इंडक्शन कूकटॉप बद्दल सर्व माहिती | Induction Cooktop & Stove Detail Information
नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात आपण इंडक्शन कूकटॉप बद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत.
इंडक्शन कूकटोप म्हणजे काय?
What is mean by Induction Cooktop?
मित्रांनो, इंडक्शन कूकटॉप म्हणजे विजेचा साहाय्याने चालणारे एक मशीन आहे. ज्यामध्ये आपण जेवण बनवू शकतो. इंडक्शन कूकटोप हे इलेक्ट्रिक कूकटोप सारखेच दिसतात. पण या इंडक्शन कूकटॉप्स मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचा वापर केला जातो. यामध्ये या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचा वापर करूनच कूकवेअर गरम केले जातात. या मध्ये तापमान नियंत्रित केले जाऊ शकते. व कमी वेळेत जेवण बनवणे शक्य होते. त्यामूळे ही प्रणाली अत्यंत कार्यक्षम आहे.
यासर्व गोष्टीं मुळे आज काल बऱ्याच घराच्या किचन मध्ये इंडक्शन कूकटॉप वापरले जात आहे. तस पहायला गेलं तर आजच्या काळात गॅस पेक्षा इंडक्शन कूकटॉप परवडत. या इंडक्शन कूकटॉप ला काम करण्यासाठी फक्त वीज लागते. हे इंडक्शन कूकटॉप गॅस प्रमाणेच काम करते. उलट गॅस पेक्षा जलद गतीने काम करायचे असेल तर इंडक्शन कूकटोप एक बेस्ट ऑपशन आहे.
इंडक्शन कूकटॉप चे फायदे
What are the Benefits of Induction Cooktop
- इंडक्शन कूकटॉप मध्ये पृष्ठभाग गरम न होता उष्णता सरळ तुमच्या कूकवेअर पर्यंत पोहचते व त्यामुळे ते लवकर गरम होतात. थोडक्यात काय तर इलेक्ट्रिक किंवा गॅस कूकटॉप्स च्या तुलनेत इंडक्शन कूकटॉप हे जलद गतीने जेवण तयार करण्यास मदत करतात. तसेच या इंडक्शन कूकटॉप मुळे पाणी पण 50 टक्के लवकर उकळते.
- इंडक्शन कूकटॉप मध्ये टेम्परेचर कंट्रोल सिस्टीम असल्याने तुम्ही त्याचे तापमान कमी किंवा जास्त करून नियंत्रित करू शकतात. त्यामुळे पदार्थ कमी किंवा जास्त शिजण्याचा प्रश्नच येत नाही.
- इंडक्शन कूकटॉप स्वच्छ करणे खूप सोपे आहे. कारण इंडक्शन कूकटॉप मध्ये पृष्ठभाग गरम होत नसल्याने, स्वयंपाक बनवून झाल्यावर ते कूकटॉप इतक्या लवकर थंड होते की तुम्ही लगेच कोणत्याही प्रकारची घाण सहज साफ करू शकता.
- ज्यांच्या घरात लहान मुले आहेत अश्या लोकांसाठी हे इंडक्शन कूकटॉप खूप चांगले आहे, कारण कूकटॉप वरून पॅन काढल्या वर इंडक्शन आपोआप बंद होतात त्यामुळे बर्नर चुकून सुरू होण्याचा धोका होत नाही.
- सुरक्षेच्या दृष्टीने इंडक्शन कूकटॉप वापरण्यास खूप चांगले आहे.
- इंडक्शन कूकटॉप्स जोडणे म्हणजे स्थापित करणे खूप सोपे आहे.
- घरात कुठेही तुम्ही इंडक्शन कूकटॉप लावू किंवा ठेवू शकता.
