आगळं वेगळं

या विषारी झाडाची तुम्हाला माहिती आहे का?

वृक्षांचे आपल्याला किती सारे विविध फायदे आहेत, याबाबत आपल्याला नवीन काही सांगायला नको. संत तुकारामांनी देखील म्हणूनच की काय ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असा महत्वाचा उपदेश आपल्या काव्यांतून दिला आहे. पण आज आपण एका अशा एका वृक्षाची माहिती जाणणार आहोत जे आपल्या सर्वांसाठीच फार विषारी आहे. गोष्ट आहे सन 1999 ची, निकोला स्ट्रिकलँड नावाची एक तरुण रेडिओलॉजिस्ट आपल्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी त्रिनिदाद आणि टोबॅको बेटांवर गेली होती.फारच कमी लोकसंख्या असलेलं निसर्गरम्य असं हे बेट होत.

एकदा असंच किनाऱ्यावर फेरफटका मारताना निकोला व त्यांच्या मैत्रिणीस एक हिरव्या रंगाचे फळ सापडले जे त्यांना प्रथमदर्शी हिरव्या सफरचंदासारखे वाटले. व उत्सुकतेपोटी दोघींनीही त्याची चव बघण्याचे धाडस केले.परंतु क्षणार्धातच त्या फळाच्या गोड चवीची जागा ही घश्यात जळजळाट व घसादुखणीने घेतली होती.त्यांना अन्न ग्रहण करताना देखील त्रास होऊ लागला.



Vishari Zad

वरील गोष्टीतील फळ हे ज्या झाडाचे होते त्याचे नाव आहे मांचिनील वृक्ष (Manchineel Tree).ज्यास ‘किनारी सफरचंद’ किंवा ‘विषारी पेरू’ असे देखील म्हणतात.

ही झाडे मुख्यत्त्वे उत्तर व दक्षिण अमेरिका तसेच केरीबिअन बेटांच्या प्रदेशात आढळतात.

या वृक्षातील ‘चिक’ हा त्याचा मुख्यत्वे विषारी घटक असतो जो त्याच्या सर्वच भागांत असतो. हे झाड इतके विषारी असते, की यातील पेरूसारखी दिसणारी फळे माणसाचा जीवदेखील घेऊ शकतात. तसेच यातील चिक हा आपल्याला गंभीर त्वचारोग देखील करू शकतो.

या झाडातील ‘फॉरबोल’ हा घटक त्याच्या विषारीपणा मध्ये मुख्य भूमिका बजावतो.आणि हा फॉरबोल पाण्यात विद्राव्य असल्याने ,पावसाखाली या झाडाखाली उभे राहणे हे आपल्या जीवाशी बेतू शकते. म्हणूनच अनेक भागांत या वृक्षांपासून सर्वांना सावध करण्यासाठी विविध फलक देखील सरकारद्वारे लावले जातात.

परंतु या मांचिनील वृक्षाचे जसे तोटे आहेत तसेच त्याचे आपल्याला अनेक फायदे देखील आहेत.



  1. मागील अनेक शतकांपासून कॅरिबियन भागातील सुतार हे या झाडाचा वापर फर्निचर बनवण्यासाठी करतात.
  2. या झाडाची घट्ट मुळे ही किनारी भागात जमिनीची धूप रोखण्यास मदत करतात.त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करते.
  3. प्राचीन काळात युद्धासमयी या झाडाचा वापर हा शत्रूची पाण्याची स्रोत दूषित करण्यासाठी व्हायचा.
  4. स्थानिक लोक मांचिनील फळांचे विष हे बाणाच्या टोकाला लावून त्याचा उपयोग करतात.

तर असे हे जगातील सर्वात विषारी झाड ‘मांचिनील’ आहे.ज्याचे नुसतेच आपल्याला तोटे नसून फायदे देखील आहेत.

लेखक – सोहम लाडगांवकर

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!