बेस्ट All-in-One कलर प्रिंटर | Best All in One Printer in India 2022
नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात आपण प्रिंटर्स (Printers) बद्दल जाणून घेणार आहोत. तसेच भारतातील सर्वात चांगले प्रिंटर्स कोण कोणते आहेत ते सुद्धा जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, प्रिंटर म्हणजे एक असे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे संगणक मधील एखादा मजकूर, एखादी इमेज किंवा एखादी फाइल ऍक्सेप्ट करून त्या माहितीला कागदा वर स्थानांतरित करते. प्रिंटर हे संगणकाशी डायरेक्ट जोडले जाऊ शकते किंवा नेटवर्क द्वारे सुद्धा कनेक्ट केले जाऊ शकते. प्रिंटर चे खूप प्रकार आहेत. त्यात प्रामुख्याने 3D प्रिंटर, इंकजेट प्रिंटर, थर्मल प्रिंटर, लेझर प्रिंटर यांचा समावेश होतो. तसेच शाळेपासून ते फ्लाइट तिकीट पर्यंत सगळ्याच ठिकाणी प्रिंटर चे खूप महत्व आहे.
या प्रिंटरमुळे बरीचशी कामे सोपी आणि लवकर होतात. शिवाय मनुष्यबळ पण कमी लागते. मित्रांनो, एखाद्या वेगळ्या प्रकारचा डेटा प्रिंट करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे किंवा वेगळ्या पद्धतीचे प्रिंटर वापरावे लागते. आज भारतातील बाजार पेठेत सर्व प्रकारचे प्रिंटर विकणाऱ्या कंपन्या आहेत. पण तुमच्यासाठी कोणता प्रिंटर योग्य आहेत ते शोधणे थोडे अवघड काम आहे. म्हणून च त्यासाठी आम्ही आज हा लेख तुमच्या साठी घेऊन आलो आहोत. आज आपण या लेखामध्ये भारतातील सर्वात चांगले प्रिंटर कोणते आहेत त्याबद्दल माहिती बघणार आहोत.
भारतातील सर्वात चांगले All-in-One प्रिंटर्स
एच पी 319 प्रिंटर (HP Ink Tank 319 Colour Printer)
मित्रांनो, हा प्रिंटर घरी वापरण्यासाठी किंवा जर तुमचं छोटं ऑफिस किंवा शॉप असेल आणि तुम्ही रोज 300 ते 500 पेज प्रिंट करत असाल तर हे प्रिंटर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. या प्रिंटर ची बिल्ड क्वालिटी आणि प्रिंट करण्याची क्वालिटी खूप चांगली आहे. या प्रिंटरची ऑनलाइन किंमत ही 11,000 ते 12,000 पर्यंत असू शकते. या प्रिंटर सोबत तुम्हाला दोन इंक बोटल्स पण मिळतात. ज्यांची सेपरेट बाहेर बाजारात किंमत 1100 रुपये आहे.
हा प्रिंटर वजनाने हलका व आकाराने लहान असल्याने तो हाताळण्यास अगदी सोपा आहे. तसेच त्याला इन्स्टॉल करणे हे खूप सोपे आहे. यात स्कॅन करणे आणि प्रिंट करणे सुद्धा खूप सोपे आहे. या प्रिंटर चा स्कॅनिंग स्पीड पण चांगला आहे. तसेच या प्रोडक्ट वर तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी मिळते.
इपसोन एल 3210 प्रिंटर (Epson EcoTank L3210 Tank Printer)
मित्रांनो, हा प्रिंटर सुद्धा घरात तसेच ऑफिस किंवा शॉप मध्ये वापरला जाऊ शकतो. जर तुम्ही एक महिन्यात 500 पेजेस पेक्षा जास्त प्रिंट करणार असाल तर हा प्रिंटर तुमच्यासाठी योग्य आहे. या प्रिंटर ची प्रिंटिंग स्पीड खूप जास्त आहे. कुठल्या ही साईझ च्या पेपर वर हा प्रिंटर माहिती प्रिंट करू शकतो. या प्रिंटर चा प्रिंटिंग चा खर्च ही खूप कमी आहे. यात प्रिंट चे रिझोल्युशन पण चांगले आहे. या प्रिंटरची ऑनलाइन किंमत ही 12 ते 13 हजार रुपये पर्यंत असू शकते. या प्रिंटर मध्ये तुम्ही प्रिंट, स्कॅन आणि कॉपी पण करू शकता. हा प्रिंटर एक मिनिटात ब्लॅक अँड व्हाईट चे 26 पेजेस तर कलर प्रिंट चे 15 पेजेस प्रिंट करू शकतो. याच प्रिंटिंग रिझोल्युशन पण खूप चांगला आहे.
कॅनॉन पिक्समा जि 3020 प्रिंटर (Canon PIXMA G3020 Colour Printer)
मित्रांनो, तुम्हाला जर एखादा चांगल्या क्वालिटी चा प्रिंटर घ्यायचा असेल तर तुम्ही कॅनॉनचा हा प्रिंटर घेऊ शकता. तसेच जर तुम्हाला CSC सेन्टर खोलायच असेल तर हा प्रिंटर तुम्ही घ्यायला हवा. या प्रिंटरची प्रिंट क्वालिटी खूप चांगली आहे. तसेच जर तुमचे स्कॅनिंग चे काम जास्त असेल तरीही तुम्ही हा प्रिंटर घेऊ शकता. याशिवाय जर तुम्ही फोटो प्रिंट जास्त काढणार असाल तरी सुद्धा हे प्रिंटर बेस्ट राहील. या प्रिंटरची प्रिंट पण हाय रिझोल्युशन ची असते. त्यामुळे हा एक बेस्ट प्रिंटर आहे. फक्त याची इंक थोडी महाग असते. आणि याची after sale service एवढी चांगली नाही.
या प्रिंटरची किंमत ही अंदाजे 16,000 रुपये पर्यंत असू शकते. या प्रिंटरमध्ये ही आपण प्रिंट, स्कॅन, आणि कॉपी करू शकतो. या प्रिंटरमध्ये तुम्हाला वायफाय काँनेक्टिव्हिटी ही मिळते. फक्त जर कधी हे प्रिंटर खराब झाले तर रिपेअर करण्यासाठी तुम्ही फक्त सर्विस सेन्टर मध्येच जाऊ शकता. तसेच याचे स्पेअर पार्टस पण लवकर मिळत नाहीत.
इपसोन एल 3250 प्रिंटर (Epson EcoTank L3250 Tank Printer)
मित्रांनो, या प्रिंटर चे स्पेअर पार्ट बाजारात सहज मिळतात. त्यामुळे कधी प्रिंटर खराब झाला तर टेन्शन नसते. हा प्रिंटर सध्या बाजारात खूप प्रसिद्ध आहे. या प्रिंटरचा प्रिंट करण्याचा स्पीड खूप जास्त आहे. याचे फ़ंक्शन्स पण चांगले आहेत. हा एक wifi प्रिंटर आहे, जो तुम्ही घरी, ऑफिस किंवा इतर कोणत्याही ठिकाणी वापरू शकता. या प्रिंटर चा प्रिंटिंग रिझोल्युशन पण खूप चांगला आहे. या प्रिंटरमध्ये तुम्ही एका मिनिटात 32 पाने प्रिंट करू शकता.
इपसोन एल 4260 प्रिंटर (Epson EcoTank L4260 Tank Printer)
मित्रांनो, हे प्रिंटर ऑटोमॅटिक डुप्लेक्स प्रिंटिंगसाठी उत्तम आहे. या प्रिंटरमध्ये तुम्हाला एक डिस्प्ले दिला आहे. ज्याद्वारे तुम्ही एखादी इमेज कमी जास्त करू शकता. या प्रिंटरमध्ये हिट फ्री टेक्नॉलॉजी असल्यामूळे याला वीज कमी लागते. यामध्ये तुम्ही पेजच्या दोन्ही बाजूला प्रिंट करू शकता. तसेच याची प्रिंटिंग स्पीड पण खूप चांगली आहे. हा प्रिंटर सगळ्या डेव्हीसेस सोबत कनेक्ट होऊ शकतो. या सर्व फीचर्स मुळे हा प्रिंटर खरेदी करण्यासाठी खूप चांगला व उत्तम आहे.
प्रिंटर खरेदी करताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या?
- तुम्ही जो प्रिंटर खरेदी करणार असाल त्याची प्रिंटिंग हाय क्वालिटी ची असावी.
- तुमच्या आवश्यकता नुसार प्रिंटर खरेदी करावे. प्रिंटरचे बरेच प्रकार असतात सिंगल फंगक्शनल, मल्टि फंगक्शनल, आणि ऑल इन वन. तुम्ही जर घरात वापरण्यासाठी प्रिंटर घेणार असाल तर तुमच्यासाठी मल्टि फंकशनल प्रिंटर योग्य राहील.
- प्रिंटिंग स्पीड पण खूप महत्वाचा असतो. त्यामुळे तुमच्या गरजे नुसार तसेच तुम्ही काय प्रिंट करणार आहात त्यावरून कमी किंवा जास्त स्पीड असलेला प्रिंटर खरेदी करावा.
- तसेच तुमच्या बजेटचा पण विचार करणे खूप आवश्यक आहे.
- प्रिंटचे रिझोल्युशन पण चांगले असायला हवे. ते सुद्धा बघणे खूप आवश्यक आहे.
- असा प्रिंटर निवडावा जो प्रत्येक पेज वर म्हणजे A4, A5, AT ,B5 C6 पेज वर प्रिंट देऊ शकेल.
- तसेच जर तुम्हाला वायफाय कनेक्टिव्हिटी हवी असेल तर तुम्हाला तसाच प्रिंटर निवडायला हवा.
- तसेच तुम्ही जो प्रिंटर खरेदी करणार आहात त्याची आफ्टर सेल सर्विस कशी आहे ते एकदा जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्हाला नंतर प्रिंटर खराब झाला तर रिपेअरिंगसाठी जास्त त्रास होणार नाही.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण प्रिंटर्स बद्दल बरीच शी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच तुमच्यासाठी भारतातील चांगल्या प्रिंटर बद्दल पण माहिती दिली आहे. अशा करतो की तुम्हाला या माहिती चा नक्की च फायदा होईल. तसेच हा लेख आवडला असल्यास तुमच्या मित्र मंडळी सोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद.