Yatra Mahiti

तिरुपती बालाजी दर्शन संपूर्ण माहिती: मंदिराचा इतिहास, जाण्याचा मार्ग, रहाण्याची/ खाण्याची सोय, धार्मिक व पर्यटन स्थळे | Tirupati Balaji Tour Guide

नमस्कार मित्रांनो, आज आपण तिरुपती बालाजीची संपूर्ण यात्रेची माहिती जाणून घेणार आहोत. यात आपण तिरुपती बालाजी मंदिर बाबत माहिती, इतिहास जाणून घेणारच आहोत त्याशिवाय तिथे गेल्यावर रहाण्याची, खाण्याची कशी सोय असते, तसेच महाराष्ट्रातून तिरुपती बालाजीला कसे जायचे, त्यासाठी किती खर्च येऊ शकतो, या अश्या सर्व गोष्टीं बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

Tirupati Balaji Yatra Mahiti 11

मित्रांनो, आपला भारत देश जगभरात संस्कृती आणि परंपरासाठी प्रसिद्ध तर आहेतच शिवाय आपला भारत हे धार्मिक स्थळ म्हणूनही जगात खूप लोकप्रिय आहे. भारतात दरवर्षी अनेक देश विदेशातील लोक फक्त सुंदर पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठीच येत नाहीत तर येथे असलेल्या धार्मिक मंदिरांनाही भेट देतात. या मंदिरांपैकी एक जगभरात प्रसिद्ध असलेले तिरुपती बालाजी मंदिर देखील अतिशय लोकप्रिय आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भारतातील व भारताबाहेरील असे अनेक लोक येथे भेट देण्यासाठी येतात.



मित्रांनो, असे हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांच्या यादीत समाविष्ट असलेले तिरुपती बालाजीचे मंदिर आंध्र प्रदेश राज्यात चित्तूर जिल्ह्यातील तिरुपती या ठिकाणा पासून 26 किमी दूर तिरुमलया पर्वतावर आहे. येथे तिरुपती बालाजी भगवान हे विष्णूच्या रूपात विराजमान आहेत, त्यांना भगवान व्यंकटेश्वर स्वामी असे म्हणून देखील ओळखले जाते. मित्रांनो, हिंदूंसाठी तिरुपती बालाजी हे सर्वात महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. परदेशातूनही अनेक लोक येथे दर्शनासाठी येतात. तसेच भारतातील मोठमोठे नेते, उद्योगपती, चित्रपट सृष्टीतील दिगग्ज कलावंत देखील तिरुपती बालाजी धाम येथे येऊन परमेश्वराचे दर्शन घेतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करतात.

तिरुपती बालाजी मंदिराचा इतिहास

आता तिरुपती बालाजी मंदिराचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊ या:-

Tirupati Balaji Yatra Mahiti 1

मित्रांनो, तिरुमला रांगा मध्ये एकूण 7 डोंगर आहेत. आणि लांबून ते वेटोळे घातलेल्या नागाच्या फणा सारखे दिसतात. मित्रांनो, तिरुपती बालाजी मंदिराचा इतिहास बघितला तर असे लक्षात येते की या मंदिराच्या स्थापनेचा अचूक काळ कुणालाही माहीत नाही. परंतु बालजींची ही मूर्ती स्वयंभू मानली जाते. एका लोक कथेनुसार तिरुपतीच्या डोंगरावर म्हणजेच तिरुमला पर्वतावर एक मोठे वारुळ होते. एका शेतकऱ्यास आकाशवाणी द्वारे वारुळातील मुंग्यांना भरविण्याची आज्ञा झाली.

तेव्हा तेथील स्थानिक राजाने ती आकाशवाणी ऐकली व स्वतः त्या वारुळास दूध पुरवू लागला. त्याच्या भक्तीमुळे बालाजी अवतीर्ण झाले. अशी आख्यायिका आहे. तसेच ऐतिहासिक पुराव्यानुसार बघितले तर हे मंदिर किमान 2000 वर्षे जुणे आहे असे म्हटले जाते. पल्लव राणी समवाईने इ. स. 614 मध्ये येथील पहिली वेदी बांधली होती. तसेच चोळ व पल्लव साम्राज्यांनी या मंदिराला अनेक योगदान दिले आहे, आणि तसे कित्येक पट सापडले आहेत. 1517 मध्ये कृष्णदेवराय राजाने दिलेल्या दानाने गर्भगृहाच्या शिखराला सोन्याचा थर देण्यात आला होता.

