क्रेडिट कार्ड (Credit Card)

क्रेडिट कार्ड संबंधित महत्वाच्या संज्ञा आणि टर्मिनालजी | Credit Card Terminology

नमस्कार मित्रांनो, आज आपण क्रेडिट कार्ड संबंधित महत्वाच्या संज्ञा आणि टर्मिनालजी (Terminology) बघणार आहोत. यामुळे तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्ड संबंधित संपूर्ण अटी, नियम वेगवेगळे चार्जेस (शुल्क) समजण्यास मदत होईल.

Credit Card All Terminology in Marathi

Annual Fee / वार्षिक शुल्क

साधारण सर्वच बँक आपल्या क्रेडिट कार्डवर काही ना काही शुल्क आकारते याच शुल्का मध्ये सर्वात सामान्य शुल्क म्हणजे वार्षिक शुल्क. या शुल्काचा अर्थ म्हणजे तुमचे क्रेडिट कार्ड चालू ठेवण्यासाठी तुम्हाला वर्षाला किती रक्कम भरावी लागते.



प्रत्येक क्रेडिट कार्डचे वार्षिक शुल्क (Annual Fee) वेगवेगळे असते आणि काही वेळा बँका हे शुल्क काही परिस्थिती (कंडिशन) मध्ये माफ करतात जसे, तुम्ही वर्षाला क्रेडिट कार्ड वरून ठराविक रक्कमेपर्यंत (उदा. 1 लाख) खर्च केले तर तुम्हाला वार्षिक शुल्क आकारले जात नाही.

तुम्हाला जर हे शुल्क वाचवायचे असेल तर तुमच्या क्रेडिट कार्डच्या नियम व अटी वाचून घ्या त्यामध्ये Annual Fee Waiver असे शोधा.

Credit Limit / क्रेडिट लिमिट

क्रेडिट लिमिट थोडक्यात सांगायचे झाले तर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून किती रक्कमेपर्यंत खर्च करू शकता. जेव्हा तुम्हाला बँक क्रेडिट कार्ड देते तेव्हा बँक तुमचा सिबिल स्कोर आणि तुमचे मासिक उत्पन्न बघून तुमच्या क्रेडिट कार्डला एका ठरावीक रक्कमेपर्यंत लिमिट ठरवून देते. आणि याच रक्कमेपर्यंत तुम्ही क्रेडिट कार्ड वरून शॉपिंग/ बिल पेमेंट करू शकता.

जसे जसे तुम्ही नियमीत क्रेडिट कार्डचे पेमेंट करता तसे तसे तुमच्या क्रेडिट कार्डचे लिमिट बँक वाढवते. आणि नियमीत पेमेंट केले नाही तर बँक क्रेडिट लिमिट कमी हि करू शकते.

याच क्रेडिट लिमिटच्या संधर्भात आणखी काही उप-संज्ञा आणि टर्मिनालजी आहेत त्याखाली बघू…



Total Credit Limit / टोटल क्रेडिट लिमिट

टोटल क्रेडिट लिमिट म्हणजे तुमच्या क्रेडिट कार्डला बँकेने ठरवून दिलेली एकूण मर्यादा आणि या लिमिट पर्यंतच तुम्ही खर्च करू शकता.

Available Credit Limit / उपलब्ध क्रेडिट मर्यादा

उपलब्ध (अवेलबल) क्रेडिट मर्यादा सध्याची क्रेडिट मर्यादा. आणि दुसऱ्या शब्दात तुमची शिल्लक मर्यादा किंवा टोटल क्रेडिट लिमिट मधून खर्च केलेली रक्कम. तुम्हाला समजण्यासाठी अवघड जात असेल तर खाली दिलेले उदाहरण बघा.

उदाहरण.

