SBI Bank

SBI क्रेडिट कार्ड साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? | Apply SBI Credit Card Online

नमस्कार मित्रांनो आज आपण SBI क्रेडिट कार्ड साठी ऑनलाईन अप्लाय (अर्ज) कसे करायचे या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आत्ताच्या काळात तुमचा कितीही इन्कम असला तरी देखील महिन्याच्या शेवटी प्रत्येकाला च आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. मग अश्या वेळी आपल्या पर्सनल गरजा भागतील असा एखादा पर्याय आपल्या जवळ असावा असा विचार मनात येतो. मग मित्रांनो, तुमच्या या समस्ये वर एकमेव उपाय म्हणजे क्रेडिट कार्ड. त्यात ही जर ते SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला जास्त फायदा मिळू शकतो. आता तुम्ही म्हणाल क्रेडिट कार्ड कोणतेही घेतले तरी चालते, एसबीआय चेच कशाला हवे?



पण मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, जर तुम्हाला कोणतेही इन्कम प्रूफ न देता, कोणतेही एक्सट्रा चार्जेस न देता जर क्रेडिट कार्ड हवे असेल तर तुम्ही एसबीआय चे च क्रेडिट कार्ड घ्यावे. मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की एसबीआय ही एक विश्वसनीय व सुरक्षेच्या दृष्टीने एक चांगली बँक आहे. त्यामुळे एसबीआय चे क्रेडिट कार्ड घेणे तुमच्या साठी नेहमीच फायद्याचे ठरेल. हा पण एसबीआय चे क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोर किंवा क्रेडिट हिस्ट्री चांगली ठेवणे आवश्यक आहे. साधारणतः 750 पेक्षा जास्त स्कोर असेल तर तुमचे कार्ड चे अप्रुव्हल लवकर होईल. आणि लवकरात लवकर तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्ड मिळेल. चला तर मग SBI क्रेडिट कार्ड साठी ऑनलाईन अप्लाय कसे करायचे या बद्दल जाणून घेऊ या

SBI Credit Card Sathi Online Arj Kasa Karaycha

SBI क्रेडिट कार्ड साठी ऑनलाईन अप्लाय कसे करायचे?

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला sbicard.com या लिंक वर क्लिक करायचे आहे. व तुम्ही लगेच एसबीआय च्या अप्लाय पोर्टल वर जाल. या नंतर आता तुम्हाला Start Apply Journey या बटन वर क्लिक करायचे आहे.

SBI क्रेडिट कार्ड अप्लाय करण्यासाठी डायरेक्ट लिंक => www.sbicard.com/sprint

Apply SBI Credit Card Online Step 1

स्टेप 2: नंतर Personal Details या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Apply SBI Credit Card Online Step 2

स्टेप 3: आता तुम्हाला तुमचे नाव टाकायचे आहे त्यात पहिले First Name, Middle Name मग Last Name टाकायचे आहे. तसेच तुमचा मोबाईल नंबर टाकून दिलेल्या टर्म्स आणि कंडिशन्स ऍक्सेप्ट करून Continue बटन वर क्लिक करायचे आहे.



Apply SBI Credit Card Online Step 3

स्टेप 4: त्या नंतर नेक्स्ट पेज वर तुमच्या मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी टाकून व्हेरिफाय करायचा आहे व Confirm OTP बटन वर क्लिक करायचे आहे. आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमच्या सिटी चे नाव सिलेक्ट करून Confirm City बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 5: मित्रांनो, आता पुढे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर व जन्म तारीख टाकायची आहे. व नंतर Confirm बटन वर क्लिक करायचे आहे.

Apply SBI Credit Card Online Step 5

स्टेप 6: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला mothers name म्हणजेच तुमच्या आईचे नाव टाकायचे आहे व तुमचा ई-मेल आयडी टाकायचा आहे. खाली तुम्हाला रेफरल कोड विचारला जाईल तिथे काहीही टाकायचे नाही. व नंतर Continue to step 2 या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 7: आता तुम्हाला तुमचे Professional Details टाकायचे आहे. यात तुम्ही Salaried Person आहात की, Self Employed आहात की, Retired Person आहात ते सिलेक्ट करायचे आहे व Continue बटन वर क्लिक करायचे आहे. जर तुम्ही Salaried पर्सन असाल तर पुढे तुम्हाला तुमच्या कंपनी चे नाव वगैरे माहिती विचारली जाते. ती माहिती टाकून नंतर Continue बटन वर क्लिक करायचे आहे.

Apply SBI Credit Card Online Step 7

स्टेप 8: मित्रांनो, आता पुढे तुम्हाला DigiLocker द्वारे KYC व्हेरिफिकेशन करायचे आहे. त्यासाठी Continue to DigiLocker या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Apply SBI Credit Card Online Step 8

स्टेप 9: त्या नंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर व दिलेला कॅपचा टाकायचा आहे व नंतर Next बटन वर क्लिक करायचे आहे. नंतर आधार लिंक मोबाइल नंबर वर एक OTP येईल तो टाकून Continue बटन वर क्लिक करायचे आहे.

