ओले केस झटपट सुकवण्यासाठी बेस्ट हेअर ड्रायर आणि Hair Dryer खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा !
नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्या समोर एक नविन महिती घेऊन आलो आहोत. आज आपण हेअर ड्रायर बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तसेच सर्वात बेस्ट हेअर ड्रायर कोणते आहेत ते ही जाणून घेणार आहोत. स्त्री असो व पुरुष दोघंसाठी हा लेख खुप महत्वाचा असणार आहे. त्यामुळे शेवट पर्यंत नक्की वाचा.
सर्वात पहिले जाणून घेऊ की हेअर ड्रायर म्हणजे नेमकं काय असतं?
मित्रांनो, हेअर ड्रायर म्हणजे केस सुकवण्यासाठी त्यावर उबदार हवा सोडणारे एक विद्युत उपकरण आहे. या हेअर ड्रायर ला ब्लो ड्रायर असे ही म्हटले जाते. हेअर ड्रायर चा उपयोग ओले केस सुकवण्यासाठी तसेच विविध हेअर स्टाइल करण्यासाठी केला जातो. तसेच हेअर ड्रायरमुळे केस हवे तसे मोल्ड करता येतात.
तसेच मित्रांनो, कधी कधी घाई घाईत आपले ओले केस तसेच ओले राहतात. अगदी टॉवेल ने कितीही पुसले तरी केस काय लगेच कोरडे होत नाही. ओले केस राहिले की मग सर्दी होते. मग अश्या वेळेस जर तुमच्या कडे हेअर ड्रायर असता तर दोन मिनिटांत तुमचे केस कोरडे झाले असते. तेव्हा आपल्याला कडे पण एक हेअर ड्रायर असावा असं वाटतं. पण सर्वात चांगला व तुमच्या केसांना योग्य असा हेअर ड्रायर शोधणे सोपे काम नाही त्यासाठी हेअर ड्रायर बद्दल काही गोष्टी तूम्हाला आधी माहीत पाहिजे, तरच तुम्ही योग्य तो हेअर ड्रायर खरेदी करू शकाल.
चला तर मग जाणून घेऊ की हेअर ड्रायर खरेदी करण्याआधी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या?
Things You Should Know Before Buying A Hairdryer in Marathi
- Adjustable Heat Setting (उष्णता सेटिंग) – मित्रांनो, तुम्ही खरेदी करत असलेल्या हेअर ड्रायर मध्ये ऍडजस्टेबल हिट सेटिंग चा ऑपशन असलाच पाहिजे. कारण त्याद्वारे तुम्ही हेअर ड्रायरचा हवेचा प्रवाह (एअर फ्लो) कंट्रोल करू शकता. तुमचे केस दाट असतील तर तुम्ही हाय हिट चा ऑपशन निवडू शकता. पण जर तुमचे केस थिन असतील तर मात्र तुम्हाला कमी हिट किंवा कमी एअर फ्लोचा ऑपशन निवडावा लागेल. म्हणून तुमच्या हेअर ड्रायर मध्ये हा ऑपशन असणे खूप महत्त्वाचे आहे.
- Watt (वॅट) -मित्रांनो, हेअर ड्रायरचे वॅटेज जितके जास्त असेल तितके ते जास्त उष्णता सोडेल आणि तितकेच तुमचे केस लवकर सुकतील. किंवा तितके लवकर तुम्ही केसांची स्टाईल करू शकता. 1000 ते 1800 वॅट असलेले हेअर ड्रायर जवळ जवळ सर्व प्रकारच्या केसांसाठी योग्य ठरते. तुमचे केस जर जास्त जाड व लांब असतील तर तुम्ही 1600 ते 1800 वॅट चे हेअर ड्रायर घ्यायला हवे. आणि जर तुमचे केस पातळ व छोटे असतील तर तुम्ही 1000 ते 1200 वॅट असलेले हेअर ड्रायर घ्यायला हवे.
- Weight (वजन) – मित्रांनो, तुमच्या हेअर ड्रायर चे वजन हे नेहमी कमी असावे. वजनाने हलका असलेला हेअर ड्रायर हा वापरण्यास सोपा व कम्फर्टेबल असतो. तसेच आपण तो सहजपणे हाताळू शकतो.
