Government Yojana

प्रधानमंत्री उज्वला योजना ऑनलाईन अर्ज | PM Ujjwala Yojana Apply Online | Free Gas Connection Apply Online

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०१६ मध्ये सुरू झाली, यामध्ये गरीब कुटुंबातील महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन देणे हा मुख्य उद्देश आहे. चुलीवर स्वयंपाक करताना होणाऱ्या धुरामुळे महिलांचे आरोग्य बिघडू नये म्हणून ही योजना आणण्यात आली.

Ujjwala Yojana Apply Online Marathi

आता याच योजनेचा तिसरा टप्पा म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 3.0 सुरू झाला आहे. या टप्प्यात सरकार तुमच्या नावाने एलपीजी गॅस कनेक्शन मोफत देते. १४.२ किलोच्या सिलेंडरसाठी साधारण २०५० रुपये आणि ५ किलोच्या सिलेंडरसाठी १३०० रुपये पर्यंत अनुदान दिले जाते, त्यामुळे अर्जदाराला कनेक्शन घेताना स्वतःकडून काहीही भरावे लागत नाही.



हा संपूर्ण अर्जप्रक्रियेचा भाग आता ऑनलाइन झाला आहे. तुम्ही घरबसल्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरून फॉर्म भरू शकता, कागदपत्रे अपलोड करू शकता आणि नंतर तुमचा अर्ज मंजूर झाला की नाही हेही ऑनलाइनच तपासू शकता.

उज्ज्वला 3.0 ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

स्टेप 1: मध्ये सर्वात आधी तुम्ही भारत सरकारची अधिकृत वेबसाइट pmuy.gov.in ही आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर उघडता आणि वरच्या बाजूला दिसणाऱ्या मेनूमधून “Apply for New Ujjwala PMUY Connection” हा पर्याय निवडता.

स्टेप 2: मध्ये पेजवर उजवीकडे खाली दिसणाऱ्या Online Portal या बटणावर किंवा वर दिसणाऱ्या Click Here या लिंकवर क्लिक करून पुढच्या पोर्टलवर जाता.

स्टेप 3: मध्ये वेगवेगळ्या गॅस कंपन्यांची यादी दिसते; इथून तुम्हाला ज्या कंपनीकडून मोफत गॅस कनेक्शन घ्यायचे आहे त्या कंपनीसमोरचा Click here to apply हा पर्याय निवडता.

स्टेप 4: मध्ये तुमच्या स्क्रीनवर अर्जाचा फॉर्म उघडतो; येथे Type of Connection या भागात Ujjwala 3.0 New Connection हा पर्याय निवडून डिक्लेरेशनचा चेक बॉक्स टिक करावा, नंतर आपले राज्य आणि जिल्हा निवडून Show List वर क्लिक करावे.



स्टेप 5: मध्ये तुमच्या भागातील सर्व गॅस डिस्ट्रीब्युटरची नावे यादीत दिसतात; तुम्ही सोयीचा वाटणारा एक डिस्ट्रीब्युटर/एजन्सी निवडता.

स्टेप 6: मध्ये कॅप्चा कोड योग्य प्रकारे टाकून Submit बटणावर क्लिक करता आणि पुढच्या स्क्रीनवर जाता.

स्टेप 7: मध्ये Generate OTP वर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून Submit OTP बटणावर क्लिक करून मोबाईल नंबरची पडताळणी करता.

स्टेप 8: मध्ये New KYC चा चेक बॉक्स निवडून Proceed बटणावर क्लिक करता, जेणेकरून पुढील केवायसी तपशील भरण्यासाठी फॉर्म उघडतो.

स्टेप 9: मध्ये वर दिसणाऱ्या Is consumer migrant या प्रश्नात जर तुम्ही कायमच्या पत्त्यापेक्षा दुसऱ्या ठिकाणी राहायला आला असाल तर Yes निवडता, नसल्यास No निवडता;

मग Family Identifier मध्ये राशन कार्ड पर्याय निवडून राशन कार्ड क्रमांक लिहिता आणि Type of Scheme मध्ये आपल्या जातीनुसार योग्य पर्याय मार्क करून Family Identifier State मध्ये आपले राज्य निवडून Proceed वर क्लिक करता.

स्टेप 10: मध्ये Terms & Conditions चा बॉक्स टिक करून खाली असलेल्या चौकटीत घरात १८ वर्षांपेक्षा जास्त वयाचे पण अर्जदार वगळून इतर किती सदस्य आहेत ते आकड्याने लिहिता;

त्यानंतर त्या सर्व सदस्यांची नावे, अर्जदाराशी नाते आणि आधार क्रमांक एक-एक करून भरता व Add new family member वापरून बाकी सदस्यही जोडता, तसेच जर घरात पुरुष मुखिया नसेल आणि विधवा महिला घराची जबाबदारी सांभाळत असेल तर संबंधित चेक बॉक्स टिक करता.

स्टेप 11: मध्ये Personal Details या भागात अर्जदाराचे नाव, जन्मतारीख व इतर वैयक्तिक माहिती भरता आणि ज्या पत्त्यावर गॅस कनेक्शन घ्यायचे आहे तो पत्ता नीट लिहिता; यापूर्वी POA Category मध्ये पत्ता पुरावा म्हणून कोणता डॉक्युमेंट (उदा. आधार कार्ड) देणार हे निवडता.

स्टेप 12: मध्ये पत्ता पुरावा म्हणून निवडलेल्या दस्तऐवजाचा क्रमांक लिहून, आपला आधार क्रमांक आणि आधारवरील नाव टाकता, नंतर बँकेचा IFSC कोड लिहून Validate वर क्लिक करता; बँकेचे नाव येताच खाते क्रमांक व खाते प्रकार भरता आणि Package Selection मध्ये मोठा सिलेंडर हवा असल्यास 14.2 kg किंवा छोटा हवा असल्यास 5 kg असा पर्याय निवडता.

स्टेप 13: मध्ये तुम्ही शहरी भागात राहत असाल तर Urban किंवा ग्रामीण भागासाठी Rural हा पर्याय निवडून, खाली जिल्हा आणि गावाची माहिती भरता व शेवटी डिक्लेरेशनचा चेक बॉक्स टिक करून Submit या बटणावर क्लिक करता.

स्टेप 14: मध्ये पुढील स्क्रीनवर तुम्हाला Request ID दिसते; ती नीट जतन करून ठेवता आणि खाली दिसणाऱ्या Click here to upload document या पर्यायावर क्लिक करून कागदपत्र अपलोड करण्याच्या पेजवर जाता.

स्टेप 15: मध्ये राशन कार्ड किंवा फॅमिली आयडी, अर्जदाराचा आधार कार्ड इत्यादी स्कॅन करून अपलोड करता;

त्यानंतर डिप्रिव्हेशन डिक्लेरेशन फॉर्म ऑनलाइन डाउनलोड करून भरून त्याचा पीडीएफ तयार करून अपलोड करता, (सर्व checklist मध्ये NO लिहा)

डिप्रिवेशन डिक्लेरेशन फॉर्म डाउनलोड => Click Here <=

तसेच घरातील १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व सदस्यांचे आधार कार्ड स्कॅन करून टाकता, शेवटी डिक्लेरेशनचा चेक बॉक्स टिक करून Submit वर क्लिक करता; सबमिट केल्यावर वरच्या बाजूला Submit Status – Completed असे दिसते आणि तुमचा अर्ज निवडलेल्या गॅस एजन्सीकडे तपासणीसाठी जातो.


प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अर्ज स्थिती (Status) कसा पहावा?

अर्ज सबमिट झाल्यानंतर वेबसाइटवरच दिसणाऱ्या Check Status या पर्यायावर क्लिक करून तुम्ही स्टेटस पेजवर जाता.

तिथे फॉर्म भरताना मिळालेली Request ID आणि तुमची जन्मतारीख लिहून Generate OTP वर क्लिक करता आणि मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून Check Status क्लिक करता;

जर अर्ज मंजूर झाला असेल तर किती रक्कम मंजूर झाली आणि पैसे कसे मिळतील याचा तपशील दिसतो, अन्यथा Pending Request असा मेसेज दिसतो.

अर्ज मंजूर झाल्यावर निवडलेल्या डिस्ट्रीब्युटरकडून तुम्हाला फोन येतो आणि ठरलेल्या दिवशी एजन्सीवर जाऊन अर्जदाराच्या नावाने मोफत गॅस सिलेंडर व कनेक्शन घेता; यावेळी ज्याच्या नावाने अर्ज केला आहे ती व्यक्ती उपस्थित असणे आवश्यक असते.

कोणाला मिळेल PMUY 3.0 चे लाभ?

सरकारने काही प्राधान्य गट निश्चित केले आहेत:

  • बीपीएल (BPL) कुटुंबातील महिला
  • SECC 2011 यादीतील पात्र कुटुंबे
  • आयुष्मान भारत कार्डधारक कुटुंबे
  • अल्पसंख्याक / अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / ओबीसी / विशेष मागास वर्ग
  • दिव्यांग कुटुंब प्रमुख
  • विधवा / एकल महिला / बेवारस महिला
  • नदीकाठ, जंगलकाठ, दुर्गम भागातील महिला

कोणते सिलेंडर उपलब्ध आहेत?

  • 14.2 KG साधारण आकाराचा सिलेंडर
  • 5 KG छोटा सिलेंडर
  • सरकारकडून भांडी + रेग्युलेटर + होज पाइप मोफत दिले जातात
  • पहिल्या गॅस भरण्याचे पैसे सरकारकडून दिले जातात

आवश्यक कागदपत्रे – छोट्या स्वरूपात

  • ओळख व पत्त्याचा पुरावा (POA)
  • आधार कार्ड (लिंक असणे आवश्यक)
  • राशन कार्ड (पात्रतेसाठी सर्वात महत्त्वाचे)
  • बँक पासबुक / खाते तपशील
  • कुटुंबातील 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व सदस्यांचे आधार कार्ड

Tags: pm ujjwala yojana apply online, pm ujjwala yojana online apply 2025, pm ujjwala apply online, ujjwala yojana online apply, how to apply pm ujjwala yojana, pm ujjwala yojana registration, pm ujjwala yojana free gas connection, ujjwala yojana 3.0 apply online, pm ujjwala yojana apply online telugu, pm ujjwala yojana online apply hindi, pm ujjwala yojana 2.0 apply online, pm ujjwala yojana 3.0 online apply, ujjwala yojana online apply 2025, pm ujjwala yojana free cylinder apply, ujjwala yojana free cylinder registration, ujjwala yojana new update 2025, pm ujjwala yojna online form, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ऑनलाइन आवेदन, उज्ज्वला योजना 2025 आवेदन, pm gas connection apply online, pm ujjwala yojana apply online 2025 bharatgas, pm ujjwala yojana apply online 2025 maharashtra, pm ujjwala yojana free gas, pm ujjwala yojana apply online 2025 marathi

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!