Income Tax Return

Income Tax Return 31 जुलै नंतर भरला तर काय होते? फायदे, तोटे समजून घ्या

नमस्कार मित्रांनो, जुलै महिना उलटून गेला तरीही अजून तुम्ही Income Tax Return म्हणजेच आयकर परतावा भरला नसेल, तर काय करावे? आणि त्याच बरोबर ITR भरला नाही तर तोटे, फायदे आणि शिक्षा काय असू शकते? या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेऊ या.

income tax return 31 july nantar bharla tar

मित्रांनो, जुलै महिना आला की पावसासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट येते. ती म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) म्हणजेच आयकर परतावा भरण्याची मुदत. मित्रांनो, तुम्हाला तर माहीत असेलच की दरवर्षी 31 जुलै पर्यंत आयकर परतावा भरणं हे आवश्यक असतं. कधी कधी काही कारणास्तव इन्कम टॅक्स रिटर्न किंवा आयकर परतावा भरणं जमत नाही, पण ही प्रक्रिया जेवढी लवकर पूर्ण करता येईल, तेवढं बरंच आहे, नाही का? तर इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय, ते का भरायला हवं? या अश्या सर्व गोष्टीं बद्दल पुढे जाणून घेऊयात. त्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.



सर्वात आधी ITR भरणं आणि इन्कम टॅक्स भरणं यातला फरक आणि 31 जुलै नंतर ITR भरला तर तोटे, फायदे काय असू शकतात ते हि सविस्तर समजून घेऊ या.

ITR भरणं आणि इन्कम टॅक्स यातला फरक

मित्रांनो, तसं सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच ITR हा एक प्रकारचा फॉर्म आहे. या फॉर्म द्वारे तुम्ही भारतीय केंद्र सरकारच्या आयकर विभागाला तुमच्या उत्पन्ना विषयी माहिती देता. तर इन्कम टॅक्स भरणं म्हणजे त्या उत्पन्नावर काही कर असेल तर तो भरणं.

मित्रांनो, ITR भरण्याआधी तुम्ही कुठल्या उत्पन्न गटात येता, याची तुम्हाला माहिती असणं खूप आवश्यक आहे. त्याबद्दल आता पुढे जाणून घेऊ या:

मित्रांनो, ज्या व्यक्तीचं उत्पन्न सरकारनं घालून दिलेल्या मर्यादे पेक्षा म्हणजे बेसिक एक्झेम्पशन लिमिट (Basic Exemption Limit) पेक्षा जास्त असेल, त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरायला हवा. म्हणजेच सध्याच्या नियमां नुसार जर तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही आयकर परतावा भरायला हवा.

थोडक्यात काय तर, तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करत असाल, तर आयटीआर भरणं गरजेचं असतं. आणि मित्रांनो, जरी तुमचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल म्हणजेच तुमचं उत्पन्न करपात्र नसेल, तरीही तुम्ही रिटर्न भरायला हवा. कारण जर तुमचा TDS कापला गेला असेल तर रिटर्न फाईल केल्यानंतर तुम्हाला टॅक्स रिफंड म्हणजेच कर परतावा मिळवता येतो.



नोट: TDS म्हणजे ऍडव्हान्स टॅक्स जो कधी कधी बँक किंवा तुमची कंपनी तुमच्या नावे आधीच टॅक्स भरते आणि तुम्हाला तो रिफंड पाहिजे असेल तर रिटर्न फाईल करावा लागतो.

मित्रांनो, याशिवाय जर आयटीआर भरला असेल तर परदेश प्रवासासाठी लागणारा व्हिसा, क्रेडिट कार्ड, एखादी सरकारी योजना, किंवा गृहकर्ज अशा गोष्टींसाठी अर्ज करताना तसंच घर किंवा जमिनीची नोंदणी करताना तुमची विश्वासार्हता वाढते. त्यामुळे रिटर्न वेळेत भरण कधीही चांगले असते.

31 जुलै ची तारीख उलटून गेली असेल तर काय?

