APAAR कार्ड सविस्तर माहिती: कसे तयार करायचे, नोंदणी, फायदे | APAAR Card Marathi
नमस्कार मित्रांनो, आमच्या आज च्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्या साठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आज आपण वन नेशन वन आयडी कार्ड म्हणजेच अपार (APAAR) आयडी कार्ड बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
विद्यार्थी मित्रांनो, एक विद्यार्थी म्हणून कधी कधी एखाद्या महत्वाच्या ठिकाणी आपल्याला आपले एखादे मार्कशीट किंवा एखादे शैक्षणिक प्रमाणपत्र ची गरज पडते. पण प्रत्येक वेळी ते आपल्याजवळ असेलच असे नाही. बहुतेक वेळा तर अनेक जणांकडून शैक्षणिक मार्कशीट किंवा एखादे महत्वाचे डॉक्युमेंट हरवते किंवा चोरी होते किंवा खराब होते. मग तेच डॉक्युमेंट परत मिळवण्यासाठी अर्ज वगैरे करावे लागतात. तसेच बोर्ड च्या व शाळेच्या चकरा माराव्या लागतात. बरं एवढं करूनही ते डॉक्युमेंट कधी भेटेल हे माहीत नसते.
पण विद्यार्थी मित्रांनो, तुमची हीच काळजी आता सरकार संपवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यासाठी सरकारने विद्यार्थी वन नेशन वन आयडी कार्ड म्हणजेच APAAR (अपार ) ही संकल्पना सुरू केली आहे. या आयडी कार्ड मध्ये विद्यार्थ्याशी संबंधित सर्व डेटा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. म्हणजे विद्यार्थ्याचे नाव, ब्लड ग्रुप, पालकांचे नाव, शैक्षणिक मार्कशीट स्पोर्ट्स सर्टिफिकेट, शिष्यवृत्ती, वगैरे माहिती या आयडी कार्ड मध्ये उपलब्ध असेल. याच अपार आयडी कार्ड बद्दल संपूर्ण माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत, पण त्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
अपार (APAAR) कार्ड म्हणजे काय?
मित्रांनो, ज्याप्रमाणे देशात ‘वन नेशन वन रेशन’ ही योजना राबवण्यात येत आहे, त्याच प्रमाणे आता विद्यार्थ्यांसाठी ‘वन नेशन वन आयडी’ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी हे कार्ड फार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मित्रांनो, (अपार) APAAR म्हणजे Automated Permanent Academic Account Registry. यामध्ये आधार कार्ड प्रमाणे विद्यार्थ्यांना एक युनिक कोड नंबर दिला जाईल. त्यात त्या विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती असेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची म्हणजेच NEP ची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने अपार हे भारत सरकार द्वारे उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. या संदर्भात, अनेक राज्य सरकारांनी शाळांना विद्यार्थ्यांच्या पालकां कडून हा अपार आयडी तयार करण्यासाठी परवानगी घेण्याची विनंती करण्यात आली आहे.
APAAR आयडी ही देशातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक विशेष ओळख प्रणाली असेल. त्यामध्ये विद्यार्थ्याचा संपूर्ण डेटा म्हणजेच विद्यार्थ्याच्या लहानपणापासूनच्या शैक्षणिक वाटचालीच्या नोंदी केल्या जातील. यामध्ये आधार कार्ड प्रमाणे विद्यार्थ्यांना एक युनिक कोड नंबर दिला जाईल. त्यात त्या विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती असेल. तसेच विद्यार्थ्याची पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतची संपूर्ण शैक्षणिक नोंद या आयडी कार्ड मध्ये केली जाणार आहे. तसेच APAAR द्वारे एक ACE डिजिटल प्रणाली देखील तयार केली जाईल. त्यामध्ये विद्यार्थी त्यांचे शैक्षणिक डॉक्युमेंट आणि निकाल, रिपोर्ट कार्ड इत्यादींसारखी महत्त्वपूर्ण माहिती सेव्ह करून ठेवू शकतील.
तसेच ऑलिम्पियाड पासून ते कोणत्याही स्पेशल ट्रेनिंग पर्यंत किंवा विद्यार्थ्याने केलेली इतर कोणतीही ऍक्टिव्हिटी, हा सगळा डेटा अपार द्वारे कळू शकतो. त्याच्या मदतीने, जरी विद्यार्थ्याला शाळा किंवा कॉलेज बदलावे लागले तरीही या आयडी कार्ड द्वारे सर्वकाही सहज करता येईल आणि महत्वाचे म्हणजे देशाच्या इतर राज्यातही हा आयडी काम करेल.
APAAR आयडी कार्डचा उद्देश काय आहे?
मित्रांनो, केंद्र सरकारकडून अपार (APAAR) आयडी कार्ड बनवण्याचा उद्देश हा आहे की देशातील सर्व शालेय विद्यार्थ्यांचा डेटा एकाच कार्ड मध्ये आणणे. वन नेशन वन स्टुडंट आयडीच्या माध्यमातून सरकार त्यांच्या भविष्याची योजना करू शकते. तसेच या कार्डची विशेष बाब म्हणजे हे कार्ड एकदा बनवल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याची शाळा बदलली तरी त्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
तर तुम्हाला देशातील कोणत्याही राज्यात किंवा कोणत्याही जिल्ह्यातील शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर फक्त अपार क्रमांक टाकला की म्हणजे त्या विद्यार्थ्याचा संपूर्ण डेटा दिसेल. तसेच आधार आणि अपार कार्ड हे संलग्न असतील म्हणजेच ते एकमेकांशी लिंक असतील. व या कार्ड मधील माहिती आपोआप अपडेट होत राहील.
कोणत्या कामासाठी अपार आयडी कार्ड उपयोगी ठरेल?
मित्रांनो, अपार आयडी कार्ड मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरुपात जतन करण्यात येईल. हे कार्ड म्हणजे त्यांचे एकप्रकारे शैक्षणिक माहितीपत्रच असेल. विद्यार्थ्याने कोणत्या इयत्ते पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्याला कोणती बक्षिसं मिळाली, कोणती प्रमाणपत्र मिळाली. त्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि क्रीडा गुणवत्ता याचा आलेख म्हणजे हे कार्ड असेल. तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल तर त्याची माहिती देखील यात देण्यात येईल.
आणि जरी शाळा बदलली तरी ही माहिती जतन असेल. यासोबतच विद्यार्थ्यांच्या समस्या कमी करून त्यांना कागदपत्रांच्या प्रती सोबत ठेवण्याच्या गैरसोयीपासून वाचवता येईल. यामुळे सरकारला डेटा गोळा करणेही सोपे होईल. म्हणजेच सरकारला देशातील साक्षरता दर आणि गळतीचे प्रमाण देखील कळेल. कोणत्या ठिकाणी किती जणांनी आपला अभ्यास सोडला हे देखील कळेल. परिणामी यामुळे प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत मुलाच्या शिक्षणाच्या प्रगतीचा मागोवा घेणे सोपे होईल. तसेच यामुळे शाळा बदलताना सर्व कागदपत्रे सोबत ठेवण्याची गरज भासणार नाही.
अपार आयडी कार्ड च्या मदतीने तुम्ही डिजीलॉकर प्रमाणे एकाच ठिकाणी कागदपत्रे डिजिटल ठेवू शकाल. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची हार्डकॉपी सोबत ठेवण्याची गरज नाही.
अपार कार्ड तयार कसे करायचे?
विद्यार्थी मित्रांनो, अपार आयडी कार्ड तयार करण्यासाठी विद्यार्थ्या कडे त्याचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच ‘डिजिलॉकर’ वर त्याचे खाते असणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्याचे केवायसी पूर्ण होईल. अपार कार्ड संबंधित शाळा, महाविद्यालये नोंदणी करुन देतील. तसेच त्यासाठी विद्यार्थ्याच्या आई- वडिलांची सहमती घेण्यात येईल.
अपार कार्ड प्रणाली किती सुरक्षित आहे?
मित्रांनो, अपार बद्दल सरकारने आश्वासन दिले आहे की विद्यार्थ्याचा आयडी गोपनीय राहील आणि तो फक्त सरकारी एजन्सी सोबत शेअर केला जाईल. जिथे गरज असेल फक्त तिथेच त्याचा उपयोग होईल. मात्र, यासाठी पालकांनी संमती दिली तरच त्या विद्यार्थ्याचा अपार आयडी क्रमांक दिला जाईल. तसेच, पालक कधीही ही संमती मागे घेऊ शकतात. संमतीनंतर, विद्यार्थ्यांची माहिती केंद्रीय एकात्मिक जिल्हा आणि माहिती प्रणाली एज्युकेशन प्लस पोर्टलवर अपलोड करण्याची जबाबदारी शाळेची असेल, असे सांगण्यात आले आहे.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण अपार आयडी कार्ड बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.
Tags: apaar card, apaar card info, apaar card kaise banaye, apaar card fayde, apaar card nuksan, apaar card online, apaar card create, apply new apaar card, apaar card kab chalu hoga, apaar card kis ke liye he, apaar card jankari, Student Card info, new student card