LIC Policy

जीवन विमाचे विविध प्रकार | Types of Life Insurance Plans

नमस्कार मित्रांनो, आमच्या आजच्या लेखात तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण भविष्यात होणाऱ्या होणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकत नाही, पण आधीपासून नियोजन केले तर या गोष्टीचा प्रभाव कमी होऊ शकतो. यामध्ये भविष्यातील गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुमच्याकडे जीवन विमा म्हणजेच Life Insurance असणे खूप गरजेचे आहे. तुमचे निवृत्ती नंतरचे जीवन, मुलांचे शिक्षण, लग्न इत्यादी. गोष्टीचे नियोजन जीवन विमा मधून शक्य होते ते कसे ते या लेखामध्ये सविस्तर माहिती करून घेऊ.

Types of Life Insurance Plans

मित्रांनो, प्रत्येकाची गरज ही वेग-वेगळी असते. त्याला अनुसरूनच वेग-वेगळे इन्शुरन्स प्लॅन्स बनवले जातात. जसे की जर कोणाला रिटायरमेंट प्लॅनिंग करायचे असेल तर अश्या व्यक्तींसाठी विविध रिटायरमेंट प्लॅन्स असतात. जर मुलांसाठी एज्युकेशन प्लॅनिंग करायचे असेल तर त्यासाठी ही विविध एज्युकेशन प्लॅन्स असतात. तसेच लग्नासाठी जर काही प्लॅनिंग करायचे असेल तर अश्यांसाठी मॅरेज प्लॅन्स असतात. याशिवाय प्रत्येकाच्या गरजेनुसार वेग-वेगळे सेविंग प्लॅन्स देखील असतात. मित्रांनो, तसे पहायला गेले तर इन्शुरन्स प्लॅन्स हे दोन प्रकार विभागलेले असतात.



  1. प्युअर प्रोटेक्शन प्लॅन
  2. प्युअर प्रोटेक्शन प्लस सेविंग प्लॅन्स.

1. प्युअर प्रोटेक्शन प्लॅन्स

मित्रांनो, प्युअर प्रोटेक्शन प्लॅन्स म्हणजेच टर्म प्लॅन्स असतात. हे प्लॅन्स खूप सिम्पल व लोकप्रिय आहेत. ज्यामध्ये तुम्ही कमीत कमी प्रीमियम (थोडक्यात हप्ता) मध्ये जास्त इन्शुरन्स घेऊ शकता. या प्लॅन्स मध्ये जर कधी पॉलिसीच्या दरम्यान पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाला तर त्याचा बेनेफिट हा त्याच्या नॉमिनी (वारसदार) ला मिळतो. उदाहरण द्यायचे झाले तर, समजा तुम्ही 40 वर्षांची प्युअर प्रोटेक्शन प्लॅन किंवा पॉलिसी काढली आहे. आणि या 40 वर्षात जर पॉलिसी काढणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनी ला क्लेम मिळतो. पण समज जर पॉलिसीच्या दरम्यान पॉलिसी होल्डरचा मृत्यू नाही झाला तर तुम्हाला काहीच मिळत नाही.

म्हणजेच, पॉलिसी च्या दरम्यान जर पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाला तरच या पॉलिसीचा फायदा होतो. आणि मृत्यू झाला नाही तर पॉलिसी मॅच्युरिटीच्या नंतर तुम्हाला काहीच फायदा मिळत नाही. आजकाल बरेच जण प्युअर प्रोटेक्शन टर्म प्लॅन घेणे पसंत करतात कारण की यात तुम्ही कमी प्रीमियम मध्ये हाय रिस्क (जास्त धोका) कव्हर घेऊ शकतात.

2. प्युअर प्रोटेक्शन प्लस सेविंग प्लॅन

मित्रानो, प्युअर प्रोटेक्शन प्लस सेविंग प्लॅन्स मध्ये जास्त करून LIC चे इन्शुरन्स प्लॅन्स विकले जातात. या प्रोटेक्शन प्लस सेविंग प्लॅन्स मध्ये जर पॉलिसीच्या दरम्यान पॉलिसी होल्डर चा मृत्यू झाला तर नॉमिनीला डेथ बेनेफिट मिळतो. तसेच पॉलिसीच्या दरम्यान जर पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाला नाही तरीही पॉलिसी मॅच्युरिटी नंतर बेनेफिट हि मिळतो. म्हणजे पॉलिसी मॅच्युरिटी नंतर जेवढे पैसे तुम्हाला मिळणार आहेत तेवढे पैसे आणि सोबत बोनस ही मिळतो.