त्यानंतर मराठा सेनापती रघुजी भोसले यांनी मंदिराच्या कायम स्वरुपी देखभालीची व्यवस्था केली. त्यानंतर ब्रिटिश काळात मंदिराचे प्रशासन तेथिल हाथिरामजी मठ कडे 1933 पर्यंत सोपवण्यात आले. आणि 1933 साली मद्रास विधानसभेच्या विशेष कायद्या अन्वये तिरुमला तिरुपती देवस्थानम समितीची स्थापना करण्यात आली. या समितीवर मद्रास सरकारतर्फे एक आयुक्त नेमलेला असायचा. आणि सध्या मंदिराची संपूर्ण व्यवस्था तिरुमला तिरुपती देवस्थानमचे विश्वस्त मंडळी पाहतात.



तिरुपती बालाजी मंदिराचे रहस्य

  1. मित्रांनो या मंदिरात स्वतः भगवान व्यंकटेश्वर स्वामी वास करतात, असे मानले जाते. मूर्ती वरील केसांमध्ये कधी गुंता होत नाही, आणि ते नेहमीच मुलायम राहतात. त्यामुळे त्यांच्या मूर्ती वरील केस खरे असल्याचे सांगितले जाते. या मंदिरात असे मानले जाते की जो कोणी व्यंकटेश्वराच्या मंदिराला भेट देईल आणि त्याच्या चरणी आपले केस अर्पण करेल त्याला देवाचा आशीर्वाद मिळेल. आणि तेव्हा पासून भक्तांमध्ये मनोकामना पूर्ण होण्या पूर्वी किंवा नंतर मंदिरात मुंडण करण्याची प्रथा आहे.
  2. मित्रांनो, तसं पाहिलं तर मंदिर समुद्रापासून खूप दूर आहे आणि मंदिराची रचना अशी केली आहे की बाहेरचा आवाजही गाभाऱ्यात येत नाही, पण इथे येणारे लोक सांगतात की व्यंकटेशाच्या मूर्तीजवळ कान लावून ऐकल्यावर आपल्याला समुद्राच्या लाटांचा आवाज येतो.
Tirupati Balaji Yatra Mahiti 3
  1. अजून एक गोष्ट म्हणजे तिरूपति बालाजी मंदिरात नेहमी एक दिवा जळत असतो. आणि आश्चर्य म्हणजे या दिव्यात कधीही कोणीही तेल किंवा तूप टाकत नाही. वर्षानुवर्षे जळत असलेला हा दिवा कधी आणि कोणी लावला हे कोणालाच माहीत नाही.
  2. तसेच बालाजीच्या गाभाऱ्यात गेल्यावर गाभाऱ्याच्या मध्यभागी मूर्ती असल्याचे आपल्याला दिसते. पण, जेव्हा तुम्ही गाभाऱ्यातून बाहेर पडाल तेव्हा तुम्हाला मूर्ती उजव्या बाजूला असल्याच जाणवेल.
  1. मित्रांनो, भगवान बालाजीच्या मूर्तीवर एक विशेष प्रकारचा पचई कापूर लावला जातो. जर हा कपूर कोणत्याही दगडावर लावला तर काही वेळाने त्या दगडाला तडे जातात, असे वैज्ञानिकांचे मत आहे. पण देवाच्या मूर्तीवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही.
  2. याशिवाय भगवान बालाजीची मूर्ती विशिष्ट प्रकारच्या गुळगुळीत दगडापासून बनलेली आहे, असे असले तरी ती पूर्णपणे सजीव असल्या सारखी दिसते. मित्रांनो, तसं तर मंदिराच वातावरण अतिशय थंड असतं, पण असे असूनही, तिरूपति बालाजीच्या अंगावर घामाचे थेंब दिसतात आणि त्यांची पाठ देखील ओलसर राहते.

बालाजी मंदिर दर्शन बद्दल थोडी माहिती

मित्रांनो, तसे तर तुम्ही तिरुपती ला कधीही होऊ शकता पण तिरुपतीला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ ही सप्टेंबर ते जानेवारी आहे. या वेळेत तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी तुम्हि पास काढू शकता. हा पास मंदिरात मिळतो किंवा तो तुम्ही ऑनलाईन बुक देखील करू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला 300 रू प्रति व्यक्ती इतके भाडे लागेल. त्या नंतर दर्शन करण्यासाठी तुम्हाला 10 ते 12 तास देखील लागू शकतात. पण जर VIP पास असेल तर 3 ते 4 तासांत दर्शन मिळू शकते.