  • टोटल क्रेडिट लिमिट (Total Credit Limit) – 50 हजार
  • एकूण खर्च (Total Amount Spent) – 10 हजार
  • उपलब्ध क्रेडिट मर्यादा (Available Credit Limit) – 40 हजार

Cash Limit / कॅश लिमिट

क्रेडिट कार्डशी संबंधित दुसरी महत्त्वाची संज्ञा म्हणजे कॅश लिमिट. तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड वापरून किती कॅश ATM मधून काढू शकता यालाच कॅश लिमिट म्हणतात. बँका सामान्यतः क्रेडिट कार्डवरील एकूण क्रेडिट लिमिटच्या 20% ते 40% कॅश लिमिट ठरवून देते.

तुम्ही क्रेडिट कार्ड वापरून ATM मधून पैसे काढू शकता पण असे करणे टाळावे कारण असे केल्यास बँक मोठ्या प्रमाणावर चार्जेस लावते.

Minimum Amount Due / किमान देय रक्कम

किमान देय रक्कम सोप्या भाषेत सांगायचे झाले तर तुम्हाला महिन्याचे पूर्ण बिल न भरता एकूण बिलाचा फार कमी भाग भरणे. हे करण्यामागचे कारण म्हणजे यामुळे तुम्हाला लेट पेमेंट चार्जेस लागत नाही आणि बिल न भरण्याचा सिबिल वर नकारात्मक परिणाम होत नाही. आपण एक उदाहरण घेऊन सोप्या पद्धतीने समजून घेऊयात.

समजा तुमचे महिण्याकाठी क्रेडिट कार्ड बिल 50 हजार झाले आहे, आत्ता तुम्हाला हे पूर्ण बिल पेमेंट करायचे आहे पण तुमच्याकडे पुरेशे पैशे नाहीत, आणि जर तुम्ही बिल पेमेंटला उशीर केला तर बँक तुमच्यावर लेट पेमेंट चार्जेस लावेल आणि हा रिपोर्ट सिबिलला पाठवला जाईल यामुळे तुमचा सिबिल स्कोर कमी होतो. यावर उपाय म्हणून बँक बोलते तुम्ही फक्त 5 हजार भरू शकता आणि उरलेली रक्कम तुम्ही निवांत तुमच्याकडे पैसे आल्यानंतर भरा. यामुळे तुम्हाला लेट चार्जेस द्यावे लागणार नाहीत आणि सिबिल वर हि नकारात्मक परिणाम होणार नाही.

पण सावध व्हा: कारण बँक राहिलेल्या रक्कमेवर भरमसाठ व्याज लावते अगदी 30 – 40% पर्यंत शिवाय इतर चार्जेस हि असतात. त्यामुळे शक्य होईल तेवढे पूर्ण बिल पेमेंट भरण्याचा प्रयत्न करा. आणि या किमान देय रक्कमेच्या मोहात पडू नका.

Annual Percentage Rate (APR) / वार्षिक टक्केवारी दर

वार्षिक टक्केवारी दर म्हणजे क्रेडिट कार्डवर लागू होणारे मासिक शुल्क/दर देण्याऐवजी तुम्हाला वार्षिक व्याजदर भरावा लागणे. तसेच हा APR दर तुमच्या थकीत रक्कम (overdue amount), बिलांवर हि परिणाम करतो. त्यामुळेच लोक म्हणतात क्रेडिट कार्ड वापरणे खूप महागात जाते.

पण हा दर फक्त तुम्ही न भरलेल्या रक्कमेवर असतो म्हणजेच तुम्ही क्रेडिट कार्ड पेमेंट उशिरा केले तर त्या रकमेवर हा दर लागू होतो. याशिवाय जर तुम्ही किमान देय रक्कम (minimum amount due) भरत आला असाल तर हा व्याजदर दररोज जमा होत राहतो, जोपर्यंत तुम्ही पूर्ण रक्कम भरत नाही तोपर्यंत. क्रेडिट कार्ड APR दरवर्षी 30-45% दरम्यान असू शकते.

