Shop

पुरुषांसाठी भारतातील सर्वात बेस्ट ट्रीमर | Best Trimmer for Men in India

नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन लेखात तुमचे पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो. आजचा लेख हा खास करून पुरुषांसाठी आहे. आज आपण पुरुषांसाठी असलेल्या ट्रीमर बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तसेच ट्रीमर खरेदी करताना कोणत्या गोष्टी पहाव्यात व सर्वात बेस्ट ट्रीमर कोणते आहेत या बद्दल ही जाणून घेणार आहोत.

Best Trimmer for Men in India

मित्रांनो, कोणत्याही पुरुषाचा दाढीचा भाग हा नेहमी हायलाइट होतो. कारण पुरुषांच्या दिसण्यातला सर्वात महत्वाचा घटक म्हणजे दाढी. आणि हीच दाढी जर व्यवस्थित ट्रिम केली असेल तर तुमच्या लुक मध्ये आणि सुंदरतेत भर पडते. पण नियमित दाढी करायची असेल तर सलून मध्ये जाणे परवडत नाही, त्यामुळे तुमच्याकडे स्वतःचा ट्रीमर असणे आवश्यक असते. एक ट्रीमर बऱ्याच गोष्टी पटकन करू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला दाढी असेल तर तुमच्या किट मध्ये ट्रीमर हे असायलाच हवे. बाजारात अनेक वेग-वेगळ्या क्वालिटीचे ट्रीमर उपलब्ध आहेत, पण त्यातल्या त्यात स्वतःसाठी कोणता ट्रीमर योग्य राहील हे ठरवणे थोडे कठीण काम होऊ शकते. पण काळजी करू नका आज आम्ही तुम्हाला त्या बद्दलच माहिती देणार आहोत. त्यामुळे शेवट पर्यंत हा लेख नक्की वाचा.



सर्वात आधी जाणून घेऊ या की ट्रीमर खरेदी करताना कोणत्या गोष्टी पहाव्यात

ब्लेड क्वालिटी – मित्रांनो कोणत्याही ट्रीमर मध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे ब्लेड्स. हे ब्लेडस पण वेग-वेगळ्या प्रकारात येतात. तुमच्या ट्रीमरच्या ब्लेड ची क्वालिटी ही नेहमी स्टेनलेस स्टीलची असावी. कारण स्टेनलेस स्टीलचे ब्लेडस टिकाऊ असतात. तसेच तुम्ही कार्बन स्टीलचे ब्लेड ही वापरू शकता, पण ते लवकर गंजतात. तसेच गंज टाळण्यासाठी तुम्ही टायटॅनियम कॉटेड असलेले ब्लेड ट्रीमर पण वापरू शकता. ते गंजत नाही आणि खूप टिकाऊ असतात. तसेच तुम्ही सिरॅमिक ब्लेडस पण वापरू शकता, हे ब्लेड खूप तिक्ष्ण असतात. पण ते खूप नाजूक असल्याने लवकर तुटू शकतात. त्यामुळे ट्रीमर खरेदी करताना त्याचे ब्लेडस कोणत्या क्वालिटी चे आहेत ते नक्की तपासून पहा.

अटैच्मन्ट (Attachment) – जर तुम्हाला तुमच्या दाढी सोबत वेग-वेगळे लुक करायला आवडत असेल तर तुम्हाला वेग-वेगळे प्रकारचे attachment असलेले ट्रीमर निवडावे लागेल. यामध्ये दाढी सोबत वेग-वेगळे लुक करण्यासाठी विविध प्रकारचे कंगवे पण दिले जातात.

ट्रिमिंग लांबी (लेंथ) व रेंज – मित्रांनो तुमच्या ट्रीमरची ट्रीमिंग लेंथ किती आहे त्यावर तुमचे केस तुम्ही किती बारीक ट्रिम करून शकता ते ठरते. केस किती बारीक ट्रिम करायचे आहे त्यानुसार तुम्हाला त्या रेंज चे ट्रीमर निवडावे लागेल. शक्यतो ट्रीमर 0.5 ते 18 mm पर्यंतची लेंथ किंवा रेंज मध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे तुमच्या आवडी नुसार तुम्ही ट्रीमिंग रेंज ठरवायची आहे. व त्यानुसार ट्रीमर खरेदी करा. पण कमीत कमी तुमच्या ट्रीमर मध्ये 0.5 mm ची रेंज आहे की नाही ते नक्की चेक करा.

वॉटर प्रूफिंग – मित्रांनो, ट्रीमर वापरायचे म्हणजे ते पाण्याच्या संपर्कात येणारच. शिवाय ट्रीमर हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. आणि जर ते पाण्याच्या संपर्कात आले तर शॉर्ट सर्किट वगैरे होऊ शकते किंवा करंट ही बसू शकतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही ट्रीमर खरेदी कराल तेव्हा तो वॉटर प्रूफ आहे की नाही ते नक्की चेक करा.

वजन – मित्रांनो, स्वतः साठी ट्रीमर निवडताना तो नेहमी वजनाने हलका असलेला निवडावा. त्यामुळे तो वापरण्यास सोपा पडतो. व त्यामुळे तुम्ही दाढी पण इझिली करू शकाल.



कॉर्ड आणि कॉर्डलेस ट्रीमर – मित्रांनो, तुम्ही कोर्डेड किंवा कॉर्डलेस ट्रीमर वापरू शकता. कॉर्ड ट्रीमरसाठी तुम्हाला पॉवर अडॅप्टर ची गरज पडू शकते. तर कॉर्डलेस ट्रीमरला चार्जिंग करून तुम्ही वापरू शकता. कॉर्डलेस ट्रीमर हे पोर्टेबल असून ते तुम्ही प्रवासात किंवा कुठेही घेऊन जाऊ शकता.

बॅटरीचा चार्जिंग वेळ – मित्रांनो, तुम्ही जर कॉर्डलेस ट्रीमर घेणार असाल तर बॅटरी रन टाइम चांगला असणारच घ्या. शक्यतो कमीत कमी 60 ते 90 मिनिटं रन टाइम देणारा ट्रीमर शोधावा. तसेच ट्रीमरला चार्जिंग होण्यासाठी किती वेळ लागतो ते सुद्धा चेक करावे. काही ट्रीमर चार्जिंगसाठी सहा ते सात तास लावतात तर काही दोन ते तीन तासात चार्ज होतात. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष देणे पण तेवढेच महत्वाचे आहे.

सर्वात चांगले ट्रीमर

आता पुरुषांसाठी भारतातील सर्वात चांगले ट्रीमर कोणते आहेत ते जाणून घेऊ या

Philips Hair Clipper Trimmer

1) फिलिप्स (Philips Hair Clipper Trimmer)

मित्रांनो, फिलिप्सच्या या ट्रीमर मध्ये तुम्हाला डबल शार्पन्ड (धारदार) ब्लेडसचा वापर केलेला दिसून येईल. तसेच यात तुम्हाला 13 लेंथ सेटिंगस बघायला मिळतात. तसेच यात तुम्हाला ट्रीमिंग रेंज ही 0.5 ते 23 mm पर्यंत दिली आहे. या शिवाय तुमच्या दाढीला वेग वेगळे लुक्स देण्यासाठी यात युनिव्हर्सल कॉम्ब सुद्धा देण्यात आले आहे. या ट्रीमर चे वजन ही खूप कमी म्हणजे फक्त 351 ग्रॅम आहे. या ट्रीमर वर तुम्हाला दोन वर्षांची वॉरंटी मिळते. या ट्रीमर ची किंमत बघायची झाली तर हे ट्रीमर तुम्हाला 1100 रुपये पर्यंत ऍमेझॉन वर मिळू शकते.

VGR V-130 Hair Clipper Trimmer

2) VGR V-130 Rechargeable Hair Trimmer

मित्रांनो, या ट्रीमरमध्ये तुम्हाला सेल्फ शार्पनिंग ब्लेडस बघायला मिळतील. शिवाय या ब्लेडस ला मेन्टेन करण्यासाठी तुम्हाला ब्लेड ऑइल पण या प्रोडक्ट सोबत दिले गेले आहे. तसेच यात तुम्हाला चार attachment दिले आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या दाढी सोबत वेग वेगळे लुक किंवा स्टाइल करू शकता. यात ट्रीमिंग रेंज पण 0.5 mm ते 12 mm पर्यंत लेंथ उपलब्ध आहे.

तसेच या ट्रीमर मध्ये तुम्हाला 10 वॅट पॉवर असलेली मोटर मिळते. ज्याचा आवाज हा खूप कमी म्हणजे 60 db पर्यंत आहे. याचे ब्लेडस पण वॉटर प्रूफ आहेत. तसेच या ट्रीमर वर तुम्हाला तीन महिन्यांची वॉरंटी बघायला मिळते. आणि ऍमेझॉन वर या प्रोडक्ट ची किंमत ही अंदाजे 1250 रुपये पर्यंत असू शकते.

VGR V-123 Professional Hair Clipper

3) VGR V – 123 Professional Hair Trimmer

मित्रांनो, या ट्रीमर मध्ये तुम्हाला सेल्फ शार्पनिंग स्टेनलेस स्टीलचे ब्लेडस मिळतात. तसेच यात चार attachment कॉम्ब दिले आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या दाढी सोबत कोणताही लुक ट्राय करू शकता. या ट्रीमर चा आवाज ही खूप कमी म्हणजे फक्त 60 db पर्यंत आहे. या ट्रीमर ची रेंज ही 0.8 ते 12 mm पर्यंत देण्यात आली आहे. आणि त्यासाठी तुम्हाला या ट्रीमर मध्ये एक LED डिस्प्ले पण दिला गेला आहे.

तसेच याची लेंथ सेटिंग करण्यासाठी यात ऍडजस्टेबल टॅपर लेव्हर पण देण्यात आली आहे. त्यामुळे हा ट्रीमर लुक वाइझ आणि यात असलेले फ़ंक्शन्स यामुळे हा ट्रीमर खूप चांगला मानला जातो. हा ट्रीमर कोर्डेड आहे व या कॉर्ड ची लेंथ ही दोन मीटर पर्यंत दिली आहे. या ट्रीमर वर तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी देण्यात येत आहे. याच्या किमती बद्दल सांगायचे झाले तर या ट्रीमरची किंमत ही अंदाजे 1500 रुपये पर्यंत तुम्हाला ऍमेझॉन वर मिळू शकते.

Panasonic Corded-Cordless Rechargeable Trimmer

4) (पॅनासोनिक) Panasonic Corded/Cordless Rechargeable Trimmer

मित्रांनो, पॅनासोनिकच्या ट्रीमर मध्ये तुम्हाला एक स्पेशल फिचर बघायला मिळते, की हे ट्रीमर कोर्डेड आणि कॉर्डलेस पण आहे. म्हणजे तुम्ही यात दिलेल्या दोन्ही फ़ंक्शन्सचा उपयोग करू शकता. तसेच हे ट्रीमर वजनाने हलके असल्याने ते तुम्ही कुठेही सहज कॅरी करू शकता. याशिवाय यात तुम्हाला 0.2 ते 18 mm पर्यंत ची लेंथ सेटिंग करता येते. तसेच यात तुम्हाला चार ऍडजस्टेबल कोम्ब बघायला मिळतील. यात तुम्हाला वॉशेबल डिटॅचेबल ब्लेड मिळतात. या ट्रीमर वर तुम्हाला दोन वर्षांची वॉरंटी मिळत असून या ट्रीमरची किंमत ही तुम्हाला ऍमेझॉन वर 1800 रुपयेच्या जवळ पास मिळू शकते.

Wahl Classic Cored Bearded and Hair Clipper

5) Wahl Classic Cored Bearded and Hair Trimmer

मित्रांनो, हे ट्रीमर मार्केट मध्ये खूप लोकप्रिय आहे. WAHL कंपनी अमेरिकन बेस्ड कंपनी आहे. आणि या कंपनीचे ट्रीमर खूप चांगल्या क्वालिटीचे असतात. हा ट्रीमर खास करून सलून मध्ये वापरले जातात. या ट्रीमरचे ब्लेड हे क्रोम प्लेटेड बनलेले आहेत, त्यामुळे यांची क्वालिटी पण चांगली आहे. तसेच यात जितके ब्लेडस दिले आहेत ते सगळे रिमुवेबल असून ते वॉशेबल सुद्धा आहेत. म्हणजे तुम्ही त्यांना धुऊ पण शकता.

तसेच यात ऍडजस्टेबल लेव्हर पण दिले आहे. तसेच यात चार attachment कोम्ब पण दिले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या दाढी सोबत कोणताही स्टायलिश लुक ट्राय करू शकता. मित्रांनो, या ट्रीमर वर तुम्हाला दोन वर्षांची वॉरंटी मिळते व ऍमेझॉन वर याची किंमत ही अंदाजे 2800 ते 2900 रुपये च्या जवळ पास असू शकते.

ट्रीमर चे फायदे

  • मित्रांनो, ज्या लोकांना आपल्या दाढी सोबत वेगवेगळे लुक करायला आवडतात त्यांच्यासाठी ट्रीमर खूप उपयोगी आहे.
  • ट्रीमर वापरताना चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे कट किंवा ओरखडे होत नाहीत. त्यामुळे जे लोक दाढी करायला घाबरतात त्यांच्यासाठी ट्रीमर वापरणे चांगला पर्याय आहे.
  • ट्रीमर वापरताना त्वचेवर शेविंग क्रीम लावण्याची गरज पडत नाही.
  • ट्रीमर हे पोर्टेबल असतात. आणि काही ट्रीमर हे combs attachment सह येतात. त्यामुळे ट्रीमर असल्या वर तुम्हाला कैची व कंगवा किंवा इतर शेव्हिंग उपकरणे सोबत ठेवण्याची गरज पडत नाही.
  • बरेचशे ट्रीमर हे वॉटर प्रूफ असतात. त्यामुळे करंट किंवा शॉर्ट सर्किट होत नाही.

ट्रीमर चे तोटे

  • मित्रांनो, तुम्हाला जर क्लीन शेव्हिंग करायची असेल तर ट्रीमरचा वापर करू शकत नाही. कारण ट्रीमर केस पूर्ण पणे काढू शकत नाही.
  • ओल्या केसांवर ट्रीमर वापरता येत नाही. त्यामुळे ट्रीमर वापरण्या आधी दाढीचे केस कोरडे असायला हवेत.

ट्रीमर मेन्टेन ठेवण्यासाठी काय करावे

मित्रांनो, तुम्हाला जर तुमचा ट्रीमर दीर्घ काळ टिकवायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. तुमचा ट्रीमर नियमित स्वच्छ करा. तसेच जर तुमचा ट्रीमर वॉशेबल नसेल तर तो पाण्याखाली धुऊ नका. त्यामुळे त्याचे ब्लेडस गंजतील किंवा ट्रीमर तुटू पण शकतो. ट्रीमरला नियमित ऑइलिंग करा. काही ट्रीमरच्या किट सोबत ऑइल पण येते. त्याचा उपयोग करा. ट्रीमरला ऑइलिंग केल्याने त्याचे वंगण चांगले राहते व तुमचे ट्रीमर दीर्घ काळ टिकते. जास्तीचे तेल असेल तर ते एक कपड्याने पुसून घ्या. अश्या प्रकारे तुम्ही तुमच्या ट्रीमर ची काळजी घेऊन त्याला मेन्टेन ठेवू शकता.

तर मित्रांनो, तुम्हाला ही जर दाढी ठेवण्याची आवड असेल तर तुमच्याकडे एक ट्रीमर तर असायलाच हवा. आशा करतो की आजचा हा लेख तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तसेच हा लेख आवडला असल्यास तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद।

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!