पुरुषांसाठी सर्वात चांगले लेदर वॉलेट | Top 5 Leather Wallet for Men
नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला सर्वात चांगले वॉलेट कोणते आहेत या बद्दल माहिती सांगणार आहोत.
मित्रांनो, स्टायलिश असे वॉलेट पुरुषांच्या लुकसाठी एक महत्त्वाची बाब आहे. वॉलेट ही वस्तू दिसायला जरी लहान असली तरी ही खूप महत्त्वाची आणि कामाची आहे. घराबाहेर पडताना आपण आवर्जून आपले वॉलेट म्हणजेच पाकीट न विसरता घेतो. पैसे, कार्ड्स, ओळखपत्र, व अन्य बऱ्याचशा छोट्या गोष्टी आपण या पाकिटात ठेवत असतो.
त्यातल्या त्यात वॉलेट जितकं जास्त लॅव्हीश असेल तितकाच लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे तुमच्या कडे एखादे चांगल्या क्वालिटी चे वॉलेट / पाकीट असायलाच हवे. हे वॉलेट इतके महत्वाचे का आहे याचं उत्तर प्रत्येक पुरुषाला माहीत आहे. या वॉलेट मध्ये फक्त तुमच्या छोट्या मोठ्या गोष्टीच ठेवता येत नाहीत तर हे वॉलेट तुमची स्टाइल कशी आहे हे सांगते आणि तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग बनून जाते. आजकाल हे वॉलेट मार्केट मध्ये चांगल्या दर्जाच्या मऊ लेदर पासून ते नायलॉन स्टाइल मध्ये वेग वेगळ्या डिझाईन मध्ये, आकारात, व वेग-वेगळ्या मटेरिअल मध्ये सुद्धा बघायला मिळते. हे वॉलेट तुमच्या महत्त्वाच्या कागदपत्रांना सुरक्षित ठेवण्यासाठी खूप मदत करते. वॉलेट हे स्लिम आणि स्लीक मॉडर्न स्टाइल चे असो किंवा बाय फोल्ड असो किंवा RFID टेक्नॉलॉजी चे अतिरिक्त सुरक्षा असलेले वॉलेट असो, ही एक अश्या प्रकारची ऍक्सेसरी आहे ज्याचा उपयोग पुरुष त्यांच्या दिवसाची सुरुवात होताना करतात.
पिढ्यान पिढ्या वॉलेट वापरण्याची ही पद्धत आज ही अशीच चालू आहे व चालू राहील. मित्रांनो, आजच्या आधुनिक काळातील व तंत्रज्ञानातील वॉलेट हे खूप स्टायलिश, आहेत, पण जेव्हा तुम्ही वॉलेट खरेदी करायला जाता तेव्हा इतके सगळे डिझाइन, आकार, व वेग-वेगळ्या मटेरिअल चे वॉलेट बघून कोणते घ्यावे ते कळत नाही. त्यामुळे या वॉलेट बद्दल काही गोष्टी तुम्हाला आधीच माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे. त्या कोणत्या गोष्टी आहेत ते जाणून घेऊ या.
सर्वात पहिले वॉलेट/ पाकीट खरेदी करताना कोणत्या गोष्टी पाहणे महत्वाचे आहे ते जाणून घेऊ या
वॉलेट खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
What You Need To Know Before Buying Wallet
मटेरियल (Material) – मित्रांनो, तुमचे पाकीट म्हणजेच वॉलेट खरेदी करताना सर्वात पहिले त्याची बिल्ड क्वालिटी व त्याचे मटेरिअल कसे आहे ते चेक करणे गरजेचे असते. तुमचे वॉलेट हे शक्यतो लेदर चे बनलेले असावे व त्याची बिल्ड क्वालिटी ही चांगल्या दर्जाची असावी. लेदर चे वॉलेट हे खूप टिकाऊ असतात व बरेच दिवस चांगले टिकतात. जर तुम्ही तुमचे वॉलेट ऑनलाईन खरेदी करत असाल तर त्या प्रोडक्ट चे व त्याच्या मटेरिअलचे डिस्क्रिपशन नक्की वाचा. नंतरच खरेदी करा.
