Government CardsHome Page 1Home Page 2Sidebar 1Voter ID

मोबाईल ॲप मधून मतदान कार्ड तयार करा (फक्त आधार कार्ड वापरून) | Apply New Voter ID Card on Voter Helpline App

भारत सरकारने जुलै १, २०१५ पासून डिजिटल अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत शासन सर्व प्रकारच्या शासकीय दाखले आणि सेवा डिजिटल पद्धतीने नागरिकांसाठी उपलब्ध करून देत आहे. यामध्ये भारत निवडणूक आयोगचे राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलचा आणि वोटर हेल्पलाइन अँपचा हि सहभाग आहे. या अँपद्वारे, तुम्ही मतदान ओळखपत्रांसाठी अर्ज करू शकता. आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला आधार कार्ड वापरून नवीन मतदान कार्ड “वोटर हेल्पलाइन अँप” (Voter Helpline app) च्या मदतीने कसे तयार करायचे याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे.

मतदान करण्यासाठी नागरिकाला मतदान ओळखपत्र आवश्यक असते. 18 वर्षे पूर्ण झालेले भारतातील सर्व नागरिक मतदान कार्डसाठी अर्ज करू शकतात. यासाठी भारत निवडणूक आयोगाने एक अँप (Voter Helpline) सुरू केले आहे. या अँपद्वारे, सर्व पात्र नागरिक मतदान कार्डसाठी अर्ज करू शकतात. ज्या लोकांनी अद्याप मतदान कार्डसाठी नोंदणी केलेली नाही ते सर्व लोक भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत अँपद्वारे मतदान कार्डसाठी अर्ज करू शकतात.



मतदान ओळखपत्रासाठी नोंदणी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुमच्यकडे फक्त आधार कार्ड असेल आणि तुमचे वर १८ वर्ष पूर्ण असेल तर तुम्ही वोटर हेल्पलाइन अँप वर जाऊन काही मिनिटात मतदान कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. यामुळे तुमचा बराच वेळ आणि पैसा वाचेल.

मतदान कार्डसाठी तयार करण्याची प्रक्रिया

Apply New Voter ID Card

स्टेप 1: सर्वात पहिले तुम्हला तुमच्या गूगल प्ले स्टोर मध्ये जाऊन Voter Helpline अँप इन्स्टॉल करायचे आहे.

Apply New Voter ID Card on Voter Helpline App Step 1

स्टेप 2: ऍप ओपन केल्या नंतर तुम्हाला ऍप चे इंटरफेस दिसेल. त्या नंतर पुढच्या पेज वर तुमचं अकाउंट तयार करायच आहे. जर आधीच तुमचं अकाउंट असेल तर फक्त मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करू शकता. पण जर तुम्ही या ऍप वर नवीन असाल तर तुम्हाला तुमचे नवीन अकाउंट तयार करावे लागेल. त्यासाठी दिलेल्या New User या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Apply New Voter ID Card on Voter Helpline App Step 2

स्टेप 3: त्या नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून Send OTP या बटन वर क्लिक करायचे आहे. तो आलेला ओटीपी पुढे तुम्हाला लागणार आहे.



Apply New Voter ID Card on Voter Helpline App Step 3

स्टेप 4: आता पुढे तुम्हाला तुमचे नाव टाकायचे आहे. ज्यात पहिले तुमचं पहिले नाव व नंतर आडनाव टाकायचं आहे. आणि नंतर पासवर्ड तयार करून टाकायचा आहे व आधी आलेला ओटीपी इथे टाकायचा आहे, व Submit बटन वर क्लिक करायचे आहे.

Apply New Voter ID Card on Voter Helpline App Step 4

स्टेप 5: त्या नंतर तुम्हाला User created successfully असा मेसेज येईल, म्हणजेच तुमचं अकाउंट तयार झाले आहे. त्या नंतर तिथे Ok करायचं आहे.

Apply New Voter ID Card on Voter Helpline App Step 5

स्टेप 6: मित्रांनो, आता परत मागे येऊन लॉगिन करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर व पासवर्ड टाकायचा आहे आणि Send OTP बटनावर क्लीक करायचे आहे. त्या नंतर आलेला ओटीपी दिलेल्या ठिकाणी टाकून शेवटी Login Now या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. व तुमचे लॉगिन सक्सेसफुली होऊन जाईल.

Apply New Voter ID Card on Voter Helpline App Step 6

स्टेप 7: आता या नंतर नेक्स्ट पेज वर तुम्हाला काही ऑप्शन दिसतील त्यातील Voter Registration या पहिल्या ऑप्शन वर क्लीक करायचे आहे.

Apply New Voter ID Card on Voter Helpline App Step 7

स्टेप 8: त्या नंतर पुढे New Voter Registration फॉर्म 6 या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे आणि थोडं खाली स्क्रोल करून Lets start बटन वर क्लिक करायचे आहे.

Apply New Voter ID Card on Voter Helpline App Step 8

स्टेप 9: त्या नंतर Yes, I am applying for the voter ID first time? असं विचारले जाईल, तर इथे ऑप्शन वर क्लिक करायच आहे व Next बटन वर क्लिक करायचे आहे.

Apply New Voter ID Card on Voter Helpline App Step 9

स्टेप 10: आता तुमच्या समोर फॉर्म ओपन होईल. हा फॉर्म आता भरायचा आहे. त्यात सर्वात पहिले तुमचे स्टेट सिलेक्ट/राज्य टाकायचं आहे. त्या नंतर District ( जिल्हा) चे नाव टाकायचं आहे. त्या नंतर तुमची Assembly (मतदार संघ) कोणता आहे ते टाकायचं आहे.

व नंतर आधार कार्ड नुसार तुमची जन्म तारीख टाकायची आहे. आणि नंतर जन्म तारीख असलेले एक डॉक्युमेंट द्यायचं आहे. त्यासाठी तुम्ही तुमचा जन्माचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, दहावी/ बारावी चे मार्कशीट, ड्रायव्हिंग लायसन्स, किंवा इंडियन पासपोर्ट यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट जन्म तारीख चा पुरावा म्हणून देऊ शकता.

पण नोंद घ्या कि तुम्हाला हे डाक्यमेन्ट सेल्फ अटेस्टिड (Self Attested) करायचे आहे, म्हणजेच जे डाक्यमेन्ट तुम्ही अपलोड करणार आहेत ते आधी झेरॉक्स/कलर प्रिंट काढून तुमची त्यावर तुमची सही करायची आहे, आणि नंतर ते डाक्यमेन्ट स्कॅन/मोबाइल वर फोटो काढून अपलोड करायचे आहे.

Apply New Voter ID Card on Voter Helpline App Step 10

स्टेप 11: इथे जर तुम्ही आधार कार्ड सिलेक्ट करणार असाल तर तुम्हाला आधार कार्ड इथे अपलोड करायचं आहे. अशी सर्व माहिती भरून झाल्यावर Next बटन वर क्लिक करायचे आहे.

Apply New Voter ID Card on Voter Helpline App Step 11

स्टेप 12: आता या नंतर तुम्हाला upload picture मध्ये तुमचा पासपोर्ट साईझ फोटो अपलोड करायचा आहे.

Apply New Voter ID Card on Voter Helpline App Step 12

स्टेप 13: त्या नंतर तुमचं जेंडर सिलेक्ट करा, त्या नंतर तुमचं नाव टाकायचं आहे. इथे नाव टाकताना इंग्रजी मध्ये तुमचं नाव टाकून स्पेस द्यायची आहे मग वडिलांचे नाव टाकायचं आहे. त्या नंतर तेच नाव मराठीत टाकायचं आहे. त्या नंतर तुमचं आडनाव सुद्धा आधी इंग्रजी मध्ये व मग मराठीत टाकायचं आहे.

