Shop

चॉपिंग बोर्ड खरेदी करताना या महत्वाच्या टिप्स फॉलो करा | Best Chopping Board – Steel, Wooden, Plastic or Glass ?

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी किचन मधल्या सर्वात महत्त्वाच्या अशा उपयोगी वस्तू बद्दल माहिती घेऊन आलो आहोत मित्रांनो आज आपण सर्वात चांगले शॉपिंग बोर्ड बद्दल जाणून घेणार आहोत, तसेच मार्केट मध्ये चांगले चॉपिंग बोर्ड कोणते आहेत ते जाणून घेणार आहोत.

Chopping Board Information in Marathi

मित्रांनो पूर्वी भाज्या चिरण्यासाठी पारंपारिक विळीचा वापर केला जात होतो. त्याने वेळ ही खूप लागायचा आणि मेहनत देखील. पण हहळूहळू परिस्थिती बदलली आणि आता भाज्या कापण्यासाठी आपण चाकू आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे चॉपिंग बोर्डचा वापर करायला लागलो. आता अस एक ही किचन दिसणार नाही जिथे चॉपिंग बोर्ड नाही. तसेच जर तुम्हाला काही चांगले खायचे असेल तर त्याची सुरुवात ही चांगलीच झाली पाहिजे. आणि त्यासाठी तुमच्याकडे चांगले चॉपिंग बोर्ड असायला हवे. ज्यावर कोणत्याही प्रकारच्या भाज्या, फळे, मांस किंवा इतर पदार्थ चांगल्या पद्धतीने कापता येतात.



चॉपिंग बोर्ड हे स्वयंपाक घरातील एक महत्त्वाचे व सर्वात जास्त वापरले जाणारे साधन बनले आहे. आणि जी गोष्ट आपण जास्त वापरतो ती तर चांगली असायलाच हवी. पण हे चॉपिंग बोर्ड नेमकं काय असतं त्याबद्दल जाणून घेऊ या.

चॉपिंग बोर्ड म्हणजे काय?

मित्रांनो, चॉपिंग बोर्ड म्हणजे एक असा प्रकारचा बोर्ड असतो ज्यावर आपण भाज्या, फळे, मांस वगैरे पदार्थ कापू शकतो. या चॉपिंग बोर्ड वर कापण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यावर भाज्या कापायला कमी वेळ लागतो. भाज्या बारीक कापता येतात. आणि हात देखील खराब होत नाही. कॉपपिंग बोर्ड मुळे तुमचा स्वयंपाक चा अर्धा वेळ कमी होतो.

आज प्रत्येक घरात चॉपिंग बोर्ड आहे त्यामुळे चॉपिंग बोर्डचा विषय काढणं म्हणजे बऱ्याच जणांना क्षुल्लक गोष्ट वाटते. पण एक गोष्ट लक्षात घ्या की चॉपिंग बोर्ड फक्त दिसायला चांगले पाहिजे असे नाही तर योग्य चॉपिंग बोर्ड वापरणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. तो कोणत्या प्रकारचा आहे म्हणजे कशापासून बनलेला आहे, त्याची क्वालिटी कशी आहे. तो कसा स्वच्छ करावा या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. नाहीतर तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

आजकाल मार्केट मध्ये बऱ्याच प्रकारचे चॉपिंग बोर्ड उपलब्ध आहेत, पण तुमच्यासाठी व तुमच्या स्वयंपाक घरासाठी कोणते चॉपिंग बोर्ड निवडणे चांगले ठरेल, हे ठरवण्यासाठी तुम्हाला आमचा आजचा हा लेख मदत करणार आहे. त्यासाठी शेवट पर्यंत नक्की वाचा.

