Income Tax Return

इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्याचे 5 फायदे (कोणीही सांगणार नाही)

नमस्कार मित्रांनो, आमच्या आज च्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्यासाठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो, आज आपण Income Tax Return फाइल करण्याचे 5 फायदे काय आहेत, या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

ITR File Karnyache Fayde

मित्रांनो, इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच ITR बद्दल तर तुम्हाला माहिती असेलच. दरवर्षी 31 जुलै पर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे आवश्यक असते. पण जर कधी काही कारणांसत्व वेळेत इन्कम टॅक्स रिटर्न भरणे जमले नाही तरी 31 डिसेंबर पर्यंत थोडाफार दंड भरून तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करू शकता. म्हणजेच जेवढया लवकर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करता येईल तेवढ्या लवकर करून घेणं कधी पण चांगलेच असते.



पण बरेच जण म्हणतात आम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरणं अनिवार्य नाही. खरचं असे असेल का? मित्रांनो, तुम्हाला माहीत नसेल पण आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की जरी तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरणं अनिवार्य नसेल तरी देखील तुम्ही जर तो भरला तर तुम्हाला त्याचे काही फायदे मिळू शकतात. हो मित्रांनो, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याचे तुम्हाला अनेक फायदे होतात, ते कोण कोणते फायदे हे आपण पुढे जाणून घेणारच आहोत. त्यासाठी तुम्ही आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

इन्कम टॅक्स आणि इन्कम टॅक्स रिटर्न भरणं यातला फरक

मित्रांनो, इन्कम टॅक्स रिटर्न भरणं म्हणजे आयकर विभागाला तुम्ही तुमच्या उत्पन्न विषयी माहिती देता. आणि यात जर तुमचे उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे. तर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न नक्की भरू शकता पण त्यावर इन्कम टॅक्स भरणं आवश्यक नाही. याउलट इन्कम टॅक्स भरणं म्हणजे तुमच्या वार्षिक उत्पन्ना वर काही कर म्हणजेच टॅक्स असेल तर तो भरणं. यात तुम्हाला इन्कम टॅक्स आणि इन्कम टॅक्स रिटर्न दोन्ही भरावे लागतात.

आता इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय? व तो कोणी भरावा या बद्दल जाणून घेऊ या

इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय?

मित्रांनो, सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच ITR हा एक प्रकारचा फॉर्म आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे ITR फॉर्म असतात. ITR 1, 2, 3,… वगैरे. या फॉर्म द्वारे तुम्ही भारतीय केंद्र सरकारच्या आयकर विभागाला तुमच्या उत्पन्ना विषयी माहिती देता. म्हणजेच हा एक सेल्फ असेसमेंट पद्धतीचा फॉर्म आहे. ज्यात तुम्ही स्वतःहून आयकर विभागाला तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे व त्यावर किती टॅक्स पडतो ते सांगता.

तसेच हा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै असते. ही तारीख प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकते. जसे की जर तुम्ही खूप मोठे व्यावसायिक असाल तर तुमच्यासाठी तारीख वेगळी असू शकते. पण एकंदरीत सर्व सामान्य नोकरदार माणसासाठी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची 31 जुलै ही तारीख शेवटची असते.



ITR भरणं कुणाला गरजेचं आहे ?

  1. मित्रांनो, जर तुमचं वय 60 वर्षाखालील असेल आणि जर तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची गरज नाही. पण जर तुमचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला रिटर्न भरावे लागतात.
  2. जर तुमचं वय 60 ते 79 वयोगटातील असेल आणि जर तुमचे वार्षिक उत्पन्न 3 लाख पर्यंत असेल तरी देखील तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची गरज नाही.
  3. तसेच जर तुमचं वय 80 वर्षावरील असेल आणि तुमचे वार्षिक उत्पन्न 5 लाख पर्यंत असेल तरी देखील तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची आवश्यकता नाही. पण जर उत्पन्न 5 लाख पेक्षा जास्त असेल तर मात्र तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरणं आवश्यक आहे.

आता Income tax return फाइल करण्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊ या

ITR फाइल करण्याचे फायदे

मित्रांनो, बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की आमचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे. तरी देखील आम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा आहे. पण त्याचे काही फायदे आहेत का? तर याच उत्तर ‘हो’ असे आहे. तर इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यास कोण कोणत्या गोष्टींसाठी फायदा होतो ते पुढे जाणून घेऊ या.

