Popular Post Healthआरोग्य टिप्स | Health Tips in Marathi

घोरणं बंद करण्यासाठी सोपे घरगुती उपाय | Best Home Remedies for Snoring

नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण Snoring म्हणजेच घोरणं कमी कसे करता येईल, व घोरणं बंद होण्यासाठी काय घरगुती उपाय करता येतील, याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Best Home Remedies for Snoring

मित्रांनो, एखादी घोरणारी व्यक्ती जर आपल्या जवळ झोपली असेल तर झोप मोड होते. याचा अनुभव तर तुमच्या पैकी बऱ्याच जणांनी घेतला असेलच. त्यातल्या त्यात जर ती व्यक्ती तुमचा पार्टनर असेल तर मग त्याचे घोरणे तुम्हाला आयुष्य भर सहन करावेच लागणार. तसेच जर कधी दुसऱ्या गावी एखाद्या कार्यक्रमाला किंवा लग्न समारंभासाठी जावे लागले आणि तिथे झोपावे लागले तर अश्या ठिकाणी एकतरी घोरणारी व्यक्ती असतेच. मित्रांनो, घोरणारा माणूस लगेच झोपून जातो पण त्याचा त्रास इतर व्यक्तींना रात्रभर सहन करावा लागतो. आणि आपली झोप अपुरी राहते.



आपल्या जवची व्यक्ती असेल तर जरा हलवून जागे करता येते व घोरू नको असे सांगता येते. पण वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तींना असे सांगता येत नाही. तसेच घोरणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. त्यामुळे आपल्याला काही करता ही येत नाही. एवढंच नाही तर घोरणाऱ्या व्यक्तीला सुद्धा माहीत नसते की आपण घोरतो आहोत. आणि बऱ्याच जणांना या घोरण्यावर काही उपचार करता येतो हे माहीत देखील नसते.

मित्रांनो, घोरण्यावर उपचार करण्याआधी घोरण्याची कारणे माहीत असायला हवीत. त्यामुळे योग्य तो उपचार करता येतो. चला तर मग घोरण्याची कारणे काय आहेत ते जाणून घेऊ या

घोरण्याची कारणे

  • मित्रांनो, शरीराने जाड असणाऱ्या व्यक्तींच्या मानेवर व गळ्या वर जास्त प्रमाणात चरबी असते. त्यामुळे श्वसन मार्गात अडथळा निर्माण होतो व अशे लोक घोरतात.
  • काही लोकांना सायनसचा त्रास असतो, त्यामुळे अश्या लोकांच्या छातीत व घशात कफ दाटलेला असतो. यामुळे श्वासोच्छ्वास करताना अडथळे येतात व परिणामी घोरणे सुरू होते.
  • तसेच काहींना सर्दी नाकातच साठून राहते. व नाकाने उच्छवास सोडणे कठीण होऊन बसते व त्यामुळे तोंडाने हवा सोडली जाते. त्यावेळी घोरताना या लोकांच्या तोंडातून फूस… फूस… असा आवाज येतो.
  • मित्रांनो, अनेकदा आपण कसे झोपतो या वर ही घोरणे अवलंबून असते.