Apply SBI Credit Card Online Step 9

स्टेप 10: नंतर डिजिलॉकर चा सहा अंकी पिन टाकायचा आहे.

हे हि वाचा: डिजीलॉकर म्हणजे काय, अकाउंट कसे बनवायचे, डॉक्युमेंट ऍड कसे करायचे

Apply SBI Credit Card Online Step 10

स्टेप 11: मित्रांनो, आता तुम्हाला काही परमिशन्स द्यायच्या आहेत त्यासाठी allow बटन वर क्लिक करायचे आहे.

मित्रांनो, या नंतर पुढे तुम्हाला तुमचा अड्रेस आलेला दिसेल. तो अड्रेस बरोबर असेल तर त्याला सिलेक्ट करायचे आहे. तुम्हाला जर अड्रेस चेंज करायचा असेल तर खाली दिलेला ऑप्शन तुम्ही निवडू शकता. या नंतर Continue ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 12: मित्रांनो, नेक्स्ट पेज वर तुम्ही क्रेडिट कार्ड साठी एलिजीबल आहात का ते सांगितले जाते. तसेच तुम्हाला SBI चे कोणते क्रेडिट कार्ड भेटेल ते पण दाखवले जातील. जर तुम्ही एलिजीबल असाल तर खाली दिलेल्या Continue बटन वर क्लिक करायचे आहे.

Apply SBI Credit Card Online Step 12

स्टेप 13: आता तुम्हाला तुमचा एक सेल्फी काढून तो अपलोड करायचा आहे.

स्टेप 14: मित्रांनो, वाट तुम्हाला Bank Verification करायचे आहे. त्यासाठी एसबीआय तुमच्या बँक अकाउंट मध्ये 1 रुपया डिपॉझिट करून नंतर डेबिट करते. इथे तुम्हाला कोणतेही इन्कम प्रूफ द्यावे लागत नाही. त्या नंतर तुम्हाला Start with part 1 या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Apply SBI Credit Card Online Step 14

स्टेप 15: आता पुढे तुम्हाला बँकेचे नाव, अकाउंट नंबर, IFSC कोड टाकून continue बटन वर क्लिक करायचे आहे.

Apply SBI Credit Card Online Step 15

स्टेप 16: मित्रांनो आता तुमच्या बॅंकेत 1 रू टाकला (Credit) जाईल

Apply SBI Credit Card Online Step 16

स्टेप 17: व नंतर 1 रुपया डेबिट करतानातुम्ही नेट बँकिंग किंवा यूपीआई चा वापर करू शकता.

Apply SBI Credit Card Online Step 17

स्टेप 18: जर तुम्ही यूपीआई द्वारे पेमेंट करणार असाल तर तुमचा यूपीआई आईडी टाकून Make Payment ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. आता पेमेंट मेथड सिलेक्ट करून pay ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. व तुमचा पेमेंट सक्सेसफुली होऊन जाईल. त्या नंतर Continue बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 19: मित्रांनो, आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला क्रेडिट लिमिट किती मिळेल ते सांगितले जाईल. तसेच त्याची annual व renewal fee सुद्धा सांगितली जाते. त्या नंतर दिलेल्या टर्म्स आणि कंडिशन्स ऍक्सेप्ट करून Submit बटन वर क्लिक करायचे आहे.

Apply SBI Credit Card Online Step 19

स्टेप 20: आता तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवला जाईल तो व्हेरिफाय केल्यावर तुमचे एप्लिकेशन सबमिट होऊन जाईल. नंतर तुम्हाला Congratulations असा मेसेज येईल व तुम्हाला तुमचे व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड मिळून जाईल. या कार्ड चा नंबर, एक्सपायरी डेट वगैरे सर्व डिटेल्स ही तुम्हाला बघायला मिळतील.

Apply SBI Credit Card Online Step 20

स्टेप 21: मित्रांनो, आता तुम्हाला कार्ड ऍक्टिव्हेट करायचे आहे. त्यासाठी तुम्ही Domestic online transaction ऑन करू शकता किंवा जर तुम्हाला tap n pay ऑन करायचे असेल तर ते देखील ऑन करू शकता. नंतर continue करून Okay बटन वर क्लिक करायचे आहे.

मित्रांनो, नेक्स्ट पेज वर तुम्हाला सांगितले जाते की 7 वर्किंग डेज मध्ये तुमचे कार्ड तुमच्या अड्रेस वर मिळून जाईल. मित्रांनो, कोणतेही इन्कम परिफ न देता मिळणारे हे क्रेडिट कार्ड तुम्ही कोणतेही ट्रांझेक्शन करण्यासाठी वापरू शकता.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण SBI क्रेडिट कार्ड साठी ऑनलाईन अप्लाय कसे करायचे, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!