लाईट बिल कमी करण्याचे साधे सोपे उपाय: टीप नंबर 4
टीप नंबर 6
मित्रांनो, वीज बिल जास्त येण्याचे पुढचे कारण हे तुमच्या मोबाईल संबंधित आहे. मित्रांनो जेव्हा तुम्ही मोबाईल चार्जर ला लावता आणि चार्जिंग झाली की मोबाईल काढून घेता पण स्विच चे बटन बंद करायला मात्र विसरता. तुम्ही जर असे करत असाल तर तुमचे वीज बिल हे साधारण 100 रुपये पर्यंत जास्त येऊ शकते.
हो मित्रांनो, ही खूप छोटी गोष्ट आहे पण यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. कारण मोबाईल चार्जर मध्ये ट्रान्सफॉर्मर बसवलेले असते. आणि त्यात नेहमी करंट फ्लो होत असतो आणि त्यासाठी ऊर्जा लागत असते. त्यामुळे जरी त्या चार्जर ला मोबाईल लावलेला नसला तरी चालू असताना ते युनिट मात्र वाढवत असते. त्यामुळे चार्जिंग झाल्या वर तात्काळ बटन बंद करा. यामुळे वीज बिल कमी येण्यास नक्कीच मदत होईल.
टीप नंबर 7
मित्रांनो, वीज बिल जास्त येण्याचे पुढचे कारण हे टीव्ही संबंधित आहे. अनेक जण रात्री उशिरा पर्यंत टीव्ही बघतात. आणि झोप आलो की टीव्ही बंद करताना फक्त रिमोट ने टीव्ही बंद करतात. आणि तुम्हाला वाटत की झाला टीव्ही बंद आता काय तो लाईट वापरत नाही.
पण मित्रांनो, इथेच तुम्ही मोठी चूक करताय, जेव्हा तुम्ही फजत रिमोट ने टीव्ही बंद करता तेव्हा फक्त टीव्ही ची स्क्रीन बंद होते. मात्र त्याच्या मागच्या यंत्रणा रात्रभर चालू राहतात, आणि इथेच मोठ्या प्रमाणावर लाईट खर्च होते. आणि वीज बिल जास्त येते. त्यामुळे असे होऊ नये यासाठी जरी झोप आली असली तरी देखील थोडे कष्ट घेऊन टीव्ही चे बटन बंद करायचे आहे. जेणेकरून वीज कमी खर्च होईल आणि बिल ही कमी येईल.
टीप नंबर 8
अजून एक गोष्ट म्हणजे पाण्याची मोटर. तुम्ही जर पाण्याची टाकी भरण्यासाठी वारंवार मोटर चालू बंद करत असाल तरी देखील तुमचे वीज बिल वाढू शकते. बरेच जण टाकी भरली की मोटर बंद तर करतात पण टाकी थोडी खाली झाली की लगेच परत मोटर चालू करतात. असे दिवसातून 7 ते 8 वेळा करतात.
यामुळे मोटर जास्त ऊर्जा खर्च करते. म्हणून एकदा टाकी भरून झाली की मोटर बंद करावी आणि जेव्हा टाकीतले पूर्ण पाणी संपेल तेव्हाच मोटर चालू करा.
याशिवाय ही बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांचा वापर केल्यास तुमचे वीज बिल नक्कीच कमी होण्यास मदत होईल. जसे की एलईडी लाइट्स वापरणे, जुना टीव्ही न वापरता नवीन एलईडी टीव्ही वापरावे, एसी वापरत असाल तर 5 स्टार रेटिंग चे वापरावे. तसेच अनेकदा आपण एकावेळी दोन तीन मोठे यंत्र वापरत असतो, त्यामुळे विजेचा लोड वाढतो. आणि जर हा लोड सॅनक्शन लोड पेक्षा जास्त असला तर तुमचे लाईट बिल वाढते. मित्रांनो, लाईट बिल कमी येण्यासाठी मार्केट मध्ये एक यंत्र देखील येते ते सुद्धा तुम्ही वापरू शकता.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण लाईट बिल जास्त येण्याचे कारण व ते कमी कमी कसे येईल साठी काय प्रयत्न करावे, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.