क्रेडिट कार्ड (Credit Card)

गुगल पे वरून सिबील स्कोर फ्री मध्ये चेक कसा करायचा? | How to Check Your CIBIL Score Free on Google Pay?

नमस्कार मित्रांनो, आज आपण गुगल पे वरून सिबील स्कोर फ्री मध्ये चेक कसा करायचा, या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तसेच या लेखात सिबील स्कोर चेक करण्या सोबतच तुमचा पूर्ण सिबील रिपोर्ट कसा मिळवायचा व त्याचे विश्लेषण कसे करायचे, तसेच क्रेडिट स्कोर वर कोण कोणते घटक परिणाम करतात, या सर्व गोष्टी बद्दल आज आपण सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

Google Pay Varun CIBIL Score Check Kasa Karaycha

मित्रांनो, CIBIL म्हणजेच क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड द्वारे एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोर तपासला जातो. सिबील स्कोर हा एखाद्या व्यक्तीची क्रेडिट योग्यता किती आहे याचे मूल्यांकन करते. बँक किंवा इतर वित्तीय संस्था एखाद्या व्यक्तीला क्रेडिट सुविधा द्यायची की नाही हे ठरवण्या आधी त्या व्यक्तीचे सिबील स्कोर चेक करते. सिबील स्कोर चांगला राहण्यासाठी तुम्हाला तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगली ठेवावी लागते. एखाद्या व्यक्तीची क्रेडिट हिस्ट्री ही कर्ज परतफेड, क्रेडिट चा वापर या संबंधित इतर घटकांवर आधारित असते. क्रेडिट स्कोर बद्दल आणखी बोलायचे झाले तर तो तीन अंकी नंबर असतो. आणि तो 300 ते 900 च्या दरम्यान मोजला जातो. 900 हा सर्वात उच्च स्कोर मानला जातो. या स्कोर मध्ये तुम्हाला कोणतीही बँक किंवा NBFC अगदी सहज पणे कर्ज देते. तर 600 च्या खाली असलेला स्कोर हा खराब मानला जातो. या स्कोर मध्ये तुम्हाला कोणत्याही बँकेतून किंवा वित्तीय संस्था तुन क्रेडिट किंवा कर्ज मिळवणे कठीण होऊ शकते. त्यामुळे सिबील स्कोर चांगला ठेवणे यासाठी कायम प्रयत्नशील राहणे आवश्यक असते.त्यासाठी तुम्हाला तुमचे पेमेंट वेळेवर पूर्ण करणे गरजेचे आहे.



मित्रांनो, तुमच्या सिबील रिपोर्ट मध्ये कोणताही प्रॉब्लेम तर नाही ना याची खात्री करण्यासाठी तुम्हाला तुमचा सिबील स्कोर वेळोवेळी नियमित पणे चेक करावा लागतो. तुमच्या क्रेडिट स्कोर चे मूल्यमापन करणे हे तुमच्या क्रेडिट स्कोर सुधारण्या साठी नेहमीच फायद्याचे ठरते. मित्रांनो, तसे सिबील स्कोर चेक करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. त्यासाठी तुम्ही सिबील च्या ऑफिशियल वेबसाईट ला भेट देऊ शकता. त्याशिवाय अनेक वेबसाइट्स व अँप्स आहेत ज्या द्वारे तुम्ही तुमचे सिबील स्कोर व रिपोर्ट चेक करू शकता. असेच एक अँप म्हणजे गुगल पे अँप (Google Pay ). हो मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर वाचलंय. गुगल पे द्वारे तुम्ही तुमचा सिबील स्कोर चेक करू शकणार आहात. तसेच त्याचा रिपोर्ट ही मिळवू शकणार आहात. ते ही अगदी विनामूल्य. खरंतर तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटले असेल पण हे खरं आहे की तुम्ही तुमच्या गुगल पे अँप मधून तुमचा सिबील रिपोर्ट अगदी विनामूल्य बघू शकणार आहात. तुम्हाला ही गुगल पे वरून सिबील स्कोर चेक कसा करायचा ते जाणून घ्यायचे असेल तर आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

गुगल पे (Google Pay) वरून सिबील स्कोर (CIBIL Score) कसा चेक करायचा ?

मित्रांनो, गुगल पे वरून सिबील स्कोर चेक करण्यासाठी सर्वात पहिले तुमच्या मोबाईल मध्ये गुगल पे अँप असणे आवश्यक आहे. जर तुमच्या कडे ते अँप नसेल तर तुम्ही ते डाउनलोड करून घ्यायचे आहे. आणि जर आधीच तुमच्या मोबाईल गुगल पे अँप असेल तर तुम्हाला ते अपडेट करून घ्यायचे आहे. त्या नंतर आता खालील स्टेप्स फॉलो करा.

Google Pay Varun CIBIL Score Check Kasa Karaycha Step 1

स्टेप 1: सर्वात पहिले अँप मध्ये जाऊन लॉग इन करा.