इंडक्शन कूकटॉप चे तोटे
Disadvantages of Induction Cooktop
- इंडक्शन कूकटॉप वर स्वयंपाक करताना लागणाऱ्या भांड्यांचे प्लेन सरफेस असायला हवेत. गोल बुडाचे भांडे या प्रकारच्या कूकटॉप वर वापरता येत नाहीत. त्यासाठी तुम्हाला नवीन प्लेन बुडाचे भांडे घ्यावे लागतील. तो अतिरिक्त खर्च तुम्हाला होऊ शकतो.
- इंडक्शन कूकटॉप बनवताना त्यात ग्लास चा ही वापर केला असल्याने व निष्काळजी पणे वापरल्याने ते तुटू शकता किंवा त्यावर स्क्रॅच पडून ते लवकर खराब होऊ शकता.
- इंडक्शन कूकटॉप हे विजे चालत असल्यामुळे जर लाईट गेली तर तुम्हाला जेवण बनवता येणार नाही.
इंडक्शन कूकटॉप खरेदी करताना कोण कोणत्या गोष्टी पहाव्यात
- कूकटॉप चा आकार – मित्रांनो, एका इंडक्शन कूकटॉप मध्ये एक, दोन, तीन ,चार, पाच इंडक्शन झोन असतात. तुमच्या गरजे नुसार तुम्ही हवा तो इनडक्शन निवडू शकता.
- कंट्रोल पॅनल – जवळ जवळ सगळ्याच इंडक्शन कूकटॉप मध्ये कंट्रोल सिस्टीम असते. इंडक्शन कूकरसाठी स्पेशली तीन प्रकारचे कंट्रोल पॅनल असते. त्यात रोटेटिंग नॉब कंट्रोल, प्रेस बटन कंट्रोल, आणि टच सेन्सर कंट्रोल असे तीन प्रकार असतात. यातही प्रेस कंट्रोल पेक्षा तच सेन्सर कंट्रोल चे इंडक्शन कूकटॉप्स जास्त महाग असतात. त्यामुळे तुमचे बजेट व तुमची गरज बघूनच इंडक्शन कूकटॉप खरेदी करा.
- पॉवर किंवा टेम्परेचर सेटिंग – मित्रांनो, इंडक्शन खरेदी करताना सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पॉवर सेटिंग कडे लक्ष देणे. इंडक्शन कूकटॉप वेग-वेगळ्या पॉवर लेवल मध्ये येतात. त्यामुळे तुम्ही स्वयंपाक करताना पदार्थ नुसार तापमान नियंत्रित करू शकतात. उदाहरण द्यायचे झाले तर समजा, तुमचे इंडक्शन कूकटॉप हे 1800 W चे आहे. तर तुमचे इंडक्शन 10 वेग वेगळ्या पॉवरसह येते.
- पॅन डिटेक्शन – सुरक्षेच्या दृष्टीने हे फिचर खूप चांगले आहे. त्यामुळे इंडक्शन खरेदी करताना या गोष्टीकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. पॅन डिटेक्शन मध्ये तुम्ही जो पर्यंत योग्य पॅन इंडक्शन वर ठेवत नाही तो पर्यंत ते काम करत नाही. जरी चुकून दुसरे एखादे भांडे इंडक्शन वर ठेवले तर ते आवाज करण्यास सुरुवात करते. म्हणूनच सुरक्षेच्या दृष्टीने तुमच्या इंडक्शन कूकटॉप मध्ये हे फिचर आहे की नाही ते तपासा.
- ऑटो शट ऑफ – बऱ्याच इंडक्शन कूकटॉप्स मध्ये हे फिचर असतेच. यामुळे काम नसताना किंवा पॅन काढल्या वर इंडक्शन आपोआप बंद होते. शिवाय हे फिचर पॅन ला जास्त गरम होण्या पासून प्रतिबंधित करते.
- कॉईल ची गुणवत्ता – कोणतेही इंडक्शन खरेदी करताना त्या इंडक्शन ची कॉईल गुणवत्ता तपासून घ्यावी. व इंडक्शन खरेदी करताना शक्यतो त्याची कॉईल ही अल्युमिनियम किंवा तांब्याची बनलेली असावी.
