BankCancelled Cheque InformationSBI Bank

कॅन्सल चेक म्हणजे काय ? | कॅन्सल चेक कसा तयार करावा ? | What is Cancel Cheque in Marathi ?

आजच्या काळात लोक आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आणि आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँकेचा वापर करतात. जेव्हा आपल्याला थोड्या पैशाची गरज लागते तेव्हा आपण एटीएम गाठतो, पण समजा तुम्हाला हजारो किंवा लाखोंच्या संख्येने पैसे काढायचे असतील किंवा दुसऱ्याला द्यायचे असतील तेव्हा ?

Cancel Cheque info in Marathi

अशा वेळी मदत होते ती चेकची. चेक चा वापर करून आपण हजारो किंवा लाखों रुपये ट्रान्सफर करण्यासाठी करू शकतो. पण कधी कधी तुम्हाला कॅन्सल चेकची मागणी केली जाते ? पण हा कॅन्सल चेक म्हणजे काय ? कॅन्सल चेकचा फायदा काय ? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या पोस्ट मध्ये बघणार आहोत.



कॅन्सल चेक म्हणजे काय ?

कॅन्सल चेक (Cancelled Cheque) दुसरे तिसरे काही नसून एक सामान्य चेकच असतो, फक्त त्या चेक वर मोठ्या अक्षरात CANCELLED असे इंग्रजीत लिहिलेले असते आणि शब्दाच्या वर खाली दोन तिरक्या लाईन ओढल्या गेलेल्या असतात. जर कोणी तुमच्यकडे कॅन्सल चेकची मागणी केली तर तुमच्यकडे असलेल्या कोणत्याही बँकेच्या चेकबुक मधून एका चेकवर CANCELLED आणि दोन तिरक्या लाईन देऊन तुम्ही तो देऊ शकता. या चेक वर सही आणि तारीख टाकण्याची गरज नसते.

चेकचा गैरवापर कोणी करू नये म्हणून त्यावर CANCELLED लिहिले जाते यामुळे जरी कोणाच्या हाती हा चेक लागला तरी तो त्याच्या काहीच कामाचा राहत नाही. कॅन्सल चेकचा वापर तुमची ओळख पटण्यासाठी किंवा KYC साठी केला जातो. कॅन्सल चेकमुळे तुम्ही त्या बँकेचे खातेदार आहे, याचा पुरावा म्हणून देखील वापर केला जातो. चेक वर असलेला खाते नंबर, बँकेचे नाव, बँकेच्या शाखेचे नाव इत्यादी गोष्टींमुळे तुमची ओळख पटण्यास मदत होते.

कॅन्सल चेक कसा तयार करावा ?

फक्त दोन सोप्या स्टेपमध्ये तुम्ही एका सामान्य बँकच्या चेकला कॅन्सल चेकमध्ये रूपांतरित करू शकता

स्टेप 1: आपल्या चेकबुक मधून एक चेक काढा आणि त्यावर एका कोपऱ्यापासून पासून दुसर्‍या कोपऱ्या पर्यंत दोन तिरक्या रेषा मारा. लक्षात ठेवा, दोन तिरक्या रेषा एकमेकांशी समांतर असाव्यात आणि काहीतरी लिहिण्यासाठी त्यांच्यात पुरेशी जागा असावी.

कॅन्सल चेक कसा तयार करावा ?

स्टेप 2: दोन तिरक्या रेषांमध्ये स्पष्टपणे CANCELED हा शब्द लिहा. या व्यतिरिक्त काहीही लिहायची गरज नाही. अशा तरेने तुमचा कॅन्सल चेक तयार होईल.



कॅन्सल चेकची गरज का असते ?

कॅन्सल चेक मागण्यामागचा पहिला उद्देश म्हणजे तुम्ही खरंच एखाद्या बँकेचे खातेदार आहेत याची ओळख पटवणे असतो. तुम्ही जमा केलेला अकाउंट नंबर तुमच्या नावाशी जोडला गेला आहे कि नाही हे चेक मुळे तपासले जाते.

कॅन्सल चेक मध्ये तुमच्या खात्याची बेसिक माहिती असते जसे –

  • बँकेचे नाव | Bank Name
  • बँकेच्या शाखेचे नाव | Bank Branch Name
  • बँकेच्या शाखेचा पत्ता | Bank Branch Address
  • बँकेच्या शाखेचा संपर्क क्रमांक | Bank Branch Contact Number
  • आयएफएससी कोड | IFSC code

या सर्व माहितीमुळे तुम्ही जमा केलेल्या माहितीची फेरतपासणी करण्यास मदत होते.


नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!