मित्रांनो, प्युअर प्रोटेक्शन प्लस सेविंग प्लॅन्समध्ये अजून ही सात ते आठ वेग वेगळ्या प्रकारचे प्लॅन्स असतात. हे प्लॅन्स तुम्ही तुमच्या गरजे नुसार घेऊ शकता. ते कोण कोणते प्लॅन्स आहेत ते जाणून घेऊ या.

Endowment Plans

मित्रांनो, यामध्ये तुम्हाला इन्शुरन्स कव्हर सोबत सेविंगचा पण फायदा होतो. या endowment प्लॅन्स मध्ये तुम्ही LIC चे वेग-वेगळे प्लॅन्स घेऊ शकता. जसे की LIC जीवन आनंद, जीवन लाभ, Plan 914 वगैरे… एंडोमेण्ट प्लॅन्स ही पॉलिसी तुम्ही 12 ते 35 वर्षाच्या कालावधीसाठी घेऊ शकता. तसेच 8 ते 55 वर्षाच्या दरम्यान ही पॉलिसी घेतली जाऊ शकते आणि ही पॉलिसी तुम्ही वयाच्या 75 वर्ष पर्यंत चालू ठेवू शकता. यामध्ये आवश्यक तेवढे प्रीमियम भरून तुम्ही तुमची विमा राशी व सोबतच बोनसचा ही लाभ घेऊ शकता.



Money Back Plan

मित्रांनो, मनी बॅक प्लॅन पॉलिसीमध्ये तूम्हाला इन्शुरन्स बेनेफिट सोबतच सरवायव्हल बेनेफिट पण मिळतो. म्हणजे दर चार पाच वर्षांनी तुम्हाला एक ठराविक रक्कम या पॉलिसी तुन मिळत राहते आणि दुसरीकडे तुमची पॉलिसी पण चालू राहते. म्हणून जर तुम्हाला पॉलिसीच्या दरम्यान जर काही पैसे हवे असतील तर तुम्ही मनी बॅक पॉलिसी घेऊ शकता. ही एक 20 वर्षांची पॉलिसी योजना आहे. या पॉलिसी मध्ये दर 5, 10 व 15 वर्षानंतर तुम्हाला प्रत्येक वर्षी विमा राशीच्या 20% रक्कम मिळते. उर्वरित रक्कम आणि बोनस हा पॉलिसी मॅच्युरिटी नंतर मिळतो. व नंतर पॉलिसी बंद केली जाते.

याशिवाय जर पॉलिसी दरम्यान पॉलिसी होल्डर चा मृत्यू झाला तर आधी किती रक्कम देण्यात आली आहे याचा विचार न करता संपुर्ण विमा राशी बोनस सह नॉमिनी व्यक्तीला मिळते. या पॉलिसीमध्ये तुम्हाला आयकर लाभ पण मिळतो. म्हणजे लाइफ इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत प्रीमियम भरल्यास कलम 80C अंतर्गत टॅक्स मधून सूट मिळते तसेच पॉलिसीची मॅच्युरिटी देय रक्कम कलम 10D अंतर्गत करमुक्त आहे. मात्र या पॉलिसी वर कुठलेही कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध नाही.

ULIP Plans

मित्रांनो, ULIP म्हणजे Unit Linked Insurance Plan (युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन) . मित्रांनो, युलीप ही एक अशी पॉलिसी आहे जी शेअर बाजाराशी जोडली गेली आहे. या पॉलिसी अंतर्गत तुम्हाला विमा राशी सोबतच शेअर बाजारावर आधारित परतावा ही मिळत असतो. या पॉलिसीसाठी तुम्ही जी रक्कम प्रीमियम म्हणून भरता त्यातली थोडी रक्कम ही विमा संरक्षण म्हणून ठेवली जाते तर उर्वरित रक्कम ही शेअर मार्केट मध्ये गुंतवली जाते. त्यामुळे शेअर मार्केट मधील गुंतवणूकीतून मिळणारा पैसा ही तुम्हाला मिळतो. म्हणजेच या पॉलिसी मध्ये तुम्हाला दुहेरी फायदा मिळतो.

