Government Yojana

किसान सुविधा पोर्टल बद्दल माहिती: खतांचे बाजार भाव, स्टॉक, पीक विमा

नमस्कार मित्रांनो आज आपण किसान सुविधा पोर्टल बद्दल माहिती बघणार आहोत. यात किसान सुविधा पोर्टल वर शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या सुविधांबद्दल माहिती घेणार आहोत, जसे कि सध्या खतांचा बाजारभाव काय बघायचा, तसेच तुमच्या जवळच्या खत विक्रेत्याकडे खतांचा स्टॉक किती आहे आणि स्टॉक असूनही तू तो तुम्हाला खत देत नसेल तर त्याची तक्रार कशी करायचे, क्रॉप इन्शुरन्स म्हणजेच पीक विमा बद्दल माहिती, या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

Kisan Suvidha Portal Mahiti

मित्रांनो, आपले राज्य सरकार व केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी वेळोवेळी नवनवीन योजना, राबवित असते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पोर्टल वर जावे लागते. त्यात कधी कधी अडचणी येतात. म्हणूनच ही गोष्ट लक्षात घेऊन सरकारने शेतकऱ्यांसाठी नुकतेच किसान सुविधा पोर्टल सुरू केले आहे. शेतकऱ्यांसाठी हे एक स्मार्ट अँप ठरणार आहे, ज्या द्वारे पोर्टल वर शेतकरी स्वतःची नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन करून अनेक सुविधांचा लाभ मिळवू शकतात. मित्रांनो, आमच्या आजच्या या लेखात किसान सुविधा पोर्टल म्हणजे काय? किसान सुविधा पोर्टल द्वारे तुम्हाला म्हणजेच शेतकऱ्याला कोण कोणत्या सुविधा मिळू शकतात. यासोबतच कृषी आणि पशुसंवर्धन संबंधित कोण कोणत्या योजना या पोर्टलशी जोडल्या गेल्या आहेत, या सर्व बाबींबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.



सर्वात पहिले किसान सुविधा पोर्टल किंवा अँप चे उद्दिष्ट व त्या बद्दल थोडी माहिती जाणून घेऊ या:-

किसान सुविधा पोर्टल किंवा अँप चे उद्दिष्ट

मित्रांनो, किसान सुविधा पोर्टल किंवा अ‍ॅप हे भारत सरकारच्या सहकार्याने नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर म्हणजेच NIC ने विकसित केले आहे. या पोर्टल चा शेतकऱ्यांना खूप लाभ होणार आहे. कारण या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित उपयोगी व आवश्यक ती माहिती पुरविली जाणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या गुणवत्तेत आवश्यक ती सुधारणा करता येईल. त्यामुळे पिकांचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल आणि तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल.

मित्रांनो, या बरोबर चा अजून एक फायदा म्हणजे किसान सुविधा पोर्टल वर नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाहीये. तसेच या पोर्टल वर जो काही डेटा असतो तो जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर नियंत्रित केला जातो. मित्रांनो, किसान सुविधा पोर्टल सुरू करण्या मागचा मुख्य उद्देश हा शेतकऱ्यांना विविध शेती योजना, पिके, शेतीसाठी लागणाऱ्या यंत्र सामग्री, पशुसंवर्धन या संबंधित माहिती देणे हा आहे. आणि ही सर्व माहिती शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिल्याने त्यांना त्यांच्या पिकांमध्ये चांगली गुणवत्ता पूर्ण सुधारणा करता येईल.

याशिवाय पोर्टल च्या माध्यमातून कोल्ड स्टोरेजची माहिती, हवामानाची माहिती, वनस्पतींची माहिती, शेतीची यंत्रसामग्री आदींची माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच या पोर्टल च्या माध्यमातून शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवले जातील, त्यामुळे शेतकरी स्वावलंबी आणि सक्षम होईल.

खतांचे सध्याचे बाजार भाव चेक करा

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला kisansuvidha.gov.in या पोर्टल वर जायचे आहे. नंतर Fertilizers/खते या ऑपशन वर क्लिक करायचे आहे.