Apply New Voter ID Card on Voter Helpline App Step 13

स्टेप 14: आता पुढे Aadhar details मध्ये तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्या नंतर फॉर्म भरणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. तसेच तुमचा ई-मेल आयडी असेल तर तो टाकायचा आहे. त्या नंतर फॉर्म भरणाऱ्या व्यक्तीला काही disability म्हणजेच अपंगत्व असेल तर ते सिलेक्ट करायचं आहे.

स्टेप 15: आता या नंतर खाली Relation Type मध्ये तुम्हाला कोणाचं नाव लावायचं आहे, ते सिलेक्ट करायचे आहे. जसे की आई, वडील, बायको किंवा दुसऱ्या कोणत्या पॅरेंट्सचे नाव लावायचे आहे, ते सिलेक्ट करून घ्यायचे आहे.

Apply New Voter ID Card on Voter Helpline App Step 15

स्टेप 16: त्या नंतर Name of relative मध्ये तुम्ही वरती जर वडील सिलेक्ट केलं असेल तर तुमच्या वडिलांचे नाव आधी इंग्रजी व नंतर मराठीत टाकायचं आहे. व नंतर आडनाव पण टाकायचं आहे. व नंतर Next बटन वर क्लिक करायचं आहे.

स्टेप 17: मित्रांनो, आता पुढे तुम्हाला तुमचा पूर्ण पत्ता टाकायचा आहे. त्यात बिल्डिंग किंवा घराचा नंबर, नाव, एरिया, जवळचे लँडमार्क , तालुका, तहसील वगैरे टाका. हा सर्व पत्ता टाकताना आधी इंग्रजी मध्ये व नंतर मराठीत टाकायचा आहे. नंतर पिन कोड टाकायचा आहे. त्या नंतर अड्रेस प्रूफ टाकायचं आहे. पुरावा म्हणून तुम्ही लाईट बिल, पाणी बिल, गॅस कनेक्शन बुक, आधार कार्ड, वगैरे पैकी कोणतेही एक प्रूफ इथे सिलेक्ट करून ते अपलोड करायचे आहे.

Apply New Voter ID Card on Voter Helpline App Step 17

स्टेप 18: या नंतर तुम्हाला Details of my family member already included in the electoral roll at current address with whom I currently reside म्हणजे जर तुमच्या घरातील कोणत्याही एका व्यक्तीच मतदान कार्ड असेल तर त्या व्यक्तीच नाव सिलेक्ट करायचे आहे. ती व्यक्ती कोणीही असू शकते जसे की, आई, वडील, बायको, व इतर आणि जर कोणाचेही मतदान कार्ड नसेल तर हा ऑप्शन सोडून द्यायचा आहे.

स्टेप 19: आता या नंतर ज्या व्यक्तीला तुम्ही सिलेक्ट केलं आहे त्याची माहिती खाली भरायची आहे. त्यात पहिले त्या व्यक्तीच नाव आणि त्या व्यक्तीचा EPIC number म्हणजेच मतदान कार्ड नंबर टाकायचा आहे.

Apply New Voter ID Card on Voter Helpline App Step 18

स्टेप 20: आता शेवटच्या स्टेप मध्ये तुमचं स्टेट (राज्य) ,डिस्ट्रिक्ट ( जिल्हा), व्हिलेज (गावाचं नाव) सिलेक्ट करायचं आहे. त्या नंतर ज्या अड्रेस वर तुम्ही आत्ता राहत आहात, त्या अड्रेस वर किती वर्षांपासून राहत आहात ती तारीख टाकायची आहे.

स्टेप 21: आता या नंतर खाली Name of applicant मध्ये तुमचं नाव आणि place of application मध्ये तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे आणि शेवटी Done ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.