Tirupati Balaji Yatra Mahiti 9

तिरुपती बालाजी जाण्याचा मार्ग

आता तिरुपती बालाजी जाण्याचा मार्ग कसा आहे, त्या बद्दल जाणून घेऊ या:-

मित्रांनो, तिरुपती बालाजी मंदिर हे आंध्रप्रदेश मधील तिरुपती या ठिकाणी तिरुमला पर्वतावर आहे. हे आंध्रप्रदेश मधील एक मुख्य ठिकाण आहे त्यामुळे येथे जाण्यासाठी सर्व प्रकारच्या साधनांची उपलब्धता आहे. तिरुपती मध्ये रेणुगुंटा या 14 किमी अंतरावर असलेल्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि रेल्वे स्टेशन देखील आहे. तिरुपतीला जाण्यासाठी तूम्ही अगोदर तिरुपती रेल्वे स्टेशन पर्यंत रेल्वेने जाऊ शकता किंवा रेनुगुंटा जंक्शन पर्यंत तुम्ही जाऊ शकता आणि तेथून पुढे तुम्ही तिरुपती पर्यंत बसणे प्रवास करू शकता.

विमानाने देखील तुम्ही जाऊ शकता, त्यासाठी तुम्ही रेनुंगुंटा विमानतळावर विमानने जाऊ शकता आणि तेथून पुढे 14 किमी अंतरावर तुमच्या आवडीच्या कोणत्याही साधनाने प्रवास करू शकता. तिरुपती शहरापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी तुम्ही बसचा प्रवास करू शकता आणि त्यासाठी साधारण 80 ते 140 रुपये खर्च येऊ शकतो.

Tirupati Balaji Yatra Mahiti 10

तिरुपती बालाजी मध्ये राहण्याची आणि खाण्याची सोय

मित्रांनो, तिरुमला मध्ये गेल्यानंतर तुम्ही सीआरओ ऑफिस मध्ये जाऊ शकता. इथे रूम बुकिंग उपलब्ध असते. तेथे प्रत्येक व्यक्तीच्या अनुसार रूम मिळू शकतो. 50 रूपये ते 1000 रुपयांपर्यंत येथे रूम मिळू शकतात आणि प्रत्येक व्यक्तीची राहण्याची सोय देखील येथे होऊ शकते. तर तुमची जेवणाची सोय ही तिरुपती बालाजीच्या अन्न प्रसाद केंद्रात होऊ शकते.

हे केंद्र तिरुपती बालाजी ट्रस्ट कडून चालवले जाते. येथे भोजन निःशुल्क असून कोणीही येथे जेवणाचा आस्वाद घेऊ शकते. त्यामुळे तिरुपती बालाजी मध्ये तुमची राहण्याची आणि खाण्याची उत्तम सोय उपलब्ध आहे.

महाराष्ट्रातुन तिरुपती ला कसे जायचे

आता महाराष्ट्रातुन तिरुपती ला कसे जाऊ शकतो? त्या बद्दल जाणून घेऊ या:-

नाशिकहून तिरुपतीला कसे जायचे?

मित्रांनो, तुम्हाला जर नाशिक वरून तिरुपतीला जायचे असेल तर त्यासाठी सर्वात स्वस्त मार्ग म्हणजे ट्रेन/ रेल्वे. नाशिक ते तिरुपती रेल्वे द्वारे जाण्यासाठी तुम्हाला मनमाड जंक्शन वरून जावे लागेल. त्यासाठी अंदाजे किंमत रू 800 ते रू 3,500 पर्यंत लागू शकता. आणि यात तुम्हाला साधारणपणे 26 तास लागू शकतात. याशिवाय जर तुम्हाला लवकर तिरुपती ला जायचे आले तर तुम्ही नाशिकहून तिरुपतीला जाण्यासाठी फ्लाइट सुद्धा विचार करू शकता.

त्यासाठी तुम्ही मुंबई वरून जलद फ्लाइट द्वारे जाताना तुम्हाला जवळपास रू 7,000 ते रू 20,000 इतके तिकीट भाडे लागू शकते. आणि तुम्ही जवळपास दोन तासात तिरुपती ला पोहचाल. पण जर तुम्ही बस द्वारे जाण्याचा विचार करत असाल तर,तुम्हाला हे माहीत असायला हवे की नाहीक हून तिरुपती ला जाण्यासाठी डायरेक्ट बस सेवा उपलब्ध नाही. तुम्हाला तुमच्या प्रवासात बदल करत जावे लागेल. आणि त्यासाठी खूप वेळही लागेल.

पुण्याहून तिरुपती ला कसे जायचे?

मित्रांनो, पुण्याहून तिरुपती ला तुम्ही रेल्वे ने प्रवास करत असाल तर तुम्ही कन्याकुमारी एक्सप्रेस ने जाऊ शकता, ही रेल्वे कमीत कमी वेळेत म्हणजे अंदाजे 15 ते 16 तासात पोहचते. तसेच तुम्ही जर बस ने जाण्याचा विचार करत असाल तर पुणे आणि तिरुपती दरम्यान थेट बस कनेक्टिव्हिटी उपलब्ध नाहीये. त्यामुळे तुम्हाला पुण्याहून तिरुपतीला जाण्यासाठी बंगलोरला जाणारी बस बघावी लागेल, त्यानंतर तिरुपतीला जाणारी बस बघावी लागेल आणि यासाठी तुमचे 23 ते 24 तास जातील.

याशिवाय पुण्याहून तिरुपतीला जाण्याचा सर्वात जलद मार्ग म्हणजे फ्लाइटने जाणे. त्यासाठी तुम्ही पुण्याहून चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणारे फ्लाइट बघू शकता. आणि मग तिथून तिरुपतीला जाण्यासाठी कॅब वगैरे करू शकता.

कोल्हापूर हून तिरुपती ला कसे जायचे?

मित्रांनो, कोल्हापूरहून तिरुपती ला रेल्वेने जाण्यासाठी सर्वात वेगवान ट्रेन बघायची असेल तर तुम्ही हरिप्रिया एक्सप्रेस चा विवंगर करू शकता. ही एक्सप्रेस कोल्हापूर ते तिरुपती दरम्यान धावणारी सर्वात वेगवान ट्रेन आहे. आणि या ट्रेनला तिरुपतीला पोहोचण्यासाठी 19 ते 20 तास लागतात. तसेच तुम्ही फ्लाइट ने सुद्धा जाऊ शकता.पण त्यासाठी तुम्हाला 5500 ते 6000 रू इतके तिकीट भाडे लागू शकते. याशिवाय कोल्हापूर ते तिरुपती पर्यंत थेट बस नाही त्यामुळे तुम्हाला प्रवासात बस बदलत जावे लागेल, आणि त्यासाठी तुम्हाला अंदाजे 15 तास लागू शकतात.

मुंबईहून तिरुपतीला कसे जायचे?

मित्रांनो, मुंबई हुन तिरुपती ला जाण्यासाठी तुम्ही रेल्वेचा पर्याय निवडू शकता. तसं पाहिलं तर मुंबई ते तिरुपती जाण्यासाठी अनेक ट्रेन उपलब्ध आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराज MGR चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस, छत्रपती शिवाजी महाराज चेन्नई एग्मोर सुपरफ़ास्ट, तसेच मुंबई सेंट्रल ते तिरुपति पर्यंत सर्वात वेगवान चालणारी ट्रेन ही लोकमान्य तिलक मदुरई एक्सप्रेस आहे. जी 18 तासात तुम्हाला तिरुपती ला पोहचवते. तसेच मुंबई ते तिरुपती तुम्ही फ्लाइटने जाणार असाल तर त्यासाठी तुम्हाला सर्वात कमी विमान भाडे रु. 5155 असेल, जे फ्लाइट चा मार्ग, बुकिंगची वेळ आणि उपलब्धते नुसार रु. 10127 पर्यंत जाऊ शकते.

पण इथे जर तुम्ही मुंबई ते तिरुपती पर्यंत राउंड -ट्रिप फ्लाइट बुक केली तर ते तुम्हाला अधिक किफायतशीर ठरेल. यासोबतच तुम्ही जर मुंबई ते तिरुपती बसने प्रवास करायचा विचार करत असाल तर तुम्ही ट्रॅव्हल्स ने जाऊ शकता. त्यासाठी तुम्हाला 1300 रू च्या आसपास भाडे पडेल. आणि त्यासाठी तुम्हाला 20 ते 21 तास लागू शकतात.

नागपूरहुन तिरुपतीला कसे जायचे?

मित्रांनो नागपूरहून तिरुपतीला जाण्यासाठी सर्वात जलद मार्ग म्हणजे फ्लाइटने जाणे. त्यासाठी तुम्ही केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी फ्लाइट घेऊ शकता, आणि त्या नंतर तिरुपतीला कॅबने जाऊ शकता. तसेच जर तुम्ही ट्रेन ने प्रवास करणार असाल तर तुम्हाला 16 ते 17 तास लागू शकतात. त्यासाठी तुम्ही स्वर्ण जयंती एक्सप्रेस, हिमसागर एक्सप्रेस, केरळ एक्सप्रेस, मिलेनियम एक्सप्रेस, वगैरे अश्या विविध ट्रेन ने जाऊ शकता.

Tirupati Balaji Yatra Mahiti 4

तिरुपती बालाजी मधील इतर धार्मिक व पर्यटन स्थळे

मित्रांनो, भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर उरलेल्या वेळेत तुम्ही तिरुपती च्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक धार्मिक व पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता. ते कोण कोणते स्थळ आहेत, ते पुढे जाणून घेऊ या…

  1. श्री पद्मावती अम्मावरी मंदिर:- मित्रांनो, तिरुपती बालाजी धाम मधील श्री पद्मावती अम्मावरी मंदिर हे सर्वात प्रसिद्ध तीर्थ क्षेत्रांपैकी एक आहे. हे मंदिर भगवान व्यंकटेश्वराची पत्नी श्री पद्मावती देवीचे निवासस्थान मानले जाते. असे मानले जाते की श्री पद्मावती अम्मावरी मंदिराचे दर्शन घेईपर्यंत तिरुपती बालाजी धामची यात्रा पूर्ण होत नाही, म्हणूनच देवी पद्मावतीचे दर्शन घेतल्यानंतर भाविक प्रथम तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जातात. हे तिरुपती बालाजी मंदिरापासून 5 किमी अंतरावर आहे.
  2. श्री गोविंदराजा स्वामी मंदिर:- मित्रांनो, शी गोविंदराजा स्वामी हे भगवान व्यंकटेश्वराचे थोरले भाऊ मानले जातात. श्री गोविंदराजा स्वामी मंदिर हे तिरुपतीच्या सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे, व ते संत रामानुजांनी 11 व्या शतकात बांधले होते, असे म्हटले जाते. द्रविड स्थापत्य शैलीत बांधलेले हे सात मजली मंदिर भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. लोक या मंदिरात आर्थिक लाभासाठी प्रार्थना करतात.
Tirupati Balaji Yatra Mahiti 2
  1. श्री हनुमान मंदिर:- मित्रांनो, तिरुपती बालाजी मंदिराजवळ असलेले हनुमानजींचे हे मंदिर खूप प्रसिद्ध मंदिर आहे. याच मंदिरात हनुमानजींनी नामजप केल्याचे सांगितले जाते. पौराणिक कथेनुसार, भगवान राम या मंदिरात भाऊ लक्ष्मण आणि आई सीता यांच्यासोबत थांबले होते. या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागत असते.
  2. श्री परशुरामेश्वर मंदिर:- मित्रांनो, तिरुपती बालाजी मंदिरापासून 20 किमी अंतरावर असलेले श्री परशुरामेश्वर मंदिर खूप प्रसिद्ध आहे. गर्भगृहात स्थापित केलेल्या लिंगामुळे मंदिराची कीर्ती आणखी वाढली आहे. या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची नेमही मोठी वर्दळ असते. त्यामुळे बालाजीच्या दर्शनादरम्यान तुम्ही या मंदिराला भेट देऊ शकता.5. श्री कपिलेश्वर स्वामी मंदिर:- मित्रांनो, तिरुमला टेकडीच्या पायथ्याशी आणि कपिला तीर्थम नदीच्या काठावर वसलेले, श्री कपिलेश्वर स्वामी मंदिर हे 108 शक्ती पीठांपैकी एक अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे. तिरुपतीमधील हे एकमेव शिव मंदिर आहे. या धार्मिक स्थळावर कपिल मुनींनी भगवान शंकराची पूजा केली होती, म्हणून या मंदिराला कपिलेश्वर स्वामी मंदिर असे म्हणतात. हे मंदिर तिरुपतीपासून तीन किमी अंतरावर आहे.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण तिरुपती बालाजी बद्दल जमेल तेवढी माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद.

Tags: tirupati balaji darshan Mahiti, tirupati balaji darshan trip mahiti, tirupati balaji darshan plan, tirupati balaji darshan yatra, tirupati balaji ki yatra, tirupati balaji paidal yatra, tirupati balaji yatra, tirupati balaji darshan mahiti, tirupati balaji darshan kase karayche, tirupati balaji darshan pune, tirupati balaji darshan mumbai, tirupati balaji darshan nagpur, tirupati balaji darshan nashik, tirupati balaji la kase jayche, tirupati balaji tour mahiti, tirupati balaji darshan tour info in marathi, tirupati balaji tour guide marathi, tirupati balaji tour guide in marathi, tirupati balaji plan in marathi, tirupati balaji mandir rasta, tirupati balaji madirat kase jayche

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!