Khatanche Bajarmuly Check Kara Step 1

स्टेप 2: नंतर Fertilizer Price/खताची किंमत या ऑपशन वर क्लिक करायचे आहे.

Khatanche Bajarmuly Check Kara Step 2

स्टेप 3: आता तुम्हाला State मध्ये राज्य निवडायचे आहे नंतर Product मध्ये खताचे नाव निवडायचे आहे आणि नंतर Search बटन वर क्लिक करायचे आहे.

Khatanche Bajarmuly Check Kara Step 3

स्टेप 4: Search बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली लगेच त्या टेबल मध्ये खताची किंमत दिसेल, तसेच त्या खताच्या वेगवेगळ्या कंपनीची किती किंमत आहे ते हि टेबल मध्ये सविस्तर दिलेले आहे.

Khatanche Bajarmuly Check Kara Step 4

अशा तऱ्हेने तुम्ही कोणत्याही खतांचे सध्याचे बाजारमूल्य चेक करू शकता आता आपण तुमच्या जवळच्या खताच्या दुकानात खतांचा स्टॉक किती आहे ते कशे तपासायचे ते बघुयात.

जवळच्या खताच्या दुकानात खतांचा स्टॉक किती आहे ते तपासा

स्टेप 1: सर्वात पहिले तुम्हाला kisansuvidha.gov.in या पोर्टल वर जायचे आहे. नंतर Fertilizers/खते या ऑपशन वर क्लिक करायचे आहे.

Khatanchya Dukant Stock Check Kara Step 1

स्टेप 2: नंतर Fertilizer Stock Position/खत साठा स्थिती या ऑपशन वर क्लिक करायचे आहे.

Khatanchya Dukant Stock Check Kara Step 2

स्टेप 3: आता तुम्हाला State मध्ये राज्य निवडायचे आहे नंतर तुमचा District/जिल्हा निवडायचा आहे आणि शेवटी Retailer/खताच्या दुकानाचे नाव लिस्ट मध्ये शोधून नंतर Search बटन वर क्लिक करायचे आहे.

Khatanchya Dukant Stock Check Kara Step 3

स्टेप 4: त्याच बरोबर जर तुम्हाला त्या खताच्या कोणत्या कंपनीचा किती स्टॉक आहे ते बघायचे असेल तर टेबल मध्ये असलेल्या स्टॉकच्या किमतीला क्लिक करा आणि नवीन पेज वर तुम्हाला त्या दुकानदाराकडे कोण-कोणत्या कंपनीचा किती स्टॉक आहे ते समजेल.

Khatanchya Dukant Stock Check Kara Step 4

किसान सुविधा पोर्टल वरील विविध योजना

याचबरोबर किसान सुविधा पोर्टल वर कोण कोणत्या योजना किंवा स्कीम चालू आहेत, तसेच या योजनांचा फायदा कसा करून घ्यायचा हे जाणून घेण्यासाठी पुढील माहिती वाचा.

सर्वात पहिले तुम्हाला kisansuvidha.gov.in या पोर्टल वर जायचे आहे. पोर्टल उखडल्यानंतर तुम्हाला वर्तुळामध्ये वेगवेगळ्या योजनांची नावे दिसतील प्रत्येक वर्तुळावर क्लिक करून तुम्ही वेगवेगळ्या योजनांची माहिती करून घेऊ शकता तसेच वेगवेगळ्या योजनांना अर्ज करू शकता. खाली आम्ही प्रत्येक योजनेची माहिती दिलेली आहे.

PM- KISAN योजना:- मित्रांनो, पोर्टल च्या होम पेज वर तुम्हाला अनेक योजना कॅटेगरी नुसार दिसतील. त्यातील पहिला ऑप्शन PM- KISAN या वर क्लिक करायचे आहे. यात तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजना बद्दल माहिती दिलेली दिसेल. त्यात तुम्हाला जर नवीन रजिस्ट्रेशन करायचे असेल तर तुम्ही या पोर्टल च्या माध्यमातून करू शकता. तसेच तुमच्या निधी बद्दल जाणून घ्याउचे असेल किंवा तुमचा आधार अपडेट करायचा असेल तसेच तुम्हाला जर काही कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यासाठी इथे हेल्पलाइन चा ऑप्शन सुद्धा दिलेला आहे.