स्टेप 2: आता अँप च्या होम पेज वर थोडे खाली स्क्रोल करायचे आहे. तिथे तुम्हाला Check Your CIBIL Score for Free हा ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वर क्लीक करायचे आहे.

Google Pay Varun CIBIL Score Check Kasa Karaycha Step 2

स्टेप 3: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला खाली Lets check या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.



Google Pay Varun CIBIL Score Check Kasa Karaycha Step 3

स्टेप 4: आता पुढच्या पेज वर तुम्हाला तुमचे नाव First Name आणि मग Last Name टाकायचे आहे. इथे तुमचा मोबाईल नंबर गुगल पे खात्या वरून आपोआप घेतला जाईल. आता खाली दिलेल्या टर्म्स आणि कंडिशन्स ऍक्सेप्ट करून Continue या बटन वर क्लिक करायचे आहे.

Google Pay Varun CIBIL Score Check Kasa Karaycha Step 4

स्टेप 5: नंतर Additional Details मध्ये तुम्हाला तुमचा पॅन नंबर टाकायचा आहे व तुमचा ई-मेल आयडी तिर्हे आपोआप येऊन जाईल.

स्टेप 7: मित्रांनो, थोड्याच वेळात स्क्रीन वर तुम्हाला तुमचा क्रेडिट रिपोर्ट आलेला दिसेल.

Google Pay Varun CIBIL Score Check Kasa Karaycha Step 5

स्टेप 8: तसेच तुमचा क्रेडिट रिपोर्ट पूर्ण बघायचा असेल तर खाली दिलेले see full report या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. तुम्हाला तुमच्या क्रेडिट स्कोर चा पूर्ण अहवाल तपशील बघायला मिळेल.

Google Pay Varun CIBIL Score Check Kasa Karaycha Step 6

मित्रांनो, गुगल पे (Google Pay) तुम्हाला फक्त तुमचा क्रेडिट अहवालचा तपशीलच देत नाही, तर त्या शिवाय तुमच्या क्रेडिट स्कोर वर परिणाम करणारे घटक कोण कोणते आहेत ते देखील दाखवतो.

Gpay चा क्रेडिट रिपोर्ट समजून घ्या

चला तर मग क्रेडिट स्कोर वर परिणाम करणाऱ्या घटकां बद्दल जाणून घेऊ या:

Google Pay Varun CIBIL Score Check Kasa Karaycha Step 7
  1. Payment History: मित्रांनो, तुमच्या क्रेडिट स्कोर वर परिणाम करणारा पहिला आणि सर्वात महत्वाचा घटक म्हणजे तुमची पेमेंट हिस्ट्री. पेमेंट हिस्ट्री वरून तुम्ही वेळेवर पैसे परत करण्यास किती तत्पर आहात ते समजत असते. त्यामुळे क्रेडिट स्कोर साठी वेळेवर पेमेंट करण्याची हिस्ट्री असणे खूप चांगले मानले जाते. मित्रांनो, तुम्ही जर वेळेवर व पूर्ण हफ्ते भरत असाल तर तुमचा चांगला क्रेडिट स्कोर तयार होतो. पण जर तुमचे हफ्ते थकले असतील तर तुम्ही त्यांना हळूहळू भरून काढले पाहिजे. कारण एका थकलेल्या पेमेंट मुळे सुद्धा तुमच्या क्रेडिट हिस्ट्री वर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे एकही पेमेंट चुकणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
  2. Credit Usage: मित्रांनो, क्रेडिट स्कोर वर परिणाम करणारा अजून एक दुसरा घटक म्हणजे तुमचा क्रेडिट वापर म्हणजेच credit usage. तुमच्या क्रेडिट चा वापर हा क्रेडिट युटीलायझेशन रेशो द्वारे दर्शविला जातो. आणि क्रेडिट युटिलायझेशन रेशो म्हणजे हे तुमच्या क्रेडिट कार्डच्या थकबाकीचे आणि तुमच्या क्रेडिट मर्यादेचे गुणोत्तर असते. यामध्ये तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेट जर जास्त असेल, म्हणजेच जर तो रेशो 30% पेक्षा जास्त असेल, तर तुमच्या क्रेडिट स्कोरला हानी पोहचू शकते.

आणि कदाचित भविष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्ज लवकर भेटणार नाही. त्यामुळे तुमचा क्रेडिट वापर म्हणजेच क्रेडिट युटीलायझेशन रेशो हा नेहमी मर्यादेत असायला हवा. मित्रांनो, शेवटी थोडक्यात सांगायचे झाले तर, तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड मधून जेवढा जास्त खर्च कराल तेवढा तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो जास्त असेल. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की तुमचा क्रेडिट युटीलायझेशन रेशो नेहमी 30% पेक्षा कमी राहील.

  1. Credit Mix: मित्रांनो, क्रेडिट मिक्स म्हणजे तुमचे सुरक्षित कर्ज (secured loan) आणि असुरक्षित कर्ज (unsecured loan) किती आहेत यांची गोळाबेरीज असते. आणि या वरून तुमचा क्रेडिट अवलंबून असतो. मित्रांनो, दीर्घ मुदतीचे कर्ज असणे कधी पण चांगले असते. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर वाढण्यास मदतच होते. म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही दीर्घ मुदतीचे सुरक्षित गृह कर्ज घेतले तर ते तुमच्या फायद्याचे ठरते. तेच जर तुम्ही अनेक प्रकारचे असुरक्षित कर्ज घेतले असतील तर ते तुम्हाला नुकसान दायक ठरू शकते.
  2. New Enquiries: मित्रांनो, जेव्हा तुम्ही नवीन कर्ज घेता किंवा नवीन क्रेडिट घेता तेव्हा तुमचा क्रेडिट रिपोर्ट आणि क्रेडिट स्कोर पहिला जातो. याला आपण क्रेडिट इन्कवायरिझ असे म्हणतो. या इन्कवायरि ची माहिती आपल्या क्रेडिट रिपोर्ट मध्ये दोन वर्षां पर्यंत राहते. त्यामुळे जर तुमचे खूप सारे क्रेडिट खाते असतील किंवा जर क्रेडिट इन्कवायरिझ असतील , तर या गोष्टीचा तुमच्या क्रेडिट हिस्ट्री वर खूप नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या क्रेडिट खाती व इन्कवायरिझ कमीत कमी ठेवाव्यात.

नोट: तुम्ही स्वतः क्रेडिट स्कोर चेक केला तर त्याची इन्कवायरी पडत नाही तर बँक किंवा NBFC ने तुम्हाला लोन/क्रेडिट कार्ड देताना तुमच्या क्रेडिट स्कोर चेक केला तरच तुमच्या क्रेडिट रिपोर्ट वर इन्कवायरी पडते.

How to read a Credit Report?

तुमचा क्रेडिट स्कोर चांगला आहे कि वाईट?

मित्रांनो, क्रेडिट स्कोर हा 300 ते 900 च्या दरम्यान मोजला किंवा गणला जातो.

  1. 681 आणि त्या पेक्षा कमी क्रेडिट स्कोर असेल तर तो सरासरी क्रेडिट स्कोर पेक्षा ही खूप कमी मानला जातो. त्यामुळे जर तुमचा क्रेडिट स्कोर 681 किंवा त्या पेक्षा कमी असेल तर तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
  2. 681 ते 730 पर्यंतचा क्रेडिट स्कोर हा सरासरी क्रेडिट स्कोर मानला जातो.
  3. 731 ते 770 पर्यंतचा क्रेडिट स्कोर हा योग्य स्कोर मानला जातो.
  4. 771 ते 790 चा क्रेडिट स्कोर हा चांगला स्कोर मानला जातो.
  5. तर 790 आता वर असलेला क्रेडिट स्कोर हा एक उत्कृष्ट व सर्वोत्तम क्रेडिट स्कोर मानला जातो.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर व क्रेडिट रिपोर्ट चा पूर्ण अहवाल चेक करून बघू शकता. चांगला क्रेडिट स्कोर असणे किती महत्वाचे आहे ते तुम्हाला समजले असेलच. त्यामुळे क्रेडिट स्कोर चांगला ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिले पाहिजे.

FAQ

गुगल पे वर क्रेडिट स्कोर चेक केल्यास त्याचा परिणाम क्रेडिट स्कोर वर होऊ शकतो का?

नाही मित्रांनो, तुम्ही जर गुगल पे वरून तुमचा क्रेडिट स्कोर चेक केला तर तुमच्या क्रेडिट स्कोर वर त्याचा परिणाम होत नाही.

गुगल पे वरून सिबील स्कोर चेक करण्यासाठी शुल्क आकारले जाते का?

नाही मित्रांनो, गुगल पे तुम्हाला अगदी विनामूल्य तुमचा सिबील स्कोर चेक करण्याची परवानगी देते.

क्रेडिट स्कोर किती वेळा अपडेट केला जातो?

मित्रांनो, क्रेडिट ब्युरो दर 30 ते 45 दिवसांनी तुमचा क्रेडिट डेटा जमा करून घेतात. आणि त्या नंतर तुमच्या क्रेडिट स्कोरला क्रेडिट इंफॉर्मशन कंपन्यां द्वारे अपडेट केले जाते.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण गुगल पे वरून सिबील स्कोर चेक कसा करायचा व क्रेडिट स्कोर वर परिणाम करणारे घटक कोणते आहेत त्या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करतो की हा आजचा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद।

Tags: Google Pay Varun CIBIL Score Check Kasa Karaycha, Check Free Credit Score on Gpay, Gpay var Credit Score Check Kara, Google pay var Credit Score Check Kara, Gpay var CIBIL Score Check Kara, Gpay var Credit Report Check Kara, Check Free Credit Report on Gapy, Check Free CIBIL Report on Gapy, Gpay var credit report check kara

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!