Lagna Samarambhलग्न पत्रिका/ कुंडली जुळवा (Kundali Milan)

घरच्याघरी अँप मधून कुंडली/ लग्न पत्रिका कशी जुळवावी (Free मध्ये) | Kundali Matching in Marathi

कुंडली जुळवणे म्हणजे वर आणि वधू यांचे गुण जुळवले जातात. पण कुंडली जुळवायचे कुठे ? असा प्रत्येकालच प्रश्न पडतो. प्रत्येक वेळेस एखाद्या ज्योतिषाकडे जाऊन कुंडली बघणे हे थोडे वेळखाऊ व खर्चिक काम आहे. पण मित्रांनो आता काळजी करू नका, कारण आम्ही तुमच्यासाठी एक अशी माहिती घेऊन आलो आहोत की ज्या माहितीच्या मदतीने तुम्ही घरबसल्या मोबाईल वरून कुंडली मिलन करू शकता. ते कसे हे जाणून घ्यायचे असेल तर आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

App Madhun Lagn Patrika Kashi julvaychi

मित्रांनो, कुंडली ही शक्यतो लग्नासाठी जुळवली जाते. आणि आपल्या कडे लग्नासाठी जन्म कुंडली जुळवणे ही एक महत्त्वाची गोष्ट मानली जाते की, तुम्ही ही तुमच्या वाड- वडिलांकडून कधी तरी ऐकले असेल की “लग्न म्हणजे काही दोन बाहुल्यांचा खेळ नाही”. तसं पाहिलं तर हे अगदीच चुकीचं नाही मित्रांनो. माणसाच्या आयुष्यात लग्न एकदाच होते, म्हणूनच आपल्या आयुष्यात येणारा जोडीदार हा सर्व गुणांनी भरलेला असावा असे प्रत्येकाला च वाटते. लग्न किंवा विवाह हे दोन व्यक्तीं मधील एक असे नाते आहे जे त्यांना सात जन्मांसाठी एकमेकांशी बांधून ठेवते.



मग ते प्रेम असो किंवा अरेंज मॅरेज असो, लग्न होण्यापूर्वी नेहमीच काही गोष्टींची पूर्तता केली जाते. आणि त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंडली जुळवणे. आपल्या वडिलधाऱ्या लोकांच्या मते, एका सुखी वैवाहिक जीवनासाठी लग्ना आधी कुंडली जुळवणे खूप महत्त्वाचे असते. कुंडली जुळवणे म्हणजे वर आणि वधू यांचे गुण जुळवले जातात. हे गुण जुळवणे म्हणजे काय? तसेच आपण घरबसल्या मोबाईल वरून कुंडली मिलन कसे करू शकतो ते आधी जाणून घेऊ.

मोबाईल वरून कुंडली/लग्न पत्रिका मिलन कसे करायचे

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला प्ले स्टोर मध्ये जाऊन AstroSage Kundli हे अँप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे.

App Madhun Lagn Patrika Kashi julvaychi Step 1

स्टेप 2: आता अँप ओपन केल्यावर तुम्हाला काही परमिशन्स विचारल्या जातील त्यांना allow करायचे आहे व त्या नंतर तुम्हाला हवी ती भाषा निवडायची व Next बटन वर क्लिक करायचे आहे.

App Madhun Lagn Patrika Kashi julvaychi Step 2

स्टेप 3: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील sign in आणि Open new account. तुम्ही नवीन युजर असाल तर तुमचे नवीन अकाउंट ओपन करायचे आहे. आता नवीन अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला Gmail ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

App Madhun Lagn Patrika Kashi julvaychi Step 3

स्टेप 4: व तुम्हाला तुमच्या ज्या Gmail वरून अकाऊंट ओपन करायचे आहे त्या जीमेल वर क्लिक करायचे आहे.



App Madhun Lagn Patrika Kashi julvaychi Step 4

स्टेप 5: त्या नंतर अँप च्या होम पेज वर तुम्हाला काही ऑप्शन दिसतील त्यातील कुंडली मिलन या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

App Madhun Lagn Patrika Kashi julvaychi Step 5

स्टेप 6: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला मुलाची व मुलीची काही माहिती विचारली जाते. त्यात आधी मुलाचे व नंतर मुलीचे नाव, जन्म तारीख, जन्म वेळ, व जन्म गाव अशी माहिती टाकायची आहे. व नंतर Next बटन वर क्लिक करायचे आहे.