Fertilizers/ खते:- मित्रांनो, दुसऱ्या कॅटेगरी ही fertilizers बद्दल दिली आहे. शेतकऱ्यांसाठी हा एक खूप चांगला ऑप्शन आहे. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना आपल्या शेतात कोणते खत टाकावे व ते कुठे मिळेल ते माहीत नसते. त्यासाठी या पोर्टल मध्ये फर्टिलायझर्स या ऑप्शन वर क्लिक केल्या वर तुम्हाला काही ऑप्शन दिसतील. त्यातील पहिल्या ऑप्शन fertilizer stock position मध्ये गेल्यावर तुम्हाला फक्त तुमचे स्टेट व डिस्ट्रिक्ट टाकायचे आहे व लगेच तुम्हाला समोर काही खत विक्रेत्यांचे किंवा खत दुकानदारांचे डिटेल्स ओपन होतील.

त्यात कोणत्या दुकानदार जवळ फर्टिलायझर्स चा किती स्टॉक आहे ते बघायला मिळेल. जर एखादा दुकानदार स्टॉक असून ही देत नसलं तरी तुम्ही डिस्ट्रिक्ट हेल्पलाईन नंबर द्वारे तशी कम्प्लेंट देखील करू शकता. व सरकार त्यावर कडक कारवाई करेल. त्यामुळे काळाबाजार करणाऱ्या दुकानदारां वर नक्कीच अंकुश बसणार आहे.

मित्रांनो, फर्टिलायझर्स च्या कॅटेगरी मधील दुसरा ऑप्शन हा fertilizer price चा आहे. यामध्ये सरकार द्वारे खतांचे दर निश्चित केलेले असतात. तुम्हाला जर खरंच दर बघायचे असतील तर तुम्हाला फजत तुमचे स्टेट म्हणजेच इजय सिलेक्ट करायचे आहे व ज्या प्रॉडक्ट चे दर बघायचे आहेत त्या प्रॉडक्ट ला सिलेक्ट करायचे आहे. व तुमच्या जवळपास जे कोणी रिटेलर्स असतील त्यांचे दर तुम्ही बघू शकता. हे दर ठरलेले असतात त्यामुळे कोणीही तुमच्या कडून ओव्हरचार्ज म्हणजेच जास्तीचे पैसे घेऊ शकत नाही. तसेच तुमच्या जवळपास जे कोणी फर्टिलायझर रिटेलर्स असतील त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील तुम्हाला इथे मिळतो.

KISAN RATH/ किसन रथ:- मित्रांनो, किसान सुविधा पोर्टल मध्ये तिसरी कॅटेगरी आहे KISAN RATH (किसान रथ). यामध्ये तुम्ही गाडी बुक करू शकता. म्हणजेच शेतकऱ्याला जर त्याचा माल कुठे बाहेर लांब किंवा शहरात घेऊन जायचा असेल तर किसान रथ पोर्टल च्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट साठी गाडी बुक करता येऊ शकते. यात तुमच्या माल च्या क्वांटीटी नुसार तुम्ही गाडी बुक करू शकता. फक्त इथे तुम्हाला ट्रान्सपोर्ट चे पैसे द्यावे लागतील.

याशिवाय इथे तुम्हाला transport service provider in your area असा ऑप्शन देखील दिला आहे. ज्या द्वारे तुम्ही तुम्ही तुमच्या एरिया मधील ट्रान्सपोर्ट सर्व्हीस उपलब्ध आहेत की नाही या बद्दल माहिती मिळवू शकता. तसेच app installation या ऑप्शन द्वारे किसान रथ च्या एप्लिकेशन ला इन्स्टॉल करून तुम्ही ट्रान्सपोर्ट साठी बुकिंग करू शकता. ही पूर्ण प्रोसेस समजून सांगण्यासाठी इथे तुम्हाला विडिओ देखील दिला आहे. त्याचा ही तुम्ही उपयोग करू शकता.

