New PostTata Neu

Tata Neu Coin व Neupass म्हणजे काय ? | कसे मिळवायचे ?

नमस्कार मित्रांनो, प्रत्येक वेळेस आम्ही तुमच्यासाठी काही तरी नवीन माहिती घेऊन येत असतो. आज ही आम्ही तुम्हाला एक नवीन व महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. मित्रांनो , आज आपण Tata Neu Coins म्हणजे काय ? ते कसे मिळवायचे, त्याचा उपयोग कसा करायचा, या सर्वांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Tata Neu Coin and Neupass Information in Marathi

मित्रांनो, तुम्हाला आत्ता पर्यंत माहीत झाले असेल की Tata ने नुकतेच एक नवीन अँप लाँच केले आहे. त्याचे नाव Tata Neu App असे आहे. टाटा कंपनी ने या एकाच अँप मध्ये सर्व प्रकारच्या सर्विसेस दिल्या आहेत. अगदी किराणा सामान पासून मेडिसिन्स, फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, हॉटेल व फ्लाईट बुकिंग, तसेच खाण्याचे पदार्थ सुद्धा आपल्याला या एकाच Tata Neu अँप मध्ये मिळणार आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात Tata Pay मार्फत आपण पैश्यांची देवाण घेवाण सुद्धा करू शकणार आहोत. तसेच Bill Pay व Finance (कर्ज, क्रेडिट स्कोर), Recharge सारख्या सुविधा पण दिल्या गेल्या आहेत. आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात बेस्ट कोणते फिचर असेल तर ते म्हणजे Tata Neu Pass किंवा Tata Neu Coin.



चला तर मग Tata Neu Coin बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ या…

Tata Neu Coin व Neupass म्हणजे काय?

मित्रांनो, टाटा कंपनी ने आपल्या ग्राहकांसाठी Neupass नावाचा नवीन reward प्रोग्राम सादर केला आहे. त्यात तुम्ही कोणत्याही प्रकारची खरेदी करून, प्रत्येक पेमेंट वर व किंवा शॉपिंग केल्यावर तुम्ही Neupass तर्फे Neu Coins मिळवू शकता. तसेच तुमच्या जवळच्या व्यक्तींना किंवा मित्रांना जर तुम्ही हे अँप रेफर केले तर तुम्हाला reward म्हणून Neu Coins भेटतात. आणि तसेच हे कॉइन शॉपिंग च्या वेळेस तुम्ही redeem ही करू शकता.

तसेच प्रत्येक वेळी खरेदी वर कमीत कमी 5 टक्के Neu coins मिळतील. कंपनी ने सांगितले आहे की 1 Neu coin ची किंमत ही 1 रुपयाच्या बरोबरीची आहे. म्हणजे 1 Neucoin = 1 रुपये. आणि असे कितीही coins तुम्ही मिळवू शकता त्यावर कुठलीही मर्यादा नाही.

Tata Neu Coin and Neupass Marathi

Tata Neu Coin बद्दल आणखी काही

Tata Neu अँप वर अकाउंट तयार केल्यानंतर अँपच्या होम पेज वर तुम्हाला Neu coin चा ऑपशन दिसतो. त्यात किती Neu coins आहेत ते सांगितले जाते. आणि Neu pass च्या मार्फत तुम्हाला हे coins दिले जातात. इथे तुम्ही किती खर्च करता त्या नुसार तुम्हाला कमीतकमी 5 टक्के coins मिळतात.

होम पेज च्या Neu coin ऑपशन वर क्लिक केल्यावर तुम्ही Neu pass च्या पेज वर जातात. तिथे तुमच्या कडे जेवढे coins असतील ते available coins या ऑपशन मध्ये दिसतात.



त्यानंतर view details बटन वर क्लिक केल्यावर तुम्हाला नेक्स्ट पेज वर तुमच्या activities म्हणजे तुमचे transactions दाखवले जातील.

तसेच expiry schedule मध्ये तुमचे conins किती व कधी expire होणार आहेत ते दाखवले जाते. (तसे हे coins एक वर्षासाठी वैध असतात.)

खाली chat with us या ऑपशन मध्ये तुम्हाला जर काही query असेल तर तुम्ही इथे चॅट करून विचारू शकता.

मागे आल्यावर तुम्हाला your badges मध्ये तुम्हाला दिलेले सर्व badges लाइफ टाइम validity असलेल्या मिळतात. इथे या अँप चे वेगवेगळे पार्टनर बघायला मिळतील ज्यात Croma, Airasia India, Bigbasket, IHCL, TatacliQ, Westside, 1mg हे सर्व आहेत.

  • Croma वर क्लिक केल्या वर इथे तुम्हाला सगळे फीचर्स life time validity चे मिळतील. तसेच privilege मध्ये तुम्हाला सांगितले जाते की जर तुम्ही Tata neu अँप द्वारे जर 100 रुपये स्पेन्ड केले तर किंवा त्या पेक्षा जास्त केले तर प्रत्येक 100 रुपया मागे तुम्हाला 5 Neu coin दिले जातील.
  • पण जर तुम्ही Tata neu द्वारा जर नाही गेलात आणि जर croma स्टोअर किंवा croma.com द्वारे मनी स्पेन्ड केले तर प्रत्येक 300 रुपये मागे तुम्हाला 1 Neu coin मिळेल. म्हणचे इथे coin तर मिळेल पण त्याची किंमत मात्र कमी असेल.
  • तसेच Airasia India मध्ये सुद्धा तुम्हाला life time validity मिळेल. शिवाय privileges मध्ये तुम्हाला सांगितले जाते की जर तुम्ही Tata neu द्वारे मनी स्पेन्ड केलेत तर प्रत्येक 100 रुपये मागे तुम्हाला 5 Neu coin मिळतील. आणि जर तुम्ही Airasia च्या वेबसाईट द्वारे गेलात तर तुम्हाला प्रत्येक 100 रुपये मागे 2 Neu coin मिळतील.

म्हणूनच मित्रांनो, इथे हे सर्व सांगण्याचा उद्देश हाच की तुम्ही जी काही ऍक्टिव्हिटी कराल म्हणजे जे काही transaction किंवा शॉपिंग वगैरे कराल ते Tata Neu द्वारेच करा. म्हणजे तुम्हाला Neu coins चा पुरेपूर उपयोग घेता येईल.

तसेच खाली आल्यावर तुम्हाला काही बेनेफिट्स व ऑफर्स दिसतील. मित्रांनो, या अँप मध्ये सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा इथे spend करता तेव्हा कोणतीही minimum requirement नाही की तुम्ही 500 किंवा 200 रुपये पासूनच स्पेन्ड केले पाहिजे. तर तुम्ही इथे अगदी 100 रुपयां पासून सुद्धा स्पेन्ड करू शकता.

तसेच coin earn करण्याचे सुद्धा काही अटी नाहीत. एका वेळेस तुम्ही कितीही coins earn करू शकता.

How to redeem Tata Neu Coins?

चला तर आता बघू की Coin Earn कसे करायचे

समजा तुम्हाला एखादे प्रॉडक्ट घ्यायचे आहे. उदाहरणार्थ, समजा तुम्ही ग्रोसरी मधून काही घ्यायचे आहे. तर ग्रोसरी ऑपशन वर क्लिक केल्या वर तुम्ही bigbasket च्या साईट वर redirect होऊन जाल. आता तुम्हाला इथे खूप सारे प्रोडक्ट दिसतील, तुम्हाला जे प्रोडक्ट घ्यायचे आहे त्यावर क्लिक करून ऍड बटन वर क्लिक करायचे आहे त्या नंतर तुम्हाला ते प्रॉडक्ट बास्केट मध्ये ऍड झालेले दाखवले जाईल व नंतर त्या प्रॉडक्ट वर क्लिक करून खाली add address to checkout या बटन वर क्लिक करून तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे

याच प्रकारे जर मोबाईल फोन ऑर्डर करायला जाल तर तुम्हाला त्या वर काही ऑफर्स असतील तर त्या दाखवल्या जातील. तसेच पेमेंट मध्ये तुम्हाला Tata pay चा ऑपशन दिला जातो, ज्यात तुम्ही तुमचे Neu coin वापरू शकता. तर Tata Pay वर क्लिक करून proceed to pay वर क्लिक केल्यासनंतर तुम्ही पेमेंट च्या पेज वर जाता. तिथे तुम्हाला Neu coin वापरण्याचा ऑपशन दिला जातो. जर तुमच्याकडे coin असतील तर ते तुम्ही इथे वापरू शकता. जितके coins तुम्ही वापराल तेवढया रुपयांचा डिस्काउंट तुम्हाला इथे मिळतो.

याशिवाय पेमेंट करताना तुम्हाला इथे card पेमेंट आणि नेट बँकिंग चा ऑपशन ही मिळतो, यापैकी तुम्हाला पाहिजे ती पेमेंट मेथड तुम्ही इथे वापरू शकता. व pay करून झाल्या वर तुमचे प्रॉडक्ट डिलीवर होऊन जाईल. प्रॉडक्ट डिलीव्हरी झाल्यावर तुम्हाला 5 टकके नुसार coin देण्यात येते. हे कॉइन तुम्ही save करून ठेवू शकता व पुढच्या वेळेस काही प्रॉडक्ट ऑर्डर कराल तेव्हा हे save केलेले Neu coin वापरू शकता. तर अशी आहे टाटा ची Neu coin ची पूर्ण प्रोसेस.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण बघितले की Tata Neu coin earn कसे करायचे आणि ते Neu coin redeem कसे करायचे. आशा करतो की आजचा लेख तुम्हाला आवडला असेल. तर तुमच्या मित्रा सोबत शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद!

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!