मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक करा (2 मिनिटात) | How to Link Voter ID Card to Aadhar Card Online
नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन नवीन व खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो, आजच्या लेखात आपण मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक कसे करायचे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, सरकार ने जसे आधार आणि पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य केले होते, तसेच आता तुम्हाला तुमचं मतदान कार्ड आणि आधार कार्ड लिंक करायचे आहे. 1 ऑगस्ट पासून मतदान आधार कार्ड लिंक करण्याचे कॅम्पेन सुरू होत आहे. याबद्दल महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी अशी माहिती दिली की
बोगस मतदान व मतदार ओळखण्यासाठी तसेच मतदारांची ओळख पटवण्यासाठी, मतदार यादी तील लोकांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मतदान कार्ड व आधार कार्ड लिंक करणे खूप गरजेचे आहे.
हे हि वाचा – घरबसल्या मोबाईल ॲप (Voter Helpline) मधून मतदान कार्ड ला आधार लिंक करा
पण हे मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक कसे करायचे ते बऱ्याच जणांना माहीत नाही. त्यासाठी आम्ही आज चा हा लेख घेऊन आलो आहोत. या लेखात तुम्ही घर बसल्या मोबाईलच्या सहाय्याने तुमचे मतदान कार्ड व आधार कार्ड एकमेकांशी कसे लिंक करू शकता या बद्दल तुम्हाला माहिती मिळणार आहे. त्यामुळे शेवट पर्यंत हा लेख नक्की वाचा.
मतदान कार्ड ला आधार कार्ड मोबाईल द्वारे लिंक करणे
चला तर मग मतदान कार्ड आणि आधार कार्ड मोबाईल द्वारे एकमेकांशी कसे लिंक करायचे
स्टेप 1:
मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हला तुमच्या गुगल मध्ये जाऊन NVSP सर्च करायचे आहे, जो पहिला रिझल्ट येईल त्यावर क्लिक करायचे आहे किंवा तुम्ही या लिंकला www.nvsp.in क्लिक करून थेट NVSP चे पोर्टल ओपन करू शकता.
स्टेप 2:
NVSP चे पोर्टल ओपन झाल्यावर तुम्हाला Login/Register या बटन वर क्लीक करायचे आहे.
अधिक माहिती – तुम्हाला या पेज वर जी फॉर्म ची लिस्ट दाखवली जात आहे याचा अर्थ म्हणजे तुम्ही या पोर्टलवर पुढील फॉर्म ऑनलाईन भरू शकता. जो फॉर्म मतदान कार्ड आणि आधार कार्ड लिंक करून देतो त्याचे नाव आहे Form 6B-Information of Aadhaar Number by Existing Electors
स्टेप 3:
तुमचे जर NVSP पोर्टल वर आधीपासून अकाउंट असेल तर तुम्ही तुमचे Username व Password टाकून लॉग इन करा. पण जर तुमचे अकाउंट नसेल तर खाली एक ऑपशन दिला आहे, Don’t have account, Register as a new user या ऑपशन वर क्लीक करायचे आहे.
स्टेप 4:
आता या पोर्टल वर नवीन अकाउंट उघडण्याची प्रक्रिया बघू: आता नवीन पेज वर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून दिलेला कॅपचा (Captcha) टाकायचा आहे, व Send OTP या बटन वर क्लिक करायचे आहे. ओटीपी आल्यानंतर तो दिलेल्या बॉक्स मध्ये टाकायचा आहे व नंतर Verify OTP या बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 5:
आता नवीन पेज उघडेल त्यावर तुम्हाला दोन ऑपशन दिसतील
- I have EPIC number
- I don’t have EPIC number
या दोघांपैकी तुम्हाला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. व खाली दिलेल्या बॉक्स मध्ये तुमचा EPIC नंबर म्हणजेच तुमचा मतदान कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा ई-मेल आयडी टाकायचा आहे व नंतर पासवर्ड क्रिएट करायचा व पुन्हा तोच पासवर्ड टाकून कन्फर्म करायचा आहे. व नंतर Register या बटन वर क्लीक करायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला You are Register Successfully असा मेसेज येईल व तुमचा अकाउंट तयार होऊन जाईल.
