आरोग्य टिप्स | Health Tips in Marathiवैद्यकीय चाचणी व रिपोर्ट (Medical Test & Report)

CBC टेस्ट संपूर्ण माहिती: म्हणजे काय, खर्च, नॉर्मल रेंज, का व कधी, वेग-वेगळे पॅरॅमिटर्स | CBC Test in Marathi

नमस्कार मित्रांनो, आज आपण CBC रिपोर्ट बद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यात सीबीसी म्हणजे काय, त्यात कोण कोणते पॅरॅमिटर्स असतात, कोणत्या सेल्स वाढल्यावर किंवा कमी झाल्यावर कोणते आजार होतात, त्याची नॉर्मल रेंज काय असायला हवी या सर्व गोष्टी बद्दल आज आपण सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

CBC Test and Report Mahiti

मित्रांनो, जेव्हा आपण कधी आजारी पडतो, म्हणजे ताप किंवा खोकला वगैरे झाला तर आपण डॉक्टर कडे उपचारासाठी जातो. डॉक्टरांच्या औषधाने जर बरे वाटले नाही तर डॉक्टर आपल्याला ब्लड टेस्ट करायला लावतात. ही ब्लड टेस्ट म्हणजे CBC (सीबीसी). अनेकदा वैद्यकीय मूल्यांकनाचा भाग म्हणून किंवा रोगांचे निदान करण्यासाठी सर्व प्रथम होणारी टेस्ट म्हणजे सीबीसी टेस्ट.



CBC टेस्ट म्हणजे तुमच्या रक्त बनवणाऱ्या पेशींची गणना करणे. CBC मध्ये पांढऱ्या रक्त पेशी ( WBC), लाल रक्तपेशी (RBC) आणि प्लेटलेट्सची (platelates) संख्या, हिमोग्लोबिनचे प्रमाण, आणि हेमॅटोक्रिट म्हणजे लाल रक्तपेशींचे प्रमाण किंवा टक्केवारी दर्शवते. या शिवाय CBC रिपोर्ट मध्ये अजून काय काय असते, ते आपण पुढे जाणून घेणारच आहोत. पण त्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

CBC टेस्ट म्हणजे काय?

सर्वात आधी CBC म्हणजे काय ते थोडक्यात जाणून घेऊ या:-

मित्रांनो, CBC म्हणजे Complete blood count म्हणजे संपूर्ण रक्त गणना किंवा ब्लड काउन्ट टेस्ट. सीबीसी ही एक प्रकारची रक्त चाचणी आहे जी तुमच्या रक्त बनवणाऱ्या पेशींची गणना करते. तसेच तुमच्या रक्तातील पेशींचे प्रकार त्यांचा आकार आणि त्यांची संख्या याबद्दल महत्वाची माहिती सीबीसी रिपोर्ट आपल्याला प्रदान करते.

CBC रिपोर्ट चे वेगवेगळे पॅरॅमिटर्स

मित्रांनो, सीबीसी रिपोर्ट मध्ये पॅरॅमिटर्स असतात त्या प्रत्येकाच्या सेल्स चे नाव व त्याची नॉर्मल रेंज दिलेली असते. तुमच्या रिपोर्ट नुसार त्यांचे प्रमाण कमी जास्त किंवा नॉर्मल असू शकते. एखाद्या सेल्स चे प्रमाण वाढल्यावर किंवा कमी झाल्यावर काय समस्या होऊ शकते त्या बद्दल आपण खाली माहिती बघणार आहोत.

CBC Report Sample

Erythrocyte Count:- मित्रांनो, सीबीसी रिपोर्ट मध्ये सर्वात पहिले erythrocyte म्हणजेच RBC (Red Blood Cells) काउन्ट बद्दल माहिती दिलेली असते. एका सामान्य माणसामध्ये याची नॉर्मल रेंज ही 4.2 -5.4 mill/ cu.mm एवढी असते. RBC ची संख्या वाढली तर polycythaemia [रक्तातील लालपेशींच्या संख्येमध्ये प्रमाणाबाहेर वाढ होणे आणि त्यामुळे रक्त घट्ट होऊन रक्तवाहिन्यांमधून प्रवास करण्याची सक्षमता कमी होणे] होण्याचा धोका असतो.



यामुळे डिहायड्रेशन देखील होऊ शकते. तसेच RBC ची संख्या जर कमी झाली तर ब्लड मधील हिमोग्लोबीन कमी होते व त्यामुळे anaemia [रक्तक्षय,अशक्तपणा] होण्याची भीती असते.

हिमोग्लोबिन/ Haemoglobin (Hb):- मित्रांनो, हिमोग्लोबिन ची सामान्य माणसामध्ये नॉर्मल रेंज ही 12 ते 16 gm/ dl इतकी असते. तसं पाहिलं तर स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये हिमोग्लोबिन चे प्रमाण वेगवेगळे असते. पुरुषांमध्ये हिमोग्लोबिन ची नॉर्मल रेंज ही 14 ते 18 gm/ dl इतकी असते.

तर स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिन ची नॉर्मल रेंज ही 12 ते 16 gm/ dl इतकी असते. तसेच याच्या कमतरतेमुळे anaemia व जास्त प्रमाण झाले तर polycythaemia होण्याचा संभव असतो.

PCV ( Packed Cell Volume):- मित्रांनो, (पीसिव्ही) PCV चे पूर्ण नाव packed cell volume असे आहे. त्याची स्त्रियांमध्ये नॉर्मल रेंज 38 ते 47% असते तर पुरुषांमध्ये नॉर्मल रेंज 40 ते 54 % इतकी असते. पीसिव्ही टेस्ट रक्तात लाल रक्तपेशी म्हणजेच RBC चे प्रमाण किती आहे ते बघण्यासाठी केली जाते. आणि हे प्रमाण टक्केवारीत मोजले जाते. ही टेस्ट ऍनिमिया, पॉलीसिथेमिया आणि डिहायड्रेशन यासह विविध वैद्यकीय स्थितींचे निदान करण्यासाठी उपयुक्त आहे.

अॅनिमियामध्ये, PCV रेंज जर सामान्यपेक्षा कमी असेल तर ऍनिमिया होऊ शकतो, तर पॉलीसिथेमियामध्ये, PCV रेंज सामान्यपेक्षा जास्त असेल तर पॉलिसीथेमिया होण्याची शक्यता असते.

MCV (Mean Corpuscular Volume):- मित्रांनो, एमसिव्ही ची नॉर्मल रेंज ही 80 ते 96 FL (Femto Letter) इतकी असते. या mcv टेस्ट द्वारे रक्तात असलेल्या RBC सेल्स चा आकार किती आहे ते समजू शकते. MCV वाढल्यास त्याला macrocyte असे म्हटले जाते. व MCV कमी झाल्यास त्याला microcyte असे म्हटले जाते.

MCH (Mean Corpuscular Haemoglobin) आणि MCHC (Mean Corpuscular Haemoglobin Concentration):- मित्रांनो, MCH ची नॉर्मल रेंज ही 27 ते 33 pg ( picograms) इतकी असते. तर MCHC ची नॉर्मल रेंज 31 ते 37 g/ dL इतकी असते. MCH टेस्ट द्वारे आपण हे समजू शकतो की प्रत्येक RBC वर किती टक्के हिमोग्लोबिन आहे. तसेच MCH वाढले तर RBC चा आकार देखील वाढतो.

इथे पण mch वाढले की त्याला macrocyte असे म्हणतात, आणि जर mch कमी झाले तर त्याला microcyte anaemia असे म्हणतात. थोडक्यात सांगायचे झाले तर, एमसीएच लेव्हल प्रत्येक RBC मधील हिमोग्लोबिन बद्दल माहिती देते, तर एमसीएचसी टेस्ट हे RBC च्या आकारमानावर आधारित त्या हिमोग्लोबिनचे सरासरी वजन किती आहे ते सांगण्यासाठी केली जाते. तसेच सतत अशक्तपणा किंवा थकवा जाणवत असल्यास डॉक्टर MCHC टेस्ट करण्यास सांगतात.

RDW (Red Blood Cell Distribution Wide):- RDW ची नॉर्मल रेंज ही 11 ते 14% इतकी असते. रेड ब्लड सेल डिस्ट्रीब्यूशन वाईड म्हणजे आरडीडब्ल्यू टेस्ट ने एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील रेड ब्लड सेल्स च्या शेप आणि साइज चे ऍनालिसिस करता येतो. या टेस्ट चे मेन ऑब्जेक्टिव हे ऍनीमिया चा डायग्नोसिस करणे हे आहे. तसेच या टेस्ट मध्ये रक्तातील सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान लाल रक्तपेशींची म्हणजेच RBC ची तुलना करता येते.

जर तुमचे RDW च्या रेंज पेक्षा जास्त असेल तर ते रेड ब्लड सेल्स च्या शेप आणि साईझ मध्ये भिन्नता आहे हे दर्शवते. ज्याचा परिणाम म्हणून तुमच्या शरीरात काही तरी अबनॉर्मलिटीझ आहेत हे दर्शविले जाते.

Total Leucocyte Count (WBC):- यालाच मराठीत पांढऱ्या पेशी असेही म्हणतात. WBC ची नॉर्मल रेंज ही 4.5 ते 11 thousand इतकी असते. WBC काउंट हे रक्तातील पांढऱ्या रक्त पेशींची संख्या मोजण्यासाठी केली जाणारी ब्लड टेस्ट आहे. WBC ला ल्युकोसाइट्स असे देखील म्हणतात. ते शरीराला संक्रमणाशी म्हणजे इन्फेक्शन विरोधी लढण्यास मदत करतात. wbc काउन्ट जर 4,500 पेशी कमी असेल तर त्याला leukopenia (ल्युकोपेनिया) असे म्हटले जाते.

आणि जर wbc वाढले तर त्याला (ल्युकोसायटोसिस) leucocytosis असे म्हटले जाते. आणि हि परिस्थिती शरीरात काही तरी इन्फेक्शन, किंवा ऍलर्जी वगैरे आहे हे दर्शवते. WBC ची संख्या कमी होणे किंवा वाढणे हे फक्त इन्फेकशन किंवा ऍलर्जी दर्शवत नाही तर एखाद्या मेडिसिन मुळे किंवा जर पेशंट ला कॅन्सर असेल आणि त्याची किमोथेरपी रेडिएशन थेरपी सुरु असेल तरीसुद्धा हा काउन्ट कमी किंवा जास्त होत असतो.

Neutrophils Count:- मित्रांनो, न्यूट्रोफील्स हे पांढऱ्या रक्त पेशींचाच एक प्रकार आहे. मानवी शरीरात आढळणाऱ्या सर्व पांढऱ्या रक्तपेशीं पैकी 50 ते 80 टक्के हे फक्त न्युट्रोफिल्स असतात. आणि त्याची नॉर्मल रेंज 2000 ते 7000 /c. mm इतकी असते. शरीरात जर कशाचे इन्फेक्शन झाले तर नयूट्रॉफील्स ची संख्या वाढते. आणि त्याला Neutrophilia असे म्हटले जाते. आणि जर त्यांची संख्या कमी झाली तर त्याला Neutropenia असे म्हटले जाते.

Lymphocyte Count:- मित्रांनो,लिम्फोसाइट हा पांढऱ्या रक्त पेशींचाच एक प्रकार आहे. लिम्फोसाइट ची नॉर्मल रेंज ही 1000 ते 3000 / c. mm इतकी असते. जर तुम्हाला शरीरात कोणत्याही प्रकारची सूज अली असेल तर अश्या परिस्थितीत लिम्फोसाइट ची संख्या वाढते. आणि लिम्फोसाइट च्या वाढण्याला Lymphocytosis असे म्हणतात. तर लिम्फोसाइट च्या कमी होण्याला Lymphocytopenia असे म्हणतात.

Monocyte Count:- मित्रांनो, मोनोसाइट ची नॉर्मल रेंज ही 200 ते 1000 / c. mm इतकी असते. जेव्हा शरीरात Autoimmune disease [शरीर स्वत:च्याच निरोगी पेशींवर अटॅक करते] होतात, तेव्हा मोनोसाइट चे प्रमाण वाढते. आणि मोनोसाइट च्या वाढण्याला Monocytosis आणि त्याच्या कमी होण्याला Monocytopenia असे म्हणतात. मोनोसाइट हे बोन मॅरो मध्ये तयार होतात.

Eosinophils:- मित्रांनो,हा सुद्धा पांढऱ्या रक्त पेशींचाच एक प्रकार आहे. इओसिनोफिल ची नॉर्मल रेंज ही 20 ते 500 / c. mm इतकी असते. जेव्हा तुमच्या शरीरात एखादी ऍलर्जी होते किंवा अस्थमा होतो तेव्हा इओसिनोफिल ची संख्या वाढते. आणि इओसिनोफिल च्या वाढण्याला eosinophilia तर त्याच्या प्रमाण कमी होण्याला eosinopenia असे म्हणतात. इओसिनोफिल्स हे शक्यतो पोट व आतड्यांच्या कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये आढळतात.

यांचे मुख्य कार्य शरीरात उपस्थित असलेल्या बॅक्टेरिया, व्हायरस आणि इन्फेक्शन शी लढा देणे आणि शरीराचे त्यांच्या प्रभावापासून संरक्षण करणे हे आहे.

CBC टेस्ट कोणती लक्षणे असतील तर करतात?

  • थकवा
  • अशक्तपणा असणे
  • ताप
  • अचानक वजन कमी होणे
  • रक्तातील लोहाची कमतरता
  • सतत रक्तस्त्राव
  • संसर्ग तपासण्यासाठी
  • रक्तातील ल्युकेमियाचे कारण शोधण्यासाठी
  • औषधे आणि उपचारांबद्दल जाणून घेण्यासाठी

CBC टेस्ट साठी खर्च किती आहे?

CBC टेस्ट ची किंमत साधारण 200 – 700 रुपय दरम्यान असते. पण, तुम्ही चाचणी कोणत्या शहरात आणि प्रयोगशाळेत करता त्यानुसार किंमत बदलते.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण CBC म्हणजेच Complete Blood Count रिपोर्ट मध्ये काय काय लिहिलेले असते आणि त्याच्या कमी जास्त प्रमाणामुळे कोणते आजार होऊ शकतात, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

Tags: CBC Test in Marathi, CBC Test Ka Keli Jate, CBC Test Mhanje Kay, CBC Test Mahiti, CBC test info in marathi, CBC test information in marathi, CBC report kasa vachaycah, How to read CBC report in marathi, Read CBC Report Marathi, CBC Report Marathi, CBC report info in Marathi, CBC Report Price, CBC Test price Marathi

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!