AirtelMobile Help

Airtel नेट डेटा, एसएमएस, टॉकटाइम बॅलन्स कसा चेक करायचा ?

आजकाल एअरटेल आणि जीवो चे सिम वापरण्याची संख्या झपाट्याने वाढत आहे, अशा वेळी नेट डेटा, एसएमएस, टॉकटाइम बॅलन्स तपासणे गरजेचे असते त्यामुळे या ब्लॉग मध्ये आपण एअरटेल नेट डेटा, एसएमएस, टॉकटाइम बॅलन्स कसा तपासायचा ते बघुयात.

Airtel नेट डेटा, एसएमएस, टॉकटाइम बॅलन्स कसा  चेक करायचा ?

USSD कोड द्वारे Airtel नेट बॅलेन्स कसा तपासावा?

यूएसएसडी कोड प्रत्यक्षात बर्‍याच गोष्टींसाठी वापरल्या जातात, परंतु डेटा, एसएमएस, टॉकटाइम बॅलन्स चेकसाठी सामान्य वापर केला जातो.



सर्वात प्रथम आपण आपल्या फोनवर डायलर (कॉल लावताना वापर करता ते अँप) उघडा, खालील कोड टाइप करा आणि कॉल बटण दाबा.

  • *123*10# – हा कोड एअरटेल 3G आणि एअरटेल 4G ग्राहकांना त्यांच्या फोनवर किती डेटा बॅलन्स उपलब्ध आहे हे तपासण्यासाठी वापरला जातो (फक्त एअरटेल प्रीपेड ग्राहकांसाठी)
  • *123# – हा कोड आपल्या एअरटेल मोबाइल नंबरची वैधता तपासण्यासाठी आणि पुढील रिचार्जची तारीख कधी आहे ते सांगतो
  • *121# – हा कोड एअरटेल 3G आणि एअरटेल 4G ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्सची माहिती देतो
  • *141# – आपला बॅलन्स संपल्यावर लोन घेण्यासाठी या कोड चा वापर करा
  • *123*9# – हा कोड एअरटेल 2G इंटरनेट बॅलन्ससाठी

Airtel टोल-फ्री ग्राहक सेवाद्वारे शिल्लक डेटा कसा तपासावा ?

आपण एअरटेल टोल-फ्री ग्राहक सेवा क्रमांकांद्वारे दैनिक शिल्लक डेटा, टॉकटाइम एसएमएस बॅलन्स आणि बरेच काही तपासू शकता, जे खालीलप्रमाणे आहेत.

  • 121 – एअरटेल ग्राहक प्रतिनिधीशी बोलण्यासाठी
  • 198 – एअरटेल नेटवर्क आणि इतर तक्रारींसाठी
  • 1909 – DND चालू करण्यासाठी
  • 123 – एअरटेल ऑफर्स आणि इतर सुविधांच्या माहितीसाठी

Airtel Thanks App मध्ये एअरटेल शिल्लक डेटा कसा तपासायचा?

Airtel Thanks App मध्ये एअरटेल शिल्लक डेटा कसा तपासायचा?

एअरटेल थँक्स अँपमध्ये नेट डेटा, एसएमएस, टॉकटाइम बॅलन्स चेक करणे खूप सोपे आहे, जे खालीलप्रमाणे-

  • गुगल प्ले स्टोअर किंवा आप्पल एप्पल अ‍ॅप स्टोअर वरून एअरटेल थँक्स अँप डाउनलोड करा
  • अ‍ॅप उघडा आणि आपला एअरटेल मोबाईल क्रमांकासह नोंदणी करा
  • आता अँपवरील सेवा किंवा प्रोफाईल विभाग वर जा तेथे, आपल्याला आपल्या सक्रिय रिचार्ज, डेटा वापर, एसएमएस शिल्लक आणि बराच काही तपशील सापडेल.

या लेख बद्दल काही प्रश्न असतील तर खालील कंमेंट मध्ये टाकू शकता, धन्यवाद…

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!