Uncategorized

शेतकरी ओळखपत्राची नोंदणी मोबाईल वरून अशी करा | Farmer ID Card Maharashtra Registration Online

नमस्कार मित्रांनो, आज आपण शेतकरी ओळख क्रमांकाची नोंदणी मोबाईल वरून कशी करायची? या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

Farmer ID Card Marathi

मित्रांनो, आत्ताच्या डिजिटल युगात आपले केंद्र सरकार व राज्य सरकार द्वारे शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. त्यातच या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कोणताही शेतकरी मागे पडू नये, कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ मिळण्यापासून तो वंचीत राहू नये, तसेच प्रत्येक योजनेची आवश्यक ती माहिती शेतकऱ्याला वेळेवर उपलब्ध व्हावी म्हणून आपल्या सरकार कडून अनेक योजना ऑनलाईन पद्धतीने दिल्या जातात. मात्र या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे ‘शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच Farmer ID’ असणे आवश्यक आहे.



Farmer ID किंवा शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे एक अद्वितीय क्रमांक (Unique Farmer ID) असतो, जो प्रत्येक शेतकऱ्यास दिला जातो. या क्रमांकाद्वारे शेतकऱ्याची संपूर्ण माहिती जसे की शेतीचे एकूण क्षेत्र, पिकांची माहिती, अनुदान, विविध सरकारी योजना, बाजारभाव, मागील हंगामातील पीक पद्धती यांसारखी महत्त्व पूर्ण माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध किंवा संकलित केली जाते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे फार्मर आयडी तुम्हाला जमीन मालकीशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देईल.

नंबरशेतीसाठी महत्वाची माहिती
1तुमच्या जमिनीवर कधीच कब्जा होणार नाही, हे वाचा
2प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन फ्री मध्ये कसं काढायचं?
3(7/12) सातबारा उताऱ्यात मोठा बदल
4डिजिटल 7/12 उतारा डाउनलोड कसा करायचा?
5किसान सुविधा पोर्टल माहिती: खतांचे बाजार भाव, पीक विमा

शेतकरी ओळख क्रमांकाची नोंदणी मोबाईल वरून करा

Farmer ID Card Maharashtra Registration Online Step 1

स्टेप 1:- मित्रांनो, मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला https://mhfr.agristack.gov.in या वेबसाईट वर जायचे आहे. वेबसाईट ओपन झाल्यावर त्याच्या होम पेज वर उजव्या बाजूला तुम्हाला लॉगिन चा पर्याय दिसेल तिथे दोन ऑप्शन दिसतील Farmer आणि Official. मित्रांनो, आपण शेतकरी म्हणून नोंदणी करणार आहोत, म्हणून Farmer (शेतकरी ) हा पर्याय निवडायचा आहे.

मित्रांनो, इथे तुमचं आधी अकाउंट नसेल तर तुम्हाला Create Account या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 2:- आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्या नंतर आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी खाली दिलेल्या बॉक्स वर टिक करायचे आणि Submit बटन वर क्लिक करायचे आहे.

Maharashtra Registration Online Step 2

त्या नंतर तुमच्या आधार रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी दिलेल्या जागी टाकून Verify बटन वर क्लिक करायचे आहे.



Maharashtra Registration Online Step 2 Sub-step 2

स्टेप 3:- मित्रांनो, आता पुढच्या पेज वर तुमच्या म्हणजेच शेतकऱ्याच्या KYC डिटेल्स दिसतील, ज्यात त्याच आधार वरील नाव जन्म तारीख, वय, पत्ता, पिन कोड वगैरे माहिती दिसेल.

त्याखाली agri stack platform ला तुमचा मोबाईल नंबर लिंक किंवा रजिस्टर करायचा आहे, त्यासाठी दिलेल्या जागी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे व त्या नंतर सेंड ओटीपी वर क्लिक केल्यावर तुमच्या समोर एका विंडो मध्ये दिलेल्या जागी आलेला ओटीपी टाकून सबमिट करायचा आहे. त्या नंतर तुमचा मोबाईल नंबर agristack प्लॅटफॉर्म ला रजिस्टर होऊन जाईल.

