स्मॉल फायनान्स बँक माहिती | Small Finance Bank Information in Marathi
आपण आज बघणार आहोत स्मॉल फायनान्स बँक काय असते. मोठ्या बॅंका जशा SBI, HDFC आपल्या ज्या सेवा देतात त्या सर्व सेवा स्मॉल फायनान्स बँक देते. पण कोणत्या सेवा द्यायच्या ते आर बी आय द्वारे ठरवलेलं जाते. यामध्ये ग्राहका कडून डिपॉझिट घेणे आणि लोन देणे यांचा समावेश आहे.
स्मॉल फायनान्स बँक सुरू करण्यामागचे कारण असे आहे की, तळागाळातील लोक, बँकेपासून लांब असलेले छोटे उद्योग, शेतकरी यांच्यापर्यंत बँकेच्या सुविधा पोहोचवणे. या बँक आकाराने छोट्या असल्यामुळे त्या कमी खर्चात जास्त ठिकाणी आपल्या शाखा उघडू शकतात.
स्मॉल फायनान्स बँक कमी रक्कमेचे लोन देते. स्मॉल फायनान्स बँक मध्ये सर्व प्रकारचे अकाउंट उघडण्याची सुविधा ग्राहकांना दिली जाते. त्यामध्ये सेविंग अकाउंट, करंट अकाउंट, फिक्स डिपॉझिट आणि रेकरिंग अकाउंट समाविष्ट आहे. स्मॉल फायनान्स बँकेत अकाउंट मध्ये पैसे ठेवण्याची मर्यादा निश्चित नाही. स्मॉल फायनान्स ग्राहकांना क्रेडिट कार्डची ही सुविधा देते.
आपण आता काही स्मॉल फायनान्स बँकेची काही उदाहरणे बघुयात
- इक्विटास स्मॉल फायनान्स बँक
- ए यु स्मॉल फायनान्स बँक
- सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
- उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक
स्मॉल फायनान्स बँकेना आरबीआय लायसन्स देत, तर आरबीआय स्मॉल फायनान्स बँकेना लायसन्स एस एफ बी सेक्शन 22 ते सेक्शन 1 बँकिंग रेगुलेशन ॲक्ट 1994 द्वारे मिळते.
स्मॉल फायनान्स बँकेत कोणत्या सेवा दिल्या जातात ते बघुया:
स्मॉल फायनान्स बँक सेविंग अकाउंट, फिक्स डिपॉझिट, रेकरींग डिपॉझिट इतर बँकेप्रमाणे सेवा दिली जाते. सुरुवातीच्या तीन वर्षांसाठी बँकेला शाखा विस्तारासाठी आरबीआयची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. NBFC’S किंवा कोणतीही व्यक्ती अशी की त्याने बँकिंगमध्ये दहा वर्षाचा अनुभव आहे ते स्मॉल फायनान्स बँक साठी अर्ज देऊ शकता. या बँकेचा उद्देश्य हा लहान व्यवसाय आणि MSMES (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग.) सुविधा देता यावी एवढाच आहे.
पहिली स्मॉल फायनान्स बँक
शिवालिक मर्कंटाईल ही स्मॉल फायनान्स बँक मध्ये रुपांतरीत होणारी पहिली नागरी सहकारी बँक आहे. जून 2020 भारतीय रिझर्व बँक (RBI) ने उत्तर प्रदेशात स्थितीत असलेली शिवालिक मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ला स्मॉल फायनान्स बँक रूपांतरित करण्यासाठी मान्यता दिली. शिवालिक मर्क टाईम हे दोन वर्षांपूर्वी आर बी आय च्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध झाल्यापासून फायनान्स बँकेत रूपांतरित होणारी पहिली नागरी सहकारी बँक आहे.
स्मॉल फायनान्स बँक स्थापन करण्यासाठी काही अटी:
- भांडवलाची पेड-अप इक्विटी दोनशे कोटी पाहिजे. शंभर कोटी तुमच्याजवळ पाहिजे तेव्हाच तुम्ही स्मॉल फायनान्स बँक स्थापन करू शकता.
- प्रत्येक स्मॉल फायनान्स बँकेचा नावात “स्मॉल फायनान्स बँक” हे शब्द असणे आवश्यक आहे. कारण आपण काही सामान घेण्यासाठी जर गेलो तर आपण त्याची टॅगलाईन बघूनच जातो आणि आपल्याला कमी लोन घ्यायच असेल तर स्मॉल फायनान्स बँक ही टॅगलाईन बघूनच आपण जाणार म्हणून या बँकांना स्मॉल फायनान्स बँक असे नाव देणे गरजेचे आहे.
- स्मॉल फायनान्स बँक ही नॉन बँकिंग वित्तीय सेवा उपक्रम हाती घेण्यासाठी उपकंपन्या स्थापन करू शकत नाही.
- 75% आयोजित नेट बँक क्रेडिट (ANBC) आर बी आय द्वारे वर्गीकृत केलेल्या प्राधान्य क्षेत्रासाठी प्रगत असणे आवश्यक आहे. ANCB म्हणजे ऍडजेस्ट नेट बँक क्रेडिट असा आहे. ANCB ही एक अशी अमाऊंट आहे जसे कमर्शियल बँक जसे CRR SLR हे सर्व काढून जी अमाऊंट उरते त्यातूनच ते लोन देतात. लोन दिल्यानंतर पहिले ते प्रॉपर्टी सेक्टरला दिली जाते.
- एका व्यक्तीसाठी जास्तीत जास्त कर्ज हे एकूण भांडवल निधीच्या 10% पेक्षा जास्त असू शकत नाही, आणि तेच गटाच्या बाबतीत 15% पेक्षा जास्त असत नाही.
- स्मॉल फायनान्स बँक ह्या म्युचल फंड युनिट चे वितरण, विमा उत्पादने, पेन्शन उत्पादने यासारख्या सेवा या बँका घेऊ शकता पण यासाठी स्मॉल फायनान्स बँकांना आर बी आय पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते.
- स्मॉल फायनान्स बँक ही पूर्ण बँकेत रुपांतर करू शकता पण त्यासाठी आर बी आय ची परवानगी घ्यावी लागते.
- या सर्वांमध्ये एक मूलभूत आवश्यकता अशी आहे त्यांच्या 25% शाखा या बँक नसलेल्या भागात स्थापन केल्या पाहिजे.