तुम्हाला जर रिटायरमेंटसाठी, लग्नासाठी किंवा घर खरेदी करण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी प्लॅनिंग करायचे असेल तर युलीप पॉलिसी मध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. तसेच या पॉलिसीमध्ये तुमचे पैसे वाढतात आणि त्यामुळे तुम्हाला जास्त परतावा मिळतो. तसेच या पॉलिसी मध्ये तुम्ही 5 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. या पॉलिसीमध्ये ही तुम्हाला आयकर कलम 80C आणि 10D अंतर्गत कर सवलत मिळते. म्हणजेच पॉलिसीमध्ये मिळालेल्या रिटर्न वर व मॅच्युरिटी वर कोणताही कर आकारला जात नाही. पण जर तुमचा वार्षिक लाभ हा अडीच लाख पेक्षा जास्त असेल तर मात्र तुम्हाला कर नियम लागू होतील.

यामध्ये LIC SIIP आणि Nivesh Plus असे काही प्लॅन्स उपलब्ध आहेत.

Whole Life Plans

मित्रांनो, जर तुम्हाला आयुष्यभर इन्शुरन्स कव्हर हवा असेल तर तुम्ही Whole लाइफ इन्शुरन्स प्लॅन पॉलिसी घेऊ शकता. यामध्ये LIC चा Jivan Umang प्लॅन आहे ज्यामध्ये तुम्हाला शंभर वर्षे वयापर्यंत इन्शुरन्स कव्हर मिळतो. आणि जर त्याआधी पॉलिसी होल्डर चा मृत्यू झाला तर त्याचा बेनेफिट हा नॉमिनीला होतो. या पॉलिसीमध्ये तीन वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्ही कर्ज लाभ पण घेऊ शकता. या पॉलिसीमध्ये ही तुम्ही भरत असलेल्या प्रीमियम वर कलम 80C व मॅच्युरिटी रकमेवर कलम 10D अंतर्गत तुम्हाला कर मुक्त केले जाते. तुम्हाला जर पूर्ण आयुष्यभर स्वतःला आणि तुमच्या कुटुंबियांना आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करायचे असेल तर या पॉलिसी मध्ये निवेश करणे फायद्याचे ठरते.

Retirement Plan or Pension Plans – मित्रांनो, रिटायरमेंट प्लॅन पॉलिसीमध्ये तुम्ही विमा संरक्षण शिवाय मंथली पेमेंट घेऊ शकता. जर तुम्हाला वाटत असेल की रिटायरमेंट नंतर ही तुम्हाला पेन्शन मिळत रहावी तर तुम्ही या प्लॅन्स मध्ये निवेश करू शकता. यामध्ये विविध प्रकारचे प्लॅन्स आहेत. जसे की LIC Jivan Shanti, PMVVY (प्रधान मंत्री वय वंदना योजना). या पॉलिसीमध्ये तुम्हाला एकदाच प्रीमियम भरावा लागतो. तसेच किमान 12 हजार रुपयांची गुंतवणूक तुम्हाला करावी लागते. तसेच ही पॉलिसी 40 ते 80 वयोगटातील व्यक्तींसाठी आहे. पॉलिसी घेताच लगेच पॉलिसी होल्डरची पेन्शन सुरू होते. तसेच या पॉलिसीमध्ये तुम्हाला पॉलिसीच्या सहा महिन्यानंतर कर्ज ही मिळू शकते.

Single Premium Plans

मित्रांनो या पॉलिसीमध्ये तुम्हाला इन्शुरन्स कव्हर सोबतच फिक्स्ड डिपॉसिटचा बेनेफिट पण मिळतो. तर ज्या लोकांना विमा संरक्षण सोबत FD मध्ये ही निवेश करायचा असेल त्यांनी या पॉलिसी चा विचार करावा. या मध्ये तुम्ही LIC Single Premium Plan Number 917 घेऊ शकता.

Child Plans

मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी काही प्लॅनिंग करायचे असेल तर तुम्ही या पॉलिसी मध्ये निवेश करायला हवा. यामध्ये तुम्हाला इन्शुरन्स कव्हर सोबत मुलांच्या भविष्यासाठी सेविंग पण करता येते. या मध्ये LIC Jivan Tarun, Child Money Back अश्या विविध पॉलिसी उपलब्ध आहेत. या मधून कोणत्याही पॉलिसीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. या पॉलिसीमध्ये तुम्ही जेवढे लवकर निवेश कराल तेवढा याचा जास्त फायदा होतो.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण लाईफ इन्शुरन्सच्या वेग वेगळ्या प्रकार बद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करतो की तुम्हाला या लेखाचा नक्की फायदा होईल. तसेच हा लेख आवडला असल्यास व महत्व पूर्ण वाटला असल्यास तुमच्या मित्र-मंडळीं सोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!