Credit Utilization Ratio / क्रेडिट युटिलायझेशन रेशो

क्रेडिट युटिलायझेशन रेशो म्हणजे क्रेडिट धारकाच्या एकूण उपलब्ध क्रेडिटची टक्केवारी जी सध्या वापरली जात आहे. उदा. तुमच्या कार्डचे क्रेडिट लिमिट हे 1 लाख आहे आणि तुम्ही साधारण महिन्याला 50 हजार खर्च करता. याचा अर्थ तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो हा 50% असतो. क्रेडिट युटिलायझेशन रेशोचा उद्देश क्रेडिट स्कोअरची गणना करण्यासाठी केला जातो. एक अशी मान्यता आहे कि तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो कमी ठेवला तर तुमचा क्रेडिट स्कोअर अधिक चांगला होऊ शकतो.

Cash Advance / कॅश ऍडव्हान्स

जेव्हा तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे काढता, तेव्हा ते कॅश ऍडव्हान्स म्हणून ओळखले जातात. बँक सामान्यत: तुमच्या एकूण क्रेडिट मर्यादेच्या एका ठराविक लिमिटपर्यंत पैसे काढण्याची परवानगी देते (20% ते 40%) आणि पैसे काढण्यावर जास्तीचा व्याजदर आणि शुल्क आकारते, त्यामुळे क्रेडिट कार्डचा उपयोग पैसे काढण्यासाठी करू नये. ते तुम्हाला खूप महागात पडू शकते.

Total Amount Due / एकूण देय रक्कम

‘एकूण देय रक्कम’ म्हणजे तुमच्या कार्ड पेमेन्टच्या शेवटच्या तारखेनुसार तुम्हाला भरावी लागणारी रक्कम. यात सुरुवातीची शिल्लक, नवीन खरेदी, शुल्क आणि थकबाकी याची गोळा बेरीज असते.

Free Credit Period / मोफत क्रेडिट कालावधी

मोफत क्रेडिट कालावधी म्हणजे विनामूल्य क्रेडिट कालावधी ज्या दरम्यान बँक कार्डधारकाकडून कोणतेही व्याज आकारत नाही. हा कालावधी सहसा 20-50 दिवसांचा असतो.

Interest-Free / Grace Period / व्याजमुक्त / ग्रेस कालावधी

व्याज-मुक्त/सवलत कालावधी म्हणजे क्रेडिट कार्डधारकाच्या बिलिंग सायकलच्या समाप्तीपासून ते देय तारखेपर्यंतचा कालावधी. जर ग्राहकाने त्याची देयके वेळेवर भरली तरच ते व्याजमुक्त असेल. बँका सहसा 20 ते 60 दिवसांच्या दरम्यान वाढीव कालावधी देतात.

Balance Transfer Fee / शिल्लक हस्तांतरण शुल्क

बॅलन्स ट्रान्सफर फी म्हणजे क्रेडिट कार्डधारक एका बँकेने जारी केलेल्या त्यांच्या कार्डांची थकबाकी दुसऱ्या बँकेच्या क्रेडिट कार्ड खात्यात हस्तांतरित करू शकतात.

Late Payment Fee / लेट पेमेंट फी

लेट पेमेंट फी म्हणजे तुम्ही वेळेवर क्रेडिट कार्ड पेमेंट केले नाही तर तुम्हाला भरावे लागणारे अधिकचे चार्जेस असतात.

Tags: Minimum Amount Due Meaning in Marathi, Minimum Amount Due Mahiti, Minimum Amount Due Marathi, Minimum Amount Due info Marathi, Annual Fee Meaning in Marathi, Annual Fee Mhanje Kay, Annual Fee Mahiti Marathi, Credit Card Annual Fee Mahiti, Credit Card Annual Fee, Credit Limit Meaning in Marathi, Credit Limit Mhanje Kay, Credit Limit Mahiti Marathi, Credit card Limit info Marathi, Credit Limit Meaning in Marathi, Total Credit Limit Meaning in Marathi, Total Credit Limit Mahiti, Total Credit Limit info in Marathi, Available Credit Limit Meaning in Marathi, Credit card Available Credit Limit Marathi, Available Credit Limit Mahiti Marathi, Credit Utilization Ratio Meaning in Marathi

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!