लाईट बिल कमी करण्याचे साधे सोपे उपाय: टीप नंबर 2
टीप नंबर 2
मित्रांनो, वीज बिल कमी करण्यासाठी अजून एक उपाय म्हणजे, आजकाल प्रत्येक घरात मॉस्कीटो रिपेलेंट म्हणजे गुड नाईट लिक्विड वगैरे वापरले जाते. आणि हे शक्यतो लाईट वर चालणारेच असतात. हे मॉस्कीटो रिपेलेंट रात्र भर चालू असतात पण सकाळी त्याला बंद करायचं आपण विसरतो.
आता तुम्हाला वाटेल एवढंस मशीन काय करणार, पण मित्रांनो, हे मशीन म्हणजे एक प्रकारचे हिटर असते. आणि हे जर 24 तास चालू राहिले तर दिवसाला 50 वॅट जरी ऊर्जा हे घेत असेल तर दिवसाला 1 युनिट तुमचे खर्च होणार. म्हणजे महिन्याचे 300 ते 400 रुपये तुमचे विनाकारण खर्च होणार. त्यामुळे तुम्ही वापरत असलेले मॉस्कीटो रिपेलेंट वेळीच बंद करा म्हणजे तुमचे जास्तीचे बिल येणार नाही.
टीप नंबर 3
मित्रांनो, बऱ्याच वेळा फ्रीज ज्या रूम मध्ये असते तिथे फॅन देखील असतो. आणि जेव्हा आपण फ्रीज उघडतो तेव्हा त्यातील गार हवा बाहेर पडते. आणि जर फ्रीज उघडतांना फॅन चालू असेल तर ती गार हवा लवकर बाहेर पडते आणि त्या जागी गरम हवा भरली जाते.
आणि परत पदार्थ गार करण्यासाठी कम्प्रेसर ला जास्त ऊर्जा खर्च करावी लागते आणि पर्यायी लाईट बिल ही जास्त प्रमाणात वाढते. त्यामुळे फ्रीज उघडतांना फॅन बंद आहे की नाही ते नक्की बघा जेणेकरून वीज बिल जास्त येणार नाही.