ऑनलाईन वोटर स्लिप डाउनलोड करा 2 मिनिटांत | Download Voter Slip Online
नमस्कार मित्रांनो, आमच्या आजच्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्यासाठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आज आपण ऑनलाईन पद्धतीने वोटर स्लिप डाउनलोड कशी करायची? या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
तसेच दरवेळेस प्रमाणे ज्या मतदारांची नोंदणी झालेली आहे त्यांना निवडणूक आयोगा कडून मतदानाच्या स्लिप म्हणजेच वोटर स्लिप दिली जाते. मित्रांनो, ही वोटर स्लिप खूप महत्वाचा कागद असतो, कारण याच्या शिवाय तुम्ही मतदान करूच शकत नाही.
त्यामुळे तुमच्या भागात अजून निवडणूक झाली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमची वोटर स्लिप काढून घ्या. तसं पाहिलं तर निवडणूक आयोगाकडूनच या वोटर स्लिप मतदारांना पाठवल्या जातात, परंतु, निवडणुकीत भाग घेणारे अनेक मतदार आपली वोटर स्लिप सोबत आणायला विसरतात, त्यामुळे त्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होता येत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही मतदानासाठी घराबाहेर पडाल तेव्हा तुमची वोटर स्लिप सोबत ठेवायला विसरू नका.
पण मित्रांनो, अजून ही तुम्हाला जर वोटर स्लिप मिळाली नसेल तर काळजी करू नका, तुम्ही तुमची वोटर स्लिप केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईट वरून घरबसल्या डाउनलोड करून घेऊ शकता व त्याची प्रिंट देखील काढू शकता. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने वोटर स्लिप डाउनलोड कशी करायची या बद्दल जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
हे हि वाचा: मतदान यादीत तुमचं नाव चेक करा, मोबाईल मधून फक्त १ मिनिटात
सर्वात पहिले वोटर स्लिप का महत्वाचे आहे? ते जाणून घेऊ या:
मित्रांनो, निवडणुकीसाठी व मतदान करण्यासाठी व्यक्तीचं वोटर स्लिप हे एक अतिशय महत्वाचे डॉक्युमेंट आहे. या वोटर स्लिप ला वोटर इन्फॉर्मेशन स्लिप असे कधील म्हटले जाते. या स्लिप मध्ये मतदान करणाऱ्या व्यक्तीची सर्व वैयक्तिक माहिती दिलेली असते, जसे की मतदाराचे पूर्ण नाव, वय, लिंग, जन्म तारीख, मतदान केंद्राचे म्हणजेच पोलिंग स्टेशन/ बूथ चे नाव व त्याचा पत्ता, तुमची विधानसभा मतदारसंघ, मतदानाची तारीख वगैरे माहिती दिलेली असते.
या स्लीपच्या आधारेच तुम्ही मतदान करण्यास सक्षम आहात की नाही हे ठरवले जाते. या स्लिप मध्ये अजून एक गोष्ट नव्याने डेंटत अली आज ती म्हणजे आता स्लिप मध्ये एक क्यू आर कोड देखील देण्यात आला आहे, ज्याचा वापर करून मतदाराचे सर्व डिटेल्स अगदी सहज पणे बघितले जाऊ शकतात. त्यासोबतच वोटर स्लिप च्या मागील बाजूस मतदान केंद्राचा नकाशा देखील देण्यात आला आहे. या नकाशाच्या मदतीने तुम्ही तुमच्या पोलिंग बूथ चा पत्ता आरामात शोधू शकता. तसेच काही महत्वाच्या सूचना देखील लिहिलेल्या आहेत. या सर्व गोष्टींमुळे वोटर स्लिप म्हणजेच मतदार स्लिप एक महत्वाचा दस्तऐवज बनला आहे.
ऑनलाईन वोटर स्लिप डाउनलोड करा
स्टेप 1: मित्रांनो, तुमची वोटर स्लिप डाउनलोड करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला election24.eci.gov.in या वेबसाईट वर जायचे आहे. या वेबसाईट वरच तुम्हाला 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या सर्व अपडेट्स मिळतील.
