सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन बद्दल सर्व माहिती | Semi-Automatic Washing Machine Detail Information
नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात आपण सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करायला जातो, तेव्हा आपल्या मनात खूप सारे प्रश्न येतात की ती वस्तू कुठल्या ब्रँडची घ्यावी, ती कशी वापरावी त्याची काळजी कशी घ्यावी, त्याची योग्य किंमत किती असेल, याबद्दल आपल्याला काही माहित नसते.
तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला या लेखातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन बद्दल जाणून घेणार आहोत.
सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन बद्दल माहिती
मित्रांनो, सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन वापरणे हे अगदी सोपं आहे. या प्रकारच्या मशिन्स मध्ये सिंगल ड्रम किंवा ट्वीन ड्रम असतात. पण शक्यतो यात दोन ड्रम असतात. एक ड्रम कपडे धुण्यासाठी असतो तर दुसरा ड्रम कपडे सुखवण्यासाठी असतो. यात फक्त काही गोष्टी हाताने कराव्या लागतात. जसे की पाणी जोडणे, एक ड्रम मधून दुसऱ्या ड्रम मध्ये कपडे टाकणे. घाण झालेले पाणी टाकुन देणे, स्पिन सायकल सेट करणे इत्यादि.
पण असे असले तरी ही सेमी ऑटोमॅटिक मशीन या खूप फायदेशीर असतात. आणि खिशाला परवडणाऱ्या असतात. म्हणजे यांची किंमत कमी असते. फक्त या सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन्स आकाराने जास्त असल्याने या प्रकारच्या मशीन ला ठेवायला जास्त जागा लागते.
मित्रांनो, या सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन मध्ये पाणी आणि इलेक्ट्रिसिटी पण कमी प्रमाणात लागते. या सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन ची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही मशीन चालू असताना देखील या मध्ये कपडे टाकू शकता. आणखी ही बरेच चांगले फीचर्स या प्रकारच्या वॉशिंग मशीन मध्ये दिसून येतात जे त्यांना चांगले प्रमाणित करतात.
आता भारतातील सर्वात चांगले सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन बद्दल जाणून घेऊ या
Samsung (सॅमसंग) सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन | Amazon वर बघा |
Whirlpool (व्हरपूल) सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन | Amazon वर बघा |
LG 8 kg सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन | Amazon वर बघा |
Amazon Basics सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन | Amazon वर बघा |
LG 11 kg सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन | Amazon वर बघा |
Samsung (सॅमसंग) 7.2 kg सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन
मित्रांनो, सॅमसंग ची ही सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन टॉप लोडेड आहे. या मशीन ची कॅपॅसिटी ही 7.2 किलो असून, तीन ते चार व्यक्तीसाठी पुरेशी आहे. तसेच या मशीन मध्ये ड्रम हे प्लास्टिक चे बनलेले असतात. यात तुम्हाला 740 RPM चे स्पिन मिळतात जे चांगले पॉवरफुल आहेत. यात तुम्हाला काही एक्सट्रा फीचर्स मिळतात. जसे की Child लॉक सिस्टीम, बझ्झर अलार्म, Duel जेट सिस्टीम.
या मशीन मध्ये पाणी खूप कमी लागते. तसेच या मशीनला इलेक्ट्रिसिटी पण बऱ्याच कमी प्रमाणात लागते. यात तुम्हाला दोन वर्षांची प्रोडक्ट वॉरंटी मिळते व पाच वर्षांची मोटर वॉरंटी मिळते. याची किंमत बघायची झाली तर सॅमसंग ची हि सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन तुम्हाला 9500 ते 10,000 रुपये पर्यंत मिळेल. हे वॉशिंग मशीन शॉक प्रूफ असून खूप टिकाऊ आहे.
Whirlpool (व्हरपूल) 7 kg सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन
मित्रांनो, व्हरपूल चे हे सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन टॉप लोडेड असून हे एक खूप चांगले वॉशिंग मशीन आहे. कारण यात तुम्हाला 1400 RPM चा स्पिन मिळतो. हो खूपच चांगला आहे. कारण स्पिन जेवढा जास्त तेवढच कपडे जास्त लवकर सुकतील. या वॉशिंग मशीन ची कपडयांची कॅपॅसिटी ही 7 किलो असून तीन ते चार व्यक्तीसाठी ही मशीन पुरेशी आहे. तसेच यात तुम्हाला 66 ली चा मोठा टब मिळतो ज्यात Deep वॉश सिस्टीम आहे.
तसेच या मशीन चा कंट्रोल पॅनल हे वॉटर प्रूफ असून यात अनेक चांगके फीचर्स मिळतात जसे की ऑटो रिस्टार्ट, बझ्झर अलार्म वगैरे, व याचा ड्रम हा प्लास्टिक चा बनलेला असून खुप चांगली स्पेस या वॉश टब मध्ये तुम्हाला मिळते. या सेमी ऑटोमॅटिक टॉप लोडेड वॉशिंग मशिनची 2 वर्षाची प्रोडक्ट वॉरंटी व पाच वर्षची मोटर वॉरंटी मिळते. या वॉशिंग मशिन ची किंमत बघायची झाली तर तो 10,000 ते 11,000 पर्यंत असू शकते.
LG 8 kg सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन
मित्रांनो, LG चे सर्वच प्रोडक्ट खुप चांगले असतात. तसेच LG चे सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन टॉप लोडेड असून त्याची 8 किलो ची कपड्यांची कॅपॅसिटी असून चार ते पाच व्यक्तींना ही वॉशिंग मशीन पुरेशी आहे. हे प्रोडक्ट खूप चांगले मानले जाते. बरेच कस्टमर या वॉशिंग मशीन ला जास्त पसंती देतात. या वॉशिंग मशीन मध्ये तुम्हाला 1300 RPM चा हाय स्पिन मिळतो. जो उत्तम स्पिन मानला जातो. त्यामुळे कपडे लवकर सुकतात. तसेच LG चे हे प्रोडक्ट पाणी आणि इलेक्ट्रिसिटी दोन्ही गोष्टी खूप कमी प्रमाणात खर्च करते.
यात तुम्हाला 4 वॉशिंग प्रोग्राम मिळतात जसे की Normal वॉश, Strong वॉश, Gentle वॉश, आणि सोक फंक्शन. याशिवाय काही नवीन टेक्नॉलॉजी सुद्धा तुम्हाला यात मिळतात जसे की रोलर जेट पलसेटर, रॅट प्रिव्हेन्शन, विंड जेट ड्राय सारखे फिचर कपडे जलद गतीने सुखवण्यासाठी तयार केले गेले आहे. या सर्व गोष्टी तुमचे कपडे धुताना खूप मदत करतात. आणि कपडे डॅमेज होण्याचे चान्सेस कमी होतात.
तसेच या वॉशिंग मशीन मध्ये रॅट प्रिव्हेंट सिस्टीम असल्याने उंदरांचा मशीनला काही त्रास होणार नाही. मित्रांनो, या वॉशिंग मशीन मध्ये तुम्हाला 2 वर्षाची प्रोडक्ट वॉरंटी आणि पाच वर्षांची मोटर वॉरंटी मिळते. याची किंमत ही अंदाजे 15 हजार रुपये पर्यंत असू शकते. LG ची ही 8 किलो ची सेमी ऑटोमॅटिक टॉप लोडेड वॉशिंग मशीन जरी महाग असली तरी याचे फीचर्स खूप चांगले आहेत त्यामुळे वॉशिंग मशीन खरेदी करताना हीच विचार नक्की करा.
Amazon Basics 10.2 kg सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन
मित्रांनो, ऍमेझॉन बेसिक्स चे हे मॉडेल एक शानदार आणि सर्वात चांगले असे मॉडेल आहे. या वॉशिंग मशीन चे वजन 26 किलो असून याची कपडे धुण्याची क्षमता म्हणजेच कॅपॅसिटी ही 10.2 किलो ची आहे. जे 6 ते 7 व्यक्तीसाठी पुरेसे आहे. या वॉशिंग मशीन मध्ये तुम्हाला 1300 RPM चे हाय स्पिन मिळते जे तुमच्या कपड्यांना लवकर सुकवते. तसेच याचे वॉश ड्रम हे प्लास्टिक चे बनलेले आहे. यात तुम्हाला दोन वॉश प्रोग्राम मिळतात आणि कपडे सुकवण्यासाठी एक सेपरेट स्पिन टब मिळतो.
तसेच याचे पॅनल हे शॉक प्रूफ व वॉटर प्रूफ आहे. या शिवाय काही चांगले फीचर्स यात तुम्हाला मिळतात , जसे की पंच टाईप पलसेटर, बझ्झर अलार्म, याची प्लास्टिक ची बॉडी सुद्धा ही अँटी रस्ट आहे. या मशीन ची दोन वर्षांची प्रोडक्ट वॉरंटी व पाच वर्षांची मोटर वॉरंटी मिळते. याची किंमत सांगायची झाली तर हे वॉशिंग मशीन तुम्हाला 12 ते 13 हजार पर्यंत मिळू शकते. या वॉशिंग मशीन मध्ये तुम्हाला डिजिटल डिस्प्ले मिळतो जो वॉशिंग सायकल व वेगवेगळ्या वॉशिंग स्टेजेस बद्दल सांगितले जाते.
LG 11 kg सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन
मित्रांनो, LG ची 11 किलो कॅपॅसिटी असलेली ही सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन सात ते आठ व्यक्तींसाठी खूप चांगला ऑपशन आहे. यात तुम्हाला 1300 RPM चा स्पिन मिळतो. तसेच यात वॉशिंग आणि ड्रायइंग असे दोन्ही फंक्शन्स मिळतात. याचे ही ड्रम प्लास्टिक चे बनलेले असतात. या मशीन ची बॉडी ही अँटी रस्ट असून यात वेग वेगळे फीचर्स दिलेले आहेत. जसे की यात Rat Away (उंदरा पासून संरक्षण) सिस्टीम आहे.तसेच कॉलर स्क्रबर दिलेले आहे.
