HSRP नंबर प्लेट घरबसल्या मागवा | How to order High Security Number Plate | HSRP online application
- HSRP नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अर्ज
- HSRP न बसवल्यास दंड किती?
- HSRP नंबर प्लेट म्हणजे काय
- HSRP कोणत्या वाहनांसाठी बंधनकारक आहे?
- HSRP नंबर प्लेटसाठी किती खर्च येतो ?
नमस्कार मित्रांनो, आज आपण HSRP नंबर प्लेट: म्हणजे काय?, ऑनलाईन पद्धतीने अप्लाय कसे करायचे?, किती खर्च येतो?, HSRP नंबर प्लेट न बसवल्यास काय होईल?, न बसवल्यास दंड किती? या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

सरकारने वाहनांची सुरक्षितता जपण्यासाठी म्हणजेच वाहनांची बनावटगिरी व त्यासंबंधी होणारी छेडछाड रोखण्यासाठी आता HSRP म्हणजे High Security Registration Plate ची संकल्पना सादर केली आहे. एचएसआरपी ला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणूनही ओळखले जाते. मित्रांनो, ही नंबर प्लेट आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज केली गेली आहे जेणेकरून वाहनाशी संबंधित गुन्हे कमी होतील.
त्यामुळे सरकारने प्रत्येक वाहन धारकाला HSRP नंबर प्लेट्स वापरणे आता अनिवार्य केले आहे. यामुळे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बद्दल तुम्हाला सर्व काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. जसे की HSRP म्हणजे काय? या नंबर प्लेट्सचं महत्त्व काय आहे? सरकार या नवीन नंबर प्लेट्स असलेल्या वाहनांसाठी एवढं आग्रही का आहे? तसेच तुम्ही जर या नंबर प्लेट्स लावल्या नाही, तर काय होईल? या अशा सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. त्यामुळे आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा…
HSRP नंबर प्लेट साठी ऑनलाईन अर्ज
स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला https://transport.maharashtra.gov.in या वेबसाईट वर यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे RTO ऑफिस नंबर सिलेक्ट करायचा आहे व नंतर Submit बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 2: त्या नंतर आता तुम्हाला न्यू वेबसाईट वर री-डायरेक्ट केलं जाईल. तिथे तुम्हाला काही ऑप्शन दिसतील त्यातील आपल्याला नवीन HSRP नंबर प्लेट साठी अप्लाय करायचं आहे म्हणून Book High Security Registration Plate या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
नोट: प्रत्येक जिल्हा नुसार वेबसाइट वेगळी असू शकते.

स्टेप 3: आता या नंतर तुम्हाला सर्वात पहिले तुमचे Booking Details भरायचे आहेत. ज्यात तुमचं State म्हणजे राज्य टाकायचं आहे. त्या नंतर Registration Number म्हणजे तुमच्या गाडीचा नंबर टाकायचा आहे.
त्यानंतर Chassis Number व गाडीचा Engine Number टाकायचा आहे. हे नंबर तुम्ही पूर्ण पण टाकू शकता किंवा शेवटचे पाच अंक टाकले तरी चालेल. या नंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून दिलेला कॅपचा भरायचा आहे व नंतर Click Here बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 4: वरील सर्व माहिती बरोबर भरली असेल तर पुढे Vehicle details मध्ये तुमच्या गाडीची सर्व माहिती ऑटोमॅटिक येऊन जाईल. जसे की BS, गाडीचा रजीस्ट्रेशन डेट, फ्युएल टाइप, वगैरे…
त्यानंतर Contact Details मध्ये मोबाईल नंबर, Owner Name म्हणजे गाडीच्या मालकाचे नाव टाकायचे आहे. ई-मेल असेल तर तो टाकायचा आहे व नंतर मोबाईल नंबर आणि Billing Address मध्ये तुमचा आधार कार्ड वर असलेला पत्ता टाकायचा आहे व शेवटी Next बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 5: मित्रांनो, या नंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवला जाईल. तो OTP टाकून Next बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 6: मित्रांनो, त्या नंतर आता Affixation location या ऑप्शन मध्ये तुम्हाला दोन पर्याय दिले जातील.
- Appointment at Affixation Centre या मध्ये तुम्ही अपॉइंटमेंट सेन्टर ला जाऊन तिथे तुमच्या गाडीला नंबर प्लेट बसवून घेऊ शकता.
- Home Delivery यामध्ये एक्सट्रा चार्जेस घेऊन व्यक्ती तुमच्या घरी येऊन गाडीला नंबर प्लेट बसवून देतो.

परंतु फक्त काही ठराविक पिन कोड वरच होम डिलिव्हरी ची सुविधा उपलब्ध आहे. तुमचा पिन कोड वर होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध आहे का ते तपासण्यासाठी तुमचा पिन कोड टाकून Check Availability बटन वर क्लिक करायचे आहे. जर तुमचा पिन कोड ऍक्सेप्ट झाला नाही तर खाली दिलेल्या Affixation Appointment centre या बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 7: आता या नंतर नेक्स्ट पेज वर तुम्हाला अपॉइंटमेंट घेण्यासाठी काही डिटेल्स भरायचे आहेत, जसे की तुमचा जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे व तुमचा पिन कीड टाका किंवा गावचे नाव किंवा Near me ऑप्शन द्वारे तुमचं लोकेशन एनेबल करू शकता.

यामुळे तुम्हाला तुमच्या जवळपास चे अपॉइंटमेंट सेन्टर दाखवले जातील. यापैकी तुम्हाला सोयीस्कर पडेल अश्या सेन्टर ला निवडायचे आहे. इथे तुम्हाला सेन्टर चे नाव ,पत्ता तसेच तारीख, वेळ व किती पैसे लागतील या सर्व गोष्टी दाखवल्या जातील, सर्व गोष्टी सिलेक्ट करून Confirm Dealer बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 8: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला अपॉइंटमेंट ची तारीख आणि वेळ यांचा स्लॉट दाखवला जाईल. जी तारीख उपलब्ध असेल ती डार्क ब्लॅक रंगाने दाखवली जाते व जी तारीख उपलब्ध नसेल ती लाल रंगाने दाखवली जाते. उपलब्ध असलेल्या तारखे मधून कोणतीही एक तारीख निवडायची आहे व त्या नंतर अपॉइंटमेंट ची वेळ ही सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि त्या नंतर Confirm & Proceed या बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 9: आता या नंतर तुम्हाला तुमची Booking कन्फर्म झाली आहे ते दाखवले जाईल. इथे तुम्हाला तुमची बुकिंग डेट, टाइम, अपॉइंटमेंट सेन्टर चा अड्रेस, तुमच्या गाडीची इतर माहिती अश्या काही गोष्टी दाखवल्या जातील. हे सर्व माहिती चेक करून घ्यायची आणि मग Confirm and Proceed बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 10: मित्रांनो, आता नेक्स्ट पेज वर Verify details and pay या ऑप्शन मध्ये तुम्हाला तुमची माहिती दिसेल ती माहिती चेक करून घ्यायची आहे. आणि नंतर पेमेंट करायचे आहे. त्यासाठी i Agree वर क्लिक करून नंतर pay online या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर यूपीआई किंवा क्यू आर कोड वगैरे कोणत्याही एका पेमेंट मेथड द्वारे तुमचे पेमेंट करून घ्यायचे आहे. पेमेंट झाल्यावर तुम्हाला पेमेंट सक्सेसफुली झाल्याचा मेसेज दाखवला जाईल.

स्टेप 11: आता या नंतर तुम्हाला तुमची अपॉइंटमेंट ची रिसीट दाखवली जाईल. ही रिसीट खूप महत्त्वाची असणार आहे त्यामुळे त्याची प्रिंट काढून घ्या किंवा स्क्रीन शॉट काढू शकता. मित्रांनो, ज्या दिवशी तुमची अपॉइंटमेंट असेल त्या दिवशी गाडी सोबतच ही रिसीट आणि RC सुद्धा घेऊन जायचे आहे. त्यांना रिसीट दाखवून प्रोसिजर झाल्यावर तुमच्या गाडीला नंबर प्लेट बसवून दिली जाईल.

अंतिम मुदतीपूर्वी HSRP नंबर प्लेट न बसवल्यास काय होईल?
