आगळं वेगळं

वोदका मद्याची हि गूढ रहस्य तुम्हाला माहिती आहे का ?

रशियन लोक कथेतून सहज बागडणारा वोदका. असं मानलं जातं की आठव्या ते नवव्या शतकात पोलंड किंवा रशियात वोदकाचा शोध लागला (त्या अनामिकांना मानाचा मुजरा). अर्थात व्युत्पत्तीशास्त्रात अधिक खोलवर नाही गेलो तरी चालेल कारण १४ व्या शतकात कोणत्यातरी परदेशी राजदूताला वोदकाचा शोध लागला जी सुरुवातीपासून रशियन जनसामान्यांच्या मनावर राज्य करत आलेली आहे.

Vodka Marathi

आता याचा उच्चार रशियन भाषेत VOHD-KA आहे ज्याचं स्पेल्लिंग आहे Водка. म्हणजे कसं न, कोलकाता ला कलकत्ता म्हटल्यावर बंगाली भडकतात (आणि मुंबईला बम्बई म्हटल्यावर मी चिडतो) तसंच वोदकाला व्होडका म्हटल्यावर रशियन चिडतात. आता वोदकाला व्होडका बनवलं इंग्रजांनी/ डचांनी / पोर्तुगीजांनी (या पोर्तुगीजांनी वसईला पण बॅसीन करून टाकलेलं) असो, नामपुराणात जास्त शिरायला नको. तर अशी ही वोदका कशी बनते आणि त्याच्या सेवनाचा विधी कसा असावा ते पाहूया.



वोदका कशी बनवतात?

How Vodka is made

1. मॅश तयार करणे

धान्य किंवा भाज्या स्वयंचलित मॅश टबमध्ये लोड केल्या जातात. वॉशिंग मशिनप्रमाणे, या टबमध्ये ब्लेड्स बसवले जातात जे टब फिरत असताना धान्य रगडतात. स्टार्चचे साखरेमध्ये रूपांतर होण्यासाठी ग्राउंड माल्ट मील त्यात सोडले जाते.

2. निर्जंतूकीकरण आणि लसीकरण

डिस्टिल्ड स्पिरिटच्या निर्मितीमध्ये बॅक्टेरियाची वाढ रोखणे फार महत्वाचे आहे. प्रथम, मॅशला उत्कलन बिंदूपर्यंत गरम करून निर्जंतुकीकरण केले जाते. नंतर, किण्वनासाठी आवश्यक आम्लता पातळी वाढवण्यासाठी त्यात लैक्टिक-ऍसिड बॅक्टेरियाचे इंजेक्शन दिले जाते. इच्छित आंबटपणाची पातळी गाठल्यावर, मॅशमध्ये पुन्हा बॅक्टेरियाला आटोक्यात आणले जाते.



3. आंबवण्याची प्रकिया

मग मॅश मोठ्या स्टेनलेस स्टीलच्या व्हॅटमध्ये ओतला जातो. यीस्ट सोडले जाते आणि वॅट्स बंद करतात. पुढील दोन ते चार दिवसांत, यीस्टमधील एंझाइमस् मॅशमधील साखरेचे इथाइल अल्कोहोलमध्ये रूपांतर करतात.

4. डिस्टिलेशन

स्टेनलेस स्टीलचे पाईप एकमेकांच्या वर रचून बाष्पीभवन घडवून आणण्यासाठी त्यात लिक्विड इथाइल अल्कोहोल स्टिलमध्ये पंप केले जाते. अल्कोहोल सतत वर-खाली केले जाते, आणि वाफेने गरम केले जाते. जोपर्यंत वाफ बाहेर पडत नाही आणि मॅशला घनत्व येत नाही तोवर ही प्रक्रिया सुरु असते. ही प्रक्रिया अशुद्धता देखील काढून टाकते. बाष्प वरच्या चेंबरमध्ये (सर्वात वरच्या भागात) केंद्रित केली जाते. उरलेला पदार्थ खालच्या भागात जातात आणि टाकून दिले जातात. धान्याचे काही अवशेष पशुखाद्य म्हणून विकले जाऊ शकतात

5. पाणी मिसळणे

तयार झालेल्या मद्यात 95-100% मद्यार्क असतो, म्हणजे तब्बल 190 प्रूफ. या अल्कोहोलला पिण्यायोग्य बनवण्यासाठी त्यात पाणी मिसळून त्याच्या मद्यार्काची पातळी 40% वर किंवा 80 प्रूफवर आणली जाते.

6. बॉटलिंग

अल्कोहोलयुक्त पेये काचेच्या बाटल्यांमध्ये साठवली जातात कारण काच नॉन-रिअॅक्टिव्ह असते. प्लॅस्टिक सारख्या इतर मटेरियलमुळे पेयामध्ये रासायनिक बदल होतो. बाटल्या स्वच्छ केल्या जातात, भरल्या जातात, कॅप लावल्या जातात, सीलबंद केल्या जातात, लेबल केले जातात आणि कार्टनमध्ये लोड केले जातात म्हणून बाटली भरण्याची प्रक्रिया अत्यंत यांत्रिक आहे. हे 400 बाटल्या प्रति मिनिट इतक्या वेगवान दराने केले जाऊ शकते.

किती सोपी ना? आता बोला! (व्हिस्कीची फारच मोठी होती प्रक्रिया) असो, कामाचा मुद्दा आला की राव.

How to Drink Vodka

वोदका सेवनाचा विधी

How to Drink Vodka

थोडी अधिकची माहिती घेऊया.

रशियन वोदका कशी प्यावी याचे ही काही नियम आहेत. जसं ही एकदम थंडगार करून नमकील्या चखण्यासोबत (नीट) सर्व्ह केली जावी. प्रस्थापित परंपरा असं मानते की थंड केल्यावर वोडकाची चव जरा सॉफ्ट होते आणि ती एका घोटात पोटात गेली पाहिजे (टकीला शॉट्स सारखी. मग पोटात जाऊन काय लागायची टी आग लागो) त्यानंतर मशरूम वगैरे चालतील चरलो तर. (स्मोक्ड सालमन वगैरे आहा होऊन जाईल सोबत.) असा नीट शॉट मारून झाल्यावर एक ग्लास थंड पाणी प्यायलं तरी चालेल, जेणेकरून त्याची चव तोंडात रेंगाळत राहणार नाही. (आता म्हणाल वोदकाला कुठे चव असते? नसतेच. पण एवढं अल्कोहोल पोटात कच्च गेल्यावर पोटाला ते पचवता यायला हवं ना).

वोदका पिताना कंपनी हवी कारण एकट पिणाऱ्याला सर्रास मद्यपी समजलं जायच. सोव्हीएट काळात एक लोकप्रिय म्हण होती – ‘चला, तिघे बसुया’ – कारण तेव्हा वोदका एक रुबलपेक्षा स्वस्त होता. म्हणजे प्रत्येकाने 1-1 रुबल काढला तरी एकालाच भुर्दंड न पडता सगळा खाना पिना तामझाम फिट्ट.

पिण्याआधी टोस्ट करणे गरजेचे आहे. काही युरोपियन परंपरा अतिशय खास प्रसंगांसाठी टोस्ट्स करताना विचार करतात, तर रशियामध्ये ते पूर्णपणे अत्यावश्यक आहे. टोस्ट मैत्री, आदर सद्भावना दाखविण्यासाठी करतात, असं मानलं जातं.

रशियन परंपरेनुसार, पहिला टोस्ट भेटण्याच्या आनंदासाठी, दुसरा पालकांना आणि तिसरा गेलेल्यांना किंवा प्रेमासाठी केला जातो. टोस्ट बोलत असताना, कोणी खात नाही, पीत नाही, बोलत नाही किंवा फोन तपासत नाही! रिकाम्या ग्लासाने किंवा शीतपेयाने क्लिंक करणे अस्विकाहार्य आहे. पारंपारिकपणे, पुरुष महिलांसाठी पेय बनवून देतात आणि रिकामी बाटली टेबलवर ठेवत नाहीत. ( मी ही शेवटची ओळ आधीपासून पाळतो)

(चियर्स टू हेल्थ!) (शब्दाचा उच्चार विचारू नका, मी 5 वेळा ऐकलं तरी दरवेळी भलतंच ऐकायला येतंय)

आता भारतीय कसे व्होडका पितात? (इंग्रजांचे पाप, खरा उच्चार शिकवला नाही)

एक माप (30/45/60ml) ग्लासात घ्यावी. त्यात बर्फ घालू नये. थंड पाणी घालावे – पाण्याचे प्रमाण 1:2 ठेवावे. वाटल्यास एक लिंबाचा तुकडा त्यात न पिळता / पिळून घालावा आणि शांतपणे घोट घेत घेत उदरात घालावी. (रशियन परंपरेच्या बिलकुल विपरीत पद्धतीने)

पार्टीतली वोदका

बऱ्याच लोकांना वाटतं अरे मी तर ऑरेंज ज्यूस प्यायलो आणि तरी चढल्यासारखं वाटतंय. ऑरेंज ज्यूस प्यायलात हे अर्ध बरोबर, पण चढली ती त्यात असलेल्या वोदक्यामुळे.

स्क्रू-ड्राइव्हर कॉकटेल. 1 भाग वोदका आणि 2 भाग ऑरेंज ज्यूस. शेकरमध्ये आईसक्युब्स भरून त्यावर हे मिश्रण टाकतात आणि मस्त शेक करून हायबॉल ग्लासात सर्व्ह करतात, अस्स स्क्रू ड्रायव्हर

लेखक – प्राक्तन पाटील

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!