Personal Loan

KreditBee/ क्रेडिटबी अँप: पर्सनल लोन कसे घ्यायचे, अटी, पात्रता, लोनचे प्रकार, कागदपत्रे

नमस्कार मित्रांनो आज आपण क्रेडिटबी (KreditBee) अँप द्वारे पर्सनल लोन कसे घ्यायचे, क्रेडिट बी लोन घेण्याच्या अटी काय आहेत, किती कर्ज घेता येते, त्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात, कर्जाचा कालावधी किती असतो, व्याजदर काय आहेत, या अश्या सर्व गोष्टीं बद्दल आज आपण सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, सध्याच्या काळात पैश्यांशिवाय जगणे खूप अवघड झाले आहे. त्यात वाढत्या महागाई मुळे प्रत्येकाला च पैश्यांची अडचण निर्माण होते. मग अश्या वेळी आपण मित्र किंवा नातेवाईक यांच्या कडून पैसे मागतो, पण दुसऱ्यांकडून पैसे मागताना खूप लाजिरवाणे वाटते. मग कधी तरी विचार येतो की त्या पेक्षा आपण एखादे पर्सनल लोन घ्यावे. जेणेकरून आपली गरज भागेल. बरेच जण पर्सनल लोन साठी बँकेत अप्लाय करतात आणि बँकेत लोन ची पूर्ण प्रोसेस होऊन लोन अमाउंट खात्यात जमा होण्यासाठी दहा ते पंधरा दिवस लागतात. पण जर पैश्यांची तातडीची गरज असेल तर मग काय करायचं? विचारात पडलात ना मित्रांनो? पण मित्रांनो, आता काळजी करत बसू नका.



तुम्हाला जर इन्स्टंट म्हणजेच अगदी 15 ते 20 मिनिटांत लोन हवे असेल तर तुम्ही क्रेडीटबी (Kreditbee) अँप चा वापर करू शकता. हो मित्रांनो, क्रेडीटबी हे Instant Personal Loan देणारे एक खूप चांगले अँप आहे. या अँप द्वारे तुम्ही फक्त 15 मिनिटांत चार लाख रुपये पर्यंत चे लोन अगदी सहज घेऊ शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे क्रेडीटबी मार्फत घेतलेले लोन, प्रोसेस झाल्यानंतर लगेच तुमच्या खात्यात जमा केले जाते. आणि या लोन च्या प्रक्रियेला खूप कमी वेळ लागतो, तसेच यात लोन घेण्याची पद्धत देखील खूप सोपी आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असते. ते पण अगदी कमीतकमी कागदपत्रांद्वारे तुम्ही इन्स्टंट पर्सनल लोन घेऊ शकता. त्यामुळे ज्या लोकांना तातडीने पैश्यांची गरज असेल त्यांच्यासाठी क्रेडीटबी (kreditbee) हा एक खूप चांगला पर्याय आहे. मित्रांनो, क्रेडीटबी अँप द्वारे लोन कसे घ्यायचे, त्याची पूर्ण प्रोसेस काय आहे. या बद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

Kreditbee Information In Marathi

सर्वात पहिले क्रेडीटबी (Kreditbee) अँप बद्दल थोडी माहिती जाणून घेऊ या:

क्रेडीटबी (Kreditbee) अँप बद्दल थोडी माहिती

मित्रांनो, KreditBee हे एक झटपट वैयक्तिक कर्ज म्हणजेच इन्स्टंट पर्सनल लोन देणारे मोबाईल अँप आहे. या अँपला NBFC ची मंजुरी असून ते RBI च्या नियमानुसार काम करते. म्हणजेच सुरक्षेच्या दृष्टीने हे एक विश्वासनिय अँप आहे. 2018 पासून क्रेडीटबी हे लोन अँप संपूर्ण देशातील लोकांना इन्स्टंट लोन देण्यासाठी कार्यरत आहे. तसेच क्रेडीटबी हे एक ऑनलाईन, जलद, सुरक्षित, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पेपरलेस किंवा कमीत कमी कागदपत्रावर लोन देणारे एक अँप आहे. या अँप द्वारे तुम्ही पंधरा ते वीस मिनिटांत 1000 रुपये पासून ते 4 लाख रुपये पर्यंत इन्स्टंट पर्सनल लोन घेऊ शकता. या अँप चे वैशिष्ट्य म्हणजे या अँप द्वारे कर्ज उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रिये दरम्यान तुम्हाला कोणत्याही बँकेत जाण्याची गरज नाही.

तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड व फोटो यांशिवाय इतर कोणत्याही कागदपत्रांची गरज भासत नाही. लागणारी कागदपत्रे देखील तुम्हाला ऑनलाईन सबमिट करावी लागतात. त्यामुळे क्रेडीटबी मध्ये लोन ची पूर्ण प्रक्रिया ही 100% ऑनलाइन आहे, त्यामुळे तुम्ही कधीही व कुठेही लोन घेऊ शकता. यात तुम्हाला ऑनलाईन पर्सनल लोन हे रू 1000 ते 4 लाख पर्यंत, 0% ते 29.95% प्रति वर्ष व्याजदराप्रमाणे मिळू शकते. व कर्ज परतफेड कालावधी हा 3 ते 24 महिन्यापर्यंत मिळतो. यात APR रेंज ही 0 ते 70% असते व अगदी कमीत कमी ट्रांझेक्शन फी असते.

मित्रांनो, यात तुमचे लोन अमाउंट व व्याजदर हे तुम्ही काय काम करता म्हणजेच तुम्ही सॅलरी पर्सन आहात की सेल्फ एम्प्लॉय आहात त्यानुसार मिळते. तसेच तुमचा सिबील स्कोर ही बघितला जातो. व त्यानुसार तुम्हाला क्रेडिट लिमिट दिली जाते. मित्रांनो, या अँपने इतरही काही विशेष कंपन्या सह भागीदारी केली आहे. आणि या अँप चे संपूर्ण देशात दोन कोटी हुन ही अधिक ग्राहक आहेत.



क्रेडीटबी कोण कोणत्या प्रकारचे लोन ऑफर करते?

  1. Flexi personal loan: मित्रांनो, या लोन टाइप मध्ये तुम्हाला कर्ज रक्कम रू 1,000 ते रू 50,000 पर्यंत मिळू शकते. व या पर्सनल लोन च्या रकमेसाठी परतफेड कालावधी हा 3 ते 10 महिन्यांचा ऑफर केला जातो. आणि या लोन साठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचे पॅन कार्ड आणि पत्त्याचा पुरावा देणे आवश्यक असते.
  2. Personal loan for salaried: या लोन मध्ये पगारदार व्यक्तींना रू 10,000 ते रू 4,00,000 पर्यंत कर्ज रक्कम मिळू शकते. व कर्जाच्या परतफेडीसाठी 3 ते 24 महिन्यांचा कालावधी मिळतो. हे कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा आणि सॅलरी प्रूफ द्यावे लागते.

KreditBee अँप डाउनलोड साठी लिंक => 4 लाखापर्यंत झटपट लोन पूर्णपणे पेपरलेस/ऑनलाईन प्रक्रिया

  1. Personal loan for self employed: मित्रांनो, या लोन टाइप मध्ये self employed म्हणजेच स्वयंरोजगार असलेल्या लोकांना रू 10,000 ते रू 1,50,000 पर्यंत 3 ते 12 महिन्यांच्या कालावधीसह त्वरित वैयक्तिक कर्ज ऑफर केले जाते. या ल9न साठी अर्ज करताना फक्त पॅन कार्ड आणि पत्त्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
  2. Purchase on EMI: मित्रांनो, KreditBee वरून तुम्ही EMI वर वस्तू खरेदी करू शकता. इथे तुम्ही विविध उत्पादनांसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करून, कोणतीही प्रक्रिया शुल्क न देता तुमची 2,00,000 पर्यंतची खरेदी सुलभ EMI मध्ये रूपांतरित करू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त पॅन कार्ड आणि पत्त्याचा पुरावा देणे आवश्यक आहे.

क्रेडीटबी वरून लोन घेण्यासाठी काय पात्रता हवी?:

  1. अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
  2. अर्जदाराचे वय 21 वर्ष पूर्ण असावे आणि
  3. अर्जदाराचे स्थिर मासिक उत्पन्न असावे.

आता क्रेडीटबी वरून पर्सनल लोन मिळवण्यासाठी कसे अप्लाय करायचे ते जाणून घेऊ या:

क्रेडिटबी अँप वरून पर्सनल लोन कसे घ्यायचे

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला प्ले स्टोअर वरून kreditbee अँप डाउनलोड करून घ्यायचे आहे. व नंतर ओपन करायचे.

KreditBee अँप डाउनलोड साठी लिंक => 4 लाखापर्यंत झटपट लोन पूर्णपणे पेपरलेस/ऑनलाईन प्रक्रिया

kreditbee Varun Personal Loan Kase Gyayche Step 1

स्टेप 2: आता तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे. व नंतर Continue बटन वर क्लिक करायचे आहे.

kreditbee Varun Personal Loan Kase Gyayche Step 2

स्टेप 3: त्यानंतर अँप चे होम पेज ओपन होईल. त्यात तुम्हाला काही लोन चे प्रकार दाखवले जातील. आता खाली दिलेल्या Login/ SignUp with mobile या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

kreditbee Varun Personal Loan Kase Gyayche Step 3

स्टेप 4: त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे व नंतर दिलेल्या टर्म्स आणि कंडिशन्स वर टिक करून Continue बटन वर क्लिक करायचे आहे.

kreditbee Varun Personal Loan Kase Gyayche Step 4

स्टेप 5: नंतर तुमच्या मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी टाकायचा आहे. व नेक्स्ट पेज वर जे काही परमिशन्स मागितले जातील त्या टिक करायच्या आहेत. व नंतर Continue बटन वर क्लिक करायचे आहे.

kreditbee Varun Personal Loan Kase Gyayche Step 5

स्टेप 6: मित्रांनो, तुम्हाला इथे Referral code सुद्धा विचारला जाऊ शकतो. ते नाही टाकले तरी चालू शकते. किंवा तुम्ही कोड टाकुही शकता. व नंतर सबमिट करायचे आहे.

kreditbee Varun Personal Loan Kase Gyayche Step 6

स्टेप 7: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. त्याच आधारावर तुमचा सिबील स्कोर चेक केला जातो. व तुम्हाला किती लोन अमाउंट द्यायची व त्यावर व्याजदर किती असेल, ते ठरवले जाते. तर पॅन नंबर टाकून दिलेल्या जागी टिक करून Submit बटन वर क्लिक करायचे आहे.

kreditbee Varun Personal Loan Kase Gyayche Step 7

स्टेप 8: मित्रांनो, आता तुम्हाला एम्प्लॉयमेंट टाइप (employment type) सिलेक्ट करायचे आहे. म्हणजेच तुम्ही Salaried/पगारदार आहात की Self- employed/स्वयंरोजगार ते सिलेक्ट करायचे आहे. त्या नंतर तुमचे Monthly Income/मासिक उत्पन्न टाकून टिक करायचे आहे व शेवटी Submit बटन वर क्लिक करायचे आहे.

kreditbee Varun Personal Loan Kase Gyayche Step 8

स्टेप 9: त्या नंतर तुमच्या लोन एलिजिबिलिटी (loan eligibility) ला चेक केले जाते. हे तुम्हाला एसएमएस द्वारे सुद्धा नोटिफाय केले जाते. त्या नंतर खाली दिलेल्या refresh बटन वर क्लिक केल्या नंतर तुम्ही लोन घेण्यासाठी पात्र आहात का ते सांगितले जाते आणि जर पात्र असाल तर तुम्हाला किती लोन मिळेल ते दाखवले जाते. समजा तुम्हाला रू 50,000 पर्यंतचे पर्सनल लोन मिळेल असे दाखवले आहे.

मित्रांनो, आता खाली तुम्हाला लोन स्टेप्स दाखवले जातील. ज्यात पहिले तुमची लोन एलिजिबिलिटी आहे ते दाखवले जाते, त्या नंतर तुम्हाला लोन एप्लिकेशन सबमिट करावे लागेल, नंतर लोन ऍग्रिमेंट करावे लागेल व शेवटी Loan Disbursment म्हणजेच तुमच्या खात्यात लोन अमाउंट ट्रान्सफर केली जाते. आता तुम्हाला त्या खाली दिलेल्या Continue to apply या बटन वर क्लिक करायचे आहे.

kreditbee Varun Personal Loan Kase Gyayche Step 9

स्टेप 10: मित्रांनो, आता तुम्हाला KYC डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. त्यात तुम्हाला तुमचे Address proof आणि Selfi अपलोड करायचा आहे.

मित्रांनो, address proof मध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ शकता किंवा डिजिलॉकर च्या माध्यमातून सुद्धा व्हेरिफाय करू शकता किंवा तुमचे पासपोर्ट देखील देऊ शकता. तसेच आता तुम्हाला सेल्फी अपलोड करायचा आहे. मित्रांनो सेल्फी अपलोड करताना तुम्ही मास्क, चष्मा व कॅप न घालता सेल्फी काढायचा आहे. व नंतर अपलोड करायचा आहे. दोन्ही गोष्टी अपलोड झाल्या नंतर Submit बटन वर क्लिक करायचे आहे.

kreditbee Varun Personal Loan Kase Gyayche Step 10

स्टेप 11: मित्रांनो, KYC नंतर आता तुम्हाला तुमची General information द्यायची आहे. त्यात तुम्हाला तुमचा ई-मेल अड्रेस टाकायचा आहे व नंतर Submit करायचे आहे.

स्टेप 12: त्या नंतर तुमचे Marital status टाकायचे आहे, त्या नंतर तुमचे Education, Profession सिलेक्ट करायचे आहे, त्या नंतर तुमचा केवायसी अड्रेस व कम्युनिकेशन अड्रेस सारखाच असेल तर इथे टिक करायचे आहे व नंतर Type of residence सिलेक्ट करून Continue बटन वर क्लिक करायचे आहे.

kreditbee Varun Personal Loan Kase Gyayche Step 12

स्टेप 13: त्या नंतर आता तुम्हाला References द्यायचे आहे. यात तुम्ही father, mother, spouse यापैकी कोणाही सिलेक्ट करून त्यांचे फोन नंबर द्यायचा आहे. तसेच friend reference मध्ये तुमच्या फ्रेंड चा पण मोबाईल नंबर द्यायचा आहे. व नंतर Continue वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 14: मित्रांनो, आता तुमचे लोन अप्रुव्हल साठी application सबमिट होऊन जाईल व तसा एसएमएस देखील येईल. किंवा तुम्ही Refresh ही करू शकता.

kreditbee Varun Personal Loan Kase Gyayche Step 14

स्टेप 15: मित्रांनो, आता नेक्स्ट पेज वर तुमच्या डिटेल्स नुसार तुम्ही किती लोन घेऊ शकता ते दाखवले जाईल. मित्रांनो तुम्ही जर salaried पर्सन असाल तर तुम्हाला इथे 4 लाख पर्यंत लोन मिळाले असते. पण जर तुम्ही सेल्फ एम्प्लॉय असाल तर तुम्हाला इथे कमी लोन अमाउंट दिली जाईल. समज इथे तुम्ही सेल्फ एम्प्लॉय असाल आणि तुमच्या डिटेल्स नुसार तुम्हाला flexi personal loan मध्ये रू 18,000 चे पर्सनल लोन ऑफर झाले आहे. आणि तुम्हाला जर ही अमाउंट वाढवायची असेल तर तुम्हाला video KYC करावी लागेल. याशिवाय क्रेडीटबी अँप च्या माध्यमातून तुम्ही लोन repayment देखील करू शकता.

kreditbee Varun Personal Loan Kase Gyayche Step 15

स्टेप 16: तर आता तुम्हाला 18,000 रुपयांचे लोन ऑफर मिळाली आहे तर ते मिळवण्यासाठी Get now या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. नेक्स्ट पेज वर परत एकदा Get now ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 17: आता तुमचे प्रोफाइल re- access केले जाईल. नंतर तुम्हाला तुमची लोन अमाउंट 18,000 रू ऑफर झालेली दिसेल. त्यावर तुमचा ईएमआई किती असेल व कर्ज परतफेड कालावधी किती असेल ते दाखवले जाईल. मित्रांनो, इथे तुम्ही तुमची लोन अमाउंट कमी देखील करू शकता. तसेच खाली दिलेल्या View summary and charges ऑप्शन वर क्लिक करून तुमच्या लोनची पूर्ण समरी बघू शकता.