- Foldable Handle (फोल्डहोणार हॅण्डल) – मित्रांनो, तुमचा हेअर ड्रायर हा फोल्डेबल असायला हवा . त्यामुळे तो तुम्ही कुठेही नेऊ शकता. तसेच त्याला जागा ही कमी लागेल.
- Cords Length (कॉर्डची लांबी) – मित्रांनो, तुमच्या हेअर ड्रायर ची कॉर्ड ची लांबी ही शक्यतो सहा फूट इतकी असावी. कारण जर तुमचा प्लग लांब असेल तर कॉर्ड तुम्हाला व्यवस्थित लावता आला पाहिजे.
- Auto Shut Off (ऑटो मॅटीक बंद होणारे) – मित्रांनो सुरक्षेच्या दृष्टीने हा फिचर तुमच्या हेअर ड्रायर मध्ये असायलाच हवा. तुमचा हेअर ड्रायर वापरून झाल्यावर किंवा तो खाली ठेवल्यावर आपोआप बंद व्हायला पाहिजे. तुमच्या सेफ्टीसाठी हे खूप महत्त्वाचे आहे.
- Cool Air Option (थंड हवा सोडणारा पर्याय) – मित्रांनो तुम्ही खरेदी करत असलेल्या हेअर ड्रायर मध्ये हा ऑपशन आहे की नाही हे नक्की चेक करा. गरम हवा ब्लो केल्यानंतर जर तुम्ही तुमच्या केसांवर हेअर ड्रायर ने कूल एअर ब्लो केली तर तुमचे केस मुलायम व शाईनी होतात. त्यामुळे तुमच्या हेअर ड्रायर मध्ये कूल एअर ऑपशन असायलाच हवा.
- तुमच्या केसांचा प्रकार – मित्रांनो हेअर ड्रायर खरेदी करताना तुमच्या केसांना सूट होईल असाच हेअर ड्रायर खरेदी करावा. त्यासाठी तुम्हाला तुमच्या केसांचा प्रकार ओळखता आला पाहिजे. तुमचे केस जर पातळ आणि छोटे असतील तर तुम्हाला असा हेअर ड्रायर निवडायला हवा जो तुमच्या केसांना थिकनेस देईल. त्यासाठी तुम्ही सिरॅमिक हेअर ड्रायर वापरणे योग्य होईल. तसेच जर तुमचे कुरुळे केस असतील तर त्यासाठी तुम्हाला डिफ्युजर (diffuser) असलेला हेअर ड्रायर वापरायला हवा. तसेच जाड आणि लांब केसांसाठी तुम्हाला आयोनिक हेअर ड्रायर वापरणे योग्य राहील.
भारतातील सर्वात चांगले हेअर ड्रायर
सिसका 1200 वॅट हेअर ड्रायर (SYSKA 1200 W hair dryer)
मित्रांनो, हा हेअर ड्रायर तुम्हाला 1200 वॅटचा मिळतो. तसेच या हेअर ड्रायरची अंदाजे किंमत 850 ते 900 रुपये पर्यंत असू शकते. यामध्ये तूम्हाला हिट ब्लांसिन्ग टेक्नॉलॉजी मिळते जी तुम्हाला ओव्हर हीट पासून संरक्षण देते. तसेच या हेअर ड्रायर मध्ये तुम्हाला स्पीड हिट सेटिंग मिळते आणि शिवाय कूल एअर फंक्शन पण मिळते. याचे हँडल पण फोल्डेबल आहे ज्यामुळे तुम्ही हेअर ड्रायर इसिली मूव्ह करू शकता. या हेअर ड्रायर चे वजन पण खूप कमी आहे. या प्रोडक्ट वर तुम्हाला दोन वर्षांची वॉरंटी मिळते.
