UPI

UPI ID म्हणजे काय? | यूपीआय आयडी कसा तयार करावा? | UPI ID Information Marathi

नमस्कार मित्रांनो, या पोस्ट मध्ये आपण समजून घेऊ कि UPI ID म्हणजे काय ? UPI ID कसा तयार केला जातो ? तसेच, यूपीआय आयडीची वैशिष्ट्ये आणि फायदे काय आहेत ? अशा UPI संदर्भातील सर्व प्रश्नाची उत्तरे समजून घेऊ.

जेव्हा तुम्ही ऑनलाईन शॉपिंग किंवा ऑनलाईन रिचार्ज करता तेव्हा पेमेंट करण्यासाठीचे अनेक पर्याय तुमच्यासमोर येतात (क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि यूपीआय). त्यामधून, आपण यूपीआय पर्याय निवडल्यास ते आपल्याला यूपीआय आयडी विचारतात. परंतु बर्‍याचदा लोकांना यूपीआय आयडीबद्दल माहिती नसते. तर मित्रांनो आज मी तुम्हाला याच यूपीआय आयडी बद्दल सर्व देणार आहे.



UPI ID Mhanje Kay

UPI म्हणजे काय? UPI Kay Ahe?

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) हि नेशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि भारतीय रिजर्व बैंक (RBI) यांनी विकसित केलेली Cashless Instant Payment सुविधा आहे. जी IMPS तंत्रज्ञानावर आधारित आहे. या सुविधेचा वापर करून कोणत्याही दोन व्यक्तींच्या बँक खात्यात त्वरित पैसे ट्रान्सफर करता येतात.

UPI ID म्हणजे काय? UPI ID Kay Ahe?

जसा आपला बँक अकाउंट नंबर असतो याचा वापर आपण पैसे ट्रान्सफर करण्यासाठी करतो तसाच UPI ID एक प्रकारचा नंबर असतो जो UPI सुविधेमध्ये त्या व्यक्तीची ओळख पटण्यासाठी आणि त्याच्या बँक अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरला जातो.

कोणतेही UPI App (उदा. गूगल पे, भीम, फोन पे) वापण्याच्या आधी आपल्याला UPI ID तयार करावा लागतो. जर तुम्ही हे अ‍ॅप्स वापरात असाल तर तुमचा यूपीआय आयडी तयार झाला असेल पण तुम्हाला तो सापडला नसेल तर एकदा तुमच्या प्रोफाईल मध्ये चेक करा.

UPI ID कसा शोधायचा?

Find your UPI ID

1) GPay

  • GPay अँप उघडा.
  • वरच्या डाव्या कोपर्‍यात, तुमच्या प्रोफाइल चित्रावर क्लिक करा
  • नंतर “Bank accounts” वर क्लिक करा
  • तुम्हाला ज्या बँक खात्याचा UPI आयडी पाहायचा आहे त्यावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला त्या बँक खात्याशी संबंधित सर्व UPI आयडी “UPI IDs” भागात सापडतील
  • उदा. 9190xxxxxx@oksbi

2) BHIM

  • BHIM अँप उघडा.
  • होम पेज वर “प्रोफाइल” (Profile) वर क्लिक करा
  • आता QR कोड खाली आणि UPI ID भागात तुमचा UPI ID असेल. तो साधारण तुमच्या रजिस्टर मोबाईल असतो.
  • उदा. 9190xxxxxx@upi

3) Paytm

  • पेटीएम अँप उघडा.
  • होम पेज वर सर्वात वरच्या पट्टीवरील “BHIM UPI” भागावर क्लिक करा.
  • तुम्हाला तुमचा UPI आयडी पेजच्या पहिल्या विभागात QR कोड च्या शेजारी मिळेल. UPI ID तुमचा रजिस्टर मोबाइल नंबर असतो.
  • उदा. 9190xxxxxx@paytm

4) Phone Pe

  • PhonePe अँप उघडा.
  • वरच्या डाव्या कोपर्‍यात, तुमच्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करा
  • “MY BHIM UPI ID” या ऑपशन वर क्लिक करा आणि तुम्हाला तुमचा UPI ID मिळेल.
  • उदा. 9190xxxxxx@ybl

UPI कसे काम करते?

UPI सुविधा वापरण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला UPI ID तयार करावा लागतो नंतर तो बँक अकॉउंटला लिंक करावा लागतो हा बँक अकाउंट बरोबर तुमच्या मोबाइल नंबरला हि लिंक होतो. UPI ID तयार केल्यामुळे तुम्हाला बँक अकॉउंटची माहिती लक्षात ठेवायची गरज नाही (जसे बैंक अकाउंट नंबर, IFSC कोड, ब्रांच नाव). जेव्हा कधी तुम्हाला ऑनलाईन रिचार्जे किंवा बिल भरायचे असेल तेव्हा फक्त UPI ID टाकून तुम्ही पेमेंट करू शकता. जर तुम्हाला तुमच्या मित्राला पैसे पाठवायचे असतील तर तर त्याचा UPI App मध्ये मोबाइल नंबर टाकून तुम्ही सहज पैसे पाठवू शकता.



UPI Full Form काय आहे?

UPI चा पूर्ण फॉर्म ‘Unified Payment Interface’, आणि मराठी मध्ये ‘एकात्मिक भरणा पद्धती’ असा होऊ शकतो. या सुवेधीची सुरुवात 11 एप्रिल 2015 रोजी नेशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि भारतीय रिजर्व बैंक (RBI) यांनी केली आहे. हा ऑनलाइन पेमेंट करण्यासाठीचा नवा मार्ग आहे, जो आत्ता भारतातील ऐकून पेमेंट व्यवहाराच्या ३०% (वर्ष २०२१) वर पोहचला आहे.

UPI चे फायदे काय आहेत ?

  • बँक अकाउंटचे माहिती न देता पैसे ट्रान्सफर करू शकतो, याचाच अर्थ तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहते
  • आर्थिक व्यवहार 24/7 करता येतात
  • आर्थिक व्यवहार करताना अधिकचे कोणतेही चार्जेस द्यावे लागत नाही
  • अगदी १ रुपाया पासून ते १० हजार पर्यंत पैसे पाठवू शकता, काही सेकंदात
  • खूप सुरक्षित आहे कारण पेमेंट करताना मोबाइल मध्ये बँकेला लिंक असलेले सिम लागते, त्याच बरोबर दोन पासवर्ड टाकावे लागतात, एक अँप ओपन करताना दुसरा पैसे पाठवताना
  • पैसे पाठवण्याची विनंती हि पाठवू शकता
  • बँक बॅलन्स चेक करण्यासाठी बँकेत जायची गरज नाही तुमच्या प्रोफाईल मध्ये जाऊन बघू शकता
  • ही पेमेंट सिस्टम भारत सरकारच्या देखरेखीखाली विकसित केली गेली त्यामुळे जास्त विश्वास ठेवू शकता
  • एकाच अँप मध्ये एकापेक्षा जास्त बँक अकाउंट लिंक करू शकता
  • तुमच्या UPI ID चा QR कोडे तयार करून शेअर करू शकता आणि दुसऱ्याचा QR कोड स्कॅन करून पैसे पाठवू शकता

UPI सुविधा देणारे App कोणते ?

  • BHIM UPI App
  • PhonePe
  • Paytm
  • Google Pay
  • Amazon Pay
FAQ

आपला यूपीआय आयडी कसा तयार करायचा ?

यूपीआय आयडी तयार करताना खालच्या गोष्टींची गरज आहे –
1) यूपीआय आयडी तयार करण्यासाठी तुमचे बँक खाते असणे गरजेचे आहे आणि त्याबोरोबर खात्याला मोबाइल नंबर हि लिंक असणे गरजेचे आहे
2) मोबाइल मध्ये SMS जाण्यासाठी बॅलन्स असला पाहिजे
3) एक स्मार्ट फोन आणि त्यामध्ये इंटरनेट कनेक्शन असले पाहिजे
4) शेवटचे तुमच्याकडे ATM कार्ड असले पाहिजे

मी माझा यूपीआय पिन विसरलो आहे, तो मला कसा रीसेट करू ?

जर तुम्ही तुमचा यूपीआय पिन विसरला असाल तर forgot pin ओपशन वर क्लिक करा. नंतर डेबिटचे शेवटचे 6 अंक व समाप्ती तारीख टाईप करा. नंतर OTP टाकून नवीन यूपीआय पिन तयार करण्यासाठीचे पेज ओपन होईल, त्यामध्ये दोन वेळा नवीन पिन टाका.

UPI पैसे ट्रान्सफर मर्यादा किती आहे ?

कमीत कमी १ रुपया आणि जास्तीत जास्त १० हजार रुपये एक वेळेस आणि दिवसाची मर्यादा १ लाख आहे.

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!