पण मित्रांनो, जर तुम्ही कर भरण्याची तारीख म्हणजेच 31 जुलै ची तारीख उलटून गेली असेल तर काय?

मित्रांनो, जर तुमची 31 जुलै ची तारीख उलटून गेली असेल तरी देखील तुम्ही तुमचा आयकर परतावा 31 डिसेंबर पर्यंत भरू शकता. पण त्यासाठी तुम्हाला काही दंड भरावा लागेल. मित्रांनो, आयकर विभाग तुम्हाला इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 च्या कलम 271F नुसार नोटीस पाठवू शकतं. आणि मग तुम्ही कलम 234F नुसार उशिरा ITR भरू शकता. पण त्यासाठी तुम्हाला 5000 रुपये पर्यंतचा दंड भरावा लागु शकतो.
तसेच जर तुमचं वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त 1000 रुपये पर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. पण हे सगळं फक्त 31 डिसेंबर पर्यंतच.

मित्रांनो, या शिवाय आयकर विभाग तुमच्या करपात्र उत्पन्नावर दरमहा 1 टक्के व्याज आकारले जाऊ शकते. म्हणजे तुमच्या करपात्र उत्पन्नावरचा TDS, TCS, ऍडव्हान्स टॅक्स आणि इतर कर सवलती मिळवल्या नंतर जी रक्कम उरते त्यावर हे व्याज लावलं जातं. अश्या परिस्थितीत एक दिवसाचा उशिरही तुम्हाला महागात पडू शकतो.

मित्रांनो, वेळेवर म्हणजेच 31 जुलै पर्यंत कर न भरल्याची आणखीन एक तोटा म्हणजे गेल्या आर्थिक वर्षात तुम्हाला जर व्यवसायात/ शेअर मार्केट मध्ये तोटा किंवा नुकसान झालं असेल तर तुम्ही ते चालू आर्थिक वर्षात कॅरी फॉरवर्ड करू शकत नाहीत. पण जर घरातून होणाऱ्या उत्पन्नात तुम्हाला काही तोटा झाला असेल तर मात्र तुम्ही तो कॅरी फॉरवर्ड करू शकता. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही वेळेवर परतावा भरला तर येणाऱ्या परताव्यावर तुम्हाला व्याज ही मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला आयकर विभागाने दिलेले वेळापत्रक पाळणे आवश्यक आहे.

ITR भरला नाही तर शिक्षा काय असते?

मित्रांनो, याशिवाय जर तुम्ही कर किंवा कर परतावा भरलाच नाही तर तुम्हाला दंड आणि शिक्षा दोन्ही देखील होऊ शकते. जर तुम्ही चुकवलेला कर हा 25,000 पेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला 6 महिने ते 7 वर्षां पर्यंतची शिक्षा आणि त्यासोबतच दंड ही ठोठावला जाऊ शकतो. पण मित्रांनो, जर तुम्ही प्रत्यक्ष उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न ITR मध्ये दाखवले असेल आणि जर ते उघडकीस आले तर मात्र तुम्हाला देयकाच्या 200 टक्क्यांपर्यंत कर भरावा लागू शकतो. आणि यामुळे तुम्ही परतावा दाखल करायला जितका उशीर कराल तितकाच रिफ़ंड यायलाही उशीर होईल.

त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही 31 जुलै पर्यंत ITR भरला असेल तर उत्तम. पण जर काही कारणामुळे ITR भरणं जमलं नसेल तर काही दंड भरून 31 डिसेंबर पर्यंत तुमचा ITR फाईल करू शकता.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण Income tax return म्हणजेच आयकर परतावा 31 जुलै पर्यंत भरला नसेल, तर काय करावे, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवादl

Tags: ITR After 31 July, ITR Ushira Bharla Tar, ITR 31 July Nantar Bharla Tar, ITR Late Bharla Tar, ITR Kadhi Bharaycha, ITR Filling After 31 July, ITR After 31 July Penalty, Income Tax After 31 July, Income Tax After 31 July Penalty, Income Tax Ushira Bharla Tar, Income tax 31 natar bharla tar

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!