- चाईल्ड लॉक सिस्टीम – तुमच्या इंडक्शन कूकटॉप मध्ये हे फिचर असणे खूप महत्वाचे आहे. तुम्ही नसताना मुलांकडून चुकून इंडक्शन चा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या इंडक्शन मध्ये चाईल्ड लॉक चे फिचर आहे की नाही ते तपासून घ्या.
मित्रांनो, या शिवाय तुम्ही जो इंडक्शन कूकटॉप खरेदी करणार आहात त्याची किंमत , तुमचे बजेट व प्रोडक्ट ची वॉरंटी या गोष्टी बघणे पण खूप महत्त्वाचे आहे. या व्यतिरिक्त काही इंडक्शन कूकटॉप पॉझ किंवा टच कंट्रोल सिस्टीम सह येतात. त्यामुळे तुम्ही निवडलेल्या प्रोडक्ट मध्ये ही सर्व वैशिष्ट्ये आहेत की नाही ते तपासून बघा.
आता भारतातील काही बेस्ट इंडक्शन कूकटॉप बद्दल जाणून घेऊ या
Prestige (प्रेसटीज) 1900 Watt इंडक्शन कूकटॉप
मित्रांनो, प्रेसटीज च्या या इंडक्शन मध्ये तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी मिळत आहे. तसेच जर तुमचे बजेट 3000 रुपये च्या जवळ पास असेल तर हे इंडक्शन कूकटॉप तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. हे इंडक्शन कूकटॉप 1900 वॅट पॉवर सह येते. तसेच यात तुम्हाला ऑटोमॅटिक व्होल्टेज रेग्युलेटर मिळते ज्यामुळे विजेच्या कमी जास्त प्रमाण वर नियंत्रण ठेवता येते. तसेच यात दोन हिट सेन्सर बसवण्यात आले आहेत.
तसेच प्रेसटीजच्या या इंडक्शन कूकटॉप मध्ये टायमर फंक्शन, ऑटो शट ऑफ, डिजिटल कंट्रोल पॅनल, मेनू सेटिंग या सारखे अनेक फिचर देण्यात आले आहेत. या शिवाय या इंडक्शन मध्ये ऑटोमॅटिक कीप वॉर्म फंक्शन देण्यात आले आहे ज्यामुळे जेवण जास्त वेळ गरम राहण्यास मदत होते. प्रेसटीज चे हे इंडक्शन कूकटॉप वापरण्यास अगदी सोपे असून हे एक शानदार, टिकाऊ, उत्कृष्ट व स्टायलिश असे प्रोडक्ट आहे.
Usha (उषा) 1600 Watt इंडक्शन कूकटॉप
मित्रांनो, उषा चे हे इंडक्शन कूकटॉप 1600 वॅट पॉवर सह येते. यात ही तुम्हाला 5 प्रिसेट मेनू ऑपशन मिळतात. या इंडक्शन कूकटॉप चे डिझाइन एकदम आकर्षक असून त्यात पॉवर सेविंग मोड बसवण्यात आले असून त्यात भांडे जास्त गरम होण्यापासून प्रतिबंधित करतो. या इंडक्शन मध्ये ही एलईडी डिस्प्ले देण्यात आला असून यात तुम्ही टेम्परेचर व टायमर चे रिडींग बघू शकता.
220 ते 240 व्होल्टेज वर सुद्धा हे इंडक्शन चालते. या प्रोडक्ट ची एक वर्षाची वॉरंटी असून याची किंमत अंदाजे 2000 रुपये च्या जवळ पास असू शकते.
Lifelong Inferno (लाइफ लॉंग ) 2000 Watt इंडक्शन कूकटॉप
मित्रांनो, लाइफलॉंग चे हे इंडक्शन कूकटॉप 2000 वॅट चे आहे. तसेच हे इंडक्शन कूकटॉप तुम्हाला सात प्रिसेट मेनू ऑपशन सह भेटते. यात पॉवर सेविंग मोड पण आहे ज्याच्या मदतीने तुमचे वीज बिल कमी येण्यास मदत होईल. जर तुमचं बजेट 1000 रुपये पर्यंत असेल तर लाइफलॉंग चे हे इंडक्शन कूकटॉप तुमच्या साठी बेस्ट प्रोडक्ट आहे. शिवाय या प्रोडक्ट ची एक वर्षाची वॉरंटी तुम्हाला मिळणार आहे. तसेच या प्रोडक्ट मध्ये सुरक्षा सेन्सर व पॅन सेन्सर पण देण्यात आले आहे.
Ibell (आयबेल) 2000 Watt इंडक्शन कूकटॉप
मित्रांनो, आयबेल चे 2000 वॅट चे हे इंडक्शन कूकटॉप एक स्टायलिश मॉडेल आहे. या इंडक्शनमध्ये ऑटो शट ऑफ व ओव्हर हिट प्रोटेक्शन सारखे फिचर उपलब्ध आहेत. या प्रॉडक्ट मध्ये उच्च दर्जाचे कॉईल वापरण्यात आले आहे शिवाय यात सात प्री सेट मेनू ऑप्शन उपलब्ध आहेत. शिवाय या इंडक्शन मध्ये एलईडी डिस्प्ले सुद्धा देण्यात आला आहे.
ज्यात टेम्परेचर कंट्रोल आणि टायमर पण देण्यात आला आहे. आयबेलच्या या इंडक्शन कूकटॉप ची तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी मिळते. व जर तुमचे बजेट 1500 रुपये च्या आसपास असेल तर आयबेल चे हे इंडक्शन कूकटॉप तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. तसेच या इंडक्शन मध्ये ऑटो शट ऑफ सारखे चांगले फिचर पण उपलब्ध करून दिले आहे. वजनाने हलके असल्याने हे इंडक्शन तुम्ही कुठेही नेऊ शकता.
Philips (फिलिप्स) 2100 Watt इंडक्शन कूकटॉप
मित्रांनो, तुम्हाला जर जलद काम करणारे आणि सुरक्षित असे इंडक्शन हवे असेल तर फिलिप्स चे हे 2100 वॅट चे इंडक्शन कूकटॉप तुमच्या साठी योग्य आहे. याची किंमत अंदाजे 2500 रुपये कॅग्या जवळ पास असू शकते. तसेच हे इंडक्शन कूकटॉप पोर्टेबल असल्याने ते तुम्ही कुठेही नेऊ शकता. यात दिलेल्या डिजिटल टच बटन मुळे इंडक्शन वर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. यात असलेल्या इलेकट्रोमॅग्नेट टेक्नॉलॉजी मुळे जास्त उष्णता देऊन अन्न लवकर शिजवते.
या इंडक्शन ची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यात 10 प्रिसेट मेनू दिलेले आहेत. यात अनेक फिचर आहेत जसे की टच स्क्रीन सेन्सर, ऑटो शट ऑफ, तसेच यात अन्न शिजवण्यासाठी टायमर सेट करून ठेवू शकता. फिलिप्स चे हे इंडक्शन एक वर्षाची वॉरंटी देत असून ते वापरण्यास अगदी टिकाऊ व स्वच्छ करण्यास अगदी सोपे आहे.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण बेस्ट इंडक्शन कूकटॉप बद्दल माहिती जाणून घेतली. आशा आहे की आमच्या या लेखाचा, तुमच्या गरजा व आवश्यकता नुसार तुम्हाला एक चांगले इंडक्शन कूकटॉप निवडण्यास नक्की मदत होईल.
तर मित्रांनो आज चा लेख आवडला असल्यास तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद !
Tags: Best Induction Cooktop, Best Induction Cooktop, Best Induction Cooktop 2022, Best Induction Cooktop in India, Induction Cooktop information in Marathi, Induction Cooktop information in Marathi, Induction Mahiti, Induction Mahiti, Induction Marathi