Kisan Rath

Crop Insurance/ पीक विमा:- मित्रांनो, क्रॉप इन्शुरन्स म्हणजेच पीक विमा होय. या बद्दल तर तुम्हाला माहित असेलच. जर तुमच्या पिकाचे काही नुकसान झाले किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्ती मुले पिक खराब झाले तर तुम्हाला त्याची नुकसान भरपाई मिळते. यासाठी तुम्ही तुमच्या पिकाचा विमा काढणे गरजेचे आहे. जर तुम्ही आधीच पिकांचा विमा काढलेला असेल तर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला झालेल्या नुकसानाची भरपाई करून देते.

यासाठी तुम्ही क्रॉप इन्शुरन्स ऑप्शन वर क्लिक केल्यावर पुढे काही ऑप्शन दिसतील. त्यात तुम्ही तुमचा स्टेट, डिस्ट्रिक्ट व पिकाचे नाव टाकून प्रीमियम कॅल्क्युलेट करू शकता. तसेच दुसऱ्या ऑप्शन मध्ये तुम्ही स्वतः विमा करू शकता किंवा इन्शुरन्स क्लेम करण्याचा ऑप्शन देखील इथे दिलेला आहे. यासोबतच ज्या कंपनी चा तुम्ही विमा केलेला आहे त्या कंपनी चा कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहे.

Agriculture Marketing and Procurement/ कृषी मार्केटिंग आणि खरेदी:- मित्रांनो, या कॅटेगरी मध्ये तुम्ही कोणत्याही पिकाचे बाजार मूल्य बघू शकता. या ऑप्शन वर क्लिक करून नंतर ऍग्रीकल्चर मार्केटिंग ऑप्शन मध्ये तुम्हाला Agmarknet price या फोल्डर मध्ये कोणत्या मंडी मध्ये कोणत्या पिकाचे काय रेट चालू आहेत ते बघता येईल.

KVK (किसान विज्ञान केंद्र):- मित्रांनो, या कॅटेगरी च्या माध्यमातून तुम्ही म्हणजेच शेतकरी कोणत्याही पिकबद्दल माहिती घेऊ शकता. किंवा एखादे पीक खराब झाले तर काय करावे या बद्दल ही मार्गदर्शन मिळेल. त्यासाठी तुम्ही कृषी विज्ञान अधिकारी सोबत डायरेक्ट बोलु ही शकता. तसेच इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स व अड्रेस ही दिला आहे.

Soil Fertility/ मातीची सुपीकता:- मित्रांनो, या कॅटेगरी मार्फत तुम्ही तुमच्या जमिनीच्या मातीचे परीक्षण करू शकता. तसेच तुम्ही जर कधी soil test केली असेल तर त्याचे रिपोर्ट कार्ड तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. याशिवाय तिथे soil test केली जाते त्या टेस्टिंग लॅब चे डोटेल्स देखील तुम्हाला इथे मिळतात.

Seeds/बिया :- मित्रांनो, या ऑप्शन मध्ये तुम्हाला बियाणांबद्दल माहिती मिळते. यात तुम्ही seeds dealers ची माहिती मिळवू शकता. किंवा seeds च्या विविध व्हरायटी बद्दल ही जाणून घेऊ शकता.

Farm Machinery/फार्म मशिनरी:- मित्रांनो, या ऑप्शन द्वारे तुम्ही शेती साठी आवश्यक कोणतेही यंत्र म्हणजे ट्रॅक्टर वगैरे खरेदी करू शकता. तुम्ही जे काही मशिन्स खरेदी कराल त्या बडफल ची सर्व माहिती म्हणजे त्याची किंमत, सबसिडी वगैरे सर्व माहिती इथे दाखवली जाते. तसेच तुम्ही ज्या सबसिडी साठी अप्लाय कराल त्याचे स्टेटस ही तुम्ही इथे पाहू शकता.

