Bike InsuranceMaharashtra Traffic Challan

स्वस्तात: Acko बाईक इन्शुरन्स ऑनलाईन कसा करायचा? | Acko Bike Insurance

नमस्कार मित्रांनो, आज आपण स्वस्तात Acko कंपनीचा बाईक इन्शुरन्स ऑनलाईन पद्धतीने कसा करायचा, तसेच Acko कंपनीचा बाईक इन्शुरन्स काढला तर फायदे काय आहेत, या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

Acko Bike Insurance Online Kasa Kadhaycha

मित्रांनो, सामान्य माणसाला परवडणारी कोणती गाडी असेल तर ती म्हणजे टू व्हिलर. टू व्हिलर चा प्रवास हा सर्वात सोयीस्कर असतो. पण मित्रांनो, रस्त्यावर बाईक चालवताना कधीही काहीही होऊ शकते म्हणूनच रस्त्यावरच्या येणाऱ्या जोखीम कमी करण्यासाठी टू व्हिलर इन्शुरन्स असण्याची खूप आवश्यकता असते. तसेच इन्श्युरन्स शिवाय टू व्हिलर किंवा बाईक चालवणे हा कायदेशीर दृष्ट्या देखील एक अपराध आहे , व त्यासाठी तुम्हाला दंड देखील होऊ शकतो. आणि तुम्हाला तर माहीत आहेच की टू-व्हीलर इन्श्युरन्स भारतात अनिवार्य आहे आणि ते खूपच फायदेशीर असल्याचे ही सिद्ध झाले आहे. मित्रांनो, मोटार वाहन कायदा, 1988 नुसार, सर्व वाहनांचा कमीत कमी थर्ड पार्टी इन्शुरन्स असणे बंधनकारक आहे.



पण हा बाईक इन्शुरन्स कसा काढायचा? हे अनेक लोकांना माहीत नसते. त्यामुळे च आम्ही हा आजचा लेख घेऊन आलो आहोत. मित्रांनो, आजकाल वेळे अभावी अनेक काम आपण ऑनलाईन करतो. असेच तुम्ही बाईक इन्शुरन्स देखील ऑनलाईन पद्धतीने काढू शकता. त्यासाठी तुम्ही Acko अँप चा वापर करू शकता. Acko द्वारे तुम्ही कोणत्याही बाईक चा इन्शुरन्स ऑनलाईन काढू शकता. तर मित्रांनो, acko वरून बाईक चा इन्शुरन्स कसा काढायचा हे आपण पुढे जाणून घेऊ या.

Acko बाईक इन्शुरन्स ऑनलाईन कसा करायचा?

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला acko.com या लिंक वर क्लिक करायचे आहे. व नंतर तुम्ही डायरेक्ट acko च्या होम पेज वर जाल.

स्टेप 2: आता दिलेल्या जागी तुम्हाला तुमच्या गाडीचा नंबर टाकायचा आहे.

Acko Bike Insurance Online Kadah Step 2

स्टेप 3: त्या नंतर तुम्हाला तुमच्या गाडीचे काही डिटेल्स दिसतील. ज्यात गाडीचे मॉडेल कोणते आहे, रेजिस्ट्रेशन इअर कोणते आहे, सध्याची इन्शुरन्स पॉलिसी स्टेटस काय आहे ते दिसेल.

आता पॉलिसी स्टेटस समोर दिलेल्या expire or not या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर तुमच्या समोर तीन ऑप्शन ओपन होतील.



  1. Policy expired (जर पॉलिसी मुदत संपलेली असेल तर)
  2. Policy expired with in 90 days (जर पॉलिसीची मुदत संपून 90 दिवसांच्या आत असेल तर)
  3. Policy expire more than 90 days ago (पॉलिसीची मुदत संपून 90 दिवस झाले असतील तर)

आता View Prices या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Acko Bike Insurance Online Kadah Step 3


स्टेप 4: मित्रांनो, आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमच्या बाईक ची इन्शुरन्स प्राइझ दाखवली जाईल. तसेच तुम्ही इथे 1, 2, 3 वर्षाचा इन्शुरन्स घेऊ शकता. मित्रांनो, थोडे खाली आल्यावर तुम्हाला इन्शुरन्स प्लॅन्स दिसतील. ज्यात Comprehensive Plan, Third Party Plan, असे प्लॅन्स दिले आहेत. त्यात शक्यतो तुम्ही Comprehensive Plan निवडायचा आहे. कारण यात तुम्हाला समोरच्या बरोबर तुमच्या बाईकची नुकसान भरपाई देखील मिळते.

तर प्लॅन सिलेक्ट केल्या वर तुम्हाला अजून एक ऑप्शन दिसेल Personal Accident Cover. तुमचा जर पर्सनल अक्सिडंट कव्हर नसेल तर तुम्ही या ऑप्शन ला सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला Continue ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Acko Bike Insurance Online Kadah Step 4

स्टेप 5: त्या नंतर नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमच्या RC प्रमाणे नाव लिहिलेले दिसेल. त्या खाली तुमचा ई-मेल आयडी टाकायचा आहे. व नंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्या खाली तुमचा गाडी नंबर आपोआप येऊन जाईल. त्या नंतर पिनकोड टाकून Continue ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Acko Bike Insurance Online Kadah Step 5

स्टेप 6: मित्रांनो, आता तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो टाकायचा आहे व नंतर तो व्हेरिफाय करून घ्यायचा आहे. आता तुम्हाला पुढे तुमच्या बाईक चे डिटेल्स बघायला मिळतील. ज्यात बाईक ओनर चे नाव वगैरे माहिती असेल.

स्टेप 7: मित्रांनो, आता तुम्हाला पेमेंट करायचा आहे. मित्रांनो, इथे तुमच्या इन्शुरन्स प्राइझ मध्ये GST सुद्धा लावली जाते. आता पेमेंट करण्यासाठी pay ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर कोणतीही एक पेमेंट मेथड सिलेक्ट करायची आहे. जसे की यूपीआई, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, वगैरे. व पेमेंट पूर्ण करायचा आहे.

Acko Bike Insurance Online Kadah Step 6

स्टेप 8: मित्रांनो, पेमेंट केल्यावर नेक्स्ट इंटरफेस मध्ये तुम्हाला डाउनलोड चा ऑप्शन मिळतो. तर तुम्ही इन्शुरन्स पेपर pdf मध्ये डाउनलोड देखील करू शकता. किंवा त्याची प्रिंट देखील काढू शकता.
मित्रांनो, इन्शुरन्स घेतल्यावर काही दिवसांनी तुम्हाला इन्शुरन्स क्लेम करायचा ऑप्शन येईल. व गरज असेल तेव्हा तुम्ही तुमच्या बाईक चा इन्शुरन्स क्लेम करू शकता.

Acko Bike Insurance Online Kadah Step 8

ACKO वर बाईक इन्शुरन्स घेण्याचे फायदे काय आहेत?

  1. मित्रांनो, acko तुम्हाल कमीत कमी किमतीचे इन्शुरन्स प्लॅन्स दाखवते. तसेच तुम्हाला कोणत्याही कागदपत्रां शिवाय झटपट पॉलिसी खरेदी करता येते.
  2. यात कोणताही एजंट नसतो त्यामुळे acko वर बाईक इन्शुरन्स च्या किमती बऱ्याच प्रमाणात कमी आहेत.
  3. Acko वर इन्शुरन्स पॉलिसी घेण्याची पूर्ण प्रक्रिया ही डिजिटल स्वरूपात म्हणजेच ऑनलाईन असून जलद होते.

FAQ

नवीन बाइक साठी ACKO द्वारे ऑनलाइन बाइक विमा घेणे विश्वसनीय आहे का?

हो मित्रांनो, ACKO या जनरल इन्शुरन्स कंपनीला भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच IRDAI कडून परवाना प्राप्त आहे. त्यामुळे acko वरून नवीन बाईक साठी विमा घेणे पूर्णपणे सुरक्षित आहे.

नवीन बाईकसाठी बाईक विमा पॉलिसीची सॉफ्ट कॉपी भारतात वैध आहे का?

हो मित्रांनो, तुम्ही तुमच्या बाईक ची पॉलिसी ची सॉफ्ट कॉपी किंवा डिजिटल प्रत DigiLocker अँप मध्ये ठेवू शकता. ते वैध आहे. आणि कोणत्याही प्रत्यक्ष कागदपत्रांशिवाय तुम्ही तुमची नवीन बाईक भारतात चालवू शकता.

ACKO वर नवीन बाईक किंवा स्कूटर साठी इन्शुरन्स पॉलिसी घेण्याचा फायदा काय आहे?

मित्रांनो, acko वर पॉलिसी घेण्याची पूर्ण प्रक्रिया ही डिजिटल पद्धतीची आहे. आणि acko डायरेक्ट टू कस्टमर हा मॉडेलचे अनुसरण करते. त्यामुळे त्यांच्या कडे कोणताही एजंट किंवा मध्यस्थ नसतो. म्हणूनच कोणतेही कमिशन द्यावे वाहत नाही. व खूप कमी किमतीत पॉलिसी मिळण्यास मदत होते.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण Acko द्वारे ऑनलाईन बाईक इन्शुरन्स पॉलिसी कशी काढायची, या बद्दल माहिती जाणून घेतली. मित्रांनो, मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!