चॉपिंग बोर्ड चे विविध प्रकार

प्लास्टिक चॉपिंग बोर्ड

मित्रांनो, प्लास्टिक चे चॉपिंग बोर्ड मार्केट मध्ये सहज उपलब्ध आहेत. ते वजनाने हलके, अतिशय स्वस्त व टिकाऊ तसेच मऊ असतात. तसेच जेव्हा आपण त्यावर कटिंग करतो तेव्हा प्लास्टिक आपल्या भाज्या, फळातील द्रव पाणी शोषून घेत नाही, ही एक खूप चांगली गोष्ट आहे. यामुळे भाज्यांचा वास, चव एकमेकांमध्ये मिक्स होत नाही आणि तो बोर्ड साफ करणे हि सोपे होऊन जाते. हा चॉपिंग बोर्ड मऊ असल्याने चाकूच्या धारेवर पण त्याचा काही परिणाम होत नाही. म्हणजेच यामुळे चाकूची धार कमी होत नाही.



या चॉपिंग बोर्ड मध्ये एक निगेटिव्ह पॉईंट असा आहे की कटिंग मुले हळूहळू या बोर्ड वर कटिंग चे मार्क्स पडतात. आणि जर तुम्ही या बोर्डला नीट साफ केलं नाही तर या मोकळ्या जागेत बॅक्टरीया होऊ शकतात आणि त्यामुळे तुमच्या आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही प्लास्टिक चा चॉपिंग बोर्ड खरेदी कराल तेव्हा तो फूड ग्रेड मटेरियलचा असावा. तसेच प्लास्टिक चॉपिंग बोर्ड घेताना दोन चॉपिंग बोर्ड घ्यावे, एक नॉनव्हेजसाठी व दुसरे भाज्यांसाठी. त्यामुळे फूड क्रॉस कंटामिनेशन (विरुद्ध दूषितीकरण) होणार नाही. याशिवाय तुमच्या चॉपिंग बोर्डला नियमित स्वच्छ करण्यासोबतच त्याला निर्जंतुक करणे (disinfect) करणे ही खूप गरजेचे आहे. तसेच चॉपिंग बोर्ड वापरण्याआधी ते स्वच्छ धुवून वापरावे.

आम्ही खाली amazon भेटणारे चांगले प्लास्टिक चॉपिंग बोर्ड लिस्ट करून दाखवले आहेत, बोर्ड विकत घेताना तुम्ही त्यांचा विचार तुम्ही करू शकता.

Amazon Brand - Solimo Plastic Cutting Chopping Board

वुडन (लाकडाचा) चॉपिंग बोर्ड

वुडन चे चॉपिंग बोर्ड हे खूप टिकाऊ असतात. आणि मार्केट मध्ये यांचे खूप सारे विविध डिझाइन बघायला मिळतात. हे बोर्ड आंब्याच्या, कडुलिंबाच्या, किंवा तागाच्या लाकडा पासून बनवले जातात. हे चॉपिंग बोर्ड खूप सॉफ्ट असतात त्यामुळे चाकूच्या धारेला काही प्रॉब्लेम होत नाही. वुडन चे चॉपिंग बोर्ड वापरतांना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जसे की या चॉपिंग बोर्ड ला नेहमी वाहत्या पाण्याखाली धुवावे, तसेच धुतल्यानंतर त्याला उभे करून ठेवावे त्यामुळे त्यातले जास्तीचे पाणी शोषून न घेता वाहून जाईल. तसेच वेळोवेळी हा चॉपिंग बोर्ड तुम्हाला स्वच्छ करावा लागेल. तसेच अधून मधून निर्जंतुक (disinfect) पण करावा लागेल. निर्जंतुक करण्यासाठी तुम्ही मीठ आणि लिंबू चा ही वापर करू शकता. या शिवाय वुडन चे चॉपिंग बोर्ड घेताना ते कोणत्या लाकडा पासून बनले आहे ते नक्की चेक करा. काही वेळेस दुकानदार किंवा ऑनलाईन वुडन चे चॉपिंग बोर्ड सांगून बांबू चे बोर्ड विकले जातात.

आम्ही खाली amazon भेटणारे चांगले वुडन चॉपिंग बोर्ड लिस्ट करून दाखवले आहेत, बोर्ड विकत घेताना तुम्ही त्यांचा विचार तुम्ही करू शकता.