घोरणे कमी व्हावे किंवा बंद व्हावे यासाठी काही घरगुती उपाय

  • मानेवरची व गळ्याची चरबी कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यामुळे चरबीचा पडणारा दाब कमी कमी होत जातो व श्वसन मार्गात अडथळे येत नाहीत व घोरणे बंद होते.
  • हळद ही आपल्या आरोग्यसाठी खूप फायदेशीर असते. नाक साफ होण्यासाठी तुम्ही रोज हळदीचे दूध पिले तरी देखील तुम्हाला फरक जाणवेल. व हळूहळू घोरणे बंद होईल.
  • मित्रांनो, घोरणे थांबवण्यासाठी एक प्रभावी उपाय म्हणजे वाफ घेणे. वाफ घेतल्यामुळे तुमचा श्वसन मार्गातील अडथळे कमी होतात. याचा चांगला परिणाम तुमच्या घश्यावर व कानावर होतो आणि घोरण हळू हळू बंद होते.
  • घोरणं कमी करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी अजून एक उपाय म्हणजे नाकात तूप सोडणे. मित्रांनो, बऱ्याच वेळा नाक चोंदल्यामुळे आपण तोंडाने श्वासोच्छ्वास करतो. त्यामुळे आपल्या नाकातून व तोंडातून घोरण्याचा आवाज येतो, म्हणून रात्री झोपताना शुद्ध तुपाचे काही थेंब नाकात टाकल्याने हळू हळू घोरणे कमी होण्यास मदत होते.
  • घोरणे बंद करण्यासाठी वेलचीचा ही उपयोग करता येतो. त्यासाठी रात्री झोपण्या आधी कोमट दुधात किंवा कोमट पाण्यात वेलची पावडर मिसळून ते प्यावे. हा उपाय रोज केल्याने हळूहळू घोरणे बंद होते.
  • मित्रांनो, तुम्ही जर सर्दीच्या त्रासामुळे घोरत असाल तर सर्दी आणि घोरणं दोन्ही बरे करण्यासाठी तुम्ही निलगिरीच्या तेलाचा वापर करू शकता. त्यासाठी रात्री झोपण्या आधी गरम पाण्यात निलगिरीच्या तेलाचे काही थेंब टाका व त्या पाण्याची वाफ घ्या त्यामुळे सर्दी बरी होऊन तुमचा श्वसन मार्ग मोकळा होईल व तुमचे घोरणे ही बंद होईल.
  • मित्रांनो, आपल्या नाकात सतत ओलसर पणा असणे खूप महत्त्वाचे असते. पण जर तुम्ही पाणी कमी पित असाल तर नाक व श्वसनमार्ग कोरडे पडू शकतो. व त्यामुळे घोरणे सुरू होऊ शकते. म्हणून भरपूर पाणी प्यावे.
  • या शिवाय मित्रांनो, हळदीचे दूध ही घेऊ शकता. कारण हळदीचे दूध किती गुणकारी आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. रात्री झोपण्या आधी हळदीचे दूध पिल्याने सर्दी कफ मध्ये आराम मिळतो व घोरणे ही बंद होते.
  • मित्रांनो जर तुमच्या घशाला आतून सूज आली असेल आणि त्यामुळे जर तुम्ही घोरत असाल तर त्यासाठी एक उत्तम उपाय म्हणजे गरम पाण्यामध्ये म्हणजेच कोमट पाण्यामध्ये पुदिना तेलाचे काही थेंब टाकून त्या पाण्याने गुळण्या केल्यास तुमचे घोरणे हळूहळू कमी होऊ शकते.
  • मित्रांनो, घोरण्यावर अजून एक उपाय म्हणजे झोपण्याची पोझिशन बदला. कारण पाठीवर झोपणारे माणसे जास्त घोरतात. त्यामुळे डाव्या किंवा उजव्या कुशी वर झोपणे कधीही चांगले. त्यामुळे घोरणे ही बंद होते.
  • मित्रांनो, जास्त कष्टाचे काम केल्याने किंवा थकवा आल्याने व पुरेशी झोप न झाल्याने ही माणूस घोरतो. त्यामुळे कमीत कमी 7 ते 8 तास झोप घेणे आवश्यक असते.
  • नाकातील सर्दी व छातीतील कफ यांवर पेपरमिंट ऑइल एक प्रभावी उपाय आहे. या पेपरमिंट ऑइल मुळे श्वसन मार्गातील सर्दी कमी होते व श्वासोच्छ्वास करणे सोपे होऊन जाते, व परिणामी घोरणे थांबते.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण घोरणे या समस्ये बद्दल उपाय जाणून घेतले. तुम्हाला किंवा तुमच्या घरात कोणाला ही घोरण्याची समस्या असेल तर हा लेख तुम्हाला नक्कीच मदत करेल, अशी आशा करतो. तसेच हा लेख महत्व पूर्ण वाटला असल्यास व आवडला असल्यास तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!