नोट – तुम्ही आता भरलेली माहिती तुम्हाला पुढच्या वेळी या पोर्टल वर लॉगिन करताना उपयोगी पडणार आहे.
स्टेप 6:
आता पोर्टल तुमचे अकॉउंट ऑटोमॅटिक लॉगिन करेल आणि तुम्हाला नवीन पेज वर घेऊन जाईल (संदर्भासाठी खालचा फोटो बघा), जर असे झाले नाही तर स्टेप 3: मध्ये सांगितल्या प्रमाणे तुम्हाला पोर्टल वर Username व Password टाकून लॉगिन करायचे आहे.
आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यातील तीन नंबर चा ऑपशन (Information of Aadhaar Number by Existing Electors) वर क्लिक करायचा आहे.
स्टेप 7:
त्यानंतर तुमच्या समोर काही फॉर्म ओपन होतील, त्यातील Form 6B चा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. त्या फॉर्म वर क्लिक करा.
स्टेप 8:
या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमचं नाव, आडनाव, मतदान कार्ड नंबर, वगैरे माहिती दिसेल ही सर्व माहिती बरोबर आहे का ते चेक करायचे आहे.
स्टेप 9:
आता वेळ आली आहे ती तुमचा आधार कार्ड नंबर लिंक करण्याची. तुमची माहिती चेक करून झाल्यानंतर थोडे खाली स्क्रोल करा, तुम्हाला दोन ऑपशन दिसतील
- I have Aadhaar Number
- I am not able to furnish my Aadhaar Number…
यातील तुम्हाला पहिला ऑपशन निवडायचा आहे (I have Aadhaar Number) याचा अर्थ तुमच्याकडे तुमचा आधार नंबर आहे. आता तुमचा मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, आधार नंबर आणि त्याखाली Place या ऑपशन मध्ये तुमच्या गावाचं नाव टाकायचे आहे. व नंतर खाली दिलेला कॅपचा टाकायचा आहे व नंतर Preview या बटन वर क्लीक करायचे आहे.
जर तुम्ही आधार कार्ड तयार केले नसेल तर दुसरा ऑपशन (I am not able to furnish my Aadhaar Number… ) निवडावा लागेल आणि खाली सांगितलेले कागदपत्रे (लायसन्स, पॅन कार्ड, वगैरे…) अपलोड करावी लागतील.
स्टेप 10:
मित्रांनो, Preview बटन वर क्लीक केल्यानंतर तुम्ही टाकलेली माहिती दिसेल ती सगळी माहिती चेक करून घ्या. बरोबर असेल तर वरती Print चा ऑपशन दिसेल त्यावर क्लीक करून त्याची प्रिंट काढू शकता किंवा त्याचा स्क्रिन शॉट पण काढू शकता.
आता ही माहिती आपल्याला सबमिट करायची आहे. त्यासाठी खाली दिलेल्या Submit या ऑपशन वर क्लीक करायचे आहे.
स्टेप 11:
नंतर तुम्हाला इथे एक Reference ID दिला जाईल. तो तुम्ही Save करून ठेवायचा आहे. कारण तो Reference ID तुम्हाला नंतर स्टेटस चेक करण्यासाठी लागणार आहे (म्हणजेच तुमचे लिंकिंचे काम कुठेपर्यंत आले आहे ते तपासण्यासाठी).
स्टेप 12:
तुमचे मतदान कार्ड व आधार कार्ड लिंक झाले की नाही ते पाहण्यासाठी तुम्ही Track status मध्ये तुमचा Reference ID टाकून तुम्ही तुमच स्टेटस चेक करू शकता.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण मतदान कार्ड व आधार कार्ड एकमेकांशी लिंक करण्याची पूर्ण प्रोसेस म्हणजेच माहिती बघितली. आशा आहे की तुम्हाला आज चा लेख नक्कीच आवडला असेल. तसेच हा महत्वपूर्ण लेख तुमच्या मित्र-मंडळीं सोबत नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचा फायदा होईल. धन्यवाद।