Webhushi's Classic Wooden Chopping Cutting Board

स्टेनलेस स्टील चॉपिंग बोर्ड

मित्रांनो तुमच्या किचनला मॉडर्न लुक द्यायचे असेल तर तुम्हाला स्टील चे चॉपिंग बोर्ड वापरायला हवे. हे चॉपिंग बोर्ड वापरण्यास, स्वच्छ करण्यास तसेच देखभाल करण्यास ही खूप सोपे आहेत. एखादा कडक पदार्थ कापण्यासाठी स्टील चे चॉपिंग बोर्ड वापरणे फायदेशीर ठरते. स्टेनलेस स्टील चे चॉपिंग बोर्ड हे वन टाइम इन्व्हेस्टमेंट मानले जातात. त्यामुळे हे चॉपिंग बोर्ड घेताना त्यांच्या क्वालिटी कडे जरूर लक्ष द्यावे. पण स्टीलच्या या चॉपिंग बोर्ड वर चाकूची धार हळूहळू कमी होते. तसेच कटिंग करताना आवाज ही खूप येतो. बाकी हा चॉपिंग बोर्ड वापरण्यास उत्तम आहे.

आम्ही खाली amazon भेटणारे चांगले स्टेनलेस स्टील चॉपिंग बोर्ड लिस्ट करून दाखवले आहेत, बोर्ड विकत घेताना तुम्ही त्यांचा विचार तुम्ही करू शकता.

OrganizeMee Stainless Steel Chopping Board

मित्रांनो, तसे मार्केट मध्ये ग्लासचे, बांबूचे, रबरचे चॉपिंग बोर्ड ही मिळतात. पण ते जास्त वापरले जात नाही. खास करून ग्लास चे चॉपिंग बोर्ड जास्त वापरले जात नाहीत. कारण ते हाताळण्यास कठीण जातात. आणि कटिंग करताना नकळत चुकून कधी ते तुटले तर त्याचे पिसेस अन्नात जाऊ शकतात. तसेच बांबू चे चॉपिंग बोर्ड दिसायला तर चांगले असतात पण यामुळे चाकू ची धार लवकर खराब होते. तर रबर चे चॉपिंग बोर्ड वजनदार आणि महाग असतात. वजनाने जास्त असल्याने ते सहजपणे हाताळता येत नाहीत. याशिवाय काही चॉपिंग बोर्ड मध्ये चाकू आधीच जॉईंट केलेला असतो. तुमच्या गरजे नुसार व आवडी नुसार तुम्ही कोणताही चॉपिंग बोर्ड घेऊ शकता, वापरू शकता. फक्त जो चॉपिंग बोर्ड घ्याल तो चांगल्या क्वालिटी चा च निवडा.

चॉपिंग बोर्ड साफ करण्यासाठी काही उपाय

  • मित्रांनो, भाज्या किंवा इतर कुठलेही पदार्थ कापल्या वर चॉपिंग बोर्ड वर भाज्यांचा रंग तसाच राहतो. जर हे डाग नीट साफ केले नाही तर ते तसेच राहतात. त्यासाठी तुम्ही चॉपिंग बोर्ड वर लिंबू घासून थोडावेळ तसेच राहू द्या. व नंतर लिंबूच्या साली ने घासून स्वच्छ धुवून टाका. कोणत्याही प्रकारचा भाजीचा रंग निघून जाईल.
  • जर तुमचा चॉपिंग बोर्ड वापरून वापरून पिवळा किंवा काळा पडला असेल तर पाण्यात थोडे व्हिनेगर घालून चॉपिंग बोर्ड त्यात थोडा वेळ भिजत ठेवा. व दहा मिनिटानंतर साबणाच्या पाण्याने घासून नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.
  • तसेच मीठ आणि लिंबू एकत्र करून त्याने चॉपिंग बोर्ड घासल्याने ते पुन्हा नव्या सारखे होतात.
  • तसेच चिंचेच्या कोळात मीठ घालून चॉपिंग बोर्ड थोडावेळ भिजत ठेवा. व नंतर घासणीने घासून स्वछ पाण्याने धुवून टाका.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण स्वयंपाक घरात वापरले जाणारे चॉपिंग बोर्ड बद्दल माहिती बघितली. तसेच त्याचे विविध प्रकार ही बघितले. आशा करतो की तुम्हाला या माहितीचा उपयोग नक्की होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र मंडळी सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!