घरबसल्या मोबाईल ॲप मधून मतदान कार्ड ला आधार लिंक करा | Link Voter ID with Aadhaar Card
नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी मतदान कार्ड संबंधित खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो, आजच्या लेखात आपण मतदान कार्ड ला आधार कार्ड Voter Helpline अँपच्या मदतीने लिंक कसे करायचे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
भारतीय निवडणूक आयोगाने, सोमवार, 1 ऑगस्ट 2022 पासून महाराष्ट्रातील लोकांना मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्यास सांगून अधिकृतपणे मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश म्हणजे मतदार यादीतील डुप्लिकेट आणि बोगस नोंदणी काढून टाकणे आहे. आधार आणि मतदान ओळखपत्र लिंक केल्यामुळे मतदाराची ओळख पटवणं अधिक सोपं होणार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.
आधार-मतदान ओळखपत्र लिंक करण्याची प्रोसेस खूप सोपी आहे. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन हि प्रोसेस पूर्ण करू शकता. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
मतदान कार्ड ला आधार कार्ड अँप द्वारे लिंक करणे
चला तर मग मतदान कार्ड ला आधार कार्ड भारतीय निवडणूक आयोगाच्या Voter Helpline मोबाईल अँप द्वारे एकमेकांशी कसे लिंक करायचे ते बघू.
स्टेप 1: सर्वात पहिले तुम्हला तुमच्या गूगल प्ले स्टोर मध्ये जाऊन Voter Helpline अँप इन्स्टॉल करायचे आहे.
स्टेप 2: अँप इन्स्टॉल झाल्यावर ते उघडा, आता तुमच्या समोर Disclaimer ची माहिती दिसेल, खाली असलेल्या I Agree वरची टिक करा आणि Next बटन वर क्लिक करा.
स्टेप 3: आता तुम्हाला अँपची भाषा निवडायची आहे. आम्ही येथे English निवडत आहोत.
स्टेप 4: आता नवीन पेज वर तुम्हाला Voter Registration बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 5: तुमच्या समोर वेगवेगळ्या फॉर्म ची लिस्ट दिसेल त्यातील Electoral Authentication Form (Form B) वर क्लिक करा. हा फॉर्म मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्यासाठी वापरला जातो.
स्टेप 6: आता Let’s Start बटन वर क्लिक करा.
स्टेप 7: आता नवीन पेज वर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, व Send OTP या बटन वर क्लिक करायचे आहे. ओटीपी आल्यानंतर तो दिलेल्या बॉक्स मध्ये टाकायचा आहे व नंतर Verify OTP या बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 8: आता नवीन पेज उघडेल त्यावर तुम्हाला दोन ऑपशन दिसतील
- Yes, I have Voter ID number
- No, I don’t have Voter ID number
या दोघांपैकी तुम्हाला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. व खाली दिलेल्या Next बटन क्लिक करायचे आहे.
जर तुम्हाला तुमचा मतदान नंबर माहित नसेल तर दुसरा पर्याय निवडा, आणि खाली उघडलेल्या फॉर्म मध्ये तुमची वैयक्तिक माहिती टाकून तुमचा मतदान नंबर शोधू शकता.
स्टेप 9: आता तुम्हाला तुमचा मतदान कार्ड नंबर टाकायचा आहे, आणि खाली महाराष्ट्र राज्य निवडायचे आहे. नंतर Fetch details बटन वर क्लिक करा. तुमचा मतदान नंबर बरोबर असेल तर खाली एक मेसेज येईल. ( We have Found this record for your enter Voter ID…. ) असा मेसेज आल्यानंतर Proceed बटन वर क्लिक करा.
स्टेप 10: आता नवीन पेज वर तुमची आयोगाकडे असलेली वैयक्तिक माहिती येईल. ती एकदा चेक करून घ्या. आणि Next बटन वर क्लिक करा.
स्टेप 11: आता वेळ आली आहे ती तुमचा आधार कार्ड नंबर लिंक करण्याची. आता नवीन पेज वर तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, आणि त्याखाली Place या ऑपशन मध्ये तुमच्या गावाचं नाव टाकायचे आहे. आणि Done बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 12: फॉर्म सबमिट झाल्यावर तुम्हाला इथे एक Reference ID दिला जाईल. तो तुम्ही Save करून ठेवायचा आहे. कारण तो Reference ID तुम्हाला नंतर स्टेटस चेक करण्यासाठी लागणार आहे (म्हणजेच तुमचे लिंकिंचे काम कुठेपर्यंत आले आहे ते तपासण्यासाठी).
स्टेप 13: आता होम पेज वरती येऊन तुम्ही लिंकिंगचा स्टेटस चेक करू शकता, त्यासाठी तुम्हाला उजव्या कोपऱ्यात असलेल्या Explore बटन वर क्लिक करायचे आहे. नंतर Status Of Application ऑपशन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 14: आता तुमचा Reference ID टाकून तुम्ही तुमच्या लिंकिंगचा स्टेटस चेक करू शकता.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्याची पूर्ण प्रोसेस म्हणजेच माहिती बघितली. आशा आहे की तुम्हाला आज चा लेख नक्कीच आवडला असेल. तसेच हा महत्वपूर्ण लेख तुमच्या मित्र-मंडळीं सोबत नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचा फायदा होईल. धन्यवाद।