फिलिप्स हेअर ड्रायर (philips hair dryer)
मित्रांनो, फिलिप्स चे सगळेच प्रोडक्ट खूप चांगले असतात. फिलिप्स चे हे हेअर ड्रायर पण एक चांगले प्रोडक्ट आहे. या हेअर ड्रायर मध्ये तुम्हाला 1200 वॅट ची पॉवर मिळते. तसेच या हेअर ड्रायर ची किंमत सांगायची झाली तर हे प्रोडक्ट तुम्हाला अंदाजे 1380 रुपये च्या जवळ पास मिळू शकते. यामध्ये तुम्हाला थर्मो प्रोटेक्ट सेटिंग दिली गेली आहे. ज्यामुळे केसांना सुकवण्यासाठी योग्य ते टेम्परेचर मेन्टेन करते. यासोबतच तुम्हला ड्रायइंग सेटिंग मिळते याद्वारे तुम्ही कूल ड्राय किंवा क्विक ड्राय चा ऑपशन निवडू शकता.
या हेअर ड्रायर मध्ये तुम्हाला ब्रश डिफ्युझर पण दिले आहे. त्याचा उपयोग तुम्हाला केस स्मूथ करण्यासाठी होतो. या हेअर ड्रायर मध्ये तुम्हाला कूल एअरचा ऑपशन पण दिला आहे. तसेच यात तुम्हाला फोल्डेबल हँडल आणि एक चांगली कॉम्पॅक्ट डिझाइन पण मिळते. सोबतच 1.5 मी ची कॉर्ड लेंथ दिली जाते. आणि या प्रोडक्ट वर तुम्हाला दोन वर्षांची वॉरंटी मिळते.
पॅनासोनिक हेअर ड्रायर (Panasonic Hair Dryer)
मित्रांनो पॅनासॉनिक च्या या प्रॉडक्ट मध्ये तुम्हाला 1800 वॅट ची पॉवर मिळते. म्हणजे हे हेअर ड्रायर खुप पॉवरफुल आहे. याचा उपयोग करून तुम्ही वेग-वेगळ्या हेअर स्टाइल करू शकता. या हेअर ड्रायर ची किंमत ही 1580 रुपयेच्या आसपास असू शकते. तसेच यात केसांच्या सुरक्षेसाठी हिट प्रोटेक्शन मोड ऑपशन दिले आहेत. या मध्ये तुम्हाला फोल्डेबल हँडल आणि कॉम्पॅक्ट डिझाइन मिळते. त्यामुळे तुम्ही हे प्रोडक्ट कुठेही नेऊ शकता. तसेच कमी जागेत ठेवू शकता. तसेच या हेअर ड्रायर वर तुम्हाला दोन वर्षांची वॉरंटी मिळते. केस लवकर सुकवण्यासाठी तसेच वेग-वेगळ्या हेअर स्टाइल करण्यासाठी हे हेअर ड्रायर एक उत्तम पर्याय आहे.
अगारो हेअर ड्रायर (Agaro hair dryer):-
मित्रांनो अगारो चे हे हेअर ड्रायर एक उत्कृष्ट असे प्रोडक्ट आहे. या प्रोडक्ट ची किंमत ही 1500 च्या आसपास असू शकते. अगारो च्या या हेअर ड्रायर मध्ये तुम्हाला 2000 वॅट ची पॉवर मिळते. त्यामुळे हे एक पॉवरफुल असे प्रोडक्ट आहे. तसेच या ड्रायरचा उपयोग तुम्ही वेग-वेगळ्या हेअर स्टाईल करण्यासाठी करू शकता. या प्रोडक्ट वर तुम्हाला दोन वर्षांची वॉरंटी मिळते. यात तुम्हाला कॉन्सन्ट्रेटर नोजल, डिफ्युझर, आणि कोम्ब अटैच्मन्ट पण मिळते. याशिवाय या हेअर ड्रायर मध्ये तुम्हाला दोन स्पीड सेटिंग व तीन हिट सेटिंग मिळतात.
या हेअर ड्रायर ची खासियत म्हणजे यात तुम्हाला ऑटो शट ऑफ चा ऑपशन मिळतो. जो ओव्हर हीटिंग होण्यापासून रोखतो. तसेच हेअर ड्रायर खाली ठेवले की ते आपोआप बंद होते. तसेच यात कॉर्ड लेंथ तुम्हाला ही 2.5 मी ची मिळते.