मित्रांनो, अंतिम मुदती पूर्वी HSRP नंबर प्लेट न बसवल्यास केंद्रीय मोटार वाहन नियम (CMVR) च्या नियम 59 आणि मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 177 अंतर्गत 1,000 रुपये चा दंड आकारला जाईल. तसेच 1 एप्रिल 2019 नंतर नोंदणी कृत झालेल्या आणि ज्या वाहनांकडे HSRP नाहीत त्यांना मोटार वाहन कायद्याच्या कलम 190 (2) अंतर्गत दंड आकारला जाईल. राज्य सरकारनेही याचे पालन न करणाऱ्या वाहन मालकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. यासोबतच कठोर अंमलबजावणीसाठी वाहतूक अधिकाऱ्यांना दररोज तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे
सर्वात पहिले आपण HSRP म्हणजे काय
मित्रांनो, HSRP म्हणजे High Security Registration Plate ही एक उच्च सुरक्षा असलेली नंबर प्लेट आहे, जी वाहनाची ओळख आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकारने लागू केली आहे. या नंबर प्लेट मध्ये एक प्रकारचा चिप असतो जो वाहनाच्या मालकाच्या डिटेल्स ची सत्यता तपासण्यासाठी मदत करतो. मित्रांनो, सरकारने आता प्रत्येक वाहनाला HSRP नंबर प्लेट्स वापरणे अनिवार्य केले आहे, आणि यामुळे प्रत्येक वाहनाची ओळख करणे अधिक सोपे आणि सुरक्षित झाले आहे.
याशिवाय HSRPs चे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे याला एक स्नॅप लॉक आहे, ज्यामुळे ही नंबर प्लेट्स काढता येणार नाही.
मित्रांनो, ही नंबर प्लेट लावण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. पण काळजी करू नका मित्रांनो, ऑनलाइन पद्धतीने HSRP नंबर प्लेटसाठी अर्ज करणं ही एक खूपच सोपी डिजिटल प्रक्रिया आहे. ज्यामुळे वाहनधारकांना त्यांची प्लेट घरबसल्या मिळवता येइल. मित्रांनो, या अर्जासाठी संबंधित राज्याच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन वाहनाची माहिती, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि वाहना नुसार शुल्क भरणे आवश्यक असते.
ही अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्या वर, तुम्हाला तुमच्या वाहनासाठी HSRP नंबर प्लेट प्राप्त होईल. मित्रांनो, खरंतर ही ऑनलाइन सुविधा, नागरिकांचा वेळ वाचवण्यासाठी आणि कागदपत्रांच्या प्रक्रियेपासून मुक्त होण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
HSRP नंबर प्लेट लावणे अनिवार्य का आहे?
मित्रांनो, रस्त्यांची सुरक्षितता वाढविण्यासाठी, तसेच वाहनांशी संबंधित गुन्हे रोखण्यासाठी आणि वाहतूक नियमांची होणारी अंमलबजावणी सुधारण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सर्व वाहनांना HSRP बसवणे अनिवार्य केले आहे. अनेक वाहने डुप्लिकेट, बनावट किंवा फॅन्सी नंबर प्लेट वापरत होती, ज्यामुळे चोरीला गेलेल्या वाहनांना किंवा गुन्हेगारी कारवायां मध्ये सहभागी असलेल्यांना शोधणे कठीण झाले होते. त्यामुळे HSRP नंबर प्लेट बसवणे खूप आवश्यक आहे.
मित्रांनो, HSRP नंबर प्लेट्स मध्ये काही सुरक्षा फीचर्स असतात, जसे की प्रत्येक नंबर प्लेट वर एक युनिक QR कोड असतो, जो वाहनाची माहिती ट्रॅक करण्यास मदत करतो. तसेच नंबर प्लेट वर एक विशेष हॉट स्टॅम्पिंग असते, जे प्लेटची authenticity दर्शवते. या सोबतच नंबर प्लेट्स वर वापरण्यात आलेले कलर व मटेरियल हे सुरक्षा वाढवण्यासाठी आहेत. या सर्व फीचर्स मुळे वाहनांची ओळख, सुरक्षा आणि कायद्याचे पालन अधिक प्रभावीपणे होऊ शकते. त्यासाठी सरकारने संबंधित HSRP नंबर प्लेट लावणे अनिवार्य केले आहे.
HSRP नंबर प्लेट कोणत्या वाहनांसाठी बंधनकारक आहे?
मित्रांनो, जी वाहने 1 एप्रिल 2019 नंतर खरेदी केलेली आहेत त्या वाहनांना HSRP प्लेट आधीच बसवलेल्या आहेत. मात्र, 2019 च्या आधीच्या सर्व दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांसाठी ही नंबर प्लेट लावणे बंधनकारक केले गेले आहे. आणि त्यासाठी तुम्हाला 31 मार्च 2015 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे, नाही तर मोठा दंड आकारला जाऊ शकतो.
HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी किती खर्च येतो ?
मित्रांनो, परिवहन विभागाने निश्चित केलेल्या दरानुसार, HSRP नंबर प्लेटसाठी खालीलप्रमाणे शुल्क आकारले जाते:
- दुचाकी आणि ट्रॅक्टरसाठी: रु 531
- तीन चाकी वाहनसाठी : रु 590
- चार चाकी आणि इतर मोठी वाहने : रु 879
FAQ
HSRP नंबर प्लेट आणि सामान्य नंबर प्लेट मध्ये काय फरक आहे?
मित्रांनो, सामान्य नंबर प्लेट असलेल्या वाहनांच्या नंबर प्लेट्स काढणे, बदलणे किंवा छेडछाड करणे सोपे होते, ज्यामुळे चोरांना वाहन चोरी केल्या नंतर प्लेट्स बदलणे सोपे होते. मात्र HSRP म्हणजेच उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स मध्ये पुन्हा वापरता न येणारी आणि काढता न येणारी लॉकिंग सिस्टम असते, ज्यामुळे वाहन चोरीचा धोका खूप कमी होतो.
HSRP नंबर प्लेट किती काळासाठी वैध असतात?
मित्रांनो, HSRP म्हणजेच उच्च सुरक्षा नंबर प्लेट्सला नियमित नूतनीकरणाची आवश्यकता नसते. एकदा hsrp नंबर प्लेट बसवल्या नंतर, त्या वाहनाच्या आयुष्यभर वैध असतात.
कोणत्या वाहनांना HSRP नंबर प्लेटची आवश्यकता असते?
मित्रांनो, खाजगी आणि व्यावसायिक अश्या दोन्ही वाहनांना या नंबर प्लेट लावणे आवश्यक आहे. तुमच्याकडे कार, मोटारसायकल, ट्रक किंवा इतर कोणतेही छोटे मोठे मोटार वाहन असो, नियमांचे पालन करण्यासाठी आणि रस्ता सुरक्षा सुधारण्यासाठी HSRP घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी अंतिम मुदत कधी पर्यंत आहे?
मित्रांनो, तसे पाहिलं तर hsrp प्लेट लावण्यासाठी अंतिम मुदत 30 एप्रिल पर्यंत आहे. परंतु 2019 पूर्वी मोठ्या प्रमाणात झालेली गाड्यांची खरेदी पाहता परिवहन विभाग या बाबत आढावा घेऊन त्यापैकी किती गाड्या नंबर प्लेट लावण्यासाठी शिल्लक आहेत हे तपासून बघतील. त्या नंतर गरज असल्यास मुदत वाढ दिली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण HSRP नंबर प्लेट साठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय कसे करायचे, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा.
धन्यवादl
Tags: hsrp number plate, hsrp number plate apply online, high security number plate, hsrp number plate apply online odisha, high security number plate online registration, hsrp, number plate, how to hsrp number plate apply online, hsrp number plate apply online karnataka, hsrp plate, hsrp number plates, how to get high security number plate, hsrp number plate karnataka, how to book hsrp number plate, how to order hsrp number plate, high security number plate kaise apply karen, hsrp number plate apply online maharashtra 2025, harp number plate online booking maharashtra, hsrp number plate online apply, harp number plate online registration, hsrp number plate online kaise book kare, hsrp number plate online order kaise kare, hsrp number plate maharashtra, high security registration plate online booking apply, order hsrp number plate, maharashtra hsrp number plate online order, high security number plate maharashtra