Share Market

शेअर बाजाराचा इतिहास | Share Market History in Marathi

शेअर म्हणजे हिस्सा किंवा भागीदारी

एखादा उद्योग जेंव्हा सुरु होतो तेंव्हा मालकाचे स्वतःचे भांडवल त्यात लागलेले असते, जसा उद्योग वाढु लागतो तसे जास्त भांडवलाची गरज भासते, त्यावेळेस नफ्यात भागीदारी देवुन या उद्योगावर विश्वास असणार्‍या जवळच्या लोकांकडुन भांडवल गुंतवले जाते.



बर्‍याच वेळेस मोठ्या गुंतवणुकदारांना उद्योगाची प्रगती आणी भविष्यातील संधींबद्दल माहिती दिली जाते आणी सुचीबध्द न झालेले शेअर्स ( Unlisted ) घेण्यासाठी विनंती केली जाते, बरेच मोठे गुंतवणुकदार अशी गुंतवणुक करतात. पण

खरे तर शेअर बाजार येथेच चालु होतो ( Primary Market )

पुढच्या टप्प्यात जेंव्हा भांडवलाची गरज लागते त्यावेळेस जवळच्या लोकांकडुन भांडवल घेणे किंवा आर्थिक संस्थांकडुन कर्ज म्हणुन घेणे यावर व्यावहारीक मर्यादा येवु शकतात. अशा वेळेस सामान्य गुंतवणुकदारांकडुन बिनव्याजी भागीदारीत भांडवल उभारणे फायद्याचे ठरते. अशा वेळेस कंपनी आपले शेअर बाजारात नोंदणी करुन IPO ( Initial Public Offer ) द्वारे लोकांसाठी विक्रीला खुले करते आणि खर्‍या अर्थाने शेअर बाजारास आपल्यासाठी सुरवात होते ( Secondary Market ).

Types of Markets

शेअर मार्केटचे स्वरुप कालानुरुप कसे बदलत गेले आणि आजचे शेअर मार्केट कसे आस्तित्वात आले हे बघणे मनोरंजक ठरेल.

साधारण अकराव्या शतकात काॅटिअर्स नावाने जी व्यावसायिक होते ते बॅंकाचे पीककर्जाच्या देवाण घेवाणीबद्दल दलाली घेवुन ही कामे करीत असत.



यांना आपण जगातले पहिले वित्त बाजारातील ब्रोकर म्हणु शकतो, पुढे बाकीच्या देशात पण सरकारी कर्जरोख्यांचे व्यवहार याप्रमाणे सुरु झाले आणी साधारण तेराव्या शतकापर्यंत हे व्यवहार सर्वमान्य झाले.

यात गम्मत म्हणजे कुठलेही समभाग ( Shares ) नव्हते परंतु कर्जरोखे किंवा सिक्युरीटीज् अशा साधनांद्वारे व्यवहार होत असत.

पुढे पंधराव्या शतकात बेल्जीअम या देशात करारनामे, देवाणघेवाणीचे दस्तऐवज या साधनांची विनीमय केंद्रे सुरु झाली ती जगातील पहिली वायदा व्यापार केंद्रे ( Exchanges ) म्हणता येतील.

Share Market History

माणसाला असलेली साहसाची आवड, त्याबरोबर व्यापार करायची वृत्ती आणी यातुन असलेले समुद्र सफरींचे आकर्षण आणी यातुन मिळणारा भरमसाठ नफा, याकडे गुंतवणुकदार पण आकर्षित झाले.

या सफरींमधील धोके माहीत असुनही लोकांनी या समुद्री व्यापार्‍यांच्या समुद्री जहाजांमधे गुंतवणुक करायला सुरवात केली.

प्रत्येक समुद्रसफरींमधे कमी अधिक असलेला धोका, मिळणारे उत्पन्न, लागणारा वेळ हे सर्व वेगवेगळे असल्याने लोकांनी एकाच वेळेस वेगवेगळ्या व्यापार्‍यांकडे पैसे गुंतवायला सुरवात केली.

ही गुंतवणुक सुनियोजित करण्यासाठी सोळाव्या शतकात एक महामंडळ स्थापन करण्यात आले – त्याचे नाव होते ‘ गव्हर्नर आणी कंपनी मर्चंट्स फाॅर लंडन ट्रेडींग इस्ट इंडीज ‘, जेणेकरुन गुंतवणुकदार एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या सफरींवर गुंतवणुक करु शकतील

पुढील काही वर्षात या महामंडळाचे रुपांतर डच इस्ट इंडिया कंपनी या व्यापारी संस्थेत करण्यात आले आणी या कंपनीचे समभाग अधीकृतरित्या आम्स्टरडॅम शेअर बाजारात स्टाॅक आणी बाॅंड्स या स्वरुपात 1602 साली उपलब्ध झाले.

जगातील ही पहिली शेअर बाजारात नोंदणी झालेली ( Listed ) कंपनी होय.

नंतरच्या दोनशे वर्षात बरेच गोंधळ झाले, अनेक व्यापारी कंपन्यांनी आपापले शेअर्स आणले, गुंतवणुकदार त्यात गुंतवणुक करत राहिले परंतु बर्‍याच कंपनीज् बेकायदेशीर होत्या, काही कंपन्यांनी परतावा देणे बंद केले, काही कंपनीज् बुडाल्या आणी या क्षेत्रात सर्वत्र अभूतपुर्व गोंधळाचे वातावरण तयार झाले, इतके की इंग्लंडने कुठल्साही कंपनीला 1825 पर्यंत नविन शेअर्स वितरीत करण्यावर बंदी घातली आणी या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 1801 मधे लंडन स्टाक एक्स्चेंज ची स्थापना केली

1817 मधे अमेरीकेने न्युयाॅर्क स्टाॅक एक्स्चेंज आणले आणी खर्‍या अर्थाने शेअर बाजार बहरु लागला, याच सुमारास बाकी सर्व देशात पण हळुहळु अधिकृत शेअर बाजार सुरु झाले.

ही झाली जागतीक शेअर बाजाराची कहाणी, पुढील लेखात आपण जगातील वेगवेगळ्या देशातील शेअर मार्केटचे स्वरुप आणी त्याबद्दलच्या मनोरंजक नोंदी पहाणार आहोत.

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!