१५ ते १८ वर्ष वयोगट कोविड लसीसाठी अपॉइंटमेंट बुक करा, संपूर्ण प्रक्रिया वाचा
१५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांना, कोविन अॅप आणि वेबसाइटवर लसीसाठी नोंदणी करता येणार आहे, असे कोविनचे प्रमुख डॉ. आर. एस. शर्मा यांनी सांगितले. लस नोंदणीसाठी मुलांचे आधार कार्ड किंवा दहावीचे ओळखपत्र (शाळेचे ओळखपत्र) ग्राह्य धरले जाईल. भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही एकमेव लस 15-18 वयोगटातील मुलांना दिली जाईल.
अधिकाऱ्याच्या मते, लसीकरण 3 जानेवारीपासून सुरू होईल.
या ब्लॉग मध्ये आपण १५ ते १८ वर्ष वयोगटासाठी मुलांसाठी लसीचा स्लॉट कसा कसा बुक करायचा ते बघणार आहोत.
कोविन वेबसाइट वरून लस नोंदणी प्रक्रिया
कोविन वेबसाइट वरून लस नोंदणी प्रक्रिया दोन भागा मध्ये विभागली आहे.
भाग १: रजिस्टर (Register)
या भागा मध्ये व्यक्ती कोविन वेबसाइट वर रजिस्टर होतो. आणि नंतर फक्त लॉगिन करून तो आपली लस नोंदणी, लस रीशेड्यूल करू शकतो. त्याचबरोबर आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी लस बुक करू शकतो. चला तर बघुयात कोविन वेबसाइट वरून लस कशी बुक करतात
स्टेप 1: सर्वात प्रथम कोविनच्या वेबसाइटला भेट द्या www.cowin.gov.in
स्टेप 2: नंतर Register/Sign वर क्लिक करा
स्टेप 3: तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर टाका, आणि Get OTP वर क्लिक करा
स्टेप 4: तुमच्या मोबाइलवर ओटीपी येईल, तो १८० सेकंडच्या आत टाईप करा आणि Verify बटन वर क्लिक करा
स्टेप 5: ओटीपी तपासणी झाल्यावर Register for Vaccination पेज उघडेल
स्टेप 6: आता तुमची वैयक्तिक माहिती भरा.
- Member Type – Regular Citizen
- Photo ID Proof – मुलांकडे असलेले फोटो आयडी आधार कार्ड, मतदान कार्ड, दहावीचे ओळखपत्र, शाळेचे ओळखपत्र इत्यादी..
- Document No – फोटो आयडीचा नंबर
- Name – फोटो आयडी वर असलेले नाव
- Gender – लिंग
- Year of Birth – फोटो आयडी वर असलेले जन्मसाल
हि माहिती टाकल्यावर Register बटन वर क्लिक करा. नंतर तुम्हाला तुमची माहिती प्राप्त झाल्याचा आणि कोविन वेबसाइट वर रजिस्टर झाल्याचा मेसेज दिसेल (Beneficiary Registered Successfully)
नोट: तुम्ही तुमच्याबरोबर तुमच्या जवळच्या कोणत्याही तीन व्यक्तीची हि माहिती भरून त्यांची हि लस बुक करू शकता. त्यासाठी Add बटन वर क्लिक करून माहिती भरा. आणि कोपऱ्यात असलेल्या Delete बटन ने त्या व्यक्तीला यादी मधून काढून हि टाकू शकता.
स्टेप 7: नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमच्या समोर Account Details दिसतील.
भाग २: लसीचे बुकिंग (Booking Appointment for Vaccination)
अकाउंट डिटेल (Account Details) पेज वर जाऊन तुम्ही लससाठीची अपॉइंटमेंट बुक करू शकता.
स्टेप 1: अकाउंट डिटेल पेज वर असलेल्या Schedule बटन वर क्लिक करा.
स्टेप 2: नंतर तुम्ही Book Appointment for Vaccination पेज वर पोहचाल
स्टेप 3: तुमच्या गावात जर आरोग्य केंद्र असेल तर गावचा पिन कोड टाका, किंवा जवळच्या गाव, शहर, तालुका, जिल्हाचा पिन कोड टाका.
स्टेप 4: आत्ता तुमच्या समोर लसीकरण केंद्रांची यादी येईल, आणि त्या केंद्रामध्ये किती स्लॉट (जागा) शिल्लक आहे तेही दिसेल. तुमच्या वेळेनुसार, वयानुसार आणि मोकळ्या स्लॉटनुसार केंद्र निवडा आणि क्लिक करा.
स्टेप 5: आता तुम्हाला Appointment Confirmation चे पेज दिसेल इथे तुम्हाला Confirm बटन दाबून तुम्ही लस बुक करू शकता.
स्टेप 6: आता नवीन पेज वर लस बुक झाल्याचा मेसेज येईल आणि Download बटन वर क्लिक करून तुम्ही तुमची स्लिप डाउनलोड करू शकता. हि स्लिप लस घेताना, केंद्रावर दाखवावी लागेल आणि त्याबरोबर तुमचे फोटो आयडी हि दाखवावे लागेल.
अशा तर्हेने तुम्ही लसीसाठीची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली. जर तुम्ही वरती दिलेल्या तारखेला केंद्रामध्ये पोहचू शकत नसाल तर लस बुकिंग अपॉइंटमेंट रीशेड्यूल कशी करायची हे या पोस्ट मध्ये वाचा.
कोविन अॅप वरून लस नोंदणी प्रक्रिया
स्टेप १: सर्वात प्रथम अॅपस्टोअर मधून कोविनचे अॅप इन्स्टॉल करा.
आता अॅप उघडा अणि तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर टाका. ओटीपी आल्यानंतर तो टाकून लॉग इन करा.
स्टेप 2: पुरावा म्हणून फोटो आयडी निवाडा.
स्टेप 3: निवडलेल्या आयडी नंबर, नाव, लिंग अणि जन्मतारीख टाका.
स्टेप 4: तुमच्या गावात जर आरोग्य केंद्र असेल तर गावचा पिन कोड टाका, किंवा जगाच्या गाव, शहर, तालुका, जिल्हाचा पिन कोड टाका. आत्ता तुमच्या समोर लसीकरण केंद्रांची यादी येईल.
स्टेप 5: त्या केंद्रांपैकी एक निवाडा अणि लस घेण्यासाठी तारीख, वेळ निवाडा.
अशा तर्हेने तुम्ही लसीसाठीचा स्लॉट बूक करू शकता. शेवटी केंद्रावर जाऊन लस घ्या.