Marathi Health Tipsआरोग्य टिप्स | Health Tips in Marathi

डोळे येणं म्हणजे काय? त्या पासून कसं वाचायचं? | Conjunctivitis Eye Flu Infection

नमस्कार मित्रांनो, आमच्या आज च्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्या साठी खूप महत्वाची व तुमच्या आयोग्याशी निगडित, उपयोगी अशी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आज आपण Conjunctivitis Eye Flu infection म्हणजेच ज्याला आपण डोळे येणं असे म्हणतो, त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तसेच डोळे येणं म्हणजे काय? त्याची कारणे कोणती? त्या पासून कसं वाचायचं? या अश्या बऱ्याच गोष्टीं बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

Dole Yene

मित्रांनो, तसं पाहिलं तर सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढते. आणि या वाढलेल्या आर्द्रतेमुळे व्हायरस पसरण्याची जास्त शक्यता असते. ओलावा राहिल्या मुळे संसर्ग बराच काळ शरीरात राहतो. अश्या वातावरणात कधी कधी आपल्याला घाम येतो आणि आपण सतत आपला चेहरा पुसत राहतो. चेहरा पुसताना आपण डोळ्यांनाही हात लावतो. मग काय डोळ्यांना संसर्ग होतो आणि डोळे येतात. मित्रांनो डोळे येणं म्हणजे इंग्रजीत त्याला कंजकटीव्हिटीझ (conjunctivitis) असे म्हटले जाते.



खरंतर पावसाळा या ऋतु मध्ये अनेक प्रकारचे संसर्ग रोग पसरण्याची शक्यता असते, पण त्यातल्या त्यात डोळे येण्याची समस्या प्रमुख मानली जाते. आणि सध्या अनेक शहरांमध्ये डोळे येण्याची साथ सुरू आहे. आणि जास्त करून हा संसर्ग शाळांमधून जास्त प्रमाणात पसरत आहे. तर डोळे येणं म्हणजे नेमकं काय होतं? हा आजार कसा होतो? त्याची लक्षणं काय? तसेच त्यावर उपचार कोणते? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या पासून बचाव कसा करायचा, या सर्व प्रशांची उत्तरं आज आम्ही या लेखात सांगणार आहोत. त्यामुळे आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

सर्वात पहिले डोळे येणं म्हणजे काय ?

मित्रांनो, डोळे येणं याला इंग्रजी मध्ये conjunctivitis असं म्हटलं जातं. हा एक संसर्गजन्य व वेगाने पसरणारा आजार आहे. बॅक्टेरिया किंवा व्हायरसमुळे डोळे आलेले असल्यास एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये हा संसर्ग पसरू शकतो, तर ऍलर्जी मुळे डोळे आलेले असल्यास त्याचा दुसऱ्यांना संसर्ग होत नाही. तसं पाहिलं तर हा आजार खूप जास्त गंभीर स्वरुपाचा समजला जात नाही. पण हा संसर्गजन्य आजार असल्याने, डोळ्यांसारख्या नाजूक अवयवावर त्याचा परिणाम होतो आणि तो बरा व्हायला देखील बराच कालावधी लागत असल्याने तो होऊ नये याची काळजी घेणं कधीही चांगले समजते जाते.

Dole Yene Lakshane

आता डोळे येण्याची लक्षणं काय आहेत?

मित्रांनो, डोळे आले असल्यास पुढील काही लक्षणं प्रामुख्याने जाणवू लागतात:-

  1. डोळे हलके लाल होऊ लागतात.
  2. डोळ्यातून पाणी यायला लागतं.
  3. डोळ्यात वारंवार खाज येऊ लागते.
  4. डोळ्यात थोडा चिकटपणा येतो.

तज्ज्ञांच्या मते, या लक्षणांसोबतच कधीकधी सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणेही जाणवू शकतात. साधारणपणे डोळे येण्याची लक्षणं आधी एका डोळ्यात दिसू लागतात. मग तीच लक्षणे दुसऱ्या डोळ्या मध्येही होतात. संसर्ग होण्यापासून ते लक्षणे दिसण्याचा काळ हा तीन ते चार दिवसांचा असतो. आणि पावसाळ्यात व्हायरसला वाढीसाठी आणि पसरण्यासाठी पोषक वातावरण असतं. त्यामुळे पावसाळ्यात डोळे येणं या आजाराची साथ जास्त पसरताना दिसते.

संसर्ग झाल्यास कोणते उपचार करावे?

  1. मित्रांनो, डोळे आल्या नंतर साधारणपणे दोन आठवड्यांत हा आजार बरा होतो. आणि हा आजार बरा करण्यासाठी शरिराच्या रोगप्रतिकारक शक्तीला पुरक अशीच औषधं दिली जातात.
  2. तसेच डोळ्यात टाकण्यासाठी काही ड्रॉप देखील दिली जातात. आणि जर ताप किंवा इतर काही लक्षणं असतील तर त्यावरही काही औषधं दिली जाऊ शकतात. पण ही सर्व औषधं डॉक्टर च्या सल्ल्यानुसार योग्य त्या प्रमाणात घेणे आवश्यक असते.
Dole yene upay
  1. याशिवाय डोळ्यातून आलेल्या स्त्रावाला हात लागतो त्यामूळे वेळोवेळी हात स्वच्छ धुवावेत.
  2. तसेच कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे टाळावे. व डोळे पुसण्यासाठी घरातील स्वच्छ टॉवेल किंवा रुमाल वापरावा.

मित्रांनो, डोळे येणं हा आजार फार गंभीर स्वरुपाचा मानला जात नसला तरीही त्याकडे दुर्लक्ष करु नये. डोळे येण्याची लक्षणं जाणवायला सुरुवात झाल्या झाल्या योग्य औषधोपचार आणि काळजी घेणं गरजेचं आहे.



इतरांना हा संसर्ग होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी?

मित्रांनो, डॉक्टरांच्या मते, कोणत्याही संसर्ग जन्य आजारापासून बचाव करण्यासाठी जी काळजी घेणं गरजेचं असतं, ती घेतल्याने या आजारापासून बचाव केला जाऊ शकतो. आहातच डोळे आलेल्या किंवा संसर्ग झालेल्या व्यक्तीने वापरलेले रुमाल, टावेल इतरांनी वापरणं टाळावं. तसेच वेळोवेळी हात स्वच्छ धुवावेत. व डोळ्यांना सारखा हात लावू नये. डोळे आलेल्या व्यक्तीने शक्यतो गॉगल चा वापर करावा, जेणेकरून इतरांना संसर्ग होणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, डोळे आलेल्या व्यक्तीच्या डोळ्यात नुसते बघितल्याने डोळे येत नाहीत तर त्यांनी हात लावलेल्या वस्तू आपण हाताळल्यामुळे इन्फेक्शन पसरते आणि एकाचा दुसऱ्याला संसर्ग होतो.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण Conjunctivitis Eye Flu infection म्हणजेच डोळे येणं म्हणजे काय, त्याची लक्षणे कोणती व त्या पासून कसं वाचायचं, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवादl

Tags: Dole Yene, Dole Yene Avshadh, Dole Yene Upay, Dole Kashamule yetat, Dole Ka yetat, Dole yene ayurvedik upay, Dole Yene Mhanje Kay, Lala Dola Hone, Dole lal hone upay, Lal dolyvar Upay, Conjunctivitis Mhanje Kay, Conjunctivitis Kashamule hote, Eye Flu Infection Mhanje Kay, Eye Flu Infection Kashamule hote, Eye Flu Infection Upay, Eye Flu Infection medicin, Eye Flu Infection Avshadh

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!