लाईट बिल कमी करण्याचे साधे सोपे उपाय: टीप नंबर 3
टीप नंबर 4
मित्रांनो, वीज बिल वाढण्याचे हे कारण तुमच्या फ्रीज संबंधित आहे. कारण 99 टक्के लोकं त्यांच फ्रीज वापरतांना ही चूक करतात. ज्यामुळे त्यांचं वीज बिल 400 ते 500 रुपयांनी वाढते. ते कारण म्हणजे तुमच्या फ्रीज चा कूलिंग स्पीड.
मित्रांनो, बरेच जण फ्रीज च टेम्प्रेचर हाय कूलिंग मोड वर ठेवतात. ज्यामुळे फ्रीज च्या मागे असणाऱ्या कम्प्रेसर ला जास्त काम करावे लागते. आणि जेव्हा ते जास्त काम करते तेव्हा त्याला ऊर्जा ही जास्त प्रमाणात लागते. आणि पर्यायी तुमचे लाईट बिल ही वाढते.
त्यामुळे तुमच्या फ्रीज चा कूलिंग स्पीड नेहमी लो ठेवावा. फक्त जेव्हा गरज असेल म्हणजे जेव्हा एखादा पदार्थ लवकर थंड करायचा असेल तेव्हाच कूलिंग स्पीड वाढवा. एरवी मात्र फ्रीज चा स्पीड लो किंवा मिडीयम मोड वर ठेवावा.
टीप नंबर 5
मित्रांनो, वीज बिल वाढण्याचे हे कारण ही फ्रीज संबंधित च आहे. बऱ्याच घरांमध्ये फ्रीज हे भिंतीच्या जास्त जवळ ठेवलेले असते. या मुळेही तुमचे लाईट बिल जास्त वाढू शकते.
आता तुम्हाला प्रश्न पडेल असे कसे काय होते. पण मित्रांनो, तुम्हाला कदाचित माहीत असेल की जेव्हा आपण एखांदा पदार्थ फ्रीज मध्ये ठेवतो तेवग फ्रीज त्यातील उष्णता शोषून घेते आणि त्या पदार्थला थंड ठेवण्याचे काम करते. मग ही शोषून घेतलेली उष्णता फ्रीज बाहेरच्या वातावरणात मिक्स करत असते. त्यामुळे त्याला मोकळी जागा लागते.
आणि जेव्हा फ्रीज ला मोकळी जागा मिळत नाही तेव्हा पदार्थ थंड करण्यासाठी कम्प्रेसर ला जास्त मेहनत घ्यावी लागते म्हणजेच जास्त ऊर्जा लागते. आणि त्यामुळे वीज बिल जास्त येते. त्यामुळे फ्रीज इन्स्टॉल करताना ते भिंतीपासून 1 ते 2 इंच लांब ठेवावे जेणेकरून त्याला मोकळी जागा मिळेल.