Shop

केस स्ट्रेट-कर्ली करण्यासाठी बेस्ट हेअर स्ट्रेटनर आणि Hair Straightener खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा !

नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात आम्ही तुमच्यासाठी केसांशी निगडित माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण हेअर स्ट्रेटनर बद्दल जाणून घेणार आहोत. तसेच तुमच्या केसांसाठी उत्तम हेअर स्ट्रेटनर कसे निवडायचे आणि भारतातील सर्वात चांगले हेअर स्ट्रेटनर कोण-कोणते आहेत याबद्दल ही माहिती बघणार आहोत.

Best Hair Straightener

मित्रांनो सुंदर दिसण्यासाठी आपण चांगले कपडे घालतो, मेक अप वगैरे करतो. पण सुंदरतेत अजून एक भर टाकणारी गोष्ट म्हणजे तुमचे केस. तुमचे केस सुंदर असतील तर तुम्ही काय परिधान केलं आहे याला जास्त महत्व नसते. तसेच कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी, लग्नात किंवा एखाद्या कार्यक्रम मध्ये आपण हेअर स्टाइल करतो. पण हेअर स्टाइल मध्ये पैसे घालवणे म्हणजे व्यर्थ गोष्ट आहे. त्यापेक्षा जर तुमच्या कडे हेअर स्ट्रेटनर (Hair straightener) असेल तर तुम्ही तुमचे केस स्ट्रेट किंवा कर्ली करून हवी ती हेअर स्टाइल करू शकता. पण हे हेअर स्ट्रेटनर म्हणजे काय आहे, कोणता हेअर स्ट्रेटनर घ्यावा, हे अजून ही बऱ्याच जणांना माहीत नाही. त्यांच्यासाठी आम्ही आज हा लेख घेऊन आलो आहोत. त्यामुळे शेवट पर्यंत नक्की वाचा.



सर्वात पहिले जाणून घेऊ की हेअर स्ट्रेटनर (Hair straightener) म्हणजे काय?

मित्रांनो, हेअर स्ट्रेटनर म्हणजे केस कर्ली करण्यासाठी किंवा स्ट्रेट करण्यासाठी वापरले जाणारे एक उपकरण आहे. या उपकरणात दोन प्लेट्स असतात या मध्ये केस अडकवून उष्णतेच्या सहाय्याने केस हवे तसे सेट करता येतात. पण ते तात्पुरत्या स्वरूपात असते. म्हणजे जोपर्यंत तुमचे केस पाण्याच्या संपर्कात येत नाही तो पर्यंत केस स्ट्रेट राहतात. मित्रांनो, या स्ट्रेटनर मध्ये विविध भाग असतात, आणि प्रत्येकाची कार्ये वेगळी असतात.

1) हेअर स्ट्रेटनर घेताना कोणत्या गोष्टी पहाव्यातहेअर स्ट्रेटनर घेताना त्याचा शेप म्हणजे आकार कसा आहे ते चेक करावे. हेअर स्ट्रेटनर दोन प्रकारच्या शेप्स मध्ये येतात. एक ज्याचे काठ (edges) गोल असतात. आणि दुसरे असे ज्याचे इजेस शार्प असतात. ज्यांना केस फक्त स्ट्रेट करायचे आहेत त्यांनी शार्प इजेसचा हेअर स्ट्रेटनर वापरावा. आणि ज्यांना केस स्ट्रेट करण्यासोबतच कर्ली पण करायचे आहे त्यांनी राऊंड इजेस असलेला हेअर स्ट्रेटनर वापरावा.

2) हेअर स्ट्रेटनर मध्ये असलेल्या प्लेट ची लांबी (width) पण तुमच्या केसांच्या प्रकार नुसार निवडायला हवी. जर तुमचे केस पातळ (थिन) आणि कमी घनदाट (डेन्सीटी) चे असतील तर तुम्हाला कमी विड्थ असलेली प्लेट हेअर स्ट्रेटनर वापरावे. आणि जर तुमचे केस दाट असतील तर तुम्हाला जास्त विड्थ असलेले प्लेट्स घ्यावे लागतील.