App Madhun Lagn Patrika Kashi julvaychi Step 6

स्टेप 7: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला मुलाचे व मुलीचे कुंडली मिलन करून किती गुण पडतात ते दाखवले जाईल. तसेच त्या नुसार त्याचे निष्कर्ष सुद्धा सांगितले जाते. तसेच काही डिटेल्स ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही मुलाचे व मुलीचे कुंडली मिलन विस्तार पूर्वक बघू शकतात. तसेच तुम्हाला जर हे डाउनलोड करायचे असेल तर ते तुम्ही पीडीएफ च्या स्वरूपात देखील डाउनलोड करू शकता.

App Madhun Lagn Patrika Kashi julvaychi Step 7

लग्न होण्यासाठी कुंडलीतील किती गुण जुळले पाहिजेत?

मित्रांनो, लग्नाच्या वेळी वधू आणि वर या दोघांच्या कुंडलीत साधारणतः 36 पैकी 18 गुण आढळल्यास विवाह यशस्वी होतो, असे मानले जाते. हे 18 गुण म्हणजे वधू आणि वर यांचे आरोग्य, दोष, प्रवृत्ती, मानसिक स्थिती, मुले इत्यादींशी संबंधित असतात. तसेच ज्योतिषीय गणने नुसार 18 पेक्षा कमी गुण आढळल्यास बहुतेक विवाह अयशस्वी होण्याची शक्यता असते. तर 18 ते 24 गुण आढळल्यास विवाह यशस्वी होतो परंतु त्यात अडचणी येण्याची शक्यता असते. तर 32 ते 36 गुण आढळले तर या प्रकारचा विवाह अतिशय शुभ मानला जातो आणि त्यामुळे वैवाहिक जीवनात जास्त अडचणी येत नाहीत. पण साधारणतः ज्योतिषीय शास्त्रानुसार एका यशस्वी वैवाहिक जीवनासाठी 36 पैकी कमीत कमी 18 गुण असणे अनिवार्य आहे.

पण मित्रांनो जगात अशी ही काही लोक आहे ती ज्योतिष शास्त्रावर किंवा कुंडली जुळवणे यावर विश्वास ठेवत नाही त्यांचा असा विश्वास आहे की लग्नासाठी कुंडली जुळवण्यापेक्षा परस्पर प्रेम, समज आणि एकमेकांबद्दलचा विश्वास हा अधिक महत्त्वाचा असतो. असे असले तरीही आजही आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत ते आधुनिक तर असतातच पण त्यासोबतच पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरांचे पालन करतात. आपल्या कुंडलीत उपस्थित असलेले ग्रह व नक्षत्र इत्यादींच्या मदतीने आपले भविष्य कसे असेल ते सांगितले जाते. आणि जर मुलगा आणि मुलगी दोघांचे नक्षत्र आणि ग्रह अनुकूल असतील तर त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहते असे मानले जाते म्हणूनच आपल्या समाजात कुंडली जुळवणे अतिशय महत्त्वाची गोष्ट मानली जाते.

AstroSage वर कुंडली मिलन करण्याचे फायदे

मित्रांनो, AstroSage वर कुंडली मिलन करण्याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे इथे तुम्ही कोणतेही शुल्क न भरता भावी वधू- वरांची कुंडली अगदी मोफत जुळवू शकता. तसेच इथे तुम्हाला गुण आणि नक्षत्रांच्या आधारे जन्म कुंडली जुळल्या नंतर योग्य निष्कर्ष प्रदान केला जातो. आणि जर तुमच्या कुंडलीत काही दोष असतील तर ते तुम्ही अस्ट्रोसेज च्या वेबसाइट वर दिलेल्या ज्योतिषाशी संपर्क साधून मार्गदर्शन घेऊ शकता. मित्रांनो, अजून एक गोष्ट म्हणजे अनेक लोकांना त्यांची जन्म तारीख किंवा जन्म वेळ वगैरे माहिती माहीत नसते, अशा लोकांसाठी नावानुसार कुंडली जुळवण्याची सुविधाही अस्ट्रोसेज वर उपलब्ध करून दिली आहे.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण मोबाईल वरून अस्ट्रोसेज अँप मार्फत कुंडली मिलन कसे करावे, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद.

Tags: kundali milan, kundali milan online in marathi, kundali milan by name, kundali milan by date of birth, kundali milan for marriage, kundali milan free, kundali milan gun, kundali milan by name, kundali matching, lagn kundali milan, kundali milan marriage marathi, kundali gun milan, kundali milan in marathi online, gun varg milan, lagn kundali milan marathi, kundali milan app, kundali milan astrosage, kundali milan by date of birth only, kundali milan by rashi name, kundali milan with name, kundali milan name, kundali milan by dob, kundali matching ganeshaspeaks, kundali milan hindi me, kundali milan by date of birth only in marathi, kundali milan matching, kundali milan app download, lagn patrika julavni, lagn patrika milan, kundali julavne marathi, kundali maching marathi

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!