शिवाय ऑटो रिस्टार्ट फंक्शन पण यात मिळते. या प्रोडक्ट ची दोन वर्षांची वॉरंटी मिळते व पाच वर्षाची मोटर वॉरंटी मिळते. आणि याची किंमत ही जवळ पास 17 हजार रुपये पर्यंत असू शकते. किमतीच्या दृष्टीने महाग वाटत असले तरी ही वॉशिंग मशीन वापरण्यास एक उत्तम प्रोडक्ट आहे. शिवाय मार्केट मध्ये या सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन ला सर्वात जास्त पसंती मिळते.
सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन्स ची काळजी कशी घ्यावी
मित्रांनो, जो पर्यंत एखादे उपकरण चांगले काम करणे थांबत नाही तो पर्यंत आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. असेच काही वॉशिंग मशिनच्या बाबतीत पण घडते. जो पर्यंत ते व्यवस्थित काम करते तो पर्यंत आपलं त्याकडे लक्ष नसते. पण जेव्हा त्यात काही बिघाड होतो किंवा कपडे स्वच्छ निघत का नाहीत याचा विचार करतो तेव्हा कळत की आपल्या वॉशिंग मशीन मध्ये काही तरी बिघाड झाला आहे. या गोष्टी होऊ नये म्हणून आपण त्याची देखभाल नीट ठेवली पाहिजे. सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन ची नियमित पणे काळजी घेणे खूप आवश्यक असते.. त्यासाठी खालील टिप्स फॉलो करा…..
- वॉशिंग मशीन नेहमी खोल पर्यंत साफ करा. कारण बऱ्याचदा आपल्याला असे वाटते की वॉशिंग मशीन स्वतःच सगळं स्वच्छ करून घेते. पण तसं नाही ये साबणाचे किंवा डिटर्जंट चे पाणी आल्याने ती जागा घाण होते म्हणजे डिटर्जंट चे काही अवशेष मशीन ला आतून चिकटलेले असतात ते वेळोवेळी साफ केले पाहिजे.
- काही डिटर्जंट मध्ये घाण व कचरा असतो. कपडे धुतल्यानंतर ही त्याचे कण आत मध्ये चिकटून बसतात. त्यामुळे तुमच्या कपड्यांसाठी योग्य डिटर्जंट वापरा.
- तसेच पाण्याचा प्रवाह व्यवस्थित सुरू राहावा यासाठी वॉशिंग मशीन चे आतले आणि बाहेर चे पाईप वेळोवेळो तपासून घ्यायचे आहे. जेणेकरून त्यात ब्लॉकेजेझ होणार नाहीत. साधारणपणे सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन ला तीन पाइप्स असतात. ते वेळोवेळी तपासून घ्या.
- अनेकदा फॅब्रिक चे बारीक कण वॉशिंग मशीनच्या फिल्टर मध्ये अडकतात. त्यामुळे पाइप्स मध्ये पण अडथळे येतात. म्हणून तुमच्या सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनचे ड्रेन फिल्टर्स सहा ते सात वॉश नंतर स्वच्छ करून घ्या.
- सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक वॉश नंतर थोडा वेळ तरी वॉशिंग मशीन चे झाकण उघडे ठेवा. त्यामुळे मशीन च्या आतील नाजूक भाग कोरडा राहील व तो आर्द्रता मूळे खराब होणार नाही.
- याशिवाय तुमचे सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन मध्ये माउस प्रोटेक्शन सिस्टीम आहे की नाही ते एकदा तपासून घ्या. आणि जरी नसेल तर मशीनसाठी स्टँड आणि एखादे कवर जरी टाकले तरी उंदरांपासून तुमच्या मशीन चे संरक्षण होईल.
मित्रांनो या शिवाय जेव्हा तुम्ही वॉशिंग मशीन खरेदी करायला जाल तेव्हा काही गोष्टी आवर्जून पहाव्यात जसे की तुमचे बजेट किती आहे , त्या मशीन चे फीचर्स काय आहेत, त्यात काय काय फंक्शन्स दिले आहे या गोष्टी आवर्जून जाणून घेतल्या पाहिजे. तसेच त्या वॉशिंग मशीन चा RPM किती आहे या कडे ही लक्ष द्यावे लागेल करण आरपीएम रेट जितका जास्त असेल तेवढे लवकर तुमचे कपडे सुकतील. पण तसं पहायला गेलं तर ही गोष्ट कपड्यांवर निर्भर करते कारण साधारण कपड्याने 300 ते 400 RPM चा स्पिन असतो आणि जीन्स साठी जवळ पास 1000 व त्या पेक्षा जास्त स्पिन रेट हवा असतो. अशा सगळ्या गोष्टी तपासून घेऊन मगच वॉशिंग मशीन खरेदी करा.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन बद्दल शक्य तेवढी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे की तुम्हाला या माहितीचा उपयोग नक्की होईल. तसेच हा लेख तुम्हाला आवडला असल्यास तुमच्या मित्रा सोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद !