उद्यम रेजिस्ट्रेशन घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने काढा (10 मिनिटात) | Udyam Aadhar Registration
नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी काही नवीन व उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण उद्योग नोंदणी म्हणजेच नवीन उद्यम नोंदणी (रेजिस्ट्रेशन) बद्दल जाणून घेणार आहोत, त्यात आपण उद्यम रेजिस्ट्रेशन कसे करायचे, त्याचे फायदे काय, यासर्व गोष्टीं बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
- उद्यम नोंदणी म्हणजे काय
- उद्यम रेजिस्ट्रेशन कोण करू शकतो
- नवीन उद्यम रजिस्ट्रेशन कसे करायचे
- उद्यम सर्टिफिकेट डाउनलोड कसे करायचे
- उद्योग आधार नोंदणी करण्याचे फायदे काय आहेत
मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखादा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करता तेव्हा सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे तुमच्या उद्योगाची नोंदणी म्हणजेच उद्योग रेजिस्ट्रेशन किंवा उद्यम रेजिस्ट्रेशन करणे. मित्रांनो, तुमचा उद्योग किंवा व्यवसाय छोटा असो किंवा मोठा त्याचे उद्यम रेजिस्ट्रेशन करणे महत्त्वाचे आहे. सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग किंवा मध्यम उद्योग क्षेत्रातील प्रत्येक उद्योजकाने आप-आपल्या उद्योगांचे उद्यम रेजिस्ट्रेशन करणे आता खूप महत्त्वाचे व अनिवार्य झाले आहे. पहिले रेजिस्ट्रेशन करण्याची पूर्ण प्रक्रिया खूप किचकट होती, पण आता मात्र उद्यम रेजिस्ट्रेशन करणे हे खूप सोपे व विनामूल्य झाले आहे. कारण आता तुम्ही तुमचे उद्यम रेजिस्ट्रेशन घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने करू शकणार आहात. ते कसे करायचे या बद्दल सविस्तर पणे जाणून घ्यायचे असेल तर हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
उद्यम नोंदणी म्हणजे काय? या बाबत थोडी माहिती
मित्रांनो, उद्यम नोंदणी ही MSME म्हणजेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय (इंग्लिश मध्ये Ministry of Micro, Small & Medium Enterprises) याने 1 जुलै 2020 पासून सुरू केली आहे. उद्योग नोंदणी प्रक्रिया ही पूर्ण पणे निशुल्क म्हणजे मोफत आहे. एकदा तुम्ही तुमच्या उद्योगाचे रेजिस्ट्रेशन केले की तुम्हाला कायमस्वरूपी एक नोंदणी क्रमांक मिळतो. यसेच नोंदणी पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट म्हणजेच प्रमाणपत्र ही तुम्हाला ऑनलाईन मिळते. यात सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एकदा का तुम्ही ही उद्यम नोंदणी केली की त्याची परत नूतनीकरण करण्याची गरज पडत नाही. तसेच ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या आधार क्रमांकची गरज पडते. इतर कोणतेही कागदपत्रे लागत नाहीत. उद्यम नोंदणी ही प्रक्रिया आता पूर्ण पणे ऑनलाईन झाली असून आयकर विभाग व जीएसटी सोबत संलग्न केली आहे.
मित्रांनो, उद्यम रेजिस्ट्रेशन हे मालकाच्या नावावर, उद्योग पार्टनरशीप मध्ये असेल तर मालका सोबत पार्टनरचे नाव रेजिस्ट्रेशन मध्ये टाकावे लागते. तसेच जर हिंदू अविभक्त कुटुंब असेल तर कर्त्या व्यक्तीच्या नावाने उद्यम नोंदणी केली जाते. किंवा कंपनी, सोसायटी किंवा ट्रस्ट बाबतीत स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तीच्या नावाने उद्यम रेजिस्ट्रेशन केले जाते.
उद्यम रेजिस्ट्रेशन कोण करू शकतो
आम्ही थोडक्यात उद्यम रेजिस्ट्रेशन कोण करू शकतो ते सांगतो –
पीक आणि प्राणी उत्पादन (शेतकरी), शिकार आणि संबंधित, अन्न/फूड प्रॉडक्ट उत्पादक (बेकरी), घाऊक आणि किरकोळ व्यापार आणि मोटरची दुरुस्ती वाहने आणि मोटारसायकल (गॅरेज), किरकोळ व्यापारी, हॉटेल आणि लॉज, शीतपेयांचे उत्पादक, कापडाचे उत्पादक आणि कपड्यांचे उत्पादक (टेलर), कागद आणि कागद संभंधित उत्पादनांचे उत्पादन, रसायने आणि रासायनिक उत्पादनांचे उत्पादन, रबर आणि प्लास्टिक उत्पादनांचे उत्पादन, कॉम्पुटर, इलेक्ट्रॉनिक आणि ऑप्टिकल उत्पादनांचे उत्पादन, विद्युत उपकरणांचे उत्पादन, फर्निचरचे उत्पादक, मशीनसामग्री आणि उपकरणांची दुरुस्ती आणि इंस्टॉलेशन, बिल्डिंग कंस्ट्रक्शन/ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर
जर तुम्हाला संपूर्ण यादी हवी असेल तर इथे क्लिक करून डाउनलोड करा, हि यादी अधिकृत ncs.gov.in वेबसाइट वर आहे. या यादीमध्ये तुमचा व्यवसाय येत असेल तरच तुम्ही उद्यम रेजिस्ट्रेशनसाठी पात्र असणार आहे. त्याच बरोबर उद्यम रेजिस्ट्रेशनसाठी उत्पन्नाची पात्रता खाली दिलेली आहे.
- ज्यांचा सूक्ष्म उद्योग आहे म्हणजे ज्याची एकंदरीत गुंतवणूक ही एक कोटीच्या आत असेल व वार्षिक उलाढाल पाच कोटींच्या आत आहे असे सूक्ष्म उद्योग उद्यम रेजिस्ट्रेशन करू शकतात.
- तसेच ज्यांचे लघु उद्योग आहेत म्हणजे ज्यांची एकंदरीत गुंतवणूक दहा कोटींच्या आत असेल व वार्षिक उलाढाल पन्नास कोटी पर्यंत असेल असे लघु उद्योग उद्यम रेजिस्ट्रेशन करू शकतात.
- याशिवाय ज्यांचे मध्यम उद्योग आहेत म्हणजेच ज्यांची गुंतवणूक पन्नास कोटीच्या आत आहे व वार्षिक उलाढाल 100 कोटी पर्यंत असेल असे उद्योग उद्यम रेजिस्ट्रेशन करू शकता.
पण जर गुंतवणूक 50 कोटीच्या वर असेल आणि वार्षिक उलाढाल 100 कोटी पेक्षा जास्त असेल तर असे उद्योग MSME क्षेत्रात मोजले जात नाही. म्हणजेच अश्या उद्योगांना उद्यम रेजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. तसेच त्यांना MSME उद्योगांसाठी असलेल्या योजनांचे लाभ ही मिळत नाहीत.
मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही याआधी तुमच्या उद्योगाचे किंवा व्यवसायाचे ‘उद्योग आधार’ काढले असेल किंवा EM 1 ( Entrepreneur Memorandum 1) आणि EM 2 (Entrepreneur Memorandum 2) काढले असेल तर तुम्ही त्याला ‘उद्यम रेजिस्ट्रेशन’ मध्ये परावर्तित (Migrate) करू शकता. व त्याचे म्हणजेच उद्यम रेजिस्ट्रेशनचे सर्टिफिकेट ही मिळवू शकता. उद्यम रेजिस्ट्रेशन सर्टिफिकेट कसे काढायचे हे आपण खाली बघणारच आहोत.
नवीन उद्यम रजिस्ट्रेशन प्रोसेस
उद्यम रेजिस्ट्रेशन कसे करायचे व उद्यम सर्टिफिकेट कसे काढायचे हे जाणून घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
स्टेप 1: मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला उद्यम रेजिस्ट्रेशन च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यायची आहे.
उद्यम रेजिस्ट्रेशनची अधिकृत वेबसाइट लिंक => udyamregistration.gov.in
त्या नंतर होम पेज वर आल्यावर तुम्हाला डाव्या बाजूला MSME / Udyam Registration Process असे लिहिलेले दिसेल. त्याखाली असलेल्या पहिल्या बॉक्स वर म्हणजेच For New Entrepreneur who are not Register yet as MSME असे लिहिलेले दिसेल त्यावर क्लीक करायचे आहे.
स्टेप 2: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे व आधार वर असलेले नाव जसेच्या तसे दिलेल्या जागी टाकायचे आहे. व नंतर खाली दिलेल्या Validate & Generate OTP या बटन वर क्लिक करायचे आहे. नंतर आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर तुम्हाला एक ओटीपी येईल तो टाकायचा आहे. व Validate या बटन वर क्लिक करायचे आहे.
नोट – इथे आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आधार कार्डशी तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.
स्टेप 3: मित्रांनो, आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला Type of Organisation म्हणजेच तुमच्या व्यवसायाचा प्रकार विचारला जाईल. त्यात तुमचा बिझनेस प्रोप्राइटर आहे की पार्टनरशीप मध्ये आहे, कंपनी आहे की एखादी को- ऑपरेटिव्ह बँक आहे, सोसायटी आहे की ट्रस्ट आहे ते सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला दिलेल्या टर्म्स आणि कँडीशन्स ऍक्सेप्ट करून PAN Validate या बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 4: त्या नंतर तुम्ही ITR भरला आहे का ते विचारले जाईल. हे पोर्टल तुमच्या पॅन कार्डचा उपयोग करून तुमच्या ITR च्या ओपशन ऑटोमॅटिक निवडेल. आता तुम्हाला GSTIN नंबर विचारला जाईल. जर तुमच्या कडे जीएसटी (GST) नंबर असेल Yes बटन वर क्लिक करा व नसेल तर No बटन सिलेक्ट करायचा आहे.
स्टेप 5: या नंतर तुमचे नाव ऑटोमॅटिक तिथे लिहिलेल दिसेल. व त्या खाली तुमचा मोबाईल नंबर व ई-मेल आयडी टाकायचा आहे.
स्टेप 6: त्यानंतर तुमची कॅटेगरी म्हणजे SC, ST, OBC वगैरे सिलेक्ट करायची आहे. त्या नंतर Gender सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतरच्या पॉईंट मध्ये तुम्ही दिव्यांग आहात की नाही ते टाकायचे आहे.
स्टेप 7: त्या नंतर तुम्हाला Name of Enterprise म्हणजेच तुमच्या बिझनेस चे किंवा शॉप चे नाव टाकायचे आहे. त्यानंतर Plan/ Unit चे नाव म्हणजेच जर तुमच्या दोन कंपन्या असतील तर त्याचे नाव टाकायचे आहे.
स्टेप 8: आता या नंतर ज्या युनिट चे नाव तुम्ही टाकले आहे त्याचाच अड्रेस म्हणजेच पत्ता टाकायचा आहे. व नंतर Add plan या बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 9: आता Official address of enterprise मध्ये पुन्हा तुमच्या व्यवसायाचा पत्ता टाकायचा आहे.(इथे फक्त तुमच्या मुख्य कंपनीचा पत्ता टाकायचा आहे. कंपनीची शाखा असेल तर त्याचा पत्ता टाकायचा नाही.)
स्टेप 10: आता खाली तुम्हाला EM /UAM registered number विचारला जाईल. जर तुमच्याकडे तो नंबर असेल तर EM ll हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. किंवा जर प्रिव्हीअस UAM नंबर असेल तर तुम्हाला तो नंबर टाकायचा आहे.
आता तुम्हाला Date of Incorporation म्हणजेच तुम्ही तुमचा व्यवसाय कधी सुरू केला त्याची तारीख टाकायची आहे. व Whether production मध्ये तुमची कंपनीचे प्रोडक्शन असेल तर Yes करा व नसेल तर No ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 11: आता तुम्हाला Bank Details टाकायचे आहे. त्यात तुमच्या बँकेचे नाव, IFSC कोड, व तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे.
स्टेप 12: या नंतर तुम्हाला Major Activity of Unit मध्ये तुम्ही काही मॅनुफॅक्चर (Manufacturing) करताय की सर्व्हिस (Services) देताय ते सिलेक्ट करायचे आहे.
स्टेप 13: नंतर खाली NIC Code विचारला जाईल. इथे तुमचा काय व्यवसाय आहे ते टाका. जर हॉटेलचा व्यवसाय असेल तर फक्त Hotel, Bakery वगैरे टाकून खाली जे नाव येईल ते सिलेक्ट करा. ( इथे जर तुमच्या व्यवसायाचे नाव येत नसेल तर तुम्ही उद्यम सर्टिफिकेट काढायची गरज नाही. आम्ही वरती PDF जोडली आहे त्यामध्ये एकदा तुमचा व्यवसाय सर्च करा.) त्यानंतर Add activity वर क्लिक करायचे आहे. व तुमचा NIC 2 Digit code, NIC 4 Digit code, NIC 5 Digit code ऑटोमॅटिकली येऊन जाईल. आलेले कोड बरोबर नसतील तर तुम्ही स्वतः बदल करू शकता. व नंतर Add बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 14: आता Number of persons employed मध्ये तुमच्या शॉप किंवा बिझनेस मध्ये किती लोक काम करतात ते टाकायचे आहे. इथे पुरुष किती व स्रिया किती त्यांची संख्या पण टाकायची आहे.
स्टेप 15: आता पुढे तुम्हाला Investment in Machinery मध्ये तुम्ही तुमच्या व्यवसाय मध्ये किती इन्व्हेस्टमेंट केली आहे ते टाकायचे आहे. इथे 2018-19 मध्ये किती इन्व्हेस्टमेंट केली ते टाकायचे आहे. त्या नंतर तुमची कंपनी असेल तर पोल्युशन/प्रदूषण कंट्रोलसाठी तुम्ही किती खर्च केला आहे ते टाकायचे आहे. आणि जर तुमच्या व्यवसायाचा पर्यावरणाशी काही संबंध येत नसेल तर तो पॉईंट सोडून द्यायचा आहे.
आता तुमचा Total Turnover टाकायचा आहे. इथे तुमचा वर्षाचा टर्न ओव्हर टाकायचा आहे.
स्टेप 16: आता पुढच्या पॉईंट मध्ये तुम्हाला जर गव्हर्नमेंटच्या e- market ला रेजिस्टर करायचे असेल तर Yes करायचे आहे किंवा नसेल करायचे तर No बटन सिलेक्ट करायचा आहे.
आता तुम्ही TReDS साठी इंटरेस्टेड आहात का असे विचारले जाईल. तर इथे तुम्ही yes किंवा no सिलेक्ट करू शकता.
स्टेप 17: त्यानंतर खाली दिलेल्या टर्म्स आणि कँडीशन्स ऍक्सेप्ट करून नंतर Submit & Get Final OTP वर क्लिक करायचे आहे. इथे तुम्ही टाकलेला डेटा परत बदलू शकत नाही असा मेसेज येईल. व नंतर Ok बटन वर क्लिक करायचे आहे. आणि जर तुम्हाला टाकलेली माहिती परत चेक करायची असेल तर Cancel बटन वर क्लिक करायचे आहे.
आता तुम्ही वर टाकलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो दिलेल्या जागी टाकून कॅपचा टाकायचा आहे व Final Submit बटन वर क्लिक करायचे आहे. व नंतर Ok बटन वर क्लिक करायचे आहे. व थोड्याच वेळात तुमचे उद्यम रेजिस्ट्रेशन पूर्ण होईल व वरती तुम्हाला तुमचा उद्यम नंबर आलेला दिसेल. तसा तुम्हाला ई-मेल आणि SMS ही येईल. तर हा उद्यम नंबर कॉपी करून सेव्ह करून घ्यायचा आहे.
त्यानंतर नेक्स्ट पेज वर तुम्हाला Thank you for visiting Udyam Registration Portal असा मेसेज येईल त्याच्या खाली Print ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही त्याची प्रिंट ही काढू शकता.
उद्यम सर्टिफिकेट डाउनलोड कसे करायचे
स्टेप 1: मित्रांनो, आता 5 ते 6 दिवसा नंतर तुम्हाला परत उद्यम रेजिस्ट्रेशनच्या वेबसाईट वर येऊन वरती Print / Verify या ऑप्शन मध्ये Print Udyam certificate या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 2: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला Udyam Registration number टाकायचा आहे. व नंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. व OTP on… ऑप्शन निवडून Validate & Generate OTP बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 3: आता तुमच्या मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी दिलेल्या जागी टाकून खाली Validate OTP & Login या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. व लगेच तुमच्या समोर तुमचे उद्यम रेजिस्ट्रेशन डिटेल्स येऊन जातील तुम्हाला. आता सर्टिफिकेट डाउनलोड/प्रिंट करण्यासाठी Print Certificate बटन वर क्लिक करायचे आहे.
आता तुम्हाला तीन ऑप्शन पैकी दुसरा ऑप्शन Print with Annexure सिलेक्ट करायचा आहे. म्हणजेच तुमच्या उद्यम सर्टिफिकेट सोबत त्याचे Annexure सुद्धा येईल.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे तुम्ही तुमचे उद्यम सर्टिफिकेट घर बसल्या काढू शकता. आणि हो तुम्ही काढलेल्या कलरफुल उद्यम सर्टिफिकेटला लॅमीनेशन करायला विसरू नका.
उद्योग आधार नोंदणी करण्याचे फायदे
- मित्रांनो, उद्योग आधार नोंदणीमुळे आता कोणत्याही उद्योजकाला त्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही.
- तसेच तुम्ही तुमच्या व्यवसायाची ऑनलाईन नोंदणी जर शकत असल्याने तुमचा वेळ आणि पैसा वाचतो.
- मित्रांनो, उद्योग आधार नोंदणी केल्यावर तुम्ही किंवा कोणताही उद्योजक सर्व सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतो.
- सुरुवातीच्या काळात डायरेक्ट टॅक्स (प्रत्यक्ष करात) सूट मिळू शकते.
- जर तुमच्या उद्योगाची उद्योग आधार नोंदणी असेल तर कोणत्याही कोलॅटरल शिवाय लोन मिळू शकते.
- या शिवाय उद्योग आधार नोंदणी करून उद्योग सुरू केला तर तुम्हाला सरकार कडून सबसिडी देखील मिळते.
- ट्रेडमार्क आणि पेटंट फी वर 50% पर्यंत लाभ मिळू शकतो
- उद्यम आधार नोंदणी केल्यामुळे तुम्हाला वीज बिल सूट मिळू शकते. तसेच व्याजदरात सूट किंवा कमी व्याजदरात कर्ज मिळू शकते.
- तसेच तुम्हाला जर बँकेत चालू (करंट) खाते काढायचे असेल तर त्यासाठी उद्योगाच्या नावावर दोन पुरावे द्यावे लागतात. तर इथे तुम्ही तुमचे उद्यम रेजिस्ट्रेशन सर्टिफिकेट पुरावा म्हणून दाखवू शकता.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण उद्यम रेजिस्ट्रेशन कसे करायचे व उद्यम सर्टिफिकेट कसे काढायचे या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असल्यास किंवा महत्व पुर्ण वाटली असल्यास तुमच्या मित्र मंडळी पर्यंत नक्की शेअर करा. तसेच अश्या नवनवीन व महत्व पुर्ण माहितीसाठी आमच्या वेबसाईटला पुन्हा नक्की भेट द्या. धन्यवाद।
FAQ
उद्यम रेजिस्ट्रेशन करण्यासाठी किती शुल्क भरावे लागते?
मित्रांनो, उद्यम रेजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागत नाही. ही पूर्ण प्रक्रिया निःशुल्क म्हणजेच मोफत आहे.
उद्यम सर्टिफिकेटची वैधता म्हणजेच व्हॅलीडिटी किती आहे?
मित्रांनो, उद्यम सर्टिफिकेट ची व्हॅलीडिटी नसते. जो पर्यंत तुमचा व्यवसाय आहे तो पर्यंत उद्यम सर्टिफिकेट वैध असते. तसेच त्याला नूतनीकरण करण्याची ही आवश्यकता नसते.
ऑनलाईन उद्यम आधार नोंदणी करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
मित्रांनो, MSME म्हणजेच उद्यम आधार नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे लागत नाहीत. ऑनलाईन उद्यम आधार नोंदणी ही प्रक्रिया पूर्ण पणे कागदविरहीत आहे. ऑनलाईन उद्यम नोंदणी करताना फक्त आधार नंबर, पॅन नंबर व बँकेचे डिटेल्स भरावे लागतात.