त्यानंतर थोडं खाली स्क्रोल केल्या वर तुम्हाला search your name in electoral roll हा ऑप्शन दिसेल त्या वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 2: या नंतर तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील. Search by EPIC, Search by Details आणि Search by Mobile या पैकी कोणत्याही एका ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता
Search by EPIC / वोटर नंबर द्वारे शोधा
मित्रांनो, हा पर्याय निवडल्या नंतर खाली तुमचा EPIC नंबर म्हणजेच तुमचा मतदार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्या नंतर तुमचे State (राज्य) सिलेक्ट करायचे आहे. व दिलेला कॅपचा टाकून Search बटन वर क्लिक करायचे आहे.
त्या नंतर तुम्हाला वोटिंग स्लिप म्हणजेच मतदार यादी दाखवली जाईल. त्यात तुमचे पूर्ण नाव, जन्म तारीख, वय, जिल्हा, राज्य, तसेच Assembly constituency म्हणजेच विधानसभा मतदारसंघ व polling station म्हणजेच मतदान केंद्राचे नाव व त्याचा पत्ता देखील दाखवण्यात येईल.
तिथेच पुढे तुम्हाला View details चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही तुमची वोटर स्लिप पाहू शकता. या स्लिप वर तुम्हाला प्रिंट असा ऑप्शन सुद्धा देण्यात आला आहे, ज्याद्वारे तुम्ही या स्लिपला डाउनलोड करून मग त्याची प्रिंट काढू शकता.
Search by Details / वैयक्तिक माहिती वरून
मित्रांनो, तुम्ही जर हा पर्याय निवडला तर त्यावर क्लिक केल्या नंतर तुमचे State म्हणजेच राज्य सिलेक्ट करायचे आहे व नंतर तुमचे पूर्ण नाव, ज्यात first name, middle name व surname टाकायचे आहे. त्या नंतर तुमच्या वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव टाकायचे आहे. त्या नंतर तुमची जन्म तारीख व वय टाकून नंतर जेंडर म्हणजेच लिंग सिलेक्ट करायचे व नंतर डिस्ट्रिक्ट म्हणजेच जिल्हा सिलेक्ट करून मग विधानसभा मतदारसंघ सिलेक्ट करून शेवटी दिलेला कॅपचा टाकायचा आहे व Search बटन वर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला तुमची वोटर स्लिप दाखवली जाईल. तुम्ही त्याला डाउनलोड करू शकता किंवा प्रिंट काढू शकता.
Note: मित्रांनो, यात भरलेली माहीती ही तुमच्या मतदार कार्ड प्रमाणेच असायला हवी.
Search by Mobile / मोबाईल नंबर द्वारे शोधा
मित्रांनो, ही तुमची वोटर स्लिप डाउनलोड करण्याची सर्वात सोपी पद्धत आहे. इथे सर्वात पहिले तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे. आणि तुमच्या मतदान कार्डशी लिंक असलेला तुमचा मोबाईल नंबर टाकायचं आहे व नंतर दिलेला कॅपचा टाकून Send OTP या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर तुमच्या लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल, तो दिलेल्या जागी टाकून Search बटन वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमची वोटर स्लिप तुमच्या समोर दाखवली जाईल. ती तुम्ही डाउनलोड करू शकता.
मित्रांनो, वोटर स्लिप च्या या तीन पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय निवडून तुम्ही सहजपणे तुमची वोटर स्लिप डाउनलोड करून घेऊ शकता. तरीही तुम्ही पहिला पर्याय म्हणजेच Search by EPIC निवडावा.
तसेच मतदानाला जाताना तुमची वोटर स्लिप तुमच्या जवळ अवश्य ठेवा आणि तुम्हाला दिलेल्या तारखेला तुमच्या मतदान केंद्रावर नक्की जा. व जाताना सोबत तुमचे मतदार कार्ड घेऊन जा आणि जर ते नसेल तर तुम्ही तुमचे आयडी प्रूफ म्हणून आधार कार्ड देखील घेऊन जाऊ शकता.
मित्रांनो, शेवटी एकच गोष्ट सांगू इच्छितो की, देशाच्या प्रगतीसाठी व उन्नतीसाठी टचे एक मतदान खूप आवश्यक आहे. त्यामुळे मतदान नक्की करा.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण ऑनलाईन पद्धतीने वोटर स्लिप डाउनलोड कशी करायची? या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.
Tags: Voter Slip Download Matathi, Voter Slip Download in Marathi, Voter Slip Download info in Marathi, Voter Slip Download Mahiti, Voter Slip Download Information in Maratgi, Voter Slip Download Kashi karaychi, Voter Slip Online Check karathi, Voter Slip Mahiti