चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी घरगुती उपाय | How To Get Rid Of Face Wrinkles Quickly
नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज या लेखात आपण चेहऱ्या वरील सुरकुत्या कमी करण्यासाठी कोणते उपाय करता येतील या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
स्त्री असो किंवा पुरुष प्रत्येकालाच सुंदर दिसायला आवडते. पण जसजसे आपले वय वाढते तसतसे आपल्या शरीरात काही बदल होताना दिसतात. त्यातल्या त्यात चेहऱ्याकडे पटकन लक्ष जाते. आणि जर या चेहऱ्यावर सुरकुत्या असतील तर आपल्याला स्वतःला खूप लाजिरवाणे वाटते. तस पहायला गेलं तर वाढत्या वयाप्रमाणे सुरकुत्या येन ही सामान्य बाब आहे, पण जर तारुण्यातच चेहऱ्यावर सुरकुत्या येत असतील तर मात्र चिंतेचा कारण बनते. चेहऱ्या वर सुरकुत्या प्रामुख्याने डोळ्यांच्या अवतीभोवती, कपाळावर दिसतात. यामुळे स्किन सैल पडते व हळू हळू चेहरा निस्तेज दिसू लागतो.
सहाजिकच कोणालाही असे व्हावेसे वाटणार नाही. पण मग या सुरकुत्या घालवण्यासाठी काय करावे? काही जण घरातच अनेक उपाय करून बघतात. पण उपाय करण्याआधी चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याचे काय कारण आहे हे माहीत असले तर चांगले उपाय करता येतात. आजच्या लेखात आपण याच विषयाबद्दल माहीती जाणून घेणार आहोत. या लेखात आम्ही तुम्हाला चेहऱ्या वर सुरकुत्या येण्याची कारणे व उपाय दोन्ही गोष्टी बद्दल माहीती सांगणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याची कारणे कोणती?
मित्रांनो, वाढत्या वयासोबत सुरकुत्या येणं ही एक सामान्य गोष्ट आहे. पण जर तरुण वयातच तुम्हाला सुरकुत्या येत असतील तर मात्र त्यामागे काही कारणे असू शकतात, ती कोणती कारणे आहेत ते जाणून घेऊ या.
- मित्रांनो, हल्लीच्या धावपळीच्या जीवनात व बदललेल्या आधुनिक जीवनशैलीमुळे आजची तरुण पिढी अपुऱ्या झोपेला बळी पडत आहे. रात्ररात्र भर जागरण केल्यामुळे डोळ्याखालची नाजूक त्वचा सैल पडून हळूहळू सुरकुत्या यायला सुरुवात होते.
- कमी पाणी पिल्यामुळे शरीरात डिहायड्रेशन होते. त्याचा परिणाम चेहऱ्या वर ही दिसू लागतो. कमी पाणी पिल्याने हळू हळू त्वचा कोरडी पडते. यामुळे ही सुरकुत्या येऊ शकतात.
- तसेच कडक उन्हात जास्त वेळ राहिल्यास ही त्वचेचा पोत बिघडतो व सुरकुत्या येऊ शकतात.
- टेन्शन व अति ताण तणाव तसेच कम्प्युटर व मोबाईल चा अति वापर हे सुद्धा सुरकुत्या येण्याचे एक मुख्य कारण आहे.
- तसेच असंतुलित आहार घेतल्यामुळे शरीराला व त्वचेला हवे ते जीवनसत्त्वे मिळत नाही. त्यामुळे सुरकुत्या पडण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
- या शिवाय धूम्रपान केल्यामुळे, तसेच हवामान, आनुवंशिकता, यांमुळे ही सुरकुत्या येऊ शकतात.
- त्वचे मध्ये कोलेजनचे प्रमाण कमी झाल्यास ही चेहऱ्या वर सुरकुत्या येऊ शकतात.
- मित्रांनो, चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याच आणखी एक कारण म्हणजे साबणाचा जास्त वापर करणे. साबण जास्त प्रमाणात वापरल्याने त्वचेतील ओलावा निघून जातो व त्वचा कोरडी पडते. परिणामी चेहऱ्यावर सुरकुत्या यायला लागतात.
चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ नये किंवा असलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी काय उपाय करावेत?
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूर्ण झोप घ्यायला हवी. तुमच्या गरजे प्रमाणे आवश्यक तेवढी झोप घ्या. झोप पूर्ण झाल्याने शरीराला तसेच डोळ्यांना देखील आराम मिळतो.
- दररोज चेहरा स्वच्छ पाण्याने धुआवा.आणि डोळे गार पाण्याने धुवावे. तसेच चेहऱ्याला बदाम तेलाने हलकी मालिश करावी किंवा गुलाब पाण्याने चेहरा पुसून घ्यावा.
- तसेच डोळ्यांखाली सुरकुत्या कमी करायच्या असतील तर भरपूर पाणी प्या.
- मित्रांनो, सुरकुत्या कमी करण्यासाठी कोरफडचा गर सुद्धा तुम्ही वापरू शकता. पण जर तुम्हाला कोरफडमुळे खाज वगैरे येत असेल तर ते न लावलेले बरे.
- मध आणि लिंबू एकत्र करून दहा मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवा व थोड्या वेळाने स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे. यामुळे तुमचा चेहरा नॅचरली ग्लो करेल व त्यामध्ये टाइटनेस येईल व सुरकुत्या कमी होतील.
- तसेच पिकलेल्या पपईचा गर चेहऱ्या वर थोडावेळ लावून ठेवावा व नंतर गार पाण्याने स्वच्छ धुवून टाकावा. असे केल्याने त्वचेचा पोत सुधारतो व सुरकुत्या कमी होतात.
- तसेच तुम्ही गुलाब पाणी, लिंबाचा रस आणि ग्लिसरीन थोडे थोडे घेऊन त्याचं मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास तुम्हाला हळू हळू तुमच्या सुरकुत्या असलेल्या चेहऱ्या मध्ये फरक दिसून येतील.
- याशिवाय तुम्ही नारळाचे तेल आणि ऑलिव्ह ऑइल एकत्र करून चेहऱ्या वर हलका मसाज करू शकता. हे ऑइल चेहऱ्यामध्ये मुरू द्यावं व नंतर अर्धा तासानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.
- तसेच बेसन आणि हळद व मध एकत्र करून याचे फेस पॅक चेहऱ्यावर लावा व थोडावेळ नंतर धुवून टाका. यामुळे ही चेहऱ्या वर ग्लो येऊन सुरकुत्या होण्याचे प्रमाण कमी होते.
- योग्य आणि संतुलित आहार घ्यावा. त्यामुळे शरीराला व पर्यायाने त्वचेला योग्य ते पोषण मिळून सुरकुत्या येण्याचे प्रमाण कमी होते.
- नियमित व्यायाम करावा. व्यायाम केल्याने त्वचा घट्ट राहते, सैल पडत नाही व सुरकुत्या येत नाहीत.
- धूम्रपान करणे खूप घातक आहे. त्यामुळे धूम्रपान करणे लवकरात लवकर सोडून देने खूप आवश्यक आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे वरील पैकी कुठलाही उपाय करताना तो तुम्हाला म्हणजे तुमच्या चेहऱ्याला सूट होतो की नाही हे एकदा नक्की चेक करावे.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी कश्या करायच्या, त्यावर कोणते घरगुती उपाय करता येतील याबद्दल माहिती जाणून घेतली. आशा करतो की तुम्हाला या माहितीचा नक्की च उपयोग होईल. तसेच हा लेख आवडला असल्यास व महत्वपूर्ण वाटला असल्यास तुमच्या मित्र मैत्रिणी सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.