर्गानुसार बदलते. सामान्यतः 50 टक्के पर्यंत अनुदान मिळते व जास्तीत जास्त 1,25,000 पर्यंत अनुदान मिळते.

अर्ज केल्यानंतर पुढील प्रक्रिया काय असते?

मित्रांनो, अर्ज केल्या नंतर अर्जाची छाननी कृषी विभाग द्वारे केली जाते. त्या नंतर पात्र असल्यास मंजुरी मिळते. शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करतो व त्याची बिले व कागदपत्रे सादर केल्या नंतर अनुदान थेट बँक खात्यात जमा होते.

Tags: tractor anudan yojana maharashtra 2025 online apply, tractor subsidy yojana 2025, new tractor subsidy scheme 2025, ट्रॅक्टर अनुदान योजना 2025, मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना, ट्रॅक्टर अनुदान योजना फॉर्म कसा भरावा 2025-26, mahadbt tractor yojana 2025 form kaise bhare, mahadbt tractor yojana 2025 online apply, mahadbt tractor yojana 2025 subsidy, tractor yojana maharashtra 2025, mini tractor yojana 2025 maharashtra, anudan yojana, subsidy yojana, tractor anudan yojana, tractor

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!