kreditbee Varun Personal Loan Kase Gyayche Step 17

त्यात तुम्हाला तुमची loan amount, annual loan interest, annual percentage rate, insurance premium, processing fee, GST, loan document fee वगैरे सर्व फी व चार्जेस दाखवले जातील. ही सर्व चार्जेस deduct होऊन जी अमाउंट उरेल ती अमाउंट तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते. मित्रांनो, इथे emi protect fee व credit score report fee नको असेल तर त्याला unselect करून तुमचे चार्जेस कमी करू शकता.

kreditbee Varun Personal Loan Kase Gyayche Step 17 Sub-Step 2

आता तुम्ही view repayment schedule ऑप्शन वर क्लिक करून तुमचे रिपेमेंट चे पूर्ण शेड्युल बघू शकता. यात तुम्हाला दर महिन्याची ड्यु डेट दिसेल. तेव्हा तुम्हाला रिपेमेंट करायचे आहे. त्या नंतर Continue ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

kreditbee Varun Personal Loan Kase Gyayche Step 17 Sub-Step 3

स्टेप 18: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला Loan Purpose सिलेक्ट करायचे आहे. व नंतर Continue ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 19: मित्रांनो, आता तुम्हाला ज्या बँकेत लोन अमाउंट ट्रान्सफर करायची आहे त्या बँकेचे अकाउंट डिटेल्स द्यायचे आहेत. त्यासाठी add savings bank account ऑप्शन वर क्लिक करून नेक्स्ट पेज वर बँकेचा IFSC कोड, बँक अकाउंट नंबर टाकायचे आहे व दिलेल्या जागी टिक करून बँक अकाउंट ऍड करायचे आहे.

kreditbee Varun Personal Loan Kase Gyayche Step 19

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण क्रेडीटबी ( kreditbee) अँप वरून पर्सनल लोन कसे घ्यायचे, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुम्हाला ही जर पैश्यांची खुओ तातडीची गरज असेल तर तुम्ही लोन घेण्यासाठी क्रेडिटबी अँप चा विचार नक्कीच करू शकता. मित्रांनो, मला खात्री आहे की या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद।

FAQ

Kreditbee (क्रेडीटबी) अँप कडून किती लोन घेऊ शकतो?

मित्रांनो, Kreditbee अँप वरून तुम्ही रू 1000 ते रू 4 लाख रुपये पर्यंतचे कर्ज घेऊ शकता.

क्रेडीटबी अँप वरून लोन घेणे सुरक्षित आहे का?

हो मित्रांनो, क्रेडीटबी अँप वरून लोन घेणे पूर्णपणे सुरक्षित आहे, कारण याला NBFC ने मंजूर केलेले आहे आणि ते RBI च्या नियमांनुसार काम करते.

क्रेडीटबी मध्ये कर्ज किती महिन्यांत फेडू शकतो?

मित्रांनो, क्रेडीटबी अँप वरून कर्ज घेतल्यानंतर, तुम्ही ते 3 महिने ते 24 महिन्यांत EMI द्वारे सहज फेडू शकता.

क्रेडीटबी लोन देताना सिबील स्कोर चेक करते का?

हो मित्रांनो, तुम्ही दिलेल्या डिटेल्स वरून तुमचा सिबील स्कोर चेक केला जातो. व त्या वरूनच तुम्हाला लोन द्यायचे की नाही ते ठरवले जाते. तसेच तुम्ही जर लोन साठी पात्र असाल तर तुम्हाला किती लोन द्यायचे व त्याचा व्याजदर किती असेल ते सुद्धा तुमच्या क्रेडिट रिपोर्ट नुसार ठरवले जाते.

क्रेडीटबी वरून लोनसाठी कोण अर्ज करू शकतो?

मित्रांनो, 21 वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही भारतीय व्यक्ती, जो पगारदार आहे किंवा ज्याचा मासिक उत्पन्नाचा स्रोत स्थिर आहे, अशी व्यक्ती क्रेडिटबी द्वारे पर्सनल लोन साठी अर्ज करू शकते.

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!