Marathi Health TipsPopular Post Healthआरोग्य टिप्स | Health Tips in Marathi

वाताचा त्रास होऊ नये म्हणून काही सोपे उपाय | How to get rid of Vata Dosh?

नमस्कार मित्रांनो, आज आपण वात वात दोष म्हणजे काय, वात दोष कशामुळे होतो, वात दोष कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खावेत आणि कोणते खाऊ नयेत, तसेच वात दोष कमी करण्यासाठी सोपे उपाय काय आहेत, याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की आपले शरीर हे पंचतत्व पासून बनलेले आहे. या पंचतत्वा मधील गुणधर्मामुळे आपल्या शरीरात तीन प्रकारचे दोष म्हणजे त्रिदोष निर्माण होतात. हे तीन दोष म्हणजे वात, कफ आणि पित्त. जेव्हा हे त्रिदोष असंतुलित होतात तेव्हा आरोग्य संबंधित समस्या निर्माण व्हायला सुरुवात होते. त्यातल्या त्यात सर्वात जास्त त्रास हा वातामुळे होतो. कारण वातामुळे सांधेदुखी, अंगदुखी खूप जास्त प्रमाणात वाढते. आणि त्यातल्या त्यात जर थंडीचे दिवस असतील तर मग विचारायलाच नको. खरंतर वाताचा त्रास हा कोणालाही कोणत्याही वयात होऊ शकतो. त्यामुळे या वात दोषावर नियंत्रण ठेवणे खूप आवश्यक आहे. पण त्यासाठी वात होण्याची कारणे काय आहेत हे जाणून घेणे महत्वाचे आहे. त्या नंतर च आपण त्यावर उपाय करू शकतो. पण सर्वात आधी वात म्हणजे नेमकं काय आहे ते जाणून घेऊ या…



Vata Mhanje kay ani Vata var Upay

वात म्हणजे नेमकं काय ते जाणून घेऊ या

मित्रांनो, आयुर्वेदात तीन प्रकारचे दोष सांगितले आहेत. ते म्हणजे वात, कफ आणि पित्त. प्रत्येक माणसाच्या शरीरात हे तिन्ही दोष थोड्या फार प्रमाणात असतात. जो दोष जास्त प्रकर्षाने जाणवतो तो म्हणजे वात दोष. वातामुळे आपल्या शरीराची व मनाची हालचाल नियंत्रित होते. त्यामुळे बऱ्याच वेळा वात दोष हे आजाराचे पहिले प्रमुख कारण असते.

मित्रांनो, वात हा डोळ्यांनी दिसत नसला तरी ही तो जाणवतो. वातदोष हा कोरडा , थंड, हलका, वेगवान, शक्तीवान व खोलवर जाणारा असतो. वात हा सर्वात महत्वपूर्ण असतो. कारण शरीराची बरीचशी काम या वातामुळेच होतात. शरीरात असणारा उत्साह आणि ऊर्जा ही वातामुळेच असते. म्हणून जर यात बिघाड झाला की शरीरात बिघाड होतो व आपण आजारी पडतो. वात हा शरीरात कुठेही येऊ शकतो, पण जास्त करून सांधे, व स्नायूंमध्ये वात येण्याचा प्रकार जास्त असतो.

वात होण्याची कारणे काय आहेत?

मित्रांनो, वात होण्याची अनेक कारणे आहेत जसे की अनियमित दिनचर्या, अनियमित आहार, व्यायामाचा अभाव, तसेच स्नायूंचा अति वापर, किंवा रक्तपुरवठा व्यवस्थित न होणे, पुरेसे पाणी न पिणे, तसेच पुरेशी झोप न घेणे, जास्त प्रमाणात कोरडे किंवा कच्चे अन्न खाणे या अश्या सर्व कारणांमुळे वातदोष होऊ शकतो.

वाताची लक्षणे काय आहेत?

मित्रांनो, तुमची त्वचा, केस किंवा ओठ सतत कोरडे पडत असतील तर हे वाताचे लक्षण असू शकते. तसेच सुई टोचल्या सारखे किंवा स्नायू ताठरने असे प्रकार होत असतील तर तो वाताचा त्रास असू शकतो. तसेच वजन कमी होणे, अस्वस्थ वाटणे, चिंता वाटणे , शरीरात तीव्र वेदना होणे हे सर्व वाताचे लक्षणे असू शकतात.

वात दोष कमी करण्यासाठी कोणते पदार्थ टाळावे?

मित्रांनो, तुम्हाला जर वातदोष कमी करायचा असेल किंवा वाताचे संतुलन नीट ठेवायचे असेल तर तुम्हाला काही पदार्थ खाणे टाळले पाहिजे. जसे की कोरडे पदार्थ खाणे टाळावे. कारण कोरडे पदार्थ वात वाढवतात. तसेच आईस्क्रीम, थंड पेये, बर्फ वगैरे थंड पदार्थ खाल्याने वात वाढतो त्यामुळे आहारातून थंड पदार्थ कमी करावे. मित्रांनो,



मसाल्याचे पदार्थ वातदोष वाढवतात. आणि तुम्हाला जर तुमचा वातदोष कमी करायचा असेल तर तुम्ही मसाल्याचे पदार्थ कमी खाल्ले पाहिजे. या शिवाय चहा, कॉफी, एनर्जी ड्रिंक वगैरे सारखे पदार्थ वात जास्त वाढवतात. त्यामुळे हे पदार्थ खाणे टाळावे.

वातदोष कमी करण्यासाठी काही सोपे उपाय

  • मित्रांनो, वात कमी करण्यासाठी तुम्ही स्वतःला उबदार ठेवले पाहिजे. वाताच्या थंडाव्याचा सामना करण्यासाठी तुम्ही गरम पाण्याने अंघोळ करा.
  • थंडीमध्ये वाताचा त्रास जास्त होतो त्यामुळे शक्यतो उबदार खोलीत रहा. व उबदार कपडे घाला.
  • मित्रांनो वातामुळे अनेक जणांना सांधेदुखी, गुडघेदुखी, अंगदुखी वगैरेंचा त्रास होतो. अश्या वेळी आयुर्वेदात वात कमी करण्याचा एक प्रभावी उपाय सांगितला आहे तो म्हणजे गरम तेलाने मालिश करणे. त्यासाठी तुम्ही बाजारात उपलब्ध असलेले कोणतेही आयुर्वेदिक मालिश तेल वापरू शकता किंवा मग घरी खोबरेल तेल, एरंडेल तेल किंवा तिळाचे तेल ही मालिश साठी वापरू शकता. गरम तेलाने मालिश करणे हे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते शिवाय त्यामुळे वात ही शांत होतो. तसेच ऑलिव्ह ऑइल आणि जाड मीठ एकत्र करून लावल्यास ही सांधेदुखी कमी होते. मालिश करण्याचा फायदा असा होतो की यामुळे तुमच्या सांध्यांना व्यंगण मिळते व त्यामुळे वाताचा त्रास कमी होतो.
  • आहारात लसणाचा समावेश करणे. कारण मित्रांनो लसुण खाल्ल्याने आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते. त्यामुळे जर तुमच्या शरीरात थंडावा वाढला असेल आणि त्यामुळे जर तुम्हाला वाताचा त्रास होत असेल तर शरीराला उष्णता मिळण्यासाठी वात असलेल्या लोकांनी आहारात लसणाचा समावेश अवश्य करावा. तसेच लसूण खाल्ल्यामुळे पचन सुधारते, पोटाच्या समस्या देखील कमी होतात. म्हणूनच वात प्रवृत्तीच्या लोकांनी लसूण खाणे फायदेशीर ठरते.
  • मित्रांनो, वातदोष कमी करण्यासाठी अजून एक उपाय म्हणजे हळदीचे दूध पिणे. हो मित्रांनो, हळदीचे दूध पिल्याने शरीराला आतून आराम मिळतो. व आरोग्य समस्या देखील दूर होतात. आजारपणातून बरे होण्यासाठी व वातदोष कमी करण्यासाठी हळदीचे दूध पिणे खूप उपयुक्त आहे.
  • याशिवाय नियमित योगासने व प्राणायाम केल्याने वात, कफ व पित्त संतुलित राहण्यास मदत होते. वात कमी करण्यासाठी काही खास योगासने प्रकार पण आहेत जसे की सूर्यनमस्कार, वज्रासन, पश्चिमोत्तासन, सर्वांगासन अशी आसने वात असणाऱ्या व्यक्तींनी केल्यास त्यांना वातदोष पासून लवकर आराम मिळतो. यासोबतच प्राणायाम करणे ही फायदेशीर ठरते.
  • मित्रांनो, थंड वातावरणात लोकांना वाताचा त्रास हा जास्त होत असतो. त्यामुळे जर तुम्ही सूर्यप्रकाशात उभे राहिलात तर शरीराला ऊब मिळते व वातदोष संतुलित राहतो. म्हणून सकलचु कोवळ्या उन्हात फिरल्याने शरीराला ऊब मिळते आणि व्यायाम ही होतो आणि परिणामी वाताचा त्रास कमी होतो.
  • मित्रांनो, वातदोषमुळे जर तुमच्या पोटात दुखत असेल किंवा ऍसिडिटी, जळजळ जाणवत असेल तर तुम्ही आहारात दालचिनीचा वापर करू शकता. त्यामुळे पोटाच्या समस्या कमी होऊन वाताचा त्रास ही कमी होतो.
  • वातदोष कमी करण्यासाठी अजून एक उपाय म्हणजे निर्गुडीचा वापर करणे. निर्गुडी ही एक वनस्पती आहे. ज्याचा वापर वाताचा त्रास कमी करण्यासाठी केला जातो. निर्गुडीची पाने व मीठ एकत्र गरम करून त्याचा शेक तुमच्या सांध्यांना देऊ शकता. किंवा त्याच्या तेलाने देखील मालिश करू शकता. असे केल्यास वातदोष पासून लवकरच आराम मिळेल.
  • वात दोष कमी करण्यासाठी अजून एक उपाय म्हणजे तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे. तुम्हला जर वाताचा त्रास असेल आणि तुम्ही जर तांब्याच्या भांड्यातून पाणी पिले तर तुमच्या शरीरातील सर्व विषारी घटक बाहेर टाकले जातील आणि त्यामुळे वातदोष ही कमी होईल. यासाठी तांब्याच्या भांड्यात रात्रभर पाणी ठेवावे व सकाळी उपाशी पोटी ते पाणी प्यावे.
Vata ashtana ahar

वाताचा त्रास असल्यास काय खावे?

मित्रांनो, तुम्ही जर चुकीचा आहार घेत असाल तर हळूहळू त्यामुळे तुम्हाला वाताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे वात विकार होऊ नये म्हणून किंवा वात कमी करण्यासाठी किंवा संतुलित करण्यासाठी योग्य आहार घेणेही तितकेच महत्वाचे आहे. त्यासाठी आहारात गव्हाची पोळी, भेंडी, मुगाच्या डाळीचे वरण किंवा आमटी., आले लसणाची चटणी, गाजर मुळा टोमॅटो याची कोशिंबीर, असा आहार घ्यावा. तसेच मटणाचे सूप घेण्यास ही हरकत नाही.

स्रियांनी वात विकारा मध्ये विशेषतः डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू आवर्जून खावे. प्रसूतीनंतरच्या काळात व इतर वेळेला ही वात कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसेच डाळींब, द्राक्षे, संत्री, सफरचंद ही फळे ही खाऊ शकता. रोज दूध प्यावे तसेच जेवणात तुपाचे पुरेसे प्रमाण असावे.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण वातदोष म्हणजे काय, त्याची लक्षणे व त्यावरील सोपे घरगुती उपाय या बद्दल बरीच माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. वरील माहितीचा उपयोग करून तुम्ही ही तुमचा वातदोष कमी करू शकता. तसेच तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल किंवा उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या जवळच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा. व अश्या नव नवीन पोस्ट व माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइट ला अवश्य भेट द्या. धन्यवाद।

FAQ

वातदोष कायमचा बरा होतो का?

मित्रांनो, वातदोष हा शरीरात वाताचे प्रमाण असंतुलित झाल्यावर होतो. तुम्ही जर तुमची दिनचर्या योग्य ठेवली, योग्य आहार व व्यायाम केला तर तुमचा वाताचा त्रास कमी होऊ शकतो.

वातदोष असणाऱ्यांची जीवनशैली कशी असावी?

मित्रांनो, वातदोष असणाऱ्यांची दिनचर्या नियमित असावी, वेळेवर उठणे झोपणे तसेच जेवणाची वेळी नियमित असावी. तसेच नियमित व्यायाम करावा.

योग केल्यास वातदोष कमी होतो का?

हो. मित्रांनो, शरीरातून वात कमी करण्याचा एक प्रभावी उपाय म्हणजे योग. कारण योग व प्राणायाम केल्यास वात संतुलित राहण्यास मदत होते.



Tags: Vata Dosh Var Upay Kay Ahet, Vata Dosh Kashmule Hoto, Vata Ka Hoto Karne Dya, Vata Hou Naye Mhanun Kay Karave, Vat Dosh Mhanje Kay, Vat Dosh Kami Karnysathi Kay Karave, Vat Dosh Astana Kay Khave, Vat Dosh Astana Kay Khau Naye, Vatachi Lakshane Kay, Vatachi Lakshane kay ahet

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!