Apply New Voter ID Card on Voter Helpline App Step 21

स्टेप 22: मित्रांनो, या नंतर तुम्ही भरलेला फॉर्म पुढच्या पेज वर ओपन होईल. हा फॉर्म एकदा चेक करून घ्यायचा आहे. जर फॉर्म मध्ये काही चूक आढळल्यास तुम्ही परत ते एडिट करू शकता. त्यासाठी उजव्या कोपऱ्यात दिलेले ‘चुकीचे’ चिन्ह दाबा. पण लक्षात ठेवा मित्रांनो, फक्त एकदाच तुम्ही हा फॉर्म एडिट करू शकता. मित्रांनो, जर तुम्ही भरलेला फॉर्म बरोबर असेल तर खाली दिलेल्या Confirm बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 23: या नंतर तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल, आणि तसा तुम्हाला मेसेज पण दाखवला जाईल. तसेच इथे तुम्हाला एक रेफरन्स आयडी दिला जाईल, तो सेव्ह करून ठेवायचा आहे. याचा उपयोग तुम्हाला स्टेटस चेक करण्यासाठी आणि कार्ड जनरेट झाले आहे की नाही ते चेक करण्यासाठी होणार आहे.

Apply New Voter ID Card on Voter Helpline App Step 23

आता स्टेटस कसे चेक करायचे ते जाणून घेऊ या

स्टेप 1: मित्रांनो, तुमचं स्टेटस चेक करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला ऍप च्या होम पेज वर यायचं आहे. इथे Voter registration या पहिल्या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Track New Voter ID Status on Voter Helpline App Step 1

स्टेप 2: या नंतर वरती तुम्हाला track status of your form असा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लीक करायचे आहे.

Track New Voter ID Status on Voter Helpline App Step 2

स्टेप 3: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमचा रेफरन्स आयडी टाकायचा आहे आणि मग तुमचे राज्य म्हणजेच महाराष्ट्र सिलेक्ट करायचे आहे व Tract Status बटन वर क्लिक करायचे आहे.

Track New Voter ID Status on Voter Helpline App Step 3

स्टेप 4: त्या नंतर तुम्हाला तुमच्या फॉर्म चे स्टेटस दाखवलं जाईल. तुमचा फॉर्म व कागदपत्रे पूर्णपणे पडताळून झाल्यावर ते ऍक्सेप्ट होईल पण जर काही चुकले असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट देखील होऊ शकतो. मित्रांनो, तुमचा फॉर्म बरोबर असला की पडताळणी नंतर सर्व ऑप्शन तुम्हाला ग्रीन झालेले दिसतील आणि नंतर तुमचे मतदान कार्ड तयार होईल. हे मतदान कार्ड तुम्ही नंतर डाउनलोड देखील करून घेऊ शकता. त्यासाठी ऍप च्या होम पेज वर Download epic या ऑप्शन वर क्लिक करून नंतर तुमचा रेफरन्स आयडी किंवा epic नंबर टाकून तुमचं मतदान कार्ड तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण मोबाईल ऍप वरून मतदान कार्ड कसे काढायचे, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा.
धन्यवादl

अशा पद्धतीने तुम्ही नवीन Voter ID साठी ऑनलाइन अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर साधारण १५ ते ३० दिवसामध्ये कागदपत्रे तपासणी होईल आणि मतदान कार्ड तयार झाल्याचा मेसेज तुम्हाला मोबाइल वर येईल, तुम्ही त्याच डॅशबोर्ड वर कार्ड तयार झाल्यानंतर त्याची डिजिटल कॉपी डाउनलोड करू शकता. आणि ऑफलाईन कार्ड साधारण ३ ते ६ महिन्यात तुमच्या पत्यावर पोस्टाने पाठवले जाईल

तुम्हाला आम्ही दिलेली माहिती उपयोगी वाटत असेल तर, अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा => मराठी डायरी (marathidiary.com)

Tags: new voter card apply maharashtra 2024, matdan card online maharashtra, voter card apply maharashtra, voter card Marathi, voter card registration, new voter application form, voter card new form online, voter card apply online Marathi, new voter card apply online, matadan card maharashtra, matadan card in Marathi, new voter portal beta, nvsp, digital new pvc card, voter id card apply online, Voter id card apply maharashtra, voter card new portal 2024, voter card apply 2024

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!