टीडीएस परत मिळवण्यासाठी:- मित्रांनो, जर कोणताही व्यवहार करताना जसे की बँकेकडून किंवा व्यवसायात व्यवहार करताना तुमचा टीडीएस कापला गेला असेल जरी तुमचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा कमी असले तरीही, आणि जर तुम्हाला तो परत मिळवायचा असेल तर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरून सरकार कडून रिफंड मिळवू शकता.

कर्ज काढण्यासाठी:- मित्रांनो, जरी तुमचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा कमी असेल. पण जर तुम्हाला कर्ज हवे असेल जसे की गृह कर्ज किंवा वाहन कर्ज वगैरे. तर हे कर्ज देताना बँक तुमच्या कडे उत्पन्नाचा पुरावा मागते. मग तुम्ही सॅलरी स्लिप किंवा फॉर्म 16 पुरावा म्हणून देता. पण जर तुमचा बिझनेस किंवा व्यवसाय असेल तर तुम्हाला सॅलरी स्लिप वगैरे देता येत नाही. अश्या वेळी तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न तुम्ही उत्पन्नाचा पुरावा म्हणून देऊ शकता. याचा कर्ज किंवा लोन मिळवण्यासाठी तुम्हाला फायदा होऊ शकतो.

इन्शुरन्स:- मित्रांनो, सध्या इन्शुरन्स घेणं ही आज काळाची गरज बनली आहे. पण तुम्ही जर हाय कव्हरेज सह (50 लाख पेक्षा जास्त) पॉलिसी किंवा इन्शुरन्स मिळविण्याची अपेक्षा करत असाल, तर कोणतीही इन्शुरन्स कंपनी सर्वात आधी तुम्हाला ITR मागते. म्हणजेच तुम्ही टॅक्स चुकवणारी व्यक्ती तर नाही ना, याची खात्री करण्यासाठी कंपनी तुमच्या ITR ची मागणी करू शकते. म्हणूनच अश्या वेळी इन्कम टॅक्स रिटर्न भरणे फायद्याचे ठरते.

शिष्यवृत्ती/स्कॉलरशीप:- मित्रांनो, तुम्हाला म्हणजेच जर एखाद्या विद्यार्थ्याला कोणतीही शिष्यवृत्ती मिळणार असेल तर त्यासाठी ही काही नियम असतात. तिथेही तुमचे म्हणजेच पालकांचा उत्पन्नाचा पुरावा मागितला जातो. यासाठी तुम्ही सॅलरी स्लिप किंवा फॉर्म 16 भरून देऊ शकता. पण जर तुमचा बिझनेस किंवा व्यवसाय असेल तर तुम्हाला सॅलरी स्लिप वगैरे देता येत नाही. अश्या वेळी तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न तुम्ही पुरावा म्हणून देऊ शकता.

कॅरी फॉरवर्ड ऑफ लॉसेस:- मित्रांनो, समजा जर तुम्हाला एखादया वर्षी व्यवसायात/ शेअर मार्केट मध्ये तोटा झाला तर तुम्ही तो कॅरी फॉरवर्ड करून त्याचा फायदा घेऊ शकता. पण त्यासाठी तुम्हाला 31 जुलै च्या आत इन्कम टॅक्स रिटर्न भरणे आवश्यक आहे.

आयटीआर फाईल करण्याची प्रक्रिया काय आहे?

मित्रांनो, या आर्थिक वर्षात इन्कम टॅक्स रिटर्न फाईल भरण्याची तारीख 31 जुलै होती. पण जर तुम्ही आतापर्यंत आयटीआर फाईल भरला नसेल तर 31 डिसेंबर पर्यंत ठराविक दंड भरून लवकरात लवकर आयटीआर फाईल करा. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीने इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करू शकता. त्यासाठी तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईट वर जाऊन तुमची इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करू शकता.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण ITR म्हणजेच Income tax return (इन्कम टॅक्स रिटर्न) फाइल करण्याचे फायदे काय आहेत, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद

Tags: ITR Fayde, ITR Benefits in Marathi, ITR File Karnyache Fayde, Income Tax File Karnyache Fayde, Income Tax Return File Karnyache Fayde, ITR File Ka Karava, Income Tax Bharnyache Fayde, ITR Bharnyache Fayde

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!