3) मित्रांनो, हेअर स्ट्रेटनर मध्ये एक प्लेट असते. जी आपले केस कर्ली किंवा स्ट्रेट करत असते. कोणतेही हेअर स्ट्रेटनर खरेदी करताना ती प्लेट कशाची व कोणत्या मटेरियल ची बनली आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तसं या प्लेट्स तीन वेग वेगळ्या मटेरियल च्या बनलेल्या असतात.

  1. सिरॅमिक (Ceramic)
  2. टायटॅनियम (Titanium)
  3. टूमलाइन (Tourmaline)

जर तुमचे केस थिन, किंवा पातळ, किंवा डॅमेज असतील तर तुम्ही सिरॅमिकचे प्लेट्स असलेले हेअर स्ट्रेटनर वापरावे. बेस्ट रिझल्ट्ससाठी सिरॅमिक कोटेड प्लेट्स न घेता प्युअर सिरॅमिक प्लेट असलेले हेअर स्ट्रेटनर घ्यावे. कारण सिरॅमिक कोटेड प्लेट्स खरेदी कराल तर कालांतराने हळूहळू त्याची कोटिंग निघून जाईल व तुमचे हेअर स्ट्रेटनर नीट काम करणार नाही. तसेच सिरॅमिक प्लेट्स ला गरम होण्यासाठी कमीत कमी 60 सेकंद लागू शकता.



जर तुमचे केस दाट, जाड व थोडे कर्ली असतील तर तुम्ही टायटॅनियम मटेरियल प्लेट्स असलेले हेअर स्ट्रेटनर खरेदी करावे. टायटॅनियम प्लेट्स चे हेअर स्ट्रेटनर सिरॅमिक प्लेट्स पेक्षा थोडे महाग असतात. टायटॅनियम प्लेटस ला गरम होण्यासाठी 30 सेकंद लागू शकतात.

तसेच जर तुमचे केस खुपच दाट असतील किंवा खुप जास्त कर्ली असतील, त्यांना मॅनेज करणे पण खुप अवघड होत असेल तर अश्या केसांसाठी तुम्ही टूमलाइन प्लेट्स असलेले हेअर स्ट्रेटनर खरेदी करावे. या प्लेट्स असलेले हेअर स्ट्रेटनर जास्त महाग असतात.

4) मित्रांनो हेअर स्ट्रेटनर खरेदी करताना त्यात टेम्परेचर कंट्रोल सिस्टीम आहे की नाही ते तपासून बघा. या फिचरमुळे तुमच्या केसांच्या प्रकार नुसार तुम्ही टेम्परेचर कमी जास्त करू शकता.

5) हेअर स्ट्रेटनर खरेदी करताना तो चांगल्या क्वालिटी चा च घ्यावा. त्यामुळे केसांना इजा पोहचणार नाही. तसेच काही हेअर स्ट्रेटनर चे वजन कमी जास्त असते. जास्त वजन असलेला स्ट्रेटनर तुम्हाला केस सेट करण्यात अडचणी आणू शकतील. त्यामुळे हात पण दुकून येतात. त्यामुळे वजनाने हलका व चांगल्या क्वालिटी चा हेअर स्ट्रेटनर निवडा.

6) तसेच काही हेअर स्ट्रेटनर कॉर्डलेस म्हणजे बॅटरी वर चालणारे ही असतात. तर हेअर स्ट्रेटनर कसा निवडावा हे तुमच्या गरजे नुसार व आवडी नुसार निवडा.