जाडी (Thickness) – मित्रांनो, वॉलेट खरेदी करताना त्याची थिकनेस किती असावी हे माहित असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जर तुम्ही थिक म्हणजे जाड वॉलेट घेतले तर त्यामुळे तुमच्या पेलविक मसल्ससाठी ते योग्य नाही. त्यामुळे वॉलेट खरेदी करताना नेहमी स्लिम वॉलेटच घ्यावे, जे कोणत्याही खिशामध्ये सहज बसेल.
कप्पे (Slots or Compartments) – मित्रांनो, तुम्ही खरेदी करत असलेल्या वॉलेट मध्ये कमीत कमी पाच कम्पार्टमेंटस तरी असलेच पाहिजे. तसेच त्यात नोटांसाठी स्लॉट हवा, हिडन पॉकेट असायला हवे.
रंग (Color) – मित्रांनो, तुम्हाला डेली युझसाठी वॉलेट हवे असेल किंवा फॉर्मल ठिकाणी नेण्यासाठी हवे असेल तर ब्लॅक व ब्राउन कलर चे पॉकेट कोणत्याही ठिकाणी वापरण्यासाठी उत्तम कलर आहेत. तसेच हे कलर तुमच्या ड्रेस व इतर ऍक्सेसरिझ सोबत ही मॅच होतात.
बांधणी (Construction) – मित्रांनो, तुमच्या वॉलेटचे कन्स्ट्रक्शन आणि त्याचे टाके/स्टीचेस तपासून बघणे ही तितकेच महत्त्वाचे असते. तसेच वॉलेटला दुमडल्यावर त्यावर किती ताण पडतो ते सुद्धा चेक करा. यामुळे तुम्हाला तुमच्या वॉलेटचा टिकाऊपणा कळेल.
पुरुषांसाठी सर्वात चांगले लेदर वॉलेट
आता पुरुषांसाठी भारतातील सर्वात चांगले वॉलेट कोणते आहेत ते जाणून घेऊ या
NAPA HIDE Leather Wallet
मित्रांनो, हे वॉलेट पूर्णपणे लेदर चे बनलेले आहे. तसेच हे बाय-फोल्ड वॉलेट आहे. या शिवाय या वॉलेट मध्ये तुम्हाला आठ कार्ड कम्पार्टमेंट बघायला मिळतात. तसेच दोन करन्सी स्लॉट, दोन हिडन कम्पार्टमेंट व यात तुम्हाला कोईन पॉकेट ही दिले गेले आहे. मित्रांनो, हे ब्राउन कलरचे पाकीट खूप स्टायलिश आहे. तसेच या वॉलेट ची किंमत ही अंदाजे 300 रुपयेच्या आसपास असू शकते.
Urban Forest RFID Leather Wallet
मित्रांनो, हे वॉलेट पण तुम्हाला लेदर चे बनलेले व बाय-फोल्ड चे बनलेले दिसेल. या वॉलेट मध्ये तुम्हाला सहा कार्ड कम्पार्टमेंट बघायला मिळतात. तसेच दोन करन्सी स्लॉट, एक हिडन कम्पार्टमेंट, सोबतच एक कॉईन पॉकेट दिले आहे. याशिवाय या वॉलेट मध्ये तुम्हाला ट्रान्सपरेंट विंडो सुद्धा दिली आहे. ज्यात तुम्ही तुमचे आयडी कार्ड ठेवू शकता. व हवे तेव्हा पॉकेट मधून न काढता या ट्रान्सपरेंट विंडो मधून दाखवू शकता. तसेच यात तुम्हाला एक चैन/झिपर कम्पार्टमेंट पण दिले गेले आहे. तसेच या वॉलेटमध्ये तुम्हाला RFID प्रोटेक्शन पण मिळते. या वॉलेट ची किंमत ही तुम्हाला 455 रुपयेच्या जवळ पास मिळू शकते.
WildHorn Blue Leather Wallet
मित्रांनो, या वॉलेटची किंमत ही तुम्हाला 475 रुपये पर्यंत मिळू शकते. तसेच हे वॉलेट लेदर चे बनले असून खूप टिकाऊ आहे. हे वॉलेट ही बाय-फोल्डेड आहे. या वॉलेट मध्ये तुम्हाला नऊ कार्ड स्लॉट, दोन करन्सी स्लॉट, दोन हिडन स्लॉट, एक कॉइन पॉकेट, सोबतच एक ट्रान्सपरेंट विंडो व एक झिपर कम्पार्टमेंट सुद्धा दिले गेले आहे. असे हे पॉकेट खूप स्टायलिश, मजबूत व टिकाऊ आहे. त्यामुळे या वॉलेट चा तुम्ही नक्की विचार करा.
AL FASCINO Genuine Leather Wallet
मित्रांनो, या वॉलेटची किंमत ही अंदाजे 470 रुपये पर्यंत असू शकते. तसेच हे वॉलेट लेदरच्या मटेरिअल चे बनले असून हे एक बाय फोल्ड वॉलेट आहे. यात तुम्हाला सहा कार्ड स्लॉट, दोन करन्सी स्लॉट्स, दोन हिडन कम्पार्टमेंट, एक कॉइन पॉकेट, व एक ट्रान्सपरेंट विंडो बघायला मिळते. हे वॉलेट RFID प्रोटेक्टेड असून ड्युरेबल आहे.
Urban Forest Black RFID Leather Wallet
मित्रांनो, या वॉलेट ची किंमत ही 455 रुपये पर्यंत तुम्हाला मिळू शकते. तसेच हे वॉलेट लेदरचे बनलेले असून हे एक बाय-फोल्ड वॉलेट आहे. यात तुम्हाला सहा कार्ड स्लॉट, दोन करन्सी स्लॉट, एक हिडन कम्पार्टमेंट, एक कॉइन पॉकेट, सोबतच तीन ट्रान्सपरेंट विंडो व एक झिपर कम्पार्टमेंट मिळते. हे वॉलेट RFID प्रोटेक्टेड असून खूप स्टायलिश व ड्युरेबल आहे.
वॉलेटची देखभाल कशी करायची
Leather Wallet Care Tips
मित्रांनो, तुमचे वॉलेट ही तुमच्यासाठी एक मौल्यवान वस्तू असते. वॉलेट फक्त एक ऍक्सेसरिझ नसून तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे. त्यामुळे त्याचा टिकाऊपणा व त्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी त्याची नियमित साफ सफाई व देखभाल ठेवणे गरजेचे असते. चला तर मग वॉलेट साफ ठेवण्यासाठी काही टिप्स जाणून घेऊ या.
- मित्रांनो, तुमची वॉलेटवर डाग पडू नये यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे तुमचे वॉलेट कोणत्याही अस्वच्छ जागेवर ठेवू नका.
- मित्रांनो, लेदरचे वॉलेट हे त्याच्या पृष्ठभागा वर खूप सेन्सिटिव्ह असतात. त्यामुळे तुमचे वॉलेट जर ब्रँडेड लेदर चे असेल तर त्याला हाताळताना स्वच्छ हातांनी हाताळावे. नाहीतर त्यावर लवकर डाग पडतील व त्याची चमक कमी होऊ शकते.
- तसेच लेदरचे वॉलेट साफ करण्यासाठी तुम्ही लेदर क्लीनर वापरू शकता. पण त्यात दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करूनच क्लीनर वापरावे.
- मित्रांनो, तुमचे लेदर चे वॉलेट साफ करण्यासाठी तुम्ही एखाद्या मऊ कपड्याचा, लोकरचा किंवा मऊ ब्रिस्टलच्या ब्रशचा ही वापर करू शकता.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण भारतातील सर्वात चांगले वॉलेट कोणते आहेत, त्याबद्दल माहिती जाणून घेतली तसेच वॉलेट चांगल्या कंडिशन मध्ये ठेवायचे असेल तर कोण-कोणते टिप्स फॉलो करावे या बद्दलही जाणून घेतले. तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा लेख आवडला असल्यास तुमच्या मित्र मंडळी सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद