हे 5 सरकारी ऍप्स तुमच्या मोबाईल मध्ये असायलाच हवेत | Top 5 Government Apps
नमस्कार मित्रांनो, आज आपण काही अश्या सरकारी ऍप्स बद्दल जाणून घेणार आहोत जे तुमच्या मोबाईल मध्ये असतील तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. तर ते कोणते पाच सरकारी ऍप्स आहेत, या बद्दल आज आपण सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, आपला भारत देश सध्या डिजिटलायझेशन कडे वाटचाल करतोय. आणि गेल्या काही वर्षात आपल्या दशात अनेक प्रकारचे व्यवहार हे डिजिटल पद्धतीने च केले जात आहे. याचे कारण म्हणजे गुगल वर उपलब्ध असणारे ऍप्स. मित्रांनो, गुगल प्ले स्टोर वर असणारे ऍप्स हे उपयुक्त असले तरी देखील त्यांच्या विश्वसनीयतेच्या बाबतीत थोडीफार शंका ही वाटतेच. पण मित्रांनो, दुसरीकडे गुगल प्ले स्टोअर वर आपल्या भारत सरकारचे अनेक अधिकृत ऍप्स आहेत ज्यावर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवू शकता.
मित्रांनो, तुम्हाला माहित असेल च की भारत सरकारने डिजिटल इंडिया अंतर्गत मोठ्या प्रमाणात ऍप्स लाँच केले आहेत. या मोबाईल ऍप्स द्वारे लोकांना अत्यावश्यक सेवा, सुविधा दिल्या जात आहेत. याशिवाय भारत सरकार तर्फे कायमच स्मार्टफोन यूजर्ससाठी वेळोवेळी अपडेटेड मोबाइल ऍप्स उपलब्ध करण्यात येतात. आणि महत्वाचे म्हणजे इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून हे ऍप्स सुरक्षित रीत्या संचलित केले जातात. सध्याचे सायबर गुन्हे बघता अधिकृत आणि सुरक्षित ऍप्सचा वापर करणे खूप गरजेचे आणि महत्वाचे आहे. असेच काही सरकारी आवश्यक ऍप्स आहेत जे तुमच्या मोबाईल मध्ये असायलाच हवे.
या सरकारी ऍप्स मध्ये उमंग, mygov, mAADHAR, mParivahan यां सारख्या काही महत्वाच्या ऍप्स चा समावेश आहे. या सर्व व इतरही काही महत्त्वाच्या ऍप्स बद्दल खाली आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. पण त्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
mParivahan/ यम परिवहन
मित्रांनो, mParivahan हे ऍप महाराष्ट्र परिवहन तर्फे जरी करण्यात आलेले सरकारी ऍप आहे. हे ऍप जारी करण्यामागचा मुख्य उद्देश असा आहे की तुम्हाला तुमच्या वाहन संबंधीत असणारी वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रे जसे की आरसी, ड्रायव्हिंग लायसन्स, इन्शुरन्स पेपर वगैरे कागदपत्रे सोबत बाळगावी लागणार नाहीत, कारण या ऍप्लिकेशन द्वारे च तुम्ही या सर्व गोष्टी व्हर्च्युअल प्रकारे डाउनलोड करून ठेवू शकता. याशिवाय तुम्हाला जर इतर कोणतीही माहिती मिळवायची असेल तर तुम्ही mParivahan App द्वारे ते अगदी कमी वेळात मिळवू शकता.
तसेच या ऍप्लिकेशन द्वारे तुम्ही कोणत्याही वाहनाचा नोंदणी क्रमांक टाकून त्या वाहनाची माहिती मिळवू शकता. तसेच या ऍप मध्ये तुम्ही आरटीओ शी संबंधित सर्व सुविधांचा लाभ घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही आणि तुम्ही कमी वेळेत सर्व कामे करू शकता. तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स देखील तुम्ही यात व्हर्च्युअल रीतीने सेव्ह करून ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या लायसन्स चे काही डिटेल्स टाकावे लागतील, जसे की नंबर व डेट ऑफ बर्थ वगैरे. आणि ओटीपी आपल्यावर तुमचे व्हर्च्युअल ड्रायव्हिंग लायसन्स तयार होऊन जाईल. आणि हे लायसन्स प्रत्येक ठिकाणी व्हॅलिड आहे.
DigiLocker/ डिजीलॉकर
मित्रांनो, नावाप्रमाणेच हे ऍप आहे. हे एखादया बँक लॉकर सारखेच तुमचे डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवते. हे ऍप इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालया द्वारे विकसित करण्यात आले आहे. यात issued document नावाचे एक मेनू असते. ज्यात तुम्ही तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन्स, बोर्ड मार्कशीट वगैरे डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवू शकता.
फक्त हे अँप युझ करण्याआधी यात तुम्हाला तुमचे अकाउंट बनवावे लागते. मित्रांनो, या ऍप चा सर्वात मोठा फायदा म्हणजे यात आपली डॉक्युमेंट्स एकदम सुरक्षित राहतात. तसेच डिजीलॉकर वरील सर्व कागदपत्रे ही सरकारी व गैर सरकारी संस्थां मध्ये व्हॅलीड असतात.
Umang App/ उमंग अँप
मित्रांनो, सरकारी योजनांबद्दल जाणून घ्यायचे असेल तर उमंग ऍप तुमच्या कडे असायलाच हवे. हे अँप युझ करण्याआधी यात तुम्हाला तुमचे अकाउंट बनवावे लागते। मगच तुम्ही ते वापरू शकता. उमंग ऍप द्वारे तुम्ही बिल पण जमा करू शकता व त्या संबंधित काही तक्रारी देखील करू शकता. तसेच पीएफ बद्दल ची सर्व कामे तसेच आधार नंबर ऍड करणे किंवा पासबुक चेक करणे वगैरे काम तुम्ही या ऍप च्या माध्यमातून करू शकता.
मित्रांनो, सरकारच्या जवळजवळ 21,815 सर्व्हिसेस या ऍप मध्ये आहेत. तसेच सरकारच्या विविध स्कीम बद्दल सुद्धा तुम्हाला इथूनच माहिती मिळू शकते. आणि तुम्ही त्या स्कीम साठी पात्र आहात की नाही ते सुद्धा या उमंग ऍप च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. आणि अप्लाय पण करू शकता.
mAadhar/ यम आधार
मित्रांनो, तुमच्या महत्त्वाच्या आधार कार्डला सुरक्षित ठेवण्यासाठी mAadhar नावाचे ऍप सरकारने तयार केले आहे. mAadhar या ऍप द्वारे युजर्स त्यांच्या आधार कार्डची सॉफ्ट कॉपी बनवू शकतात. याशिवाय, तुमचे आधार कार्ड मधील नाव आणि पत्ता यासारखी माहितीही या ऍप द्वारे दुरुस्त केली जाऊ शकते. तसेच या ऍप द्वारे यूजर आपली ई-केवायसी देखील करू शकतो. महत्वाचे म्हणजे यात एका अकाउंट वर एकूण पाच आधार कार्ड डाउनलोड केले जाऊ शकतात.
यात तुम्ही तुमचे हरवलेले आधार कार्ड सुद्धा डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रिंट सुद्धा काढू शकता. त्यामुळे प्रत्येकाने वापरावे असे हे एक अतिशय महत्वाचे आणि उपयोगी असे ऍप आहे.
My Gov/ माझे सरकार
मित्रांनो, तुम्हाला जर सरकारशी डायरेक्ट संवाद करायचा असेल तर mygov ऍप वापरू शकता. तसेच सरकारला काही सल्ला किंवा सूचना द्यायच्या असतील जसे की ‘मन की बात’ कार्यक्रम मध्ये कोणते टॉपिक डिस्कस व्हायला हवे, वगैरे सूचना तुम्ही सरकारला या ऍप च्या माध्यमातून देऊ शकता. मित्रांनो my gov ऍप मध्ये काही क्विझ सुद्धा चालू असतात ज्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करून बक्षीस जिंकू शकता.
MyGov हे ऍप भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राने विकसित केले आहे. तसेच my gov या फ्लॅटफार्म वर तुम्हाला सरकारी योजनांची माहिती मिळू शकते आणि तुम्ही मंत्रालय आणि विविध विभागाशी संवाध साधू शकतात.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण असे पाच सरकारी ऍप्स बघितले ज्यांना तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करायलाच हवे. व त्यांचा पुरेपूर फायदा किंवा उपयोग करून घेतला पाहिजे. मित्रांनो, मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.
Tags: Top Gov App, Best Sarkari App, Yojana App, Sarkari Yojana Android App, Sarkari Free App, Government Free App, Government App Mahiti, Government Free App Konte Ahet, Bharat Sarkar App, Bharat Sarkar Free App, Sarkari Mofat App, Indian Gov App, Indian Government Free Apps, government app,my gov app download,aadhar government app,all gov app,all government app list,all government app,central government app,best government mobile apps,best government app,central govt apps,e gov app,e sarkar app download