Government Schemes/ सरकारी योजना:- मित्रांनो, या ऑप्शन मध्ये तुम्हाला सरकार द्वारे राबविल्या जाणाऱ्या सर्व योजनांची लिस्ट तुम्हाला बघायला मिळते. तुम्हाला जर एखादया योजनांची माहिती हवी असेल तर ते तुम्ही बघू शकता किंवा जर एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तो देखील तुम्ही घेऊ शकता.

Training Services/ प्रशिक्षण सेवा:- मित्रांनो, जर एखाद्या शेतकऱ्याला शेती विषयक एखादया गोष्टी बद्दल ट्रेनिंग घ्यायची असेल तर तो या ऑप्शन चा वापर करू शकतो. यात सेकरे द्वारे विविध प्रकारचे ट्रेनिंग प्रोग्राम उपलब्ध केले जातात.

DD KISAN/ डीडी किसान:- मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी डीडी किसान नावाचे चॅनेल सुद्धा उपलब्ध आहे. या द्वारे शेतकऱ्यांशी निगडित जी काही न्युज असते ती दाखवली जाते. त्याचा शेतकरी उपयोग घेऊ शकतो.

मित्रांनो, याशिवाय पोर्टल मध्ये जनावरांसाठी देखील सर्व्हीस उपलब्ध करून दिली आहे. यात जनावरांच्या ब्रीड्स बद्दल, हॉस्पिटल बद्दल, वॅक्सिन बद्दल वगैरे तुम्ही माहिती मिळवू शकता.

किसान सुविधा पोर्टल चे फायदे कांस्य आहेत ते जाणून घेऊ या’-

  1. मित्रांनो, किसान सुविधा पोर्टल द्वारे तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकता. तसेच तुम्ही पीएम किसान सन्मान निधी पेमेंट चे स्टेटस देखील तपासू शकता.
  2. तसेच पिकांशी संबंधित सर्व माहिती या पोर्टल वर उपलब्ध आहे. जसे की… खते, बियाणे, पिके आणि रोगांची ओळख, डीलर्सची माहिती, पिकांचे बाजारभाव, हवामान परिस्थिती वगैरे.
  3. या सोबतच पशुपालनाशी संबंधित सर्व माहिती देखील या पोर्टलवर उपलब्ध आहे ज्यात जनावरांची देखभाल, त्यांचे विविध रोग व त्यावरील उपचार इत्यादी.
  4. मित्रांनो, या पोर्टल ची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे किसान सुविधा पोर्टल वर उपलब्ध असलेल्या सर्व सेवा तुम्हाला विविध भाषांमध्ये म्हणजेच हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती, तमिळ इत्यादी भाषां मध्ये मिळतात.
  5. आणि महत्वाचे म्हणजे सरकार कडून देण्यात येणाऱ्या या सर्व सेवा पूर्णपणे मोफत आहेत. म्हणजेच शेतकरी कोणतेही शुल्क न भरता या सेवांचा मोफत वापर करू शकतात.
  6. मित्रांनो, किसान सुविधा पोर्टलचा अजून एक फायदा म्हणजे या पोर्टल चा वापर करून आता शेतकरी बांधव शेतीतील नवनवीन तंत्रे शिकू शकतात आणि त्यांच्या पिकांचे उत्पादन वाढवू शकतात.

FAQ

किसान सुविधा पोर्टल कोणामार्फत सुरू करण्यात आले आहे?

किसान सुविधा पोर्टल हे कृषी सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे.

किसान सुविधा पोर्टल किंवा अँप कसे डाउनलोड करावे?

शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईल फोन वर उपलब्ध असलेल्या प्ले स्टोअर अँप द्वारे किसान सुविधा अँप डाउनलोड करू शकतात.

किसान सुविधा अँप मध्ये शेतकऱ्यांसाठी कोणती माहिती उपलब्ध करून दिली आहे?

मित्रांनो, किसान सुविधा अँप मध्ये शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित सर्व प्रकारची महत्त्वाची माहिती उपलब्ध करून दिली आहे

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण किसान सुविधा पोर्टल बद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या पोर्टल च्या माध्यमातून शेतकरी बांधव नक्कीच आपली व आपल्या शेताची प्रगती करू शकतो. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!