हावेल्स हेअर ड्रायर (Havells hair dryer)
मित्रांनो, हावेल्सचे हे हेअर ड्रायर सर्वात चांगले हेअर ड्रायर मानले जाते. हे हेअर ड्रायर 1600 वॅट चे आहे. तसेच या हेअर ड्रायर ची किंमत ही अंदाजे 1100 रुपयेच्या जवळ पास असू शकते. या प्रोडक्ट मध्ये तुम्हाला तीन हिट सेटिंग व दोन स्पीड सेटिंग दिल्या आहेत. तुमच्या गरजे नुसार तुम्ही ते वापरू शकता. तसेच यात हिट बॅलन्स सेटिंग पण दिली गेली आहे. या हेअर ड्रायर मध्ये तुम्हाला फोल्डेबल हँडल, कूल शॉट बटन व एक स्टोरेज हुक पण दिले आहे. तसेच या प्रोडक्ट वर तुम्हाला दोन वर्षांची वॉरंटी मिळते.
हेअर ड्रायर वापरण्याचे फायदे
What Are The Advantages Of A Hairdryer?
- हेअर स्टाईल करण्यासाठी वारंवार सलून किंवा पार्लर मध्ये जावे लागते. व प्रत्येक वेळी पैसे खर्च करावे लागतात. हेअर ड्रायर घेतल्यास तुमचे पैसे व वेळ दोन्ही वाचते. तसेच दाट आणि लांब केस सुकवण्यासाठी ही कमी वेळ लागतो.
- हेअर ड्रायर चा उपयोग तुम्ही पाळीव प्राण्यांवर सुद्धा करू शकता. पाळीव प्राण्यांचे केस लवकर सुकवण्यासाठी याचा उपयोग होतो.
- तसेच हेअर ड्रायरच्या मदतीने तुम्ही कपडे किंवा नेल पेंट पण सुकवू शकता.
- हेअर ड्रायर च्या मदतीने तुम्ही घर बसल्या वेग वेगळ्या हेअर स्टाइल करू शकता.
हेअर ड्रायर वापरण्याचे तोटे
What Are The Disadvantages Of A Hairdryer?
- हेअर ड्रायर दररोज वापरल्याने तुमचे केस खराब होऊ शकतात. टाळू वरचे छिद्र उघडून केस गळणे सुरू होऊ शकते.
- जास्त गरम केल्याने तुमची टाळू जळू ही शकते.
- केसांची चमक जाऊ शकते. तसेच केस वाढणे ही थांबते.
- हेअर ड्रायरच्या आवाजा मुळे तुमच्या कानांना त्रास होऊ शकतो.
हेअर ड्रायर वापरताना कोणत्या गोष्टीं ची काळजी घ्यावी
- हेअर ड्रायर वापरताना केसांपासून शक्यतो सहा ते सात इंच लांब ठेवा. असे केले नाही तर केस कोरडे व्हायला सुरुवात होईल व ते लवकर तुटतील.
- हेअर ड्रायर वापरण्याआधी तुमच्या केसांना नरीशमेन्ट सिरम लावा त्यामुळे उष्णतेचा केसांना त्रास होणार नाही आणि केस मऊ राहतील.
- हेअर ड्रायर वापरण्यापूर्वी केसांना कंडिशनिंग अवश्य करा. नाही तर नंतर केसांमध्ये गुंता होऊन ते तुटतील.
- तुमचे केस जर आधी पासूनच कोरडे व रुक्ष असतील तर हॉट ड्रायर ऐवजी कूल ड्रायरचा ऑपशन वापरा.
- ड्रायर मुले केसांमधील पोषण निघून नये म्हणून केसांना नियमित पणे तेल लावा. व आहाराकडे नीट लक्ष द्या. भरपूर फळे, भाज्या खा व भरपूर पाणी प्या.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण हेअर ड्रायर बद्दल बरीच शी माहिती बघितली तसेच भारतातील सर्वात चांगले हेअर ड्रायर कोणते आहेत ते सुद्धा जाणून घेतले. या माहिती चा तुम्हाला नक्की उपयोग होईल, अशी आशा करतो.
तसेच आज चा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळी सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.