बेस्ट हेअर स्ट्रेटनर

Braun Hair Straightener

Broun satin हेअर स्ट्रेटनर

मित्रांनो, दाट केसांसाठी हे हेअर स्ट्रेटनर खूप चांगले आहे. तसेच यात तुम्हाला सिरॅमिक प्लेट्स मिळतात. हे प्रोडक्ट शक्यतो ब्लॅक कलर मध्ये येते. तसेच या मध्ये तुम्हाला टेम्परेचर कंट्रोल सेटिंग पण मिळते, जे जास्तीत जास्त 185°C पर्यंत आहे. तसेच 40 सेकंद मध्ये याच्या प्लेट्स गरम होतात. या प्लेट्स ची साईझ पण जास्त असते. या प्रोडक्ट वर तुम्हाला कोणत्याही प्रकारची वॉरंटी मिळत नाही. तसेच या हेअर स्ट्रेटनर ची किंमत ही अंदाजे 1999 रुपये पर्यंत असू शकते. तसेच यात तुम्हाला ऑटो शट ऑफ चा ऑपशन मिळतो व तेरा प्रकारच्या सेटिंग ऑपशन मिळतात. सर्व प्रकारच्या केसांसाठी हे हेअर स्ट्रेटनर उपयुक्त नाही, फक्त थिक म्हणजे दाट केसांवर तुम्ही याचा उपयोग करू शकता.

VEGA 3 in 1 Hair Styler Straightener Curler Crimper

Vega थ्री इन वन हेअर स्ट्रेटनर

मित्रांनो, वेगा चे हे प्रोडक्ट तुम्हाला थ्री इन वन फिचर मध्ये मिळते. म्हणजे यात तुम्ही केस स्ट्रेट करू शकता, कर्ली करू शकता, तसेच केस क्रिम्पिंग पण करू शकता. याची कॉर्ड लेंथ पण जास्त आहे. तसेच यात तुम्हाला सिरॅमिक प्लेट्स मिळतात, व हे हेअर स्ट्रेटनर तुम्ही फक्त दाट केसांवर वापरू शकता. हे प्रोडक्ट तुम्हाला ब्लॅक कलर मध्ये भेटते. तसेच या प्रोडक्ट मध्ये प्लेट्स ला गरम व्हायला दोन मिनिटं लागतात, जो खुप जास्त वेळ लागतो. तसेच या प्रोडक्ट वर तुम्हाला दोन वर्षांची वॉरंटी मिळते. व याची किंमत ही अंदाजे 1200 रुपये च्या आसपास असू शकते.

Havells Ceramic Plates Hair Straightener

Havells हेअर स्ट्रेटनर

मित्रांनो, हा हेअर स्ट्रेटनर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या केसांवर वापरू शकता. हे प्रोडक्ट तुम्हाला जांभळ्या (पर्पल) कलर मध्ये उपलब्ध आहे. तसेच यात तुम्हाला टेम्परेचर कंट्रोल सेटिंग मिळत नाही, पण यात टेम्परेचर हे 210 ℃ पर्यंत मिळते. या हेअर स्ट्रेटनर मध्ये तुम्हाला प्लास्टिक चे मटेरील मिळते. तसेच याची कॉर्ड लेंथ ही 2 मी पर्यंत भेटते. तसेच गरम होण्यासाठी याला 45 सेकंद लागतात. आणि या प्रोडक्ट वर तुम्हाला दोन वर्षांची वॉरंटी मिळते. या हेअर स्ट्रेटनर ची किंमत ही अंदाजे 900 रुपयेच्या जवळ पास असू शकते.

SYSKA Hair Straightener

SYSKA हेअर स्ट्रेटनर

मित्रांनो, हे हेअर स्ट्रेटनर सर्व प्रकारच्या केसांवर वापरता येऊ शकते. तसेच हे प्रोडक्ट तुम्हाला गुलाबी (पिंक) कलर मध्ये उपलब्ध आहे. या हेअर स्ट्रेटनर मध्ये सिरॅमिक मटेरियल वापरले आहे. यात टेम्परेचर सेटिंग खूप चांगली मिळते, जी 230℃ पर्यंत उपलब्ध होते. तसेच गरम होण्यासाठी याला 60 सेकंद चा वेळ लागतो. या शिवाय या प्रोडक्ट वर तुम्हाला दोन वर्षांची वॉरंटी मिळते. याची किंमत बघायची झाली तर ती तुम्हाला हे प्रोडक्ट 700 ते 750 रुपयेच्या जवळ पास मिळते. तसेच या मध्ये तुम्हाला ऑटो शट ऑफ चा ऑपशन सुद्धा मिळतो.

Philips Hair Straightener

Philips हेअर स्ट्रेटनर

मित्रांनो, फिलिप्स चे हे हेअर स्ट्रेटनर कोणत्याही प्रकारच्या केसांवर वापरता येऊ शकते. हे प्रोडक्ट ब्लॅक कलर मध्ये मार्केट मध्ये उपलब्ध आहे. तसेच यात सिरॅमिक मटेरियल वापरले आहे. याची कॉर्ड लेंथ तुम्हाला 1.6 मी ची मिळते. तसेच या प्रोडक्ट मध्ये तुम्हाला 210 ℃ मॅक्सिमम टेम्परेचर सेटिंग मिळते. या प्रोडक्ट ला गरम होण्यासाठी 60 सेकंद लागतात. तसेच या प्रोडक्ट वर तुम्हाला दोन वर्षांची वॉरंटी मिळते व याची किंमत ही अंदाजे 1000 रुपये च्या जवळ पास आऊ शकते. तसेच यात तुम्हाला गरजे नुसार टेम्परेचर ऍडजस्ट करता येऊ शकते.

हेअर स्ट्रेटनर चे फायदे व नुकसान

मित्रांनो, हेअर स्ट्रेटनर चे फायदे तर तुम्हाला माहीत आहेच की ते केसांना हेअर स्टाइल करण्यासाठी, स्ट्रेट करण्यासाठी, कर्ली करण्यासाठी, तसेच योग्य हेअर स्ट्रेटनर वापरल्यास केस मुलायम व चमकदार होतात. पण तुम्हाला माहीत आहे का हेअर स्ट्रेटनर चा दररोज वापर केल्याने त्यापासून केसांना नुकसान ही होते. चला तर मग हेअर स्ट्रेटनर चा जास्त वापर केल्यास कोणत्या प्रकारचे नुकसान होते ते पाहू या.

  • मित्रांनो, हेअर स्ट्रेटनिंग करताना तुम्ही पाहिले असेल की केसातुन एक प्रकारचा धूर निघतो. तो धूर म्हणजे वाफ आहे. म्हणजे केसांमध्ये असणारा नैसर्गिक ओलावा हेअर स्ट्रेटनर मुळे निघून जातो व त्यामुळे केस निर्जीव व ड्राय होतात.
  • केसांमधील नैसर्गिक ओलावा गेल्यामुळे केसांची चमक जाऊन ते निस्तेज होतात.
  • सतत हेअर स्ट्रेटनिंग केल्यामुळे त्याचा परिणाम केसांच्या मुळावर होऊन केस कमकुवत होऊन तुटायला व गळायला लागतात.
  • केसांना कोरडे पण आल्यास तुमच्या टाळूला म्हणजेच स्काल्पला खाज यायला सुरुवात होते. त्यामुळे स्काल्पला इजा पोहचू शकते.
  • सततच्या हेअर स्ट्रेटनिंगमुळे केसांच्या वाढीवर ही परिणाम होतो. व वाढ मंदावते.
  • त्यामुळे हेअर स्ट्रेटनरचा वापर मर्यादित करा. जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि नुकसान कमी होईल.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण हेअर स्ट्रेटनर बद्दल बरीच शी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे की तुम्हाला या माहितीचा नक्कीच फायदा होईल. तसेच लेख आवडला असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी सोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद।

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!