Maharashtra Registration Online Step 3

स्टेप 4:- आता या नंतर Set Password या ऑप्शन मध्ये तुम्हाला एक पासवर्ड तयार करायचा आहे व त्याला पुन्हा एकदा टाकून कन्फर्म करायचं आहे. या नंतर Create Account ऑप्शन वर कळेल करायचे आहे व लगेच तुमचं नवीन अकाउंट तयार होऊन जाईल व तुम्हाला तसा मेसेज ही येईल.

Maharashtra Registration Online Step 4

स्टेप 5:- मित्रांनो, आता परत मागे येऊन लॉगिन करायचं आहे. त्यासाठी परत Farmer ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे व नंतर खाली मोबाईल नंबर टाकायचा व पासवर्ड टाकून दिलेला कॅपचा टाकायचा आहे व Log In बटन वर क्लिक करायचे आहे.

Maharashtra Registration Online Step 5

स्टेप 6:- मित्रांनो, या नंतर पुन्हा एकदा तुम्हाला तुमचे KYC डिटेल्स दाखवले जातील. त्या नंतर खाली Register as farmer या बटन वर क्लिक करायचे आहे.

Maharashtra Registration Online Step 6

स्टेप 7:- या नंतर तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर तुम्ही Mobile number confirmation मध्ये Yes करू शकता व मोबाईल नंबर बदलू शकता पण जर तुम्हाला मोबाईल नंबर बदलायचा नसेल तर No ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आपण इथे No ऑप्शन निवडणार आहोत.

Maharashtra Registration Online Step 7

स्टेप 8:- मित्रांनो, आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला Farmer details या ऑप्शन मध्ये तुमचं नाव मराठीत टाकायचं आहे. (मित्रांनो, इथे नाव टाकताना कुठल्याही प्रकारचा फुलस्टॉप, कॉमा वगैरे चिन्ह द्यायचं नाही.) त्या नंतर तुमची Cast व Category सिलेक्ट करून घ्यायची आहे.

Maharashtra Registration Online Step 8

स्टेप 9:- या नंतर Farmer Identifier Type या ऑप्शन मध्ये तुमचं आणि शेत जमीन मालकाचे नाते काय आहे ते सिलेक्ट करायचे आहे. नंतर New business मध्ये No टाकायचं आहे.

स्टेप 10:- आता Residential details ऑप्शन मध्ये तुम्हाला तुमच्या गावचे नाव Local language म्हणजेच मराठी मध्ये टाकायचं आहे. त्या नंतर Insert latest residential details या ऑप्शन ला टिक करायचे आहे आणि त्या नंतर तुमचा जिल्हा, तालुका, गावाचे नाव आणि मग पिन कोड सिलेक्ट करून घ्यायच आहे.

स्टेप 11:- आता Land holder details मध्ये तुम्हाला Owner सिलेक्ट करायचं आहे.

नंतर Occupation details या मध्ये दिलेल्या Agriculture आणि Land owning farmer या दोन्ही ठिकाणी टिक करायचं आहे.

Maharashtra Registration Online Step 11

स्टेप 12:- Land details:- owned lands या मध्ये Fetch land details असा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे

Maharashtra Registration Online Step 12

आणि त्या नंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव टाकायचं आहे त्या सोबतच तुमचा खाते क्रमांक आणि सर्व्हे नंबर टाकून Submit बटन वर क्लिक करायचे आहे .

Maharashtra Registration Online Step 12 Sub-step 2

स्टेप 13:- नंतर तुमच्या खाते क्रमांकानुसार तुमचे शेत जमिनीचे डिटेल्स ओपन होतील. त्यात तुम्हाला तुमचा नाव, गट क्रमांक, क्षेत्र अश्या सर्व गोष्टी दिसतील. त्यावरील तुमच्या नावावर किंवा गट क्रमांकावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर Farm land plot details या मध्ये Farm land type या पर्यायात तुम्हाला Agriculture सिलेक्ट करायचं आहे. तसेच खाली Identifier type मध्ये S/o करायचं आहे (जर वडिलांच्या नावावर जमीन असेल तर). या नंतर Identifier name मध्ये तुमच्या पतीचे/ वडिलांचे/ मुलाचे नाव टाकू शकता. आणि मग Add land details बटन वर क्लिक करायचं आहे.

Maharashtra Registration Online Step 13

स्टेप 14:- मित्रांनो, या नंतर तुम्ही परत Land details च्या पेज वर जाल. तिथे खाली दिलेल्या बॉक्स मध्ये टिक करून Verify all land ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

आणि त्या नंतर खाली दिलेल्या Department approval या ऑप्शन मधील Revenue ऑप्शन ला टिक करायचं आहे. त्या नंतर farmer consent पूर्ण वाचून मग त्याच्या बॉक्स मध्ये टिक करायचं आहे आणि शेवटी Save बटन वर क्लिक करायचे आहे.

Maharashtra Registration Online Step 14

स्टेप 15:- या नंतर नेक्स्ट विंडो मध्ये proceed to e -sign या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Maharashtra Registration Online Step 15

स्टेप 16:- आता नेक्स्ट पेज वर असलेल्या बॉक्स मध्ये टिक करून खाली आधार क्रमांक टाकून ‘Get OTP’ ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Maharashtra Registration Online Step 16

स्टेप 17:- त्या नंतर तुमच्या मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी टाकून तुमच्या आधारची पडताळणी करून घ्यायची आहे. या नंतर तुमचा फार्मर आयडी तयार होऊन जाईल. तसा तुम्हाला मोबाईल वर सुद्धा मेसेज येईल. मित्रांनो, तुम्ही रजिस्टर केलेले डॉक्युमेंट्स सुद्धा तुम्ही download pdf या ऑप्शन वर जाऊन डाऊनलोड करून ठेवू शकता.

Maharashtra Registration Online Step 17

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण शेतकरी ओळख क्रमांकाची नोंदणी मोबाईल वरून कशी करायची, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद.

FAQ

  1. महाराष्ट्रात शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच Farmer ID अनिवार्य आहे का?

    मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना 15 एप्रिल पासून राज्य कृषी विभागाकडून देण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच Farmer ID आवश्यक असेल.

  2. शेतकरी ओळख क्रमांक चे फायदे काय आहेत?

    मित्रांनो, शेतकरी ओळख क्रमांक असल्यास शेतकऱ्याला बँके कडून कर्ज घेण्यास मदत होऊ शकेल. तसेच खते, बियाणे आणि कृषी उपकरणे खरेदी करण्यासाठी अनुदानाची सुविधा देखील दिली जाणार आहे.

  3. फार्मर आयडी मध्ये किती अंक असतात?

    मित्रांनो, फार्मर आयडी मध्ये 12 अंक असतात?



Tags: Farmer ID online, Farmer ID registration, Online Farmer ID process, agristack farmer registry, farmer id registration online, farmer registry kaise kare, ऑनलाईन शेतकरी आयडी, युनिक फार्मर आयडी, शेतकरी नोंदणी, farmer registry maharashtra, online farmer registry, farmer registry kashi karavi, farmer id apply, farmer id card, farmer id card online apply agristack, agristack farmer id card online apply maharashtra, farmer id card online registration Maharashtra, farmer id marathi corner, farmer id registration online, farmer id card online registration csc, farmer id card online apply Maharashtra, शेतकरी ओळखपत्र, farmer id, farmer id registration, farmer id registration maharashtra, farmer id card download, farmer id kaise check kare, shetkari card online registration, Farmer id shetkari card

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!