Shop

पुरुषांसाठी सर्वात चांगले फॉर्मल शूज | Best Formal Shoes For Men

नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा लेख मी खास माझ्या पुरुष मित्रांसाठी घेऊन आलो आहे. आज आपण चांगले फॉर्मल शूज कोणते आहेत या बद्दल जाणून घेणार आहोत.

Best Formal Shoes For Men

मित्रांनो, हँडसम दिसण्यासाठी आपण जसे चांगले कपडे घालतो, तसेच पायातील चांगले फॉर्मल शूज आपल्या लुकला अधिक स्टायलिश बनवतात. त्यामुळे या फॉर्मल शूजच्या बाबतीत अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती हव्यात. कारण शूज हा तुमच्या ड्रेसिंगचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. 
तुमच्या शूजच्या कलेक्शन मध्ये फॉर्मल ब्लॅक, ब्राउन, किंवा ग्रे कलरचे शूज हे असायला हवे. हे अश्या रंगाचे शूज आहेत जे कोणत्याही आऊटफिट वर खूप चांगले दिसतात. तसेच तुम्ही एखाद्या ऑफिस पार्टीला किंवा एखाद्या फॉर्मल पार्टीला जात असाल तर तुम्ही फॉर्मल शूज घातले पाहिजे. मित्रांनो, या फॉर्मल शूजमध्ये ही आजकाल खूप साऱ्या व्हारायटीझ बघायला मिळतात. तुम्ही जर फॉर्मल शूज विकत घेणार असाल, तर जरा थांबा, आधी हा लेख शेवट पर्यंत वाचा. कारण या लेखात आम्ही तुम्हाला फॉर्मल शूज खरेदी करताना बाघायच्या गोष्टी आणि बेस्ट फॉर्मल शूज कोणते आहेत याबद्दल माहिती सांगणार आहोत.



फॉर्मल शूज खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

What You Need To Know Before Buying Formal Shoes

सर्वात पहिले फॉर्मल शूज खरेदी करताना कोणत्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे ते जाणून घेऊ या

Color (कलर) – मित्रांनो, तुमच्या फॉर्मल शूजचा कलर जितका डार्क असेल तितकाच तो उठून दिसतो. ब्लॅक कलर हा सर्वात जास्त वापरला जाणारा कलर आहे आणि तो दिसायला ही फॉर्मल दिसतो. पण जर तुम्हाला तुमच्या फॉर्मल शूज मध्ये थोडे वेगळेपणा हवा असेल तर तुम्ही डार्क ब्राउन (तपकिरी) किंवा सिम्पल ब्राउन कलर ही वापरू शकता. यात काही लाइट कलर ही मिळतात, पण शक्यतो डार्क कलरचे फॉर्मल शूज तुम्हाला नक्कीच चांगला लुक देतील.

Types of Shoes (शूज चे प्रकार) – मित्रांनो, मार्केट मध्ये फॉर्मल शूजच्या खूप साऱ्या व्हरायटी बघायला मिळतात. त्यातले काही प्रकार आपण बघुयात.

  • ऑक्सफर्ड शूज – ऑक्सफर्ड शूजला तुम्ही कोणत्याही प्रसंगी परिधान करू शकता. बंद लेस, कमी टाच आणि लॉंग टोझ ही ऑक्सफर्ड शूज ची काही खास वैशिष्ट्ये आहेत. हे शूज चार वेगवेगळ्या प्रकारात येतात त्यापैकी कॅप टो ऑक्सफर्ड हे सर्वात लोकप्रिय आहेत. या प्रकारचे शूज हे फॉर्मल ओकेझन किंवा बिझनेस ओकेझनच्या वेळेस परिधान केले जातात.
  • डर्बी शूज – डर्बी शूज हे ऑक्सफर्ड शूज चा च एक प्रकार आहे. फक्त डर्बी शूज मध्ये लेसिंग सिस्टिम असते. हे शूज तुम्ही फॉर्मल किंवा कॅझुअल ड्रेस वर परिधान करू शकता.
  • ब्रॉग्स – मित्रांनो, तुम्हाला जर एखादे डिझाइन वाले किंवा एक वेगळ्या लुक मधले शूज हवे असतील तर तुम्ही ब्रॉग्स शूज वापरू शकता. ब्रॉग्स मध्ये डार्क ब्राउन कलर खूप छान दिसतो. 
  • मोंक स्ट्रॅप – मित्रांनो, तुम्हाला जर लेस नसलेले शूज हवे असतील तर तुम्ही या मोंक स्ट्रप शूजचा विचार करू शकता. हा शूज घालण्यास खूप सोपा आहे तसेच दिसायला ही आकर्षक आहे.

Material (मटेरिअल) – मित्रांनो, फॉर्मल शूज घेताना ते नेहमी लेदरचे घ्यावे, कारण ते खूप टिकाऊ व दिसायला ही स्टायलिश दिसतात. त्यामुळे शूज घेताना असे शूज घ्यावे ज्याला पॉलीश करणे, व साफ करणे सोपे जाईल.



Sole (सोल) – मित्रांनो, सोल क्वालिटी चेक करून घेणेही खूप महत्वाचे आहे. साधारणतः चांगल्या सोल क्वालिटीचे शूज ओळखणे जरा कठीण असते. कारण त्यातही काही प्रकार असतात. जसे की लेदर सोल, PU सोल आणि रबर सोल. त्यातल्या त्यात लेदर सोलचे शूज सर्वात चांगले असतात.

Size (साईझ) – फॉर्मल शूज घेताना तुमच्या पायाच्या आकारा नुसार फिट बसतील असेच घ्यावे.

पुरुषांसाठी सर्वात चांगले फॉर्मल शूज

Best Formal Shoes For Men | Best Office Leather Shoes

आता भारतातील सर्वात चांगले फॉर्मल शूज कोणते आहेत ते जाणून घेऊ या

1) ALBERTO TORRESI Formal Shoes

मित्रांनो, तुम्हला जर मोंक स्ट्रॅप्स मध्ये फॉर्मल शूज हवा असेल तर अल्बर्टोचा हा फॉर्मल शूज तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन असू शकतो. या शूज चे मटेरिअल हे सिंथेटिक लेदर चे बनलेले आहे. तसेच या शूजची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या शूज मध्ये तुम्हाला TPU सोलचा वापर केलेला दिसून येईल. जो इतर रबर सोल पेक्षा खूप चांगला मानला जातो. हा शूज तुम्ही रेग्युलर पण वापरू शकता. या फॉर्मल शूज मध्ये तुम्हाला डार्क ब्राउन आणि ब्लॅक कलर मिळतात. त्यातल्या त्यात ब्लॅक कलर हा खूप जास्त उठून दिसतो. या फॉर्मल शूज वर तुम्हाला 30 दिवसांची वॉरंटी मिळत असून याची किंमत ही 2,000 रुपयेच्या जवळ पास असू शकते.

ALBERTO TORRESI Formal Shoes

2) Hush Puppies Shoes

मित्रांनो, हा फॉर्मल शूज पूर्ण पणे लेदरचा बनलेला आहे. याचा सोल पण हा पूर्णपणे लेदरचा बनलेला आहे. हा शूज तुम्ही फॉर्मल कार्यक्रमला बिनधास्तपणे परिधान करू शकता. याचा (टाच) टो हा पूर्ण गोलाकार (राऊंड) बनवलेला आहे, ज्यामुळे तो चांगला फॉर्मल शूज दिसतो. यामध्ये तुम्हाला वेग वेगळे कलर बघायला मिळतात, जसे की डार्क ब्राउन, ब्लॅक. या फॉर्मल शूजवर तुम्हाला 90 दिवसांची वॉरंटी मिळते. तसेच या शूज ची किंमत ही अंदाजे 2,200 – 3,200 रुपये पर्यंत असू शकते. 

Hush Puppies Shoes

3) Red Tape Men’s Leather Formal Shoes

मित्रांनो, हा शूज ब्रॉग्स टाइपचा आहे. जर तुम्हाला ब्रॉग्स फॉर्मल शूज वापरायला आवडत असेल तर या शूजचा तुम्ही विचार करू शकता. याची युनिक डिझाईन ही प्रत्येकाचं लक्ष वेधून घेते. याचे मटेरिअल हे लेदर चे बनलेले आहे. तसेच यात TPU सोलचा वापर केलेला दिसून येईल. या फॉर्मल शूज वर तुम्हाला 30 दिवसांची वॉरंटी मिळते आणि याची किंमत बघायची झाली तर हा शूज तुम्हाला 1,259 – 2,255 रुपयेच्या जवळ पास मिळू शकतो.

Red Tape Mens Leather Formal Shoes

4) Red Chief Leather with Lace Formal Shoes

मित्रांनो, तुम्हाला जर चांगल्या मटेरिअलचे डर्बी शूज हवे असतील तर हा शूज तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. हा शूज पूर्ण पणे प्लेन असून त्यावर कोणत्याही प्रकारचे पॅटर्न बनलेले नाहीत. हा शूज पूर्ण पणे लेदरचा बनलेला आहे. याचा सोल पण लेदरचा बनलेला आहे. या फॉर्मल शूज मध्ये तुम्हाला डार्क ब्राउन व ब्लॅक असे दोन कलर बघायला मिळतात. यापैकी कोणताही कलर घेतला तरी तो तुमच्या आऊट फिट वर चांगलाच दिसणार आहे. या शूज वर तुम्हाला 60 दिवसांची वॉरंटी बघायला मिळतात. तसेच याची किंमत अंदाजे 1,800 – 2,100 रुपयेच्या आसपास मिळू शकतो.

Red Chief Leather with Lace Formal Shoes

5) Arrow Men’s Leather Shoes

मित्रांनो, हा फॉर्मल शूज ऑक्सफर्ड टाइपचा आहे. मित्रांनो, ऑक्सफर्डचे शूज हे सर्वात बेस्ट शूज मानले जातात. आणि हा ब्लॅक कलरचा शूज अतिशय सुंदर आहे. हा शूज लेदरचा बनलेला असून याचा सोल हा TPU टाइप चा बनलेला आहे. हा वजनाने खूप लाइट आहे. याची किंमत बघायची झाली तर हा फॉर्मल शूज तुम्हाला 2,700 – 3,999 रुपयांपर्यंत मिळू शकतो.

Arrow Men's Leather Shoes

फॉर्मल शूज जास्त काळ टिकण्यासाठी त्यांची देखभाल कशी घ्यावी ?

Leather Shoe Care Tips for Longer Lasting Shoes

मित्रांनो, तुमचे फॉर्मल शूज शक्यतो लेदर चे च बनलेले असतात. आणि ते महाग ही असतात. मग अश्या महागड्या शूज ची काळजी, देखभाल घेणे ही तितकेच महत्त्वाचे असते. त्यासाठी आम्ही तुम्हाला खाली काही टिप्स देणार आहोत. ज्याचा अवलंबन करून तुम्ही तुमचे फॉर्मल शूज स्वच्छ करून दीर्घकाळ टिकवू शकता.

  • मित्रांनो, लेदरच्या शूजला त्याची पॉलिश टिकवून ठेवण्यासाठी काही विशेष केअर आणि ट्रीटमेंटची आवश्यकता असते. त्यासाठी तुम्हाला काही चांगल्या दर्जाचे ब्रश, कंडिशनर, पॉलीश आणि शु क्रीमची आवश्यकता असते. जेव्हा तुम्ही लेदर शूज खरेदी करता तेव्हा शु केअर किट मध्ये ही थोडी गुंतवणूक केली की फायद्याचे ठरते.
  • तुमचे शूज जर पाण्याच्या संपर्कात आले असल्यास त्यांना व्यवस्थित सुकवून घ्या किंवा कोरड्या पेपर टॉवेल ने कोरडे करून घ्यावे. फक्त थेट सूर्यप्रकाशामध्ये ठेवू नये किंवा शूज कोरडे करण्यासाठी ड्रायरचा वापर करू नये.
  • फॉर्मल लेदरचे शूज स्वच्छ करण्यासाठी त्यांना आधी शु ब्रश ने साफ करा व नंतर ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्या. गरज असेल तर हे तुम्ही दररोज ही करू शकता.
  • तसेच लेदर शूजला क्रॅक होण्यापासून वाचवण्यासाठी शूज कोरडे झाल्यावर त्यांना लेदर क्रीम व लेदर कंडिशनर लावा. 
  • तुम्ही तुमचे लेदरचे शूज रोज वापरत असाल तर त्यांना वॉटर प्रूफिंग करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचे पाण्यापासून संरक्षण होते, आणि जास्त दिवस टिकतात. 
  • तुमच्या फॉर्मल लेदर शूजला चमकवण्यासाठी त्यांना वेळोवेळी पॉलीश केली पाहिजे. या सर्व टिप्स तुम्हाला तुमच्या शूज ची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी मदत करतील.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण भारतातील सर्वात बेस्ट फॉर्मल शूज कोणते आहेत त्याबद्दल जाणून घेतले. तसेच तुमच्या शूजची देखभाल कशी घ्यावी याबद्दल ही जाणून घेतले. यामुळे तुमचे शूज हे वर्षानुवर्षे तुम्हाला नक्कीच साथ देतील. तसेच आमचा आज चा हा लेख तुम्हला आवडला असल्यास तसेच महत्व पूर्ण वाटला असल्यास तुमच्या मित्र मंडळी सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद

Tags – Best Formal Shoes For Men, Best Office Leather Shoes, Black & Brown Formal Shoes, Top Formal Shoes For Men, Changale Formal Shoes, Purushansathi Formal Shoes, Office Formal Boots, Best Office Boot, चांगले बूट, ऑफिससाठी बूट, पार्टीसाठी बूट, Best formal shoes